* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: AWA MARU - TITANIC OF JAPAN
  • Availability : Available
  • Translators : CHARULATA PATIL
  • ISBN : 9788184981636
  • Edition : 2
  • Publishing Year : OCTOBER 2010
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 248
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :REI KIMURA COMBO SET - 8 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
ON THE 1ST OF APRIL 1945, A JAPANESE HOSPITAL SHIP THAT HAD BEEN GIVEN SAFE PASSAGE BY THE ALLIES, IN THE DEAD OF NIGHT, WAS MISTAKEN FOR A MILITARY VESSEL AND TORPEDOED BY THE AMERICAN SUBMARINE QUEENFISH.IT SANK WITHIN MINUTES TAKING ALMOST ALL OF THE 2007 PASSENGERS TO THEIR WATERY GRAVES. THIS IS THE GRIPPING STORY OF THE AWA MARU, THE LITTLE KNOWN TITANIC OF JAPAN.FOLLOW THE JOURNEY OF KYOKO TANAKA, WHOSE PARENTS AND BROTHER HAD BEEN PASSENGERS ON THE AWA MARU AS SHE SET SAIL ON HER OWN VOYAGE OF DISCOVERY. SHE TRAVELS FROM JAPAN TO SINGAPORE IN SEARCH OF THE TRUTH AND A PIECE OF HER HISTORY AND MAKES POIGNANT AND TOUCHING DISCOVERIES OF THE LIVES OF HER PARENTS AND SOME OF THE OTHER FAMILIES AS THEY PREPARED TO BOARD THE AWA MARU. THE LIVES OF THE DOOMED PASSENGERS OF THE AWA MARU AND THE EVENTS OF THAT HORRIFIC NIGHT WHEN THEY PERISHED ARE ALL TOLD IN THIS BOOK AS NEVER BEFORE.
जगात दुस-या महायुद्धाचा वणवा पेटलेला... जपाननं सिंगापूरमधली ब्रिटिशांची सत्ता उलथवून तिथे आपले हातपाय पसरलेले... परंतु अल्पावधीतच जपानी साम्राज्याच्या सत्तेचा हा सूर्य ढळू लागला. सिंगापूरमधले सारे जपानी पराजयाच्या कल्पनेनं, त्यानंतर उसळणा-या सुडाग्नीच्या दहशतीनं प्रचंड हादरले! जीव वाचवण्यासाठी, जपानला पळण्यासाठी जिवाचा आटापिटा करू लागले. जपाननं सिंगापूरमधल्या जपानी नागरिकांना परत आणण्यासाठी ‘आवा मारू’ नावाची बोट पाठवली. या बोटीला अमेरिकेकडून सुरक्षित प्रवासाची हमी मिळालेली होती. परंतु एकच बोट आणि जपानी असंख्य! बोटीत जागा मिळवण्यासाठी सारे जिवाच्या आकांतानं धडपडू लागले. अखेर, दोन हजार ‘निवडक भाग्यवंतां’ना घेऊन बोटीनं २८ मार्च १९४५ या दिवशी सिंगापूर सोडलं. परंतु १ एप्रिलच्या त्या भयाण रात्री काही वेगळंच घडलं!... कुठे गेले हे सारे लोक?... तीन दशकांनंतर क्योको तानाका झपाटल्यासारखी कुठे गेली? कुठे गुंतले होते तिच्या आयुष्याचे अदृश्य धागे?... आजवर साहित्यकृतीत शब्दबद्ध न झालेली दुस-या महायुद्धाच्या काळातली ही सत्य घटना आणि काळजाचा थरकाप उडवणारे त्यातले तपशील वाचकांनीही अनुभवावेत... रेई किमुरांनी ‘आवा मारू’ या बोटीच्या वास्तव घटनेभोवती इतक्या कसबीपणानं कल्पित कथानकाचा एक दुपेडी गोफ विणला आहे, की ती घट्ट वीण वाचकालाही त्यात ओढून घेते. अतिशय उत्कंठावर्धक रहस्यमयतेनं गतिमान होत जाणारं हे लेखन, पुस्तक वाचून संपवलं तरी वाचकाला पकडून ठेवतं!

