* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: ARUNAS STORY
  • Availability : Available
  • Translators : MEENA KARNIK
  • ISBN : 9788184981421
  • Edition : 2
  • Publishing Year : DECEMBER 1998
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 206
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
  • Available in Combos :PINKI VIRANI COMBO SET - 3 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
A REMARKABLE WORK OF INVESTIGATIVE REPORTING AND NON-FICTION WRITING IN THE TRADITION OF TRUMAN CAPOTE`S IN COLD BLOOD JOURNALIST PINKI VIRANI RECREATES THE REAL-LIFE TRAGEDY OF ARUNA SHANBAUG, WHO WAS ATTACKED WITH A DOG CHAIN AND BRUTALLY RAPED IN THE VERY HOSPITAL WHERE SHE WAS A NURSE, AND ABANDONED BY HER FAMILY THEREAFTER. BRAIN-DEAD FOR SIGHT, SPEECH AND MOVEMENT, YET HOPELESSLY ALIVE TO PAIN, HUNGER AND TERROR, SHE NOW LIES, BARELY ALIVE, IN THE HOSPITAL WHERE SHE ONCE TREATED PATIENTS BACK TO HEALTH. VIRANI`S INVESTIGATIONS ALSO UNEARTHED THE CROWNING TRAGEDY: WHILE ARUNA HAS BEEN IN COMA FOR OVER TWENTY-FIVE YEARS, HER RAPIST, A SWEEPER IN THE HOSPITAL, WALKED A FREE MAN AFTER A MERE SEVEN YEARS IN PRISON FOR `ROBBERY AND ATTEMPT TO MURDER`. VIVID AND GUT-WRENCHING, THIS IS A BOOK THAT WILL HAUNT THE READER LONG AFTER THE FINAL PAGE HAS BEEN TURNED. `PINKI VIRANI HAS NARRATED ARUNA`S BRUTALIZATION THROUGH METICULOUS AND PERSISTENT RESEARCH. THE STRUCTURE OF THE BOOK IS NOTABLE IN THE WAY IT RESISTS SENSATIONALISM. ` - TELEGRAPH .`VIRANI`S BOOK IS RESEARCHED, THOUGHT-PROVOKING, SHARP. IT IS BOTH SAD AND ANGRY, SCATHING AND RESTRAINED. ` - PIONEER .`... HER STORYTELLING SKILL AND ABILITY TO RECREATE SCENES POWERFULLY MAKE THE BOOK GRIPPING ... AN AMAZING EFFORT IN RETELLING A TRUE-LIFE TRAGEDY.’- ASIAN AGE COVER DESIGN BY B & M DESIGN .
अरुणा शानबागसारखं प्रकरण हे वैद्यकीय व्यवसायातलं एकमेव प्रकरण असेल! पण तरीही त्यावर म्हणावं तेवढं संशोधन झालेलं नाही. अशा प्रकारचं आयुष्य जगणा-या रोग्यांसाठी दयामरणाचा निर्णय योग्य म्हणता येईल की अयोग्य यावर म्हणावी तेवढी चर्चा झालेली नाही. बलात्काराविरूद्धच्या कायद्यातील पळवाटांबाबतही योग्य तो उपाय झालेला नाही. अरुणाची ना धड मृत आणि ना धड जिवंत अशी अवस्था करणा-या नराधमाला मात्र केवळ सात वर्षांची शिक्षा झाली! तीही चोरी आणि मारहाणीच्या कृत्यांबद्दल. बलात्कार केल्याचा आणि खुनाच्या प्रयत्नाचा आरोप कोणी त्याच्यावर ठेवलाच नाही. अशा प्रश्नांची उठाठेव करण्याची गरज आहेच कुणाला? पिंकी विराणींचे हे पुस्तक या अशा धगधगत्या प्रश्नांना वाचा फोडते.

No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #ARUNACHIGOSHTA #MEENAKARNIK #PINKIVIRANI
Customer Reviews
  • Rating StarVikas Jadhav

    सध्या संपूर्ण भारतभर 2-3 प्रकरणांची चर्चा होतेय,ते म्हणजे निर्भया हत्याकांड व दोषींची फाशी,हैद्राबाद बलात्कार व आरोपींचे एन्काऊंटर, उन्नव बलात्कार प्रकरण. ह्या सगळ्या बातम्या वाचतांना,बघतांना एक घटना आठवली की अजूनही अंगावर शहारे येतात.तिचे नाव अरुणाशानभाग.KEM हॉस्पिटलमध्ये नर्स असलेल्या अरुणावर तिथल्याच एका वॉर्ड बॉय ने बलात्कार केला,त्यावेळी तिचा गळा लोखंडी साखळीने आवळल्या मुळे अरुणा कोमात गेली ती तब्बल 42 वर्षे. ह्या काळात तिचा भावी पती होणार असलेल्या डॉक्टर ने देखील साथ सोडली.पण जिवाभावाच्या मैत्रिणींनी तब्बल 42 वर्ष निरपेक्ष सेवा केली.तिच्या गुन्हेगाराला फक्त 7 वर्षे सजा झाली आणि तो मोकाट सुटला ह्या संघर्षाची कहाणी पिंकी विराणी यांनी शब्दबद्ध केलीय,तर मीना कर्णिक यांनी मराठी अनुवाद केलाय अवश्य वाचावे असे ...Read more

