* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: BAUTHAKURANEER HAAT
  • Availability : Available
  • Translators : MEDHA TASKAR
  • ISBN : 9788184983111
  • Edition : 2
  • Publishing Year : NOVEMBER 2011
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 168
  • Language : Translated From BENGALI to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :RAVINDRANATH TAGORE COMBO SET - 6 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS A FICTION, THE VERY FIRST NOVEL SCRIPTED IN 1883 BY RAVINDRANATH TAGORE, AT THE AGE OF 22. THIS NOVEL HAS THE BACKGROUND OF ROYAL FAMILIES AND THE RITES AND RITUALS FOLLOWED BY THEM. THIS IS A STORY OF THE ROYAL FAMILY OF KING PRATAPADITYA AND HIS SON UDAYADITYA. THE FORMER IS A SHREWD KING READY TO TAKE ANY ACTION SO AS TO MAINTAIN THE DECORUM OF BEING A KING; WHEREAS THE LATER BELIEVES IN BEING A JUST AND KIND HUMAN BEING, COMPASSIONATE AS WELL. THE KING TAKES ALL THE ACTIONS THAT HE CAN TO PREVENT UDAY FROM BEING A NORMAL HUMAN BEING. HE WANTS HIS SON TO LEARN THE IMPORTANCE OF BEING RUDE AND CRUEL IF NEEDED. UDAY’S SISTER VIBHA IS MARRIED TO RAMCHANDRARAI, ANOTHER KING. BUT HE IS INSULTED MANY TIMES AT THE HANDS OF KING PRATAP. HE GOES BACK TO HIS KINGDOM WITHOUT VIBHA, HIS NEWLYWED WIFE. HE SENDS MESSAGES FOR HER TO COME AND JOIN HIM BUT SHE REFUSES TO JOIN HIM AS HER BROTHER IS UNDER IMPRISONMENT. THIS IS A STORY OF THE TRUE LOVE OF A BROTHER AND A SISTER AND THEIR UNCLE. THEY ALL ARE BRUTALLY TREATED AT THE HANDS OF THE KING WHO BELIEVES ONLY IN KNIGHTHOOD AND NOT KINDNESS.
प्रत्येक दीर्घ नि:श्वासावर विस्तृत टीका आणि स्पष्टीकरणे दिली जात होती. विभेला हे सगळे आणखी सहन होईना, म्हणून ती निसटून बागेत आली होती. सूर्य आज ढगांआडूनच उगवला होता, ढगांआडच अस्तास गेला होता. दिवस कधी मावळला आणि संध्याकाळ कधी झाली, ते समजले नाही. संध्याकाळच्या वेळी पश्चिम दिशेला सोनेरी रेषा उमटली होती, पण दिवस मावळताना ती विरून गेली. अंधार घनदाट होऊ लागला होता. दशदिशा झाकोळून गेल्या होत्या. ओळीने असलेल्या सुरूच्या दाट बनांतून फांद्यांच्या वर इतका अंधार दाटला की, फांद्या एकमेकींत मिसळून गेल्या अन् सहस्र लांबलचक पायांवर भार देऊन प्रचंड विस्तृत नि:स्तब्ध अंधार त्यावर रेलला आहे, असे वाटत होते. हळूहळू रात्र होऊ लागली. राजवाड्यातले दिवे एकेक करून मालवले गेले.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#RAVINDRANATHTAGORE#MEDHATASKAR #POSTMASTER #MRUNALINIGADKARI #AMITAGOSAVI #NILIMABHAVE #NASHTANEED #GEETANJALI # BAUTHAKURANEERHAAT #KABULIVALAANI ITARKATHA #MEHTAPUBLISHINGHOUSE #TRANSLATEDBOOK #MARATHIBOOKS
Customer Reviews
  • Rating Starदर्शना चाफेकर १६.०२

