* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SARASWATIBAI RAJWADE, A CURSED APSARA ON THIS EARTH, A BEAUTIFUL HEROINE OUT OF A WONDROUS NOVEL. HER BEAUTY MADE IT POSSIBLE FOR HER TO BE A DRAMA QUEEN FOR A WHILE. AT A VERY EARLY AGE, SHE TRAVELLED AS A SINGER, ALL OVER INDIA WITH THE BAND. WHEN FIFTEEN, SHE WAS MARRIED TO A HIGH-RANKING OFFICER, AMBIKAPATI RAISHASTRI RAJVADE. THOUGH SHE ENJOYED THE RICHES THIS MARRIED LIFE OFFERED HER, SHE HAD TO SUFFER LONELINESS AS A PART OF THE PARCEL. SHE UTILIZED THIS TIME TO MASTER VARIOUS LANGUAGES. HER FIRST STORY WAS WRITTEN IN TAMIL. VERY SOON SHE STARTED PENNING DOWN HER THOUGHTS IN KANNAD. SHE STARTED PUBLISHING ‘SUPRABHAT’, A MAGAZINE EXCLUSIVELY FOR WOMEN. HER AUTOBIOGRAPHY REVEALS HER SEARCH FOR LOVE THROUGHOUT LIFE, A PROCESS OF SOLITUDE WHILE EXPERIENCING ISOLATION.
सरस्वतीबाई राजवाडे म्हणजे अद्भुत कादंबरीतल्या नायिका किंवा आकाशातून या भूतलावर अवतरलेल्या जणू शापग्रस्त अप्सराच! आपल्या असामान्य रूपामुळे काही काळासाठी त्या रंगभूमीवर झळकल्या. वाद्यवृंदाबरोबर गायिका म्हणून बालवयातच त्यांनी भारतभर प्रवास केला. पंधराव्या वर्षी त्या अंबिकापती रायशास्त्री राजवाडे या उच्चपदस्थ अधिकाऱ्याशी विवाहबद्ध झाल्या. त्यांनी श्रीमंत संसाराच्या सुखाबरोबरच एकान्तवासाचं दु:खही अनुभवलं. या कालखंडात त्यांनी अनेक भाषा आत्मसात केल्या. त्यांनी तमिळमध्ये पहिली कथा लिहिली. त्यानंतर त्यांनी कन्नडमध्ये कथा लिहायला सुरुवात केली. त्यांनी स्वत: स्त्रियांसाठी `सुप्रभात` नावाचं मासिकही चालवलं. सरस्वतीबार्इंचं जीवनचरित्र म्हणजे जीवनभर प्रेमाचा शोध घेत, एकाकी जगत एकान्ताकडे वळलेल्या एका जिवाची कथा!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#ASHICH KAHI PANE#VAIDEHI#UMA KULKARNI# #अशीच काही पाने #वैदेही #उमा कुलकर्णी #
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAMANA 12-12-2021

    कन्नड साहित्यातील सुप्रभात... मराठी साहित्यामध्ये ‘नवकथा’ आणि ‘नवकविता’ या संकल्पनांनी फार मोठा बदल घडवून आणला त्यातूनच पुढे विविध प्रकारच्या लेखन प्रयोगांना चालना मिळाली. मराठी साहित्यसृष्टी आधुनिक काळाशी स्वत:ला जोडून घेत कालसुसंगत साहित्य प्रसवत ाहिली. महाराष्ट्राच्या शेजारीच असलेल्या कर्नाटक प्रांतालाही साहित्याची मोठी परंपरा आहे. त्या स्त्रीवादी नवलेखनाची सुरुवात एका मराठी स्त्रीने केली होती. हे एक वेगळेच वैशिष्ट्य आहे. १९५२ साली