  • Rating StarVikas Jadhav

    सध्या संपूर्ण भारतभर 2-3 प्रकरणांची चर्चा होतेय,ते म्हणजे निर्भया हत्याकांड व दोषींची फाशी,हैद्राबाद बलात्कार व आरोपींचे एन्काऊंटर, उन्नव बलात्कार प्रकरण. ह्या सगळ्या बातम्या वाचतांना,बघतांना एक घटना आठवली की अजूनही अंगावर शहारे येतात.तिचे नाव अरुणाशानभाग.KEM हॉस्पिटलमध्ये नर्स असलेल्या अरुणावर तिथल्याच एका वॉर्ड बॉय ने बलात्कार केला,त्यावेळी तिचा गळा लोखंडी साखळीने आवळल्या मुळे अरुणा कोमात गेली ती तब्बल 42 वर्षे ह्या काळात तिचा भावी पती होणार असलेल्या डॉक्टर ने देखील साथ सोडली.पण जिवाभावाच्या मैत्रिणींनी तब्बल 42 वर्ष निरपेक्ष सेवा केली.तिच्या गुन्हेगाराला फक्त 7 वर्षे सजा झाली आणि तो मोकाट सुटला ह्या संघर्षाची कहाणी पिंकी विराणी यांनी शब्दबद्ध केलीय,तर मीना कर्णिक यांनी मराठी अनुवाद केलाय अवश्य वाचावे असे ...Read more

  • Rating StarDAINIK GAONKARI 6-2-2011

    अरुणा शानभाग या के.ई.एम हॉस्पिटलमधील नर्सवर झालेल्या अत्याचाराची ही सत्यकहाणी आहे. तिच्यावर ओढवलेल्या त्या अमंगल आणि क्रूर अशा घटनेनंतर तिच्या मेंदूवर परिणाम होतो आणि ती नेहमीसाठी अर्धवट बेशुद्धावस्थेत जाते आणि सुरू होतो तिचा जीवनमृत्यूशी संघर्ष. मळ लेखिका पिंकी विराणी यांनी अरुणा विषयीचा सगळा तपशील मिळवून लिखाण केले असल्याने वाचनीयता अधिक आहे. अगदी पहिल्या वाक्यापासून वाचक कथेशी एकरूप होऊन जातो. भाषाशैली इतकी प्रभावी आहे की, घटना डोळ्यांसमोर घडत असल्याचे जाणवते आणि आपण देखील या घटनेचे प्रत्यक्षदर्शी असल्याचा भास होतो. अरुणाची निरागसता, तिचे दु:ख-यातना व्यक्त करण्यात लेखिका यशस्वी झाली आहे. याचवेळी लेखिकेने ‘दया मरणाच्या’ विषयावर देखील मंथन केले आहे. आपल्याला मरण हवंय हे सुद्धा सांगता न येणाऱ्या अरुणाच्या भावविश्वात लेखिका आपल्याला सहजपणे घेऊन जाते. तिची प्रत्येक भावना आपल्यापर्यंत पोहोचवते. ...Read more