No Records Found
No Records Found
Keywords
"#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #JAPANESEMAGNOLIA(MARATHI) #JAPANESEMAGNOLIA #जॅपनीजमॅग्नोलिया #FICTION TRANSLATED FROM ENGLISH TO MARATHI NIRMALA MONE निर्मला मोने REI KIMURA रेई किमुरा #JAPANESEORCHID(MARATHI) #AWAMARUTITANICOFJAPAN(MARATHI) #JAPANESEROSE #MIERIC #"
Customer Reviews
  • Rating Starसई (पुस्तकप्रेमी समूह)

    दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान अमेरिकेच्या पाणबुडीने जपानी प्रवासी असलेले एक निमलष्करी जहाज हलगर्जीपणाने नष्ट केले होते व २५०० निष्पाप जीवांना जलसमाधी मिळाली होती. ही एक खरी घटना. त्याभोवती या जपानी लेखिकेने एक कथा चपखलपणे गुंफली. पण खरंचकिती कुटुंबांची होरपळ झाली असेल. एक जपानी मुलगी , क्योको. तिची आई चिएको शेवटच्या क्षणी तिला एक रहस्य सांगण्याचा प्रय्तन करते. मुलीला एक जुना फोटो मिळतो . तो सिंगापुरचा असतो. प्रचंड उतसुकतेपोटी ती पती च्या पाठिंब्यामुळे सिंगापूरला रवाना होते. एक जुनापुराणा फोटो या व्यतिरिक्त तिच्याकडे काही असत नाही. सिंगापूरच्या जपानी समिती मध्ये ती जाते. तिथे शोध घेताना काही धागेदोरे हाती लागतात . त्यातून तिला समजतं की जिला ती इतकी वर्षे तिची आई समजत होती ती तिची आई नाही आहे. आता मात्र तिला धक्का बसतो. मग पुढचा प्रश्न कि ती कोणाची मुलगी आहे ? तिचे आई वडिल कोण ? आता ते कुठे आहेत? टॅक्सीमधून प्रवास करताना तिला दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान सिंगापूरमधे असलेल्या “जपानी वसाहती बद्दल कळतं,, ती तिथे पोहोचते आणि नवीनच कोडी तसेच धूसर आठवणी सोबत घेऊन येते. अजून काही खटपटीनंतर जपानी समिती कडून तिला एक यादी मिळते,,, ती यादी असते,,,,, अशा लोकांची कि जे दुसऱ्या महायुद्ध शेवटच्या टप्प्यात असताना सिंगापुरहून जपानला आपल्या मायदेशी परतण्याच्या आशेने एका “आवा मारू” नावाच्या जहाजावर चढले होते. या जहाजाला चीनच्या जवळ समुद्रात जलसमाधी मिळते. या यादीमुळे तिला कळतं कि आपल्याला एक भाऊ ही आहे. आता ती पुन्हा एकदा आपल्या जुन्या जपानी वसाहतीतल्या घराला भेट देते. तिथे तिची बालमैत्रीण जी या सर्व इतिहासाची साक्षीदार आहे. ती (मेइलिन) कथा सांगते , तेव्हा तिला सर्व उलगडा होतो..,,,,,, तिचे वडिल (शिगे) जपानी सेनेमधील गुप्तहेर असतात. त्यांना सिंगापूरमधे पाठवल्यावर ते गरोदर पत्नीसहित येतात , जिला आपला थंड जपान सोडून यायचे नसते. तिथे येताना प्रवासात त्यांची एका जपानी कुटुंबासोबत ( तनाका कुटुंब) मैत्री होतो ती कायम टिकते. सिंगापूरच्या उष्ण हवामानाशी जुळवून घेत, जपानच्या आठवणीत झुरत इतर अनेक जपानी लोकांना सोबत घेऊन वसाहत वसवतात. कुटुंब वाढवतात. सवादा आणि तनाका कुटुंबीय यांचे संबंध दिवसेंदिवस गहिरे होतात.वसाहतीला ते अगदी जपानचं प्रतिरूप करतात. हे करताना चिनी वंशाचा स्थानिक कल्पक हुशार सुतार या कुटुंबाच्या संपर्कात येतो. वसाहतीसाठी मदत करताना तो त्यांचाच होऊन जातो. त्याची मुलगी मेइलिन या मुलांसोबत वाढते , खेळते. क्योको , तिचा भाऊ आणि मेइलिन हे कायम एकत्र खेळतात. चिएको आणि मोरी क्योको ला आपल्या मुलासारखेच प्रेम करतात. कारण तिला मूल नाही. ४ वर्षांनी दोस्त राष्ट्रांची सरशी व जपानची पिछेहाट सुरू होते मासाको (शिगेची पत्नी )कुटुंबाची चिंता करत जपानला जाण्यासाठी पाठपुरावा करत राहते. अचानक एके दिवशी बातमी कळते कि “आवा मारू“बोट जपानी लोकांना घेऊन जपानला चालली आहे.