कर्नाटकातून ‘सुप्रभात’ हे मासिक निघू लागले. गिरिबाला हे साहित्यिक टोपननाव धारण केलेली कुणी विदुषी त्याची प्रकाशिका, संपादक आणि लेखिकासुद्धा होती. तिच्या कथालेखनातून आधुनिक जगातल्या नव्या स्त्रीच्या भावना, जाणिवांचा उच्चार होत होता. शिवाय तिला कन्नडसह तामीळ, इंग्रजी वगैरे भाषा तर येतातच. पण मराठी ही तिची मातृभाषा आहे. कोण ही बाई? मग सगळ्यांना कळले की, इंग्रज सरकारचे मद्रासचे (आत्ता चेन्नई) डेप्युटी कलेक्टर आणि सिंगापूर ट्रेझरीचे अकाउंन्टंट जनरल अंबिकापती रामशास्त्री राजवाडे या फार मोठ्या उच्चपदस्थ अणि श्रीमंत माणसाची ही विधवा पत्नी असून त्यांचे नाव सरस्वतीबाई राजवाडे असे आहे. परंतु गिरिबाला ऊर्फ सरस्वतीबाई राजवाडे यांची ही नवसाहित्यपताका फार काळ चालू राहिली नाही. त्यांच्या घराण्यात एक वंशपरंपरा चालत आलेली. सुमारे एक हजार वर्षांपूर्वीची शारदांबेची म्हणजे सरस्वतीची मूर्ती होती. एक देऊळ बांधून त्यात त्या मूर्तीची प्रतिष्ठापना करायची अशी राजवाडे साहेबांची इच्छा होती. पण त्यांच्या हयातील ते घडले नाही. आपल्या मृत पतीची ती इच्छा पूर्ण करण्याचे सरस्वतीबाईंनी ठरवले. साहित्य क्षेत्रातला मानसन्मान आणि वेगळी ओळख बाजूला ठेवून सरस्वतीबाईंनी उडुपी या शहरात शारदांबेचे मंदिर उभारले. उर्वरित आयुष्य त्यांनी त्या देवीच्या सेवेतच घालवले. १९९४ साली वयाच्या ८१व्या वर्षी त्या मरण पावल्या. प्रस्तुत ‘अशीच काही पानं’ हे सरस्वतीबाई राजवाडे यांचे चरित्र कन्नड साहित्यातल्या नामवंत लेखिका वैदेही यांनी लिहिले आहे नि कन्नडमधले उत्तमोत्तम ग्रंथ मराठीत आणणाऱ्या उमा कुलकर्णी यांनी ते अनुवादित केले आहे. वैदेही या १९८७ साली सरस्वतीबाईंच्या संपर्कात आल्या. म्हणजे त्यांना केवळ सातच वर्षे चरित्रनायिकेचा सहवास मिळाला. त्यातही सरस्वतीबाई स्वत:च्या पूर्वजीवनाबद्दल बोलणे टाळत असत. त्यांचे स्मरण मात्र तल्लख होते. त्यामुळे त्यांच्याशी वेळोवेळी झालेल्या गप्पांमधून वैदेही यांनी हे चरित्रधागे जुळवले आहेत. – मल्हार कृष्ण गोखले ...Read more

  • Rating Starशिवमार्ग मासिक : मे-जून २०१९

    एका कन्नड लेखिकेच्या व्यक्तिमत्त्वाचं अनोखं दर्शन साहित्याच्या क्षेत्रात योगदान देऊनही दुर्लक्षित राहिलेल्या सरस्वतीबाई राजवाडे त्यांच्या जीवनाच्या उत्तरार्धात उडुपी येथे राहत होत्या. बेंगळूरला एका कार्यक्रमात त्यांचा सत्कार होणार होता. त्या सत्कारसाठी त्यांना आणायची जबाबदारी नामवंत कन्नड लेखिका वैदेही यांच्यावर सोपवण्यात आली होती. त्या निमित्ताने सरस्वतीबार्इंशी त्यांची ओळख झाली. त्या ओळखीचं रूपांतर गाढ स्नेहात