AN ATTEMPT HAS BEEN MADE THROUGH THIS BOOK TO EXPLAIN THE CASTE-CULTURE OF EIGHTEEN DIVERSE CASTES SUCH AS KANJARBHAT SAMAJ, KAIKADI SAMAJ, GOPAL SAMAJ’S JAAT PANCHAYAT AND PROBLEMS FACED BY THE LAMAN-BANJARA COMMUNITIES. FEW EXAMPLES OF THIS STRUGGLE ARE LATUR’S KATTI-HATODA MORCHA AND THE AURANGABAD PARISHAD. IT TELLS US ABOUT THE AUTHOR’S ATTEMPT TO STABILIZE THEM IN THE FRAMEWORK OF THE SOCIETY BASED ON HIS DETAILED ANALYSIS. THE AUTHOR SPENT HIS ENTIRE LIFE TRYING TO OPEN THIS `CLOSED DOOR` (OF DEVELOPMENT). YET THIS DOOR IS STILL ONLY AJAR. WRITER LAXMAN MANE STRESSES THAT THIS EFFORT WILL YIELD RESULTS ONLY WITH THE SUPPORT OF COMMUNITY MEMBERS. THE WRITER IDENTIFIES WITH THE SUFFERINGS OF ALL THESE TRIBES AND IS BRINGING ABOUT REVOLUTIONARY CHANGES IN THEM WITH EMPATHY AND COMPASSION. THOUGH LITERACY AND THE HOPE OF REFORM HAVE REACHED THIS UNDER-DEVELOPED SECTION OF SOCIETY, COUNTLESS QUESTIONS YET REMAIN UNANSWERED. THIS BOOK IS A KEEN AND RESEARCH-BASED EXPLORATION OF THE LIFE OF THE NOMADS.
कंजारभाट समाज, कैकाडी समाज, गोपाळांची जात पंचायत, लमाण-बंजार्यांचे प्रश्न, अशा अठरा पगड जातींची जात-संस्कृती उलगडण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केला आहे. अभ्यासपूर्वक कार्य करून त्यांना समाजाच्या चौकटीत स्थिरता देण्याचा लेखकाने केलेला प्रयत्न, लातूरचा कत्ती-हातोडा मोर्चा, औरंगाबादची परिषद इ. ही त्या संघर्षाची उदाहरणं. लेखकाने आपलं उभं आयुष्य हा ‘बंद दरवाजा’ उघडण्यासाठी घालवलं. तरीही हा दरवाजा अजून फक्त किलकिला झाला आहे. समाजबांधवांची साथ मिळवून हा प्रयत्न पूर्णत्वास न्यावा लागेल, हे लेखक लक्ष्मण माने सांगत आहेत. या सर्व जमातींची दु:खं स्वत:ची समजून, लेखक मायेची पाखर घालून त्यांच्यात क्रांतिकारी बदल घडवून आणत आहेत. साक्षरता, सुधारणेची आस तळागाळातील समाजापर्यंत पोहचली आहेच; तरीही असंख्य प्रश्न अनुत्तरितच आहेत...भटक्यांच्या जीवनाचा आस्थेने आणि अभ्यासपूर्वक घेतलेला वेध.