* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788184980493
  • Edition : 2
  • Publishing Year : AUGUST 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 232
  • Language : MARATHI
  • Category : SCIENCE FICTION
  • Available in Combos :SHUBHADA GOGATE COMBO SET - 11 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
ASMANI, WHICH LITERALLY MEANS `FROM THE SKY` ,IS A COLLECTION OF THIRTEEN SCIENCE FICTION STORIES BY RENOWNED WRITER SHUBHADA GOGATE. THE STORIES COVER VARIOUS SUBJECTS LIKE SPACE TRAVEL, GENETIC ENGINEERING, ALIENS,ROBOTICS, TIME TRAVEL ETC. THEY TELL US OF POSSIBLE SITUATIONS WHICH CAN ARISE OUT OF THE GALLOPING ADVANCEMENT OF VARIOUS BRANCHES OF SCIENCE, HUMAN RESPONSE AND EMOTIONAL INVOLVEMENT IN THESE SITUATIONS, AND POSSIBLE SOLUTIONS TO THEM.
विज्ञानकथा’ हा प्रकार आता मराठीला नवीन राहिलेला नाही. अनेक वर्षं दुर्लक्षित राहिलेल्या विज्ञानकथेनं आता चांगलं बाळसं धरलं आहे. आज ज्ञात असलेल्या विज्ञानाच्या खांद्यावरून भविष्यातल्या शक्यतांकडे डोकावून पाहण्याचा प्रयत्न करणारा हा वाङ्मयप्रकार आता लोकप्रिय झालेला आहे. असं डोकावून पाहणं विस्मयजनक तर असतंच, शिवाय ते मनोरंजकही ठरतं. शुभदा गोगटे हे मराठी विज्ञान साहित्यातलं एक मान्यवर नाव. विज्ञानकथा, विज्ञानकादंबरी, विज्ञानलेख असे अनेक प्रकार त्यांनी समर्थपणे हाताळले आहेत. त्यांच्या अनेक कथांना व कादंबरीला विविध पुरस्कार मिळालेले आहेत. क्लोनिंग, कालप्रवास, यंत्रमानव अशा अनेक विज्ञान विषयांवरच्या त्यांच्या कथा या संग्रहात समाविष्ट आहेत.गवत खाऊन काम करणाNया यंत्रमानवाची गंमत ‘बकाबक’मध्ये आहे, वंशशास्त्राच्या घोडदौडीत निर्माण होऊ शकणारी शक्यता ‘मार्जिनल्स’मध्ये दिसते तर कालप्रवासाचा उपयोग करणारे चोर-पोलीस ‘कालचतुराची चित्तरकथा’मध्ये भेटतात. भविष्यातल्या शक्यतांमध्ये संभाव्य मानवी भावभावनांचं चित्रण करणाऱ्या या कथा आहेत.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
ASMANI #SHUBHADA #GOGATE #BAKABAK #MARGINALS #PRAVASIDAS #YANTRSAJEEVACHA #VARAS #KALPADI #SAKHA #AVER #JANM-JANMANTAR #PAHUNI #KALCHATURACHI CHITTARKATHA #DHAVAT BHET
Customer Reviews
  • Rating StarRATNAGIRI EXPRESS 16-11-2009

    ‘अस्मानी’ या कथासंग्रहात रंजक विज्ञानकथांचा समावेश करण्यात आला आहे. गवत खाऊन काम करणाऱ्या यंत्रमानवाची गंमत ‘बकाबक’ या कथेत दिसते. वंशशस्त्राच्या घोडदौडीत निर्माण होऊ शकणारी शक्यता ‘मार्जिनल्स’ या कथेमध्ये आढळते तर कालप्रवासाचा उपयोग करणारे चोर-पोलीस‘कालचतुराची चित्तरकथा’मध्ये भेटतात. भविष्यातील शक्यतांमध्ये संभाव्य मानवी भावनांचं चित्रण करणाऱ्या या कथा आहेत. अस्मानी या शीर्षककथेमध्ये एका शेतकऱ्याची कथा चितारली आहे. या शेतकऱ्याच्या शेतात एके दिवशी अचानक भूकंप होतो. नंतर दररोज ठरलेल्या वेळी असा भूकंप होतो. या दरम्यान त्याच्या शेतातील पिकांची वाढ राक्षसी वाटावी अशी होते आणि एक दिवस सारं शेत उद्ध्वस्त होतं. रोज ठराविक वेळी होणाऱ्या या भूकंपाचं रहस्य काय हे शोधून काढण्यासाठी मंत्र-तंत्राबरोबरच पोलिसांचीही मदत घेतली जाते. अखेर जमिनीला बसणारे हे धक्के म्हणजे भूकंप नसून जमिनीत गडप झालेल्या आणि उड्डाण करू इच्छिणाऱ्या एका यानाची ती करामत असल्याचं लक्षात येतं. या साऱ्या कथांची मांडणी गोगटे यांनी त्याचे तपशील अगदी तर्काला पटतील, असे दिले आहेत. सामान्य वाचकालाही सहज खिळवून ठेवतील अशा या कथा आहेत. बारीकसारीक तपशिलामुळे जणू आपण तो अनुभव घेत आहोत अशी जाणीव कथा वाचताना होते. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKASHA 11-10-2009