  • Rating StarHINDUSTAN CHANDERI 29-9-2010

    आज या घटनेला छत्तीस वर्षाचा कालावधी लोटला आहे. केईएम हॉस्पिटलमध्ये एका नर्सवर झालेला खुनी हल्ला, त्यामुळे तिला झालेले ब्रेनहॅमरेज आणि त्यानंतरचा प्रदीर्घ काळ तिचा जीवनाशी चाललेला निर्विकार संघर्ष. घटना नवीन असताना मेडिकलच्या विद्याथ्र्यांना आवर्जून अ्यासायला उपयुक्त केले जायचे. विधी महाविद्यालयातून कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्याथ्र्यांना पहिल्या वर्षी ही केस अभ्यासावी लागायची. पिंकी विराणीनी ‘अरूणाज स्टोरी’ लिहिली नव्हती तोपर्यंत अरुणा शानबागवर केवळ खुनी हल्ला झाला अशी अनेकांची समजूत होती. आपल्या कायद्याच्या भाषेतील बलात्काराची व्याख्या वेगळी असल्यामुळे गुन्हेगारांना या गुन्ह्यासाठी शिक्षा झालीच नाही. खुनी हल्ला आणि चोरी यासाठी केवळ सात वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा एकाच वेळेला भोगल्याने त्याची सुटका झाली. पिंकी विराणीने सत्य शोधले, त्या घटनेपासून प्रतिसाद देण्याच्या पलीकडे गेलेल्या अरुणाा शानबागकडून काही माहिती मिळण्याची शक्यता नव्हती. त्यावेळी हजर असलेल्या लोकांचा अरुणाच्या नातेवाईकांचा माग काढत सत्याचा मागोवा घेण्याची कामगिरी अतिशय अवघड होती. पिंकी विराणीने ती पेलली. संशोधनात्मक लेखनाचा विषय समजून लोकांच्या बोलण्यातून धागेदोरे जुळवत अरुणाचा भूतकाळ, कौटुंबिक पाश्र्वभूमी, स्वभाव, प्रत्यक्ष घटना घडलेल्या दिवसाच्या मागच्या पुढच्या काळातील संदर्भ शोधून अरुणाची सत्यकथा वाचकांपुढे मांडली. मीना कर्णिक यांनी भाषेला योग्य वजन देत तीच सत्यकथा मराठीत अनुवादित करून ‘अरुणाची गोष्ट’ या कादंबरीद्वारे वाचकांपुढे मांडली. घटनास्थळ आणि त्यानंतर अरुणाचा दीर्घ निवास (पेशंट म्हणून) केईएममध्येच असल्यामुळे केईएमचा स्टाफ, नर्सेस, डीन हे सगळेच कादंबरीत हजेरी लावतात. मृत नाही आणि फक्त जिवंत म्हणण्याखेरीज अरुणा काहीही करू शकत नाही अशा अवस्थेत तिच्या नातेवाईकांनी तिच्याकडे पाठ फिरवल्यावर गेली अनेक वर्षे तिच्याबरोबर काम करणाNया नर्सेसनी या घटनेनंतर हॉस्पिटलमध्ये रूजू झालेल्या व्रतस्थपणे अरुणाला सांभाळले. अरुणाच्या अत्याचाराइतकीच या नर्सेसच्या माणुसकीची ही कहाणी बनते. एका खुनशी अधम पुरुषाच्या हीनतेबरोबर तेव्हाचे डीन सी. के. देशपांडे अरुणाचा भावी वर डॉ. संदीप सरदेसाई यांच्या सहृदयतेची काहणी बनते. प्रसंगानुसार इतर अनेक पात्रे कादंबरीत हजेरी लावतात. घटनेची उकल करत जातात. पोलीस चौकशी, केस, निकाल या ठरावीक चाकोरीतून केस फिरते आणि नंतर शिल्लक राहतो तो अरुणाचा जीवघेणा संघर्ष. शब्दात व्यक्त करू शकत नाही. तिला डोळ्यांनी दिसत नाही तरीही वेदना तिला जाणवतात. परंतु, या वेदनामय जीवनातून मला मुक्ती हवी आहे हे सांगता न येणाNया अवस्थेत अरुणा शानबाग वर्षानुवर्षे जगते आहे. कादंबरीत प्रत्यक्ष घटना, अरुणाचा भूतकाळ आणि या घटनेनंतर आजपर्यंत सुरू असलेल्या केईएमचा कारभार आणि त्यासंबंधीत व्यक्तीविषयी माहिती देणारे प्रकल्प अशा तीन प्रकरणात कादंबरी आपल्यापुढे उलगडते. कादंबरी संपते आणि वाचकांच्या मनात प्रश्नांची मालिका सुरू होते. स्त्रियांची समाजातील सुरक्षितता आपल्या उपयोगाचा नाही म्हटल्यावर त्याच्या नातेवाईकांची होणारी व्यवहारी प्रतिक्रिया, कोणत्या तरी चुकीने एका जीवाला आयुष्यभर मिळणाNया यातना या सगळ्या मन पिळवटून टाकणाNया विचारांची वाचक विषण्ण होतो. अरुणाची गोष्ट वाचकांच्या मनात करुणा दाटून आणते. या करुणेने वेगळे रूप घेऊन सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने काही ठोस पावले उचलली तरच अरुणाची गोष्ट सार्थकी लागली असे म्हणता येईल. अरुणाचा मूक संघर्ष आणि समाजातील पुरुषी पशू यांची गोष्ट ‘अरुणाची गोष्ट’ मध्ये सापडते. ‘अरुणाज स्टोरी’ या पिंकी विराणी लिखित सत्यकथेचा मीना कर्णिक यांनी केलेला अनुवाद ‘अरुणाची गोष्ट’ आणि रविंद्रनाथ टागोर यांनी लिहिलेली ‘नष्ट नीड’ या विवाहबाह्य संबंधातील गुंतागुंत समर्थपणे दाखवणारी कादंबरी मेहता प्रकाशनने प्रकाशित केली आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more