* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE DAY I STOPPED DRINKING MILK: LIFE STORIES FROM HERE AND THERE IS A BOOK THAT COMPRISES 23 SHORT STORIES THAT ARE BASED ON THE PERSONAL EVENTS IN THE LIFE OF MURTHY. ONE OF THE STORIES IS ABOUT CHITRA, WHOSE STORY IS HIGHLY INSPIRING. THIS BOOK EXPLAINS HOW CHITRA`S LIFE WAS COMPLETELY TRANSFORMED AFTER MEETING MURTHY DURING A TRAIN JOURNEY FROM MUMBAI TO BANGALORE. CHITRA HAD GOTTEN ONTO THE TRAIN WITHOUT A TICKET, BUT THE AUTHOR TOOK HER IN AND PROVIDED HER WITH SHELTER. CHITRA STUDIES AND LATER MOVES ABROAD AND IS VERY APPRECIATIVE OF MURTHY`S GESTURE. IN ANOTHER STORY, THE READERS ARE INTRODUCED TO VISHNU, WHO IS A HIGHLY SUCCESSFUL MAN, YET HE DOESN`T KNOW WHAT IT FEELS LIKE TO BE HAPPY. IN ANOTHER STORY, ENTITLED GANGA`S GHAT, THE READERS ARE INTRODUCED TO AN OLD LADY, WHO DESIRES TO ACHIEVE SOMETHING IN LIFE. SHE EXPERIENCES CONTENTMENT AS A RESULT OF SEEING TO THE NEEDS OF HER FELLOW VILLAGERS BY SETTING UP A BATHING FACILITY. THE STORY CHANGING INDIA REVOLVES AROUND THE AUTHOR`S EXPERIENCES IN AMERICA, HEARING TWO DIFFERENT OPINIONS ABOUT THE COUNTRY. ONE OF THE STORIES IN THIS BOOK REVOLVES AROUND VENKAT, WHO DOESN`T HEED TO OTHER PEOPLE`S ADVICE, BUT ONLY SPEAKS. IN THE COVER STORY OF THIS BOOK, THE DAY I STOPPED DRINKING MILK: LIFE STORIES FROM HERE AND THERE, THE READERS ARE INTRODUCED TO A FAMILY RESIDING IN ODISHA, WITH WHOM THE AUTHOR HAD ONCE STAYED DURING HER VISIT TO THE VILLAGE. AS THE AUTHOR IS A GUEST TO THE FAMILY, THEY DESIRED TO GIVE HER SOME FOOD OR DRINK. THE AUTHOR ASKS FOR A GLASS OF MILK, AT WHICH THEY WERE COMPLETELY FLUSTERED AND UNABLE TO MEET HER REQUEST. THIS BOOK ALSO CONTAINS A HEARTWARMING STORY OF THE LIFE OF A MUSLIM NAMED RAHMAN, WHO WAS BROUGHT UP BY HIS HINDU NEIGHBOUR. THE STORIES IN THE DAY I STOPPED DRINKING MILK: LIFE STORIES FROM HERE AND THERE ARE SIMPLE AND MOVE THE HEART OF THE READER, HELPING THEM TO REALIZE HOW BLESSED THEY ARE.
आयुष्याच्या प्रवासात आपल्याला विविध प्रकारच्या व्यक्ती भेटतात, अनेक घटनाप्रसंगांना सामोरे जावे लागते. त्यातून वेगवेगळे अनुभव येतात. त्यातले काही अनुभव चांगले असतात, काही घटना वाईट. काही सुखकारक असतात, तर काही दु:खदायक. काही व्यक्ती चमत्कारिक असतात, तर काही अनुभव मन थक्क करणारे.... हे अनुभव, या व्यक्ती आपल्याला बरेच काही शिकवून जातात. आपले आयुष्य विविध अंगांनी संपन्न करतात; परिपक्व बनवतात. या संग्रहात सुधा मूर्ती यांनी या अनुभवांना आणि व्यक्तिरेखांना कथारूप दिले आहे. या कथा जशा सुधा मूर्ती यांच्या आहेत, तशा त्या तुमच्याआमच्या आहेत; विलक्षण चमत्कृतींनी भरलेल्या, गुंतागुंतीच्या जीवनाविषयीच्या आहेत. सहजसोप्या कथनशैलीतून उलगडत जाणाया या कथा ‘आयुष्याचे धडे’ देतात; अंतर्मुख करतात.