झालं. सरस्वतीबार्इंनी आपल्या जीवनाची सलग कहाणी वैदेही यांना सांगितली नाही; पण सरस्वतीबार्इंनी वेळोवेळी सांगितलेल्या आठवणींतून ती उलगडत गेली आणि वैदेही यांनी ती शब्दबद्ध केली. ‘अशीच काही पाने’ या शीर्षकासह ती जीवनकहाणी मराठीत आणली आहे उमा कुलकर्णी यांनी. विसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात सरस्वतीबार्इंचा जन्म झाला. त्यांचे वडील हरिदास (कीर्तनकार) होते. त्यांच्या आईमध्ये आणि वडिलांमध्ये एका पिढीचं अंतर होतं. सरस्वतीच्या जन्माआधी दोनदा त्यांच्या वडिलांनी त्यांच्या आईला गर्भपात करायला लावला. सरस्वतीच्या वेळेला गर्भपात करायला नकार दिला म्हणून त्यांचे वडील त्यांच्या आईला माहेरी सोडून गेले आणि त्यांनी तिला परत नेलं नाही. सरस्वतीच्या जन्मानंतर तीन वर्षांनी त्यांचे वडील मरण पावले. बापाला खाल्लेली मुलगी म्हणून त्यांच्या आईने त्यांचा लहानपणी दुस्वास केला. देखण्या रूपामुळे एक-दोन श्रीमंत कुटुंबांनी सरस्वतीला दत्तक घ्यायची तयारी दाखवली; पण त्यांच्या आईने नकार दिला. मोलमजुरी करून जगणाऱ्या आई-आजीबरोबर त्याही गरिबीत जीवन कंठत होत्या. त्यांच्या सौंदर्यामुळे रंगभूमीवर आणि मूक चित्रपटात काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वाद्यवृंदाबरोबर गायिका म्हणून बालवयातच भारतभर प्रवासही त्यांनी केला; पण हे औटघटकेचं वैभव होतं. परत आपल्या गावी येऊन त्या दारिद्र्यात जीवन कंठू लागल्या. पंधराव्या वर्षी एका उच्चपदस्थ अधिकारी असलेल्या बावन्नवर्षीय विधुराशी त्यांचा विवाह झाला; मात्र त्यांच्या पतीमध्ये आणि त्यांच्यामध्ये वैवाहिक संबंध निर्माण होऊ शकले नाहीत. पतीच्या नोकरीच्या निमित्ताने तंजावर, मद्रास, सिंगापूर, बेंगळूर अशी भटकंती करत असताना सरस्वतीबार्इंनी अनेक भाषा आत्मसात केल्या. अनेक स्त्री-प्रधान कथा लिहून लेखिका म्हणून मान्यता मिळवली. स्त्रियांसाठी `सुप्रभात` नावाचं मासिक चालवलं. वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी त्या विधवा झाल्या. त्यांच्या घरातील सरस्वतीच्या एका पुरातन मूर्तीची देऊळ बांधून त्यात प्रतिष्ठापना करावी, अशी त्यांच्या पतीची अंतिम इच्छा होती. पतीची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी त्या उडुपी या पतीच्या गावी आल्या आणि तिथे देऊळ बांधून त्यांनी सरस्वतीच्या मूर्तीची त्यात प्रतिष्ठापना केली आणि मग त्यांचं सगळं जीवनच देवीमय झालं. एका कुटुंबाच्या हवाली हे देवस्थान करून त्या शेवटपर्यंत त्या कुटुंबात राहिल्या. सरस्वतीबार्इंच्या या चरित्रातून ठळकपणे समोर येणारी बाब म्हणजे जीवनातल्या सगळ्या अनुभवांकडे