    पुस्तकाच्या नावाने आणि त्यावरील चित्राने मनं वेधून घेतलं. कवर पेज पाहताच वाचायला सुरूवात केली. विशेष हे कि रवींद्रनाथ टागोरांची ही पहिली कादंबरी पण त्यांच्या नंतरच्या लेखनाच्या मानाने दुर्लक्षत राहिली. आशिया खंडातील पहिले नोबेल पुरस्कार विजेते रवीं्रनाथ टागोर यांना आपण `विश्वकवी` म्हणून ओळखतो. पण त्या बरोबरच ते तत्त्वज्ञ, विचारवंत, निबंधकार, प्रबंधकार, चित्रकार, संगीतकार, गीतकार, नाटककार, कादंबरीकार आणि कथाकारही होते. कादंबरी खुप छान आहे. स्वतःच्या आंतरिक सामर्थ्याच्या बळावर वाटचाल केली नाही तर माणूस आखीव चौकटीतील बाहूली बनून राहतो. एक अन्यायी, अत्याचारी, निष्ठूर राजा. सत्ताधीशाला आई-वडिल, बायको, मुलं असे कोणते ही नाते विश्वसनीय नसते. सत्ता हेच सर्वकाही आणि त्या जोरावर तो सगळ्यांना हातातील बाहूली बनून ठेवतो. जो बंड करेल त्याला शिक्षा. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

TANUJA Bankar

This book is so much informative. The imagination and the way of telling this kind of story is just amazing!!! It doesn`t getting bored to read this. Each page is interesting and About mysterious truth. It`s a pleasure to know about our culture and sme mysterious stories that we don`t know. I just want to Thank you so much dear AKSHAT GUPTA SIR for this wonderful book. #Must read book Lots of good wishes Akshat sir👏😊 ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा.डाॅ. राहुल हांडे .... संगमनेर

"जिसे भी देखिए वो अपने आप मे गुम है जूबा मिली है मगर हुंजुबा नही मिलता कभी किसिको मुकम्मल जहा नही मिलता..." संज्ञापन व दळणवळण याची अत्यंत वेगवान साधने सहज उपलब्ध असलेल्या आजच्या जगात वावरणाऱ्या माणसाची व्यथा उपरोक्त गझल सहजपणे व्यक्त करून जाते. मणसाच्या जीवनात भौतिक समृद्धीचा अतिरेक झालेला असताना माणसाचा माणसाशी संवाद मात्र क्षीण होत चाललेला दिसतोय. आजचा माणूस मोबाईलवर बोलायला कितीही वेळ देतोय;परंतु प्रत्यक्षात भेटून दुसऱ्याशी संवाद साधण्यासाठी त्याच्याकडे अजिबात वेळ नाही. भौतिक सुख सोयी व संज्ञापन-संपर्क साधनांचा सुळसुळाट आपल्या समाजात झालेला नव्हता तेव्हा एकमेकांशी बोलणं हा मनोरंजनच नव्हे तर एकूण जीवन व्यवहाराचा अविभाज्य भाग होता. दैनंदिन जीवन व्यवहाराच्या पलीकडे जाऊन शिळोप्याच्या गप्पा मारण्यासाठी प्रत्येक जणाला त्याच्या सोयीची कंपनी देखील उपलब्ध होती. त्यावेळी माणसाची आर्थिक व भौतिक परिस्थिती दुबळी असली तरी मनस्थिती बळकट होती. आज हे सर्व इतिहास जमा झालेले आहे. असे असताना जी. बी. देशमुख यांचे `छाटितो गप्पा` हे भारतीय समाजाच्या गप्पामय जीवनाची आठवण पुन्हा ताजी करणारे पुस्तक नुकतेच मेहता पब्लिशिंग हाऊस,पुणे यांनी प्रकाशित केले आहे. घरातील छोट्या मोठ्या प्रसंगांपासून सुरू झालेल्या या गप्पा कार्यालयीन कामकाजात देखील रंगलेल्या आहेत. सुमारे गेल्या पाच दशकांचा मराठी समाज त्याच्या समग्र वैशिष्ट्यांसोबत ह्या गप्पांमध्ये मनमुराद वावरताना दिसतो. पुस्तकाचे लेखक जी.बी. देशमुख यांचे बोट धरून वाचक जेव्हा ह्या गप्पांच्या आखाड्यात उतरतो तेव्हा हौदातील मातीत केव्हा रंगून जातो याचे भान राहत नाही. माणसाशी माणसाचा संवाद तुटला आहे. अशी तक्रार सतत कानावर पडत असताना `छाटितो गप्पा` हे पुस्तक आपल्याला पुन्हा एकवार भोवतालच्या माणसांशी संवाद साधण्यासाठी नक्कीच प्रेरित करते. माणसाशी माणसाचा तुटलेला संवाद जोडण्याच्या प्रयत्नांमध्ये जी.बी. देशमुख यांचे `छाटितो गप्पा` हे पुस्तक निश्चितच महत्त्वाचे योगदान देणारे ठरेल यात शंका नाही. ...Read more