No Records Found
No Records Found
Keywords
#SUDHA MURTY #N.R.NARAYANA MURTY #LEENA SOHONI #UMA KULKARNI #WISE & OTHERWISE #GOSHTI MANSANCHYA #PUNYABHUMI BHARAT #THAILIBHAR GOSHTI #SUKESHINI AANI ITAR KATHA #BAKULA #AYUSHYACHE DHADE GIRAVTANA #AAJICHYA POTADITALYA GOSHTI #MAHASHWETA #DOLLAR BAHU #SAMANYATALE ASAMANYA #PARIGH #PITRURHUN #ASTITVA #HARAVALELYA MANDIRACHE RAHASYA #TEEN HAJAR TAKE #SARPACHA SOOD #GARUDJANMACHI KATHA #TRISHANKU #A BETTER INDIA A BETTER WORLD #NARAYAN MURTY : MULYA JAPNARA EK ADWITIYA AAYUSHYA #सुधा मूर्ती #एन.आर.नारायण मूर्ती #लीना सोहोनी #उमा कुलकर्णी #वाइज अँड अदरवाइज #गोष्टी माणसांच्या #पुण्यभूमी भारत #थैलीभर गोष्टी #सुकेशिनी #बकुळा #आयुष्याचे धडे गिरवताना #आजीच्या पोतडीतल्या गोष्टी #महाश्वेता #डॉलर बहू सामान्यांतले असामान्य #परीघ पितृऋण #अस्तित्व #हरवलेल्या मंदिराचे रहस्य #तीन हजार टाके #सर्पाचा सूड #गरुडजन्माची कथा #त्रिशंकू #अ बेटर इंडिया अ बेटर वर्ल्ड : नारायण मूर्ती #नारायण मूर्ती : मूल्यं जपणारं एक अद्वितीय आयुष्य
Customer Reviews
  • Rating StarAbhijit Jaysing Angne

    With every story that I read from this book..I kept giving claps for your exemplary Marathi Translation.

  • Rating StarPawan Chandak

    आयुष्याचे धडे गिरवताना हे सुधा मूर्ती लिखित लीना सोहोनी अनुवादित पुस्तक वाचले. इन्फोसिस फाऊन्डेशनच्या संचालिका इतकीच सुधा मूर्ती विषयी ओळख माझ्या मनात होती. शिवाय माझे वाचन संस्कृती तील प्रेरणास्थान गणेश शिवा आयथळ यांच्या मुलाखतीमध्ये सुधा मूर्तीयांच्या विविध 22 पुस्तका विषयी ऐकले होते. पण आपणास माझे हे तोकडे ज्ञान वाचून कीव आली असेल. पण खरेच सांगतो मला इतकीच माहिती होती. पुढे सुधाताईंनी पुस्तकात दिलेल्या एकेक अनुभव, कथा वाचताना त्यांच्या साध्या सरळ भाषेतून व तितक्याच साध्या राणीरहाणीमानातून त्यांची उच्च विचारसरणी व तितकीच समाजाशी एकरूप अशी विचारसरणी आणि समाजाची त्यांचे असलेले प्रेम जिव्हाळा व आपुलकी दिसून येते. मग तो `बॉम्बे टु बेंगलोर` मधील `चित्रा` हे पात्र असो की, `रहमानची अव्वा` किंवा मग `गंगाघाट` म्हणून दररोज गरीब भिकाऱ्यांना गरम पाण्याने अंघोळ घालणारी `गंगा` असो. इतकेच नाही तर `गुणसूत्र` मधून विविध सामाजिक कार्यातून आलेल्या कटू अनुभव, पुढे गणेश मंडळ यापासून ते मृत व्यक्तींच्या अंतिम संस्कार करणारी `मुक्ती सेना` या संस्थेचे प्रेरणादायी कार्य, तसेच समाज सेवा करताना येणारे कधी गोड तर कधी कटू अनुभव पुढे `श्राद्ध` मधून सुधा ताईंनी मांडलेली स्त्री-पुरुष भेदभाव विरुद्ध स्पष्ट वैचारिक मत ज्यात त्यांनी "`श्राद्ध` करणे म्हणजे केवळ पुरुषांचा हक्क नसून स्त्रियांना देखील तितकाच समान हक्क असायला हवा. जसे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रियादेखील पुरुषांच्या बरोबरीने नव्हे तर पुरुषांपेक्षा ही सरस असे उत्कृष्ट दर्जाचे काम करत आहेत. त्यामुळे स्त्री-पुरुष असा काही फरक उरलाच नाही मग कोणत्याही स्त्रीला आपल्या पती किंवा वडिलांचे श्राद्ध करू न देणे हा तिच्यावरील अन्याय आहे. त्यामुळे मी स्वतः इथे साध्या करणारच" हा त्यांचा हट्ट मला खूप आवडला. पुढे `अंकल सॅम` `आळशी पोर्टडो`, `दुखी यश` मधून विविध स्वभावाच्या छान व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. तसेच शेवटी आयुष्याचे धडे मधून आपल्याला आलेले विविध अनुभव वाचकांना बरंच शिकवून जातात. शेवटी `तुम्ही मला विचारला हवे होते` म्हणून एका व्यक्तीचा अहंकार अशी बरीच गोष्टींची शिकवण या पुस्तकातून मिळते. खरंच आयुष्याचे धडे गिरवताना हे पुस्तक वाचताना खूप काही शिकायला मिळाले। धन्यवाद सुधाताई🙏 ...Read more

