* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789391151041
  • Edition : 1
  • Publishing Year : NOVEMBER 2021
  • Weight : 500.00 gms
  • Pages : 200
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
APOORVA ,ALAUKIK ,EKMEV IS ALL ABOUT THE POWER OF NOSTALGIA WHERE ITS AUTHOR YASHODHARA REMINISCES ABOUT THE GOOD OLD DAYS KEEPING THE LEGACY LEFT BEHIND BY THE PEOPLE IN HER LIFE AT THE CENTER OF THE NARRATIVE . AS SHE WAS INDEED BLESSED TO BE BORN IN A FAMILY OF STALWARTS LIKE HER GRANDPARENTS DADASAHEB PHALKE AWARD WINNER BHALJI PENDHARKAR ,ACTOR-PRODUCER FROM THE SILENT- TALKIE ERA LEELABAI PENDHARKAR , FATHER FIGURES LIKE NARENDRA KATKAR –RANJIT DESAI –GAJANAN BHOSLE , HER MOTHER AUTHOR MADHAVI DESAI AND AUNT ACTOR SULOCHANA ; SHE HAD TO PEN DOWN HER MEMORIES AND THOUGHTS ABOUT THEM AND SHARE INSIGHTS ON HOW THEY CONTINUE TO INSPIRE ,MOTIVATE AND MENTOR HER AND MANY OF HER GENERATION . DURING THE JOURNEY THROUGH LIFE SHE MET AND BEFRIENDED PRIYA TENDULKAR , RAHI ANIL BARVE , SAMRUDDHI KERKAR , THEATER- FILM ACTOR DR KASHINATH GHANEKAR AIJAZ AHMED AND MANY MORE… THE STORIES OF THESE PERSONALITIES IN APOORVA … ARE THEREFORE RICH WITH PERSONAL HISTORY AND PROVIDE A SOURCE OF AFFIRMATION, HOPE, AND BELIEF THAT THEIR LEGACY WILL BE PRESERVED.
महान अभिनेत्री आणि माणूस म्हणूनही मोठ्या असणाऱ्या सुलोचनाबाई, अभिजात कविता लिहिणारी बाल कवयित्री समृद्धी केरकर, अभिनेत्री-लेखिका प्रिया तेंडुलकर, सामाजिक जाणीव असलेले, धडपडे नरेंद्र काटकर (यशोधराताईंचे वडील), लग्नानंतरही यशोधराताईंच्या शिक्षणाला पाठिंबा देणारे त्यांचे सासरे गजानन भोसले, साहित्य-कला क्षेत्रातील लोकांशी नातं जुळवायला शिकवणारे थोर साहित्यिक रणजित देसाई, एक मनस्वी कलावंत आणि तेवढाच मनस्वी माणूस डॉ. काशिनाथ घाणेकर, अतिवास्तववादी कथाविश्वातून भेटणारा राही अनिल बर्वे, अभिनेता प्रशांत दामले आणि त्यांचे कुटुंब...या आणि अन्य व्यक्तिरेखांचे अंतरंग आणि बहिरंग सूक्ष्मतेने उलगडणारा, यशोधरा काटकरांच्या लेखणीतून उतरलेला व्यक्तिचित्रसंग्रह.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीसाहित्य #व्यक्तिचित्रणात्मक #बंजाऱ्याचेघर #थर्डपर्सन #अपूर्वअलौकिकएकमेव... #यशोधराकाटकर #घरतिघींचे #आवडती #मातीतलेपाय #गुडबायप्रिया #तेतिघेपप्पापपादादाआणिमी #आमचेडॉक्टर #अस्वस्थ #सख्खेशेजारी #असामान्यजयशंकरदानवे #निर्मलाबाईयशोधराआणियशोधराबाई #इाQन्फनिट #आईबद्दललिहिताना... #मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #मेहतापब्लिशिंगहाऊस #VYKATICHITRANATMAK #YASHODHARAKATKAR #APURVAALOUKIKEKMEVA #THIRDPERSON #BANJARYACHEGHAR #GHARTIGHINCHE #AWADTI #MATITALEPAI #GOODBYEPRIYA #AAMCHEDOCTOR #SAKHESHEJARI #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC#TRANSLATEDBOOKS@50%#MEHTAPUBLISHINGHOUSE
Customer Reviews
  • Rating StarlOKPRABHA - 21-01-2022