साक्षी भावाने पाहण्याची त्यांची वृत्ती. कुठेही कटुता नाही, त्रागा नाही, मीपणा नाही. जाणवत राहते त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील सात्त्विकता, लीनता आणि शुचिता. त्यांच्यातील या सकारात्मकतेविषयी वैदेही लिहितात, ‘अशा जन्मजात स्वतंत्र मनोवृत्तीच्या या लेखिकेनं आयुष्यभर स्वप्नं, स्वप्नं आणि फक्त स्वप्नंच पाहिली! कुठल्याही परिाqस्थतीत त्यांनी आपला स्वप्नलोक बंद केला नाही. कदाचित त्यामुळेच त्या जीवनाच्या विप्लव प्रवाहात वाहून न जाता स्थिर उभं राहून उद्याच्या जगात जगायचं बळ राखून होत्या. अखेरपर्यंत त्यांच्यामधली मुग्धता, लहान-सहान बाबतीतला खोडकरपणा, पटकन उभं राहून इकडं-तिकडं फिरत अनुभवायचा उत्साह, कल्पक शक्ती, स्वप्नाळूपणा, विशेष ग्रहणशक्ती, घडून गेलेल्या घटना पुन्हा नजरेसमोर उभं करायची प्रतिभा अजिबात लपून राहात नव्हती.’ तर अशा या लेखिकेचं हे चरित्र छोटेखानी असलं तरी बराच आशय सांगून जातं. उमाताईच्या रसाळ अनुवादामुळे ते वाचनीय झालं आहे. ...Read more

  • Rating StarMaharashtra Times SAMWAD 21st April 19

    एका अद्भुत जीवनाचे शब्दचित्र! लहानपणी भोगलेले दारिद्र्य, पित्याचे न मिळालेले प्रेम, आईच्या वात्सल्यापेक्षा माथी आलेला दुस्वास, रम्यतेपेक्षा कष्ट आणि मेहनतीने होरपळून गेलेले बालपण, आयुष्यात आलेले अवमानाचे प्रसंग... हे सगळे सुमारे शंभर वर्षांपूर्वीचया काळात आणि तेही एका स्त्रीच्या आयुष्यात येणे म्हणजे त्या स्त्रीची केवढी मोठी कसोटी पाहणारे असेल, याची कल्पनाच केलेली बरी. मात्र तरीही त्या कशाचीही कटुता आयुष्यात न ठेवता पुढे आलेल्या काहीशा सुखदायी आयुष्याचा सारीपाट मांडून पुन्हा योग्य वेळी इदं न मम म्हणत साधे आयुष्य जगणाऱ्या आणि एका प्रकारे कृतार्थतेची भावना जपणाऱ्या सरस्वतीबाई राजवाडे यांचे व्यक्तिमत्त्व बहुढंगी आणि जीवन कर्तृत्वशाली. त्यांची जीवनकहाणी कोणासाठीही प्रेरणादायी ठरावी अशीच. लेखिका वैदेही यांनी राजवाडे यांना भेटून त्यांच्या आठवणी एकत्र करायला सुरुवात केली आणि त्यामुळे या कन्नड लेखिकेची जीवनकहाणी सर्वांसमोर येऊ शकली. उमा कुलकर्णी यांनी केलेला मराठी अनुवाद सकस!  उडुपीजवळील एका गावात जन्मलेल्या सरस्वतीबाई. त्यांचे वडील पन्नाशीतील; तर आई विशीत. त्यामुळे वडिलांना मूल नको होते आणि आपल्या पत्नीला त्यांनी गर्भपाताचे औषध दोनदा दिले होते. तथापि तिसऱ्या वेळी मात्र सरस्वतीबाईंची आई रस्त्यावर पळत सुटली. आपल्या पतीला दूषणे दिली आणि जमलेल्या गर्दीने देखील त्यांना धारेवर धरले. त्याने अपमानित झालेल्या त्या गृहस्थाने आपल्या पत्नीला तिच्या माहेरी