  • Rating StarRajesh Javir

    सुधामूर्तीं लिखीत पुस्तक आयुष्याचे धडे गिरवताना पुर्ण वाचुन झाली, कळलंच नाही केव्हा वाचून संपलं इतके अतिशय साधं,सोपं आणि छान लिखाण. त्यांच्या जीवनात आलेल्या प्रत्येक लहान-मोठे अनुभव सुधामूर्तींनी सांगितले आहे.आपल्या आयुष्यात येणारा जवळपास प्रत्ेक व्यक्ती काहीतरी आपल्या प्रत्येकाला काहीन काही शिकवून जातो हे मात्र अगदी खरं. सूधा मूर्ती यांची पुस्तकं अतिशय छान. ती पुस्तके सोपी आणि लगेच समझणारी असतात. जीवनात आलेले अनुभव लहान मोठ्या प्रसंगातून ते उलगडवून दाखवतात. त्यांचे स्वत:चे अनुभव सांगताना त्यात कुठेही मोठेपणा नसतो. इन्फोसिस फाउंडेशन च्या माध्यमातून सामजिक कार्य करतांना तसेच आयुष्याचे धडे गिरवितांंना त्यांच्या आयुष्यात आलेल्या व्यक्ति तसेच ऐतिहासिक वास्तू यांच्या कडे एका नैतिक स्टोरी च्या माध्यमातून मांडलेले विचार म्हणजे ही कादंबरी आहे. ट्रेन मध्ये मिळालीली एक अनाथ गरीब मुलगी जिला दत्तक घेऊन उच्च शिक्षण देऊन त्या बळावर तिने अमेरिके पर्यंत घेतलेली झेप. अश्या 23 वेगवेगळ्या व्यक्ति रेखेला एका नैतिक निर्णायक प्रारूप मध्ये सुधा मुर्तींंनी मांडले आहे... सुधा मूर्तींना आपल्या विविध टप्प्यांवर भेटललेली माणसं काहीतरी शिकवून जातात. हे पुस्तक मरगळ दूर करते आणि जीवनाचे पैलू उलगडवून दाखवते. .. ...Read more

  • Rating StarVaibhav Todkar

    "Infosys Foundation" च्या अध्यक्षपदी असलेल्या सुविख्यात सामाजिक कार्यकर्त्या आणि कुशल लेखिका सुधा मूर्ती लिखित हे अप्रतिम पुस्तक.प्रस्तुत पुस्तकात त्यांना भेटलेल्या माणसांची व्यक्तिचित्रे ही कथरूपात त्यांनी सादर केली आहे.अतिशय सरळ सोपी भाषा आणि प्रत्ेक गोष्टीत एक गहिरा अर्थ ,शिकवण असा छान मेळ आहे. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
सौ.प्रतिमा देसाई, नवी मुंबई.