    आयुष्याचे संचित... आयुष्यात लहानपणापासून अनेक व्यक्ती येत असतात. त्या व्यक्तींचा प्रभाव कळत नकळत आपल्या जीवनावर पडत असतो. अनेकविध पैलूंमुळे त्या व्यक्ती मनात घर करतात. कधी चांगल्या आठवणींमधून आपल्याला सतत आठवत राहतात, तर कधी त्यांची आठवण आपल्याला व्ाकूळही करून सोडते. लेखिका यशोधरा काटकर यांनी त्यांच्या जीवनावर प्रभाव पाडलेल्या, त्यांना जीवनाच्या विविध टप्प्यांवर भेटलेल्या अशाच व्यक्तींचा धांडोळा घेतला आहे. या व्यक्ती त्यांच्या घरातल्या, नात्यातल्या, व्यवसायातल्या आणि अन्य काही कारणास्तव त्यांच्या संपर्कात आलेल्या आहेत. या व्यक्ती अपूर्व, अलौकिक आहेत आणि म्हणूनच एकमेवही असाव्यात. ही सर्व मंडळी वलयांकित (नावाजलेली, प्रसिद्ध असलेली) आहेत. यातील काही जण तर त्यांचे जन्मापासूनचे साथीदार आहेत. मुखपृष्ठावरची त्या व्यक्तींची छायाचित्रे पाहून पटकन वाटते, की चित्रपट कलावंतावरच्या जीवनकहाण्याच असाव्यात कदाचित, पण तसे नाही, हे पुस्तक वाचताना जाणवते. या व्यक्तींमधील वेगळेपण त्यांनी शोधून काढले. त्यांचा आपल्या जीवनावरचा प्रभाव किंवा त्या व्यक्ती का भावल्या ते त्यांनी या लेखांमध्ये व्यक्त केले आहे. अर्थात हे सर्व लेख हे वेगवेगळे दिवाळी अंक, वृत्तपत्रांच्या पुरवण्या यामध्ये प्रकाशित झालेले आहेत. तरीही ते एकत्रित वाचताना त्यातील गोडवा जराही कमी होत नाही, उलट त्यांचा संग्रह केल्याने ते वाचताना मन गुंतून जाते. लेखिकेच्या जीवनात आलेल्या या व्यक्तींनी तिला काही न मागता आयुष्याचे संचित दिले आहे. हे संचित दुर्मीळ रत्नांसारखे असून त्याने आपले जीवन संपन्न केले आहे, असे त्यांना वाटते. त्यांना कधी निराशा आली किंवा अत्युच्च आनंद झाला तर त्या आवर्जून या रत्नांच्या संचिताची पोतडी उघडतात आणि त्यात गुंतून जातात. त्यांना नवी ऊर्जा मिळते आणि त्या पुन्हा नव्याने कार्यरत होतात. भालजी पेंढारकर, त्यांच्या तीन पत्नी यांच्याविषयी लिहिताना लेखिकेला तिचे बालपण आठवत राहते. आपल्या आजीची माया आठवते. प्रिया तेंडुलकरसारखी मैत्रीण तिला त्या दोघींमधलं साधम्र्य आठवाला लावते. लेखिकेच्या जीवनावर ज्यांचा प्रभाव नेहमीच राहिला आहे. त्या तिच्या जन्मदात्यांपासून (पप्पा) दुसरे वडील (दादा-रणजीत देसाई), सासरे (पपा) यांच्या आठवणी लिहिताना लेखिका सहजपणे भावुक होऊन जाते. नव्या पिढीचा लेखक म्हणून ज्याची ओळख आहे, त्या राही अनिल बर्वेची ओळख करून देताना त्याच्यातील एक प्रकारची अबोलता, संपूर्ण समाजावर आतून दाटून आलेली चीड आणि त्यामुळेच निर्माण झालेली अस्वस्थता हे लिहिताना गूढ ग्रेस वाचतोय असे वाटल्याखेरीज राहत नाहीत. लेखिका निर्मलाबाई देशपांडे यांच्या घराशी लेखिकेचे वेगळेच नाते आहे. या नात्यात एक गंमतही आहे. निर्मलातार्इंची मुलगी यशोधरा देशपांडे यांच्याशी असलेल्या नामसाधर्म्यामुळे त्यांची मैत्री अधिक घट्ट झालीच, पण त्या दोघांच्या नात्यामध्ये आणखी एक साम्य आहे ते म्हणजे त्यांच्या मुलींचीही नावे सारखी आहेत. या नामसाधर्म्यामुळे त्या दोघींना झालेला आनंद वाचताना वाचकालाही मनामध्ये खुसखुशीत वाचताना आनंद अनुभवता येतो. जुन्याजाणत्यांबरोबर लेखिकेने नव्या पिढीच्या प्रतिनिधींनाही आपल्या लेखामध्ये मानाचे स्थान दिले आहे. समृद्धी केरकर असेल नाही तर शर्वरी पेढकर... अशा नवोदित कवींच्याही कवितांवर त्यांना आपले मत व्यक्त करावेसे वाटले आहे. आईने केलेल्या संस्काराची शिदोरी लेखिका अलगदपणे उघडते तेव्हा त्यांच्या कणखरपणाचे रहस्य उलगडते. अभिनेता प्रशांत दामले यांचे शेजारीपण त्या सहजपणे सख्खे शेजारी म्हणून स्वीकारतात तेव्हा वाचताना शेजारी असावेत तर असे... असे वाक्य सहज ओठावर येते. डॉ. काशिनाथ घाणेकर यांचा अंतिम प्रवास आणि त्याबरोबरच त्यांच्या जीवनाशी असलेली नात्याची ओळख वाचताना डोळे कधी पाणावतात हेच कळत नाही. साहित्य, चित्रपट आणि अन्य क्षेत्रातील व्यक्तींची ओळख लेखिका यशोधरा काटकर यांनी इतकी सहज करून दिली आहे, की त्यामुळे हे पुस्तक वाचताना त्यांच्या संचितामध्ये आपणही सहज गुंतून जातो. – वरूण कुलकर्णी ...Read more

