* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: EMPOWERING WOMEN AS I SEE
  • Availability : Available
  • Translators : MADHURI SHANGBAUG
  • ISBN : 9789387789661
  • Edition : 5
  • Publishing Year : MARCH 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 168
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : POLITICS & GOVERNMENT
  • Available in Combos :KIRAN BEDI COMBO SET - 11 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
I BELIEVE IN CONTINUOUS LEARNING AND SHARING THE KNOWLEDGE. I FEEL THAT IT IS MY DUTY TO WRITE DOWN ABOUT THE THINGS WHICH UPSET ME THE MOST, WHETHER I SEE THEM, LISTEN TO THEM OR READ THEM. WITH OPEN EYES AND MIND WE SHOULD WORK TOWARDS MAKING EVERY WOMAN COMPETENT. I WILL CONTINUE TO WRITE ABOUT THE COMMON MAN`S PROBLEMS, I WILL USE THE POWER OF WORDS TO REACH ALL. DR. 106~ HAS WRITTEN ON THE VARIOUS PROBLEMS OF WOMEN NOW AND THEN. IN THIS BOOK, MANY OF HER ARTICLES ARE BOUND TOGETHER. WE HOPE THAT THEY WILL COMPEL THE READER TO THINK SENSITIVELY ABOUT THE WOMEN AND TO ACT FOR THEIR BETTERMENT.
``सतत शिकणे अन् मिळालेले ज्ञान वाटून घेणे यावर माझा पूर्ण विश्वास आहे. मी जे पाहते, ऐकते, वाचते त्यातील जे मला अस्वस्थ करते, त्याबद्दल लिहिणे हे माझे कर्तव्य आहे असे मला वाटते. विशेषत: स्त्री आणि तरुण यांच्या सक्षमीकरणासाठी सर्वांनी सजग राहून कृती करायची गरज आहे. लेखणीची ताकद वापरून, सामान्यांचा आवाज जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी हाती निशाण धरायचे काम मी यापुढेही करत राहीन.`` डॉ. किरण बेदी यांनी वेळोवेळी वेगवेगळ्या प्रश्नांवर लिहिलेल्या लेखांचे हे संकलन, वाचकांना स्त्रीप्रश्नांबद्दल संवेदनशील करेल आणि प्रतिसाद द्यायला, कृती करायला उद्युक्त करेल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#9TH JUNE #I DARE #ITS ALWAYS POSSIBLE #WHAT WENT WRONG AND WHY #MAJAL DARMAJAL #AS I SEE STRIYANCHE SAKSHAMIKARAN #AS I SEE BHARTIYA POLICE SEVA #AS I SEE NETRUTVA AANI PRASHASAN #BE THE CHANGE FIGHTING CORRUPTION #KIRAN BEDI #MADHURI SHANGBAUG #आय डेअर #इट्स ऑलवेज पॉसिबल #व्हॉट वेंट राँग अ‍ॅण्ड व्हाय #मजल दरमजल #अ‍ॅज आय सी...-स्त्रियांचे सक्षमीकरण...#भारतीय पोलीस सेवा...#नेतृत्व आणि प्रशासन...#भ्रष्टाचाराशी लढा #किरण बेदी #माधुरी शानभाग
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKSATTA 03-04-2005