    इंग्रजी साहित्यात विज्ञान कथेचे दालन समृद्ध आहे. मराठी साहित्यात आता कुठे या कथाक्षेत्राला चांगले दिवस येत आहेत. ललित साहित्यात कथा लिहिताना कल्पनेचे प्रचंड स्वातंत्र्य असते. विज्ञानकथेबद्दल तसे म्हणता येत नाही. विज्ञानात वैज्ञानिक तथ्य बाजूला ठेवून था लिहिता येत नाहीत. विज्ञानकथा लिहिताना विज्ञानाचे निकष पाळावेच लागतात हे एक अत्यंत अवघड असे काम आहे. वैज्ञानिक शोधात स्वतःच्या कल्पना घुसवता येत नाहीत किंवा वैज्ञानिक शोधाचे जे निकष आहेत ते त्याची तोडफोड करता येत नाहीत. अलीकडच्या काळात विज्ञानविषयक कथा लिहिणारे ललित साहित्यिक पुढे आले आहेत. काही वर्षांपूर्वी डॉ. जयंत नारळीकर यांचा विज्ञानविषयक कथासंग्रह खूपच लोकप्रिय झाला होता. आता या क्षेत्रात शुभदा गोगटे नावरूपाला आल्या आहेत. इंग्रजी साहित्यात विज्ञानाच्या दृष्टीतून भविष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला जातो. चार-सहा शतकानंतर माणूस कसा असेल, माणसाची अवस्था कशी असेल, समाजरचना, घर बांधणी, सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात काय काय बदल झाले असतील अशा अनेक विषयांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जातो. अलीकडेच इंग्रजीतील मार्कर ही कादंबरी जगभरात गाजली. मार्कर या कादंबरीत कर्करोगाचा विषाणू आपल्या शरीरात आहे असे लक्षात आल्यानंतर संबंधित नायिका या घटनेला कशी सामोरं जाते त्याचे वर्णन आलेले आहे. विज्ञानकथेला एक विशिष्ट असा वाचक वर्ग लाभलेला आहे. त्यातील बहुतांशी लोक विज्ञान या विषयात रस घेणारे असतात. काही लोक विज्ञान विषयात शिक्षण घेतलेले असतात. ज्यांना थोडीफार विज्ञानाची माहिती आहे अशा लोकांसाठी एक काल्पनिक जग उभे करून त्यांची करमणूक करणे आणि करमणूक करताना भविष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न करणे हे एक अवघड काम आहे. शुभदा गोगटे यांनी आपल्या ‘अस्मानी’ या कथासंग्रहात हे काम अत्यंत जबाबदारीने पार पाडले आहे असे म्हणावे लागेल. विज्ञानकथा लिहिणाऱ्यांनी स्वतःहून काही बंधने घालून घेतली पाहिजेत. काही वर्षांपूर्वी विज्ञानाचा गंधही नसलेल्या एका लेखिकेने विज्ञानविषयक कथा लिहिल्या आणि प्रकाशकाने त्या पुस्तकरूपाने छापल्याही. ते पुस्तक डॉ. जयंत नारळीकर यांच्या पाहण्यात आले त्यांनी चाळले आणि विज्ञानकथेच्या नावावर काल्पनिक कथा लिहिणाऱ्या लेखिकेबद्दल नाराजी व्यक्त केली. विज्ञान म्हणजे सत्य वैज्ञानिक कथाचा उपयोग समाजातील अंधश्रद्धा निर्मुलनासाठी झाला पाहिजे. विज्ञानविषयक लेखनातून अंधश्रद्धा वाढता कामा नये. असे काही निकष विज्ञानविषयक कथा लिहिणाऱ्या लेखकाने पाळावेत. तसे झाले तरच विज्ञानविषयक कथांची लोकप्रियता वाढेल आणि विज्ञानविषयक कथांतून भविष्याचा वेध घेऊ पाहणारा एक वर्ग निर्माण होईल. तसे वातावरण निर्माण होईल. आता विज्ञानातील शोध अति सूक्ष्म पातळीवर गेले आहेत, त्यामुळे विज्ञानविषयक कथाही तशाच ताकदीच्या असल्या पाहिजेत. अशा कथा लिहायच्या झाल्या तर संबंधित विषयाची माहिती करून घेणे गरजेचे आहे. कोणताही मनुष्य सर्वच क्षेत्रात निष्णात असतो असे नाही. विज्ञानविषयक लेखन करणाऱ्या साहित्यिकाने पाश्चात्य देशातील लेखकांचा आदर्श समोर ठेवला पाहिजे. पाश्चात्य लेखक ज्या विषयावर लेखन करायचे असते त्या विषयाचा अत्यंत बारकाईने अभ्यास करतात. माहिती मिळवितात. संबंधित विषयांबाबत जगभरात काय संशोधन चालू आहे त्याची माहिती घेतात आणि नंतरच लेखन करतात. शुभदा गोगटे यांच्या या ‘अस्मानी’ कथासंग्रहातील काही कथा निश्चितच प्रचंड परिश्रम घेऊन लिहिल्या आहेत असे जाणवते. या कथा विज्ञानाची आवड असलेल्या लोकांना आवडणार आहेत. हे पुस्तक मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केले आहे. मेहताचे पुस्तक म्हणजे चांगलेच असतात याबद्दल चर्चा होण्याचे कारण नाही. पुस्तकाचे मुद्रण सुबक आहे. मुखपृष्ठ कथासंग्रहाला साजेसं आहे. पृष्ठसंख्या २२८ असून या अत्यंत चांगल्या पुस्तकाची किंमत फक्त १८० रुपये आहे. एकूणच पुस्तक संग्रही ठेवावे असेच आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more