* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: BEFORE MEMORY FADES
  • Availability : Available
  • Translators : SUDARSHAN ATHAWALE
  • ISBN : 9788184985245
  • Edition : 2
  • Publishing Year : JANUARY 2014
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 480
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Print Books:
STARTING WITH HIS FORMATIVE YEARS, WHEN HE HAD THE GOOD FORTUNE TO INTERACT WITH MANY EMINENT JUDGES AND ADVOCATES,659~ MOVES ON TO DEAL WITH A WIDE VARIETY OF IMPORTANT SUBJECTS, SUCH AS: THE SANCTITY OF THE INDIAN CONSTITUTION AND ATTEMPTS TO TAMPER WITH IT. CRUCIAL CASES THAT HAVE MADE A DECISIVE IMPACT ON THE NATION, ESPECIALLY ON THE INTERPRETATION OF THE LAW. THE RELATIONSHIP BETWEEN THE POLITICAL CLASS AND THE JUDICIARY. THE CANCER OF CORRUPTION AND HOW TO COMBAT THIS MENACE. THE AUTHOR OUTLINES MEASURES TO RESTORE THE NOW-LOW CREDIBILITY OF THE LEGAL PROFESSION. HE ALSO DELINEATES HIS ROLE IN SEVERAL HIGH-PROFILE CASES. IN RECOGNITION OF HIS TRACK RECORD, THE GOVERNMENT OF INDIA NOMINATED HIM TO THE RAJYA SABHA. HE DESCRIBES THE HIGHLIGHTS OF HIS TENURE THERE. BOTH MEMBERS OF THE LEGAL PROFESSION AND THE LAY READER WILL FIND THE CONTENTS INFORMATIVE AND USEFUL.
शासन, प्रशासन आणि न्यायसंस्था यांच्यातील संबंध आणि शासनाच्या फायद्यासाठी, सत्तेचे वर्चस्व टिकवण्यासाठी न्यायालयीन निर्णयांचा राजकारण्यांकडून केला जाणारा वापर – कायदा आणि न्यायव्यवस्था यांची ढासळती प्रतिमा व प्रतिष्ठा सावरण्याचे, त्यांची विश्वासार्हता परत मिळविण्यासंबंधी केलेले उत्तम मार्गदर्शन – आणीबाणी आणि भोपाळ वायुगळती दुर्घटना यांसारख्या अनेक महत्त्वपूर्ण घटनांबाबत स्वत:ची भूमिका – आणि राज्यसभेतील कारकिर्दीचे तपशीलवार वर्णन याद्वारे प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ फली नरीमन यांनी वाचकांशी साधलेला हा प्रांजळ संवाद!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SUDARSHANATHAWALE #TRAVELLINGTOINFINITY:MYLIFEWITHSTEPHEN #ट्रॅव्हलिंगटूइन्फिनिटी #BIOGRAPHY #BEFOREMEMORYFADES #बिफोरमेमरीफेड्स #AUTOBIOGRAPHY "
Customer Reviews
  • Rating StarCampus Express

    Published by the pioneers in Marathi Publishing Industry Mehta Publishing House, Before Memory Fades is not just a book but a classic piece of art. It is a commentary on the most important court cases like Shankari Prasad (1951), Sajjan Singh (1965),Golaknath (1967), Keshavananda Bharti (1973), and Minerva Mills (1980) which laid the fundamental basis of the Indian Constitution, Nariman recalls some of the most touching family sentiments, when he was offered High Court Judgeship at the age of 38 but declined the honour for financial reasons. Born on the January 10 of 1929, at the General Hospital in faraway Rangoon, to a Zoroastrian, or (Parsis) family as they are called, Fali Sam Nariman, ‘Baba’ to his parents, had to leave for India and take refuge when the Japanese bombed Rangoon in December 1941, during the second World War. Little did they know that their son would rise to become one of India’s greatest lawyer of all times. This autobiography gives a detailed insight of the National Emergency in 1975, when he was the Additional Solicitor General of India, Fali recalls of those days like 12th June 1975 when Justice Jagmohan Lal Sinha of the Allahabad High Court pronounced the judgment in the election petition filed against Indira Gandhi by Raj Narain where she was held guilty of corrupt practice and thus was disqualified from holding any public office and events following this. Nariman’s book describes the circumstances and facts of the greatest industrial accident, The Union Carbide Gas Leak at Bhopal in 1984 in real. The lead counsel for the Union Carbide Corporation received severe criticisms while representing the company Tribune des Droits Humains described him as a ‘Fallen Angel’, questioning his reputation as a human rights activist. In one of the most important cases (Second Judges Case) decided by the Supreme Court Nariman appeared and won, ‘A Case I Won – But I Would Prefer To Have Lost’. Criticizing his own win, Narman said ‘I don’t see what is so special about the first five judges of the Supreme Court. They are only the first five in seniority of appointment – not necessarily in superiority of wisdom or competence. I see no reason why all the judges in the highest court should not be consulted when a proposal is made for appointment of a high court judge (or an eminent advocate) to be a judge of the Supreme Court. I would suggest that the closed-circuit network of five judges should be disbanded.’ While reading this book, one can sense that that is is not only an autobiography but describes India’s political and constitutional history with utmost sincerity and transparency. Mehta Publishing House, the largest Marathi book publisher’s in the world known for translating the best of world literature in Marathi have made this book available in Marathi language for Marathi Readers. The good news is that this book shall soon be available in DRM enabled e-book format for the next gen population and those living a hectic life. The simplest language, legal & typical jargons managed by author Fali. S. Nariman as well as the translator Sudarshan Athawale, creates a beautiful flow of story of Nariman’s life. This book stands true in quality in terms of binding, fonts, cover page & content. Before Memory Fades is much more than a chronological account of an eminent lawyer and humble person’s successful life. It is the work of a storyteller whose observations about places, people and circumstances add up to provide a unique insight into the legal profession, from the early years of independence when a young Fali joined the Bombay Bar and did ‘more watching than pleading.’ It is a classic example of an extraordinary life lived so ordinarily and is much more than just a collection of anecdotes and reflections on the events and people that have filled his life. This book is a must read for all who have admires the living legend Mr. Fali Sam Nariman who was awarded the Padma Bhushan (1991) and Padma Vibhushan (2007), by the President of India in recognition of distinguished service in the field of jurisprudence and public affairs. ...Read more

  • Rating StarVIJAY DARDA (MP)

    Dear Respected Shri Fali Nariman It was indeed a great pleasure to receive the Marathi translation of your celebrated autobiography. It was an unusual account of an unusual life that out shown others in the legal field in India. your sense of humor picturization of the times you lived in so fruitfully comes out alive in every page. The Marathi translation by Mr. Sudarshan Athavale is equally brilliant & is a true depiction of the original in English. The writer seems to have captured the ca would surely add to the richness of Marathi literature. It would certainly enrich the Marathi readers. The Marathi man of letters is always fascinated by brilliant autobiographies & this edition is sure to be a proud possession for them. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA, LOKRANG 10 AUGUST

    प्रामाणिक व मार्गदर्शक अनुभवकथन... देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय ख्याती असलेले ज्येष्ठ विविध फली नरिमन यांनी आणीबाणीच्या काळात नागरिकांच्या हक्कांचे अंतिम आश्रयस्थान असलेले सर्वोच न्यायालय कसे वागले, यावर मार्