    रोखठोक वैचारिक मंथन… डॉ. किरण बेदी! काही आठवले का? हो त्याच त्या भारतीय पोलीस सेवेतील सर्वोच्च पदावर पोहोचलेल्या पहिल्या स्त्री-अधिकारी. रॅमन मॅगसेसेसह अनेक पुरस्कारांनी सन्मानित. विविध समाजोपयोगी कामांतून महत्त्वाचा सहभाग. वेळात वेळ काढून स्तंभलेखन या आधी काही पुस्तकांचे प्रकाशन. इ. इ. हा बायोडेटा’ सर्वांना माहीत असेलच. तो पुनहा आठवण्याचे कारण त्यांचे ‘अ‍ॅज आय सी...’ हे नवीन पुस्तक होय. ‘द ट्रिब्यून’ आणि ‘पंजाब केसरी’मध्ये सातत्याने आलेल्या शंभर लेखांचे संकलन या पुस्तकात करण्यात आले आहे. समाज आणि त्यात घडणाऱ्या असंख्य लहान-मोठ्या घडामोडींवर बेदींचे बारीक लक्ष दिसते. किंबहुंना तो त्यांच्या चिंतनाचा विषय आहे. भारतीय पोलीस सेवेदरम्यान आलेले अनुभव या लेखांतून आधिक्याने जाणवतात. पोलीस, प्रशिक्षण केंद्र, पोलिसांची जीवनशैली, त्यांच्याविषयी वाटणाऱ्या आत्मीयतेसोबतच सेवाकार्याचा वारसा चालावा, सांगण्याची धडपड या लेखांतून दिसते. ‘स्त्री’ हा किरण बेदीचा दुसरा जिव्हाळ्याचा विषय मानता येईल. स्त्री शिक्षण, सबलीकरण, अनिष्ट प्रथावृत्तींच्या विरोधात ठामपणे उभे राहणे, स्त्री-शक्तीची जाणीव करून देणे असे कार्य या लेखाद्वारे होताना दिसते. देशाचे भावी नागरिक कसे हवेत, त्यांचे शिक्षण, त्यांच्यावर होणारे संस्कार, त्यांचा सर्वांगीण विकास यादृष्टीने मुलांच्या भवितव्याचा विचार बेदी या लेखात करताना दिसतात. सैनिकांचे बलिदान, देशाभिमान, आपल्या उपयुक्त आर्दर्श ठरणाऱ्या परंपरा त्या वाचकांपुढे ठेवतात. तशाच समाजात चालणारे गैरव्यवहार, साध्या साध्या वाटणाऱ्या प्रश्नांनी घेतलेले भयनाक स्वरूप आणि या साऱ्यांतूनही आशेचा किरण दिसू शकतो, ही भावना यातून व्यक्त होते. परदेशातील कायदा-सुव्यवस्था, ‘इथे-तिथे’ मधला जाणवणारा फरक, तिथल्या चांगल्या-वाईट, आदर्श गोष्टी, दाखले किरण बेदी देतात. स्वत: उत्तम खेळाडू असल्याने खेळ-आरोग्याची महती त्या गातात. काही निवडक लोकांची पत्रे दाखवत त्यावर भाष्य करतात. कधी एखाद्या ठिकाणी आपण केलेले भाषणच ओघवते लिहून जातात. या साऱ्यांतून त्यांचे चतुरस्त्र व्यक्तिमत्व जाणवून जाते. ‘‘मी जे पाहते, ऐकते, वाचते, बारकाईने निरखते त्याचे काय करावे असा प्रश्न मला पडतो. मी ते सर्व विसरून जाऊ शकते, दुर्लक्षू शकते. त्याबद्दल तक्रारी करू शकते वा पुढे बघू म्हणून हात झटकू शकते. पण तसे न करता त्यावर लिहून शब्दांतून माझी अस्वस्थता प्रकट करणे ही मला माझी एक गरज वाटते. म्हणून मी लिहिते आणि लिहित राहीन.’’ या किरण बेदींच्या उद्गारातून त्यांची भूमिका सहज स्पष्ट होऊ शकते. यथार्थ शीर्षके आणि रोखठोक कथन असलेले हे अनुभव बेदींची चीड, प्रेरणा, चित्तवेधक गोष्टी, वैचारिकता असे कंगोरे दाखवतात. समाज वास्तवाच्या असंख्या छटा रंगवून त्यांचे दर्शन वाचकांना घडवायचा त्यांचा मानस आहे. ओघवती भाषा, सुबोध आणि नेमका आशय थोडक्या शब्दांत पोचवणारी शैली बेदींनी आत्मसात केलेली दिसते. वाचकांशी संवाद साधत, सजग करत, त्यांना ‘माणूस’ बनवण्याचे बेदींचे प्रयत्न प्रामाणिक वाटतात. समाज सर्वार्थाने सुंदर व्हावा, असे किरण बेदींना वाटते. त्यासाठी अर्थातच प्रत्येकाने झटायला हवे. म्हणूनच ‘अ‍ॅज आय सी...’ असे म्हणताना तुम्हीही पाहा, असे मन:पूर्वक त्या वाचकांना सांगतात. -राधिका कुंटे ...Read more

  • Rating StarDAINIK DESHDOOT 19-7-2009

    ‘अ‍ॅज आय सी’ (स्त्रियांचे सक्षमीकरण) यात अनुक्रमणिकेवर नुसती दृष्टी फिरवली तरी केवढा मोठा आवाका त्यांनी लेखनातून वाचकांसमोर मांडलाय याची कल्पना येते. त्यांच्या मते स्त्री असणे ही एक मूल्यवान गोष्ट अन् जबाबदारी आहे. स्त्री स्वयंनिर्भर, स्वावलंबी असते ेव्हा ती साक्षात दुर्गालक्ष्मीचे स्वरूप असते. अन् स्त्री जेव्हा शिकलेली नसते, आर्थिकदृष्ट्या दुसऱ्यावर अवलंबून असते, त्यातून मानसिकदृष्ट्याही ती दुस-यावर अवलंबून असते तेव्हा तर तिचे जगणे पुरातन काळातल्या गुलामासारखे असते. किरण बेदींनी आजूबाजूच्या निरीक्षणातून अनुभवातून स्त्रियांचे अनेक प्रश्न यानिमित्ताने उजेडात आणले आहेत. स्त्री शिक्षण, हुंडा, स्त्री भ्रूणहत्या, घरगुती हिंसाचार, स्त्रियांची मानसिकता अशा विषयांवर परखड विचार मांडले आहेत. कृपया वाचू नका, बोला, तुमच्या सर्व शक्तिनिशी, विकासदृष्टीला प्रणाम, कुणीतरी कुठेतरी, इथे अजिबात सहनशीलता दाखवू नका, या प्रश्नांना उत्तरे हवी आहेत, जन्मापासून बंदिवासात, इच्छा आहेत तिथे मार्ग आहे, उत्कृष्ट आणि निकृष्ट आपणच आपल्याला मदत करूया, जबाबदार पालकत्त्व चौफेर व्यक्तिमत्त्व, दुहेरी मूल्यमापन, नव्या पिढीची पहाट अशा अनेक विषयांचे विस्ताराने विवेचन केले असून प्रत्येक स्त्रीच्या मनातल्या भावना, विचार मांडले आहेत. प्रत्येकाने अगदी स्त्री-पुरुष सगळ्यांनी वाचावं असं पुस्तक आहे. ‘अ‍ॅज आय सी’ चे हे तीन भाग वाचून, त्यातून ज्ञान माहिती तर मिळतेच, परंतु प्राप्त परिस्थितीचेही भान येते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more