नेऊन कायमचे सोडून दिले. सरस्वतीबाईंचा जन्म झाल्यापासून त्यांना वडिलांचे प्रेम तर मिळालेच नाही; पण `वडिलांना गिळणारी` अशा नजरेतून पाहणाऱ्या आईचे वात्सल्य देखील त्यांच्या अनुभवाला आले नाही. घरचे दारिद्र्य; कोणी या मुलीला दत्तक घ्यायची तयारी दर्शविली तरी आईच्या नकारामुळे सरस्वतीबाईंना कायमच दारिद्र्यात आणि धाकात राहायला लागले. त्यांच्यावर चोरीचे आरोप अनेकदा झाले; एकदा तर त्यांचा आईनेच त्यांना चोरीच्या आरोपावरून पोलिसांत दिले. अशा हृदयद्रावक घटना-प्रसंगांमुळे सरस्वतीबाईंचे आयुष्य लहानपणी किती हलाखीचे, हेटाळणीचे आणि मानसिक दडपणाचे गेले असेल याची कल्पना येते. दिसायला सुंदर असल्याने एका नाटक कंपनीने त्यांना काम दिले. अर्थात हे ओळखीतून मिळाले. मात्र तेथेसुद्धा त्यांना एका माणसाच्या आकसातून मार खावा लागला. काही प्रसंग मनावर कायमचे ओरखडे उमटवितात. सरस्वतीबाई लिहितात: `त्या माणसाची अखेरीस फार वाईट अवस्था झाली होती... ती कानावर आली की मला वाटायचे नक्कीच माझा शाप त्याला भोवला असणार.` नाटकानंतर मूक चित्रपटांतदेखील त्यांना काम मिळाले आणि त्यांचा अभिनय वाखाणला जाऊ लागला होता. मात्र मुंबई त्यांना मानवली नाही आणि त्या गावी परतल्या. शिक्षण घेऊ लागल्या; मात्र त्यात त्यांना गती नव्हती. त्याच सुमारास गावात एक वाद्यवृंद आला होता आणि त्या कंपनीत सरस्वतीबाई रुजू झाल्या. देशभर गायिका म्हणून वाद्यवृंदात सहभागी झाल्या. इतक्या लहान वयात त्या स्वतःसाठी आणि आपल्या आईसाठी कमवीत होत्या हे उल्लेखनीय.  अंबिकापती रायशास्त्री राजवाडे यांनी सरस्वतीला पाहिले. ते तंजावरमध्ये त्याकाळी डेप्युटी कलेक्टर होते. त्यांनी या पंधरा वर्षे मुलीशी विवाह केला तेव्हा त्या दोघांतील वयाचे अंतर होते सदतीस वर्षांचे! ते वडिलांसारखे नव्हे तर आजोबांसारखे होते असे त्यांनी लिहिले आहे! लग्नानंतर सरस्वतीबाईंच्या आयुष्यात स्वास्थ्य आले ते प्रामुख्याने आर्थिक. सिंगापूरला राजवाडे यांची बदली झाली आणि सरस्वतीबाईंना सिंगापूरला जाता आले. आपल्या पतीच्या पुस्तकवेडाविषयी जसे त्यांनी लिहिले आहे, तद्वतच त्यांच्या विचित्र स्वाभाविषयी देखील अनुभव सांगितले आहेत. बाहेर जाताना आपल्या पत्नीला घरात ठेवून बाहेरून कुलूप लावून ते जात अशी आठवण त्यांनी सांगितली आहे. पण त्याच काळात त्यांचे वाचन सुरु झाले, कारण घरात ग्रंथसंग्रह मोठा होता. एका स्नेह्याने एका मराठी मासिकाचा अंक त्यांना सिंगापूरला पाठवून दिला आणि मराठी सरस्वतीबाईंनी आत्मसात केली असल्याने त्या तो अंक वाचू शकल्या आणि आपणही लिहू शकतो अशी उमेद त्यांना वाटू लागली. त्यांनी मराठी