सर्वप्रथम पुस्तकाचं मुखपृष्ठ नजरेतून उतरून विचारात जातं. डबा ऐसपैस मधे न दिसताच जाणवणारं मित्रांचं टोळकं, बिनधास्त वृत्ती आणि खोडकर प्रवृत्ती दर्शवणारं भिरभिरतं फुलपाखरू, दप्तरातून डोकावणारी वह्या पुस्तके म्हणजे नकळत पुढील आयुष्याच्या जबाबदारीच्या जाीवा आणि __एकदम भिंगाचा चष्मा जणू तटस्थ पणे ते सगळं जगणं पहातोय. काही गोष्टी आपण म्हणतो "compliment for each other"तसं हे मुखपृष्ठ. छोट्या छोट्या गोष्टी पण काही ना काही शिकवत माणसाला कसं संस्कारीत करतात याचं उदाहरण म्हणजे " छाटितो गप्पा" . अर्थात काय शिकवणं घ्यायची ते घेणाऱ्या वर असतं. अडगळीत गेलेल्या `थर्मास` वरचा "जोकर" मनात शल्य ठेवून जातो. `गव्हातले खडे ` केवळ मनाला बोचत नाहीत तर त्यातला त्या काळातील सोशिक भाव सांगून जातो. `आनंदाची खुण` ही गोष्ट म्हणजे त्यातल्या बहिणीच्या मायेची जणू ऊबदार शाल . `हॅट्ट्रिक ` ह्या कथेतून नकळत्या वयातच आपल्या संविधानाच्या चौकटीत राहून कायद्याचा धडा गिरवला गेला त्यामुळे `टॅक्स डिपार्टमेंट` मधे असूनही हात बरबटले नाही. `मामूची उधारी ` जन्मभराचं हे ओझं नकळत सजग करून गेलं. पुरणामागची वेदना मधलं मनाला भिडलेलं चिरकालाचं दु:ख , सल डोळ्यात पाणी आणते. सगळ्याच कथा सुरवातीला हलक्याफुलक्या वाटल्या तरी त्यातील वेदना , हुरहूर, खेद अश्या अनेक भावनांचा संगम आहे. सगळ्या बद्दल थोडं थोडं लिहिलं तरी नको ईतकं लांब लचक होईल.तरी एक शेवटचं जे सगळ्यात जास्त भावलं. सुपरहिरो! वा. यातल्या एका वाक्यानी आनंदाश्रु व खंत यांची जाणीव करून दिली. ९५ वर्षाच्या व्याधींनी जर्जर झालेल्या आईचा पलंग दिवाणखान्यात ठेवून वर "दिवाणखान्याची खरी शोभा तीच तर आहे बाकी सगळं शोभेच" हे ठामपणे सांगणाऱ्या लक्ष्मण भाऊंना मनापासून दंडवत. न पाहिलेल्या या व्यक्तीला अनुभवलं ही तुझ्या लेखनाची कमाल. थोडक्यात "छाटितो गप्पा "हा ऐवज आहे अनुभवाचा . यातून पुढल्या पिढीला खुप घेण्यासारखे आहे. अनेक भावनांची गुंफण घालत, तरल अनुभव सांगताना त्यातल्या वेदना,सल,दु:ख, आनंद हळुवार उलगडत केलेलं हे लिखाण जास्त मनाला जागवतं. मनापासून आवडलं पुस्तक. प्रत्येक कथेवर भाष्य करण्याचा मोह आवरावा लागला. लेखकाचं हार्दिक अभिनंदन. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अनिरुद्ध गुप्ते, नागपूर.

स्वतः लेखक समोर बसून गप्पा मारत आहेत असा भास होतो. सर्वच कथा सुंदर आहेत. पुस्तक पुर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेववत नाही, ह्यातच लेखकाचे यश आहे. *"मोबाईल माॅकरी"* कथेत पात्रांविषयी उत्सुकता निर्माण होते. *अगा, जे घडलेचि नाही* कथेतील इलेक्शन ड्यूीचा अनुभव मस्त कथन केला आहे. *थर्मास* सर्वोत्तम असे माझे मत आहे. लेखकाचे मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा !! ...Read more