* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: APAN MANSAT JAMA NAHI
  • Availability : Available
  • ISBN : 9788184980226
  • Edition : 3
  • Publishing Year : APRIL 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 180
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE STORIES BY RAJAN GAVAS HAVE THE NEW DIMENSIONS OF THE 80S. THEY EXPRESS THE NEW MODE IN WOMEN`S LIVES. THEY REVEAL THE CHANGES IN THE THOUGHTS AND EXPRESSIONS IN THEIR LIVES. MOST OF HIS STORIES HAVE THE RURAL BACKGROUND AND WHILE CREATING THE PICTURE OF A RURAL LIFE, HE DOES NOT IGNORE A SINGLE ASPECT OF IT. HE VERY MINUTELY DESCRIBES EVERY DETAIL IN HIS STORIES. HE SUCCEEDS TO PRESENT THE MENTALITY OF THE WHOLE VILLAGE AS SUCH. HE EXPRESSES THE LIFESTYLE OF A FARMER, HIS RELATIONS WITH OTHER MEMBERS OF THE SOCIETY, THE NEW POLITICS, THE CASTE SYSTEM, AND EVERY SUCH ASPECT RELATED TO A SOCIAL LIFE. OVER THE PERIOD, THE RURAL LIFE IS ALSO CHANGING. IT IS ALSO PRACTICING THE MODERN WAYS OF LIFE. DURING THESE LAST THREE DECADES, THE WHOLE OF MAHARASHTRA IS EXPERIENCING CHANGES; THE MODERN URBANIZATION IS SPREADING TOWARDS THE RURAL AREAS, INVADING IT SWIFTLY. WHILE PRESENTING THIS IN PERFECT STYLE, THE AUTHOR IS GIVING US A WARNING THAT THIS WILL IN TERM HARM THE PREVIOUS VALUES AND MORALE OF THE RURALITES. ALL THESE STORIES CONSTANTLY HAVE THE URBANIZATION AT THE CORE OF THEIR CULTURE. RANDHIR SHINDE:
राजन गवस यांची कथा ऐंशीनंतरच्या कथापरंपरेतील एक महत्त्वाची कथा आहे. त्यांच्या कथेतून आधुनिक काळातील स्त्रीविषयक विशिष्ट मूल्यदृष्टियुक्त जाणिवा, बदलता गावगाडा यासंबंधीची आशयसूत्रे प्रभावीरित्या आविष्कृत झाली आहेत. समकालीन कथेतील त्यांचे वेगळेपण म्हणजे त्यांच्या कथेतून संपूर्ण गावाचे भान प्रकट होते. गावाचा म्हणून एक संवेदनस्वभाव असतो, तो या जीवनदृष्टीतून साकारला आहे. बदलत्या गावगाड्याचे चित्र या कथेत पाहायला मिळते. कृषिसंस्कृतीतील विविध तहेचे संबंध, समूहमानस, नवे सत्तासंबंध, जातीयतेची उतरंड याबद्दलचा जीवनार्थ ही कथा व्यक्त करते. गेल्या तीनेक दशकभरातील महाराष्ट्रातील गावगाड्याचा बदलता अवकाश ही कथा चित्रित करते. आधुनिक काळातील शहरकेंद्रित मूल्यदृष्टीचे लोण हळूहळू ग्रामीण जीवनात कसे पसरते आहे व त्यामुळे या लोकमानसामध्ये घडलेल्या पालटाचे, स्थित्यंतराचे, त्यातील ताणाचे चित्रण ही कथा करते. या गोष्टींमुळे कृषिसंस्कृतीतील एकसंध सहजीवी जीवनदृष्टीला तडे बसत आहेत व स्वार्थार्थ, व्यवहारी, उपयोगितावादी जीवनदृष्टीची रुजवात होते आहे, याची सूचना ही कथा करते. या कथेत शहरी आक्रमणाचा ताण सतत वेंÂद्रवर्ती राहिलेला आहे. नव्या कृषिसंस्कृतीकडे पाहण्याची एक नवी मर्मदृष्टी ही कथा देते. म्हणूनच राजन गवस यांची कथा वैशिष्ट्यपूर्ण ठरते. तिच्यात जीवनार्थाच्या अनेक शक्यता सामावल्या आहेत. – रणधीर शिंदे
सार्वजनिक वाचनालय, नाशिक यांचेतर्फे ` पु.ना. पंडित पुरस्कार` २००९.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#RAJANGAVAS #DEVDASI# JOGTIN# DEV #YALLUBAI #SULI #SUBANA #BAYAJA #PARADI #LIMB #JAT #BABANYA #SHEWANTAKKA #LAGNA #MELA #NAVAS #HITNI #DONGAR #BHANDARBHOG #RIVANAVAYALIMUNGI #CHOUNDAKA #AAPANMANSATJAMANAHI
Customer Reviews
  • Rating Starविजय तानाजी पाटील (तासगाव )

