MRS. PATIL ASKED ME TO GO THROUGH HER ABOVE MENTIONED BOOK. OUT OF CURIOSITY, I AGREED TO DO SO. I AM VERY MUCH IMPRESSED WITH THE WAY SHE HAS DESCRIBED EACH AND EVERY CHAPTER. ACTUALLY, THIS TOPIC OF CHILD NURSING IS VERY DIFFICULT TO UNDERSTAND, BUT SHE HAS MADE IT VERY SIMPLE. TO MAKE THE UNDERSTANDING EASIER SHE HAS ELABORATED IT WITH THE HELP OF DIAGRAMS. THIS BOOK DESCRIBES IN DETAIL THE VARIOUS ASPECTS IN THE GROWTH OF A CHILD, RIGHT FROM THE CARE OF AN INFANT, HIS UPBRINGING, HIS PROTECTION, THE CARE TO BE TAKEN AT THE HOSPITAL AS WELL AS AFTER BRINGING THE BABY HOME, THE DISEASES, THEIR SIGNS AND SYMPTOMS, THE PREVENTIVE METHODS, THE MODE OF TREATMENT AND SPECIAL CARE, ETC. SHE HAS ALSO GIVEN DETAILED INFORMATION OF MANY WELFARE SCHEMES FOR CHILDREN. THIS BOOK IS THE FIRST OF ITS TYPE, BEFORE THIS I HAVE NOT COME ACROSS ANY SUCH BOOK, WHICH IS WRITTEN ESPECIALLY FOR THE BABIES. THIS BOOK WILL BE VERY USEFUL FOR THE STUDENTS OF NURSING COLLEGE, BUT IT WILL BE A GREAT GUIDE TO ALL PARENTS WHILE NURTURING THEIR BABIES. DR. V. A. BHOSALE; M. D. (PAEDIATRICS).
सौ. सुधा पाटील यांनी आपल्या बाल परिचर्या या लिखाणाचे वाचन करण्यास मला विनंती केली. मला त्यांनी काय लिहिले असेल हे पाहण्याची उत्सुकता वाटली व मी वाचण्याचे कबूल केले. काही प्रकरणे वाचल्यानंतर त्यांच्या सविस्तर लिखाणाबद्दल मला त्यांचे फारच कौतुक वाटले.
त्यांनी सहज सोप्या मराठी भाषेतून किचकट विषयही समजण्यास सोपा व सविस्तर रीतीने मांडला आहे. विषय समजण्यास सोपा होण्यासाठी योग्य ठिकाणी सुबक आकृत्यांचाही समावेश केलेला आहे.
या पुस्तकात नवजात बालकाची काळजी, बालकाचे संगोपन, संवर्धन, संरक्षण आजारी बालकाची घरी व रुग्णालयातील काळजी, बालकाला होणारे आजार, चिन्हे व लक्षणे, विशेष उपचार व काळजी यांचे सविस्तर विवेचन केले आहे. तसेच बाल कल्याणकारी योजनांचीही सविस्तर माहिती दिली आहे.
बाल परिचर्या विषयाचे मराठीतील या पुस्तकाच्या दर्जाचे पुस्तक यापूर्वी माझ्या तरी वाचनात आलेले नाही. हे पुस्तक नर्सिंगच्या सर्व कोर्सेसच्या विद्यार्थिनींना निश्चितच उपयोगी पडेल, यात शंका नाही. तसेच आजच्या काळातील प्रत्येक माता-पित्याच्या वाचनात अशी पुस्तके आल्यास त्यांना त्यांच्या मुलांच्या आरोग्याची काळजी सोपे सोपे होईल.
हे पुस्तक लिहिल्याबद्दल लेखिकेचे अभिनंदन!
डॉ. भोसले व्ही.ए.
एम.डी (पेडि.), बालरोगतज्ज्ञ