कथा त्याच मासिकाकडे पाठविली; मात्र ते मासिक होते आणि मग त्यांनी तीच कथा कन्नडमध्ये लिहिली. त्या कथेचे कौतुक कन्नडमधील राष्ट्रकवी मानले जाणारे गोविंदराय पै यांनी केले आणि तेथून सरस्वतीबाईंचा साहित्याच्या क्षेत्रातील प्रवास सुरु झाला; पण लवकरच त्यांचा दाम्पत्य म्हणून सुरु असलेला प्रवास अर्ध्यावरच संपला. त्या बंगलोरला आणि नंतर उडुपीला आल्या आणि तेथून त्यांचा लेखनाचा एका अर्थाने यज्ञ सुरू झाला. आपल्या खऱ्या नावाने त्या लिहू लागल्या. कथा-कविता त्या लिहू लागल्या आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळू लागला. नव्याने लिहू लागलेल्या स्त्रियांना स्थान मिळावे म्हणून त्यांनी सुप्रभात नावाचे मासिक सुरु केले. ज्या काळात स्त्रियांकडे तुच्छतेने पाहिले जायचे आणि त्यांच्या लेखनाविषयी उपहासाने बोलले जाई, अशा काळात एका स्त्रीने केलेला तो प्रयोग केवळ अनोखा नव्हे तर धाडसी होता हे खरेच. स्वतःकडे मुबलक पैसा होता; पण प्रयोग सामूहिक आहे तो तसाच झाला पाहिजे म्हणून सरस्वतीबाईंनी वर्गणी गोळा करण्यास सुरुवात केली आणि त्यासाठी स्वतः पायपीट केली. ते मासिक वर्षभरच चालले; परंतु त्या बारा अंकांनी अनेक लेखिकांना लिहिते केले. नंतर आपला सर्व पैसा उडुपी येथील मठाला सरस्वतीबाईंनी अर्पण केला आणि त्या तेथेच वास्तव्य करू लागल्या.  कडवट अनुभव, एकाकीपणा, अवमानाचे प्रसंग, लहानपणी मिळणाऱ्या वात्सल्याचा अभाव या सगळ्याचे सावट आपल्या जगण्यावर पडू न देता सरस्वतीबाई उभारी धरुन आणि उमेदीने आयुष्य जगल्या. त्यांच्या आयुष्याचे हे शब्दचित्र प्रेरणादायी आणि तितकेच लोभस झाले आहे यात शंका नाही! ...Read more

  • Rating StarAmruta Chougule

    सरस्वतीबाई राजवाडे म्हणजे अद्भुत कादंबरीतल्या नायिका किंवा आकाशातून या भूतलावर अवतरलेल्या जणू शापग्रस्त अप्सराच! आपल्या असामान्य रूपामुळे काही काळासाठी त्या रंगभूमीवर झळकल्या. वाद्यवृंदाबरोबर गायिका म्हणून बालवयातच त्यांनी भारतभर प्रवास केला. पंधराव्ा वर्षी त्या अंबिकापती रायशास्त्री राजवाडे या उच्चपदस्थ अधिकाऱ्याशी विवाहबद्ध झाल्या. त्यांनी श्रीमंत संसाराच्या सुखाबरोबरच एकान्तवासाचं दु:खही अनुभवलं. या कालखंडात त्यांनी अनेक भाषा आत्मसात केल्या. त्यांनी तमिळमध्ये पहिली कथा लिहिली. त्यानंतर त्यांनी कन्नडमध्ये कथा लिहायला सुरुवात केली. त्यांनी स्वत: स्त्रियांसाठी `सुप्रभात` नावाचं मासिकही चालवलं. सरस्वतीबार्इंचं जीवनचरित्र म्हणजे जीवनभर प्रेमाचा शोध घेत, एकाकी जगत एकान्ताकडे वळलेल्या एका जिवाची कथा! ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more