    "ग्रामीण भागातून पोटासाठी शहराकडे वळणाऱ्या लोकांच्या वर्तनात होणारा स्वार्थी बदल आणि गावकुसातील विविध जातीधर्मातील लोकांनी एकमेकांबद्दल जपलेली आत्मीयता, बेरकी राजकारण,कुरघोडी व्यक्त करणारा कथासंग्रह " `पाझर`या कथेत टीव्ही बघून काही तरुणामध्ये जैतूनबी, बाबुलबद्दल निर्माण झालेला द्वेष,परंतु त्याला जुन्या पिढीच्या पाटील व जाणत्या मंडळींनी अजिबात थारा न दिल्याने गावात एकी राहिल्याचे दिसून आलं आहे. `तुटल्या प्रदेशाचा प्रवास` या कथेत मुलांना पोटाला चिमटा देऊन शिकवल्यानंतर, अप्पलपोटा विचार करून रक्ताच्या नात्यांना ती कसे विसरून जातात हे लेखकाने मार्मिकपणे दर्शवले आहे. पण यात त्या घरच्या म्हातारीची कुटुंब एकत्र राहावं ही तळमळ मात्र मनाला चटका लावून जाते. `बहुलकरांच्या मुलाची गोष्ट` या कथेत मास्तर आपल्या दिपूला, त्यांना परिस्थितीमुळे जे शिकता आले नाही ते दिपूने शिकावं यासाठी केलेली जोर-जबरदस्ती त्यांच्याच अंगलट येते अन दिपू घर सोडून निघून जातो. गुरुजींनी आपल्या गरीब भावंडांना अंतर दिलेलं असूनही अशा कठीण प्रसंगी भावाच्या मदतीला ती धावून येतात.शिकल्याने माणूस स्वार्थीच विचार करू लागतो त्यापेक्षा मायेचा पाझर असलेली अडाणी लोक बरी .कथेने आपल्या मुलावर अपेक्षांचे ओझं लादणाऱ्या पालकांच्या डोळ्यातही झणझणीत अंजन घातलं आहे. ` ठराव ` या ग्रामीण कथेत दूधसंघाच्या निवडणुकीतील गाव पातळीवरचे बेरकी आबा, तात्यांचे राजकारण, एकमेकांची जिरवाजिरवी समोर आणली आहे.गरज पडल्यावर एकमेकांच्या जीवावर उठणारं राजकारण मनात घृणा निर्माण करते. ` वळसंगे काका`या कथेत नायकाने आपल्या घराची परिस्थिती सुधारण्यासाठी, आपल्या स्वतःचा बळी देऊन घरच्यासाठी केलेली धडपड दर्शवली आहे. या त्यागाची भावंडांना जाण नसल्याने शेवटी काकालाही स्वतःचा विचार करण्यास परिस्थिती भाग पाडते. `लेखकराव` या कथेत लेखनकलेस धनिकांच्या दावणीस बांधण्याचा प्रकार नायकाने समोर आणला आहे. पिढी जात गर्भ श्रीमंत दादासाहेब आपल्या खानदानाचे अपेक्षित चरित्र लेखकास हवा तो मोबदला देऊन, लिहिण्यास सांगत आहेत. ` छळणारी गोष्ट ` ही एक गुढकथा तात्या ह्या गावकुसातील पुढाऱ्याची. पण कथेने एवढी वळणे घेतली आहेत की, शेवटपर्यंत तात्या नावाचं गुढ वाचकाला उकलतच नाही. `आपण माणसात जमा नाही` या कथेत नायक व त्याच्या आई-वडिलांस, त्यांचे आजोबा नेसत्या कपड्यांनीशी घरातून बाहेर काढतात. त्यानंतर त्यांचा सुरू होतो जगण्याचा संघर्ष.या काळात त्याच्या आईचे वडीलांकडे नायकास शिकवायला ठेवून घेतात.पण मामी व इतर नातलगांचा त्याला विरोध. आजोबांनी घेतलेल्या कणखर भूमिकेमुळे शिक्षण व्यवस्थित पूर्ण होतं. तो सरकारी नोकरी पदरात पाडून घेतो.उपकाराची परतफेड म्हणून आपल्या भाच्यास पुढे शिकवायचे असते.पण त्यावेळेस पत्नीने केलेला आकांडतांडव बघून नायकाला स्वतःचीच लाज वाटते अन तो ठरवतो `आता गावाची शीव नाही बघायची, कारण आपण माणसात जमा नाही` हा प्रसंग डोळ्यासमोर आल्यानंतर आपल्यालाही नायक आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करत आहे असं नक्कीच वाटतं. `तळ` या कथेत कल्लवा ही कथेची नायिका असून, ती एकहाती हातभट्टीचा व्यवसाय कुठल्याच पुरुषाला दाद न देता सांभाळते. तिला बाहेरख्यालीपणा खपत नसल्याने, आपल्या नवऱ्याशी फारकत घेऊनही त्याच्याशी प्रामाणिक राहणारी स्त्री कल्लवा. तिच्यावर हात टाकल्याचे कळल्यावर सत्यवाचे तिच्या पाठीशी उभ रहाणं मनात घर करून जाते. एकंदरीत या कथा मानवी स्वभावाचे विविध पैलू, अन त्याचे परिस्थिती अनुरूप बदलणारे वर्तन आपल्यासमोर उघडून दाखवतात.कोल्हापूर परिसरातील वर्णन वाचून आपल्या आसपास कथा घडत असल्याचा भास होतो. ...Read more