या बोटीला दोस्त राष्ट्रांचे अभय आहे व ती बोट सुखरूपपणे जपानला पोहोचणार आहे . जीवाचे रान करून मासाको तिथे सावादा आणि तानाका या कुटुंबांसाठी जागा मिळवते. मेइलिन व तिच्या सुतार वडिलांना हे लोक परत जाणार म्हणून अपरिमित दुःख होते. ( नंतरच्या आयुष्यात पण त्यांना वाटत राहते कि हे लोक कधीतरी परततील.) असंख्य आशा , स्वप्नं घेऊन दोन हजारांहून अधिक माणसे बोटीवर चढतात. प्रवास सुरू होतो. सर्व आलबेल असताना दूरवर एक धडाका होतो, अमेरिकी पाणबुड्या सर्वत्र असतात. त्यामुळे जीव मुठीत धरून सगळे प्रवास करत असतात.त्यांचा आशेचा किरण एकच असतो. त्यांचा कॅप्टन , ज्याची यशस्वी सफरींची नोंद आहे. एक गरोदर स्त्री जिचा नवरा आर्मीत आहे ती निराशावादी बोलत राहते. मासाको अजून घाबरते पण मुळची ती खंबीर आहे. अचानक काही कारणाने बोटीचा ठरलेला रस्ता बदलतो. जपानी आर्मीवाला आणि शिगे दोन्ही घाबरतात. इथेच फासे फिरतात. अमेरिकी पाणबुडीकडून निष्काळजीपणा प्रदर्शित होतो. संदेश चुकीचा वाचला जातो. आणि जे नको व्हायला होतं ते होतं,,, पाणतीर डागले जातात. ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, एक भयानक शेवट!!!! आशाआकांक्षा, स्वप्नं, वर्तमान , भविष्य सगळ्यांचा चक्काचूर! या विनाशातून क्योको (मासाको शिगेची मुलगी)आणि चिएको वाचतात. चिएको तिला मुलीप्रमाणे वाढवून मोठी करते,,, पण एक भळभळणारी जखम उराशी घेऊन. क्योको ऐकून सुन्न होते,, स्वतः ला सावरते,, मेइलिन ला उराउरी भेटते परत आपल्या आधीचे आयुष्य सुरू करते. आपल्या पतीला हे काही न सांगण्याचा निर्णय घेते. दरवर्षी टोकियोतील झोजोजी मंदिराच्या आवाजातील एका कोपरयात विसावलेल्या स्मारकाला मात्र नित्य भेट देते. एक प्रकरण वर्तमान आणि एक प्रकरण भूतकाळ लिहिला आहे. वर्तमानात क्योको चे आताचं जीवन तिचा सिंगापुरमधील शोधप्रवास दाखवलाय. भूतकाळात शिगे , मासाको सवादा ( क्योको चे खरे आई वडिल)आणि चिएको,मोरी तनाका यांचा सिंगापूर निवास, जहाजगमन , जलसमाधी हा प्रवास दाखवला आहे. बोटीवर जे काही घडते ते कोणालाच माहिती नाही. चिएको क्योको ला जपानमध्ये वाढवते. मेइलिन ला उशीरा कळतं बोट बुडल्याचं. तिचे वडील घराची काळजी घेतात. सिंगापूरवासियांचा जपानवर रोष असल्यामुळे मेइलिन व तिच्या वडिलांना समाजरोष सहन करावा लागतो. जपानी समिती ने मात्र शक्य तेवढी माहिती , कागदपत्रे जपून ठेवली आहेत. (((((((((सवादा कुटुंब—- शिगे व मासाको. त्यांची दोन मुले क्योको व तिचा भाऊ तनाका कुटुंब—- मोरी व चिएको जी क्योको ला आयुष्यभर सांभाळते. चिनी सुतार व मुलगी मेइलिन))))) पाणबुडीच्या कॅप्टन वर काही विशेष कारवाई झाली नाही. युद्धाचे असे किती साइडइफेक्ट्स असतील आणि युद्ध संपल्यानंतर कितीकाळ अस्तव्यस्त असेल सर्व! ‘विनाशकाले विपरीत बुदधी ‘हेच खरं पूर्वकाळातील राक्षसांचा पुनर्जन्म होतो की काय जाणे? सर्वांचे आभार!! ...Read more

  • Rating StarUttara Bhadkamkar Pandit

    ही कादंबरी, छान आहे

  • Rating StarMauli Pandhare

    aplya purvajachi kahani shodhnare pustak ahe .read everyone

  • Rating StarNeelakshi M Patil

    Apratim pustak

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more