  • Rating StarGOAN OBSERVER 17 DEC, 2021

    Rich Tribute To Cinema Families… A lot has been written about several creative personalities who have contributed immensely to Indian culture in general and cinema in particular. But Yashodhara Katkar’s ‘Apoorva, Alaukik, Ekmev’ (Marathi) goes far byond. The book is a rich tribute not only to tinsel town personalities like actors Leelabai Pendharkar, Sulochana, Priya Tendulkar, director Rahi Anil Barve but also those from the world of literature like Marathi authors Madhavi Desai, Nirmala Deshpande, Ranjit Desai and Konkani poet Samruddhi Kerkar among others. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
रवींद्र वानखडे, पुणे.

`छाटितो गप्पा` आज वाचुन झाले. खुप छान लिहिले आहे. लेखकाशी प्रत्यक्ष गप्पाच मारतोय असे वाटले. काही भावुक गोष्टी मनाला हळवं करून गेल्या. विदर्भातील वर्‍हाडी भाषा आपसूकच आपली असल्याची जाणीव होत राहते. मनातील भाव व्यक्त करण्यास ती अधीक सक्षम असल्याच दिसून येते. लेखकाने असेच लिखाण सुरू ठेवून सर्वांना आनंद देत राहावा. आता पुढील पुस्तकाची प्रतिक्षा आहे. ...Read more

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
अनील सहजे, नाशिक.

`महारुद्र` वाचून झालं. भीमरावांच्या व्यक्तित्वाचं कौतुक करू की लेखकाच्या लिखाणाचं ह्या विचारात पडायला झालं. पण एकाचंच का? अतिशय उत्तम कामगिरी लेखकाच्या हातून घडली आहे. ओघवत्या पाण्यासारखं, खळाळतं असं हे लेखन आहे.