  • Rating StarB Poorva

    #पुस्तक_ओळख #आपण_माणसात_जमा_नाही #रिवणावायली_मुंगी #राजन_गवस कधी कधी काही काही पुस्तकं फार उशिराच हातात पडली असं वाटतं, त्यातलीच ही दोन. आजवर जरी पुस्तकं वाचली तरी पुस्तक वाचताना आपण पुस्तक वाचत आहोत ही जाणीव मनाच्या तळाशी जिवंत असाची पण राजन गवस यांचे कथासंग्रह त्या अर्थाने मला वेगळेच भासले. त्याच्या कथा एखाद्या चित्रपटाप्रमाणे मनःपटलावर जिवंत होतात,स्मृतीत रेंगाळत राहतात. हे कथासंग्रह प्रत्येक मनाचे आहेत.स्त्री आत्ताची असो वा ऐंशी नव्वदीच्या काळातली असो ,तिची जीवनमूल्ये,तिची घुसमट ,तिची बदलत जाणारी दृष्टी हे जितकं राजन गवस यांनी अस्सल पणे मांडलं आहे तितकंच प्रभावीपणे बदलत्या गावगाड्यातल्या माणसाचे औद्योगिकरण बदलत जाणारे राहणीमान,पालटत जाणारे दोन पिढ्यातील अंतर त्यातून होणारी मानवी मनाची उलाघाल याचे अतिशय प्रभावी चित्रण या कथासंग्रहातून केले आहे.एकसंघतेतून विस्कळीत होत व्यवहारी आणि भोगवादी बनत गेलेली पिढी आणि त्यातून जुन्या संस्कारातील मानवी मनावर येणारा ताण अशा मानवी मनाच्या वेगवेगळ्या पैलूंवर या कथा प्रकाश टाकतात. राजन गवस यांच्या कथा जितक्या श्रेष्ठ आहेत तितक्याच विविधांगी आहेत.वाचकाला चौकटीबाहेर विचार करायला लावून जीवनार्थाने समृद्ध करतात. -©पूर्वा बडवे ...Read more

  • Rating Starगोविंद पाटील

    साहित्य अकादमी विजेते मराठीतील आघाडीचे लेखक राजन गवस यांनी लिहलेल्या आणि प्रतिष्ठित दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेल्या ग्रामीण कथांचा " आपण माणसात जमा नाही..."हा संग्रह नुकताच वाचून काढला..संग्रहात एकूण तेरा कथा आहेत. खेड्यापाड्यात शिक्षण आलं...कमालीच्य गरीबीवर मात करून मुलं शिकायला लागली.त्यांच्या शिक्षणासाठी नात्यागोत्यातल्या माणसानी खूप हाल सोसले.प्रसंगी पडेल तो त्याग केला.हा त्याग करणार्यांमध्ये आई बाबा बहिण भाऊ आजी आजोबा चुलता काकू मावशी काका मामा मामी आत्या अशा गावगाडा संस्कृतीच्या आपल्या लोकांनी शिकवण्यासाठी आपलं योददान दिलं.. नव्याने शिक्षित झालेल्या या पिढिकडून मागच्यांच्या काही अपेक्षा होत्या पण नोकरीमुळे शहराचं वारं लागलेल्या या पांढरपेशानी त्यांच्या अपेक्षांना छेद दिला या मध्यवर्ती सुत्राला धरून या कथा लिहिल्या गेल्या आहेत..राजन गवस यांच्या कथांमधून बदलत निघालेला नवा गाव..गावातलं सडकं राजकारण..जातकारण...नातेसंबंधातले ताणतनाव..बदलणारे समूहमानस यांचे मर्मग्राही चित्रण आले आहे..मराठी कथा साहित्यात स्वताचे वेगळेपण सिद्ध करणारा हा संग्रह आपण नक्की वाचायला हवा... ...Read more

  • Rating StarJYOTI GRANTHVARTA MAGAZINE 15-8-2009

    राजन गवस यांची कथा ऐंशीनंतरच्या कथापरंपरेतील एक महत्त्वाची कथा. त्यांच्या कथेतून संपूर्ण गावाचे भान प्रकट होते. गावाचा म्हणून एक संवेदनस्वभाव असतो, तो या जीवनदृष्टीतून साकारला आहे. बदलत्या गावगड्याचे चित्र या कथेत पाहायला मिळते. कृषिसंस्कृतीतील विविधतऱ्हेचे संबंध, समूहमानस, नवे सत्तासंबंध, जातीयतेची उतरंड याबद्दलचा जीवनार्थ ही कथा व्यक्त करते. नव्या कृषिसंस्कृतीकडे पाहण्याची एक नवी मर्मदृष्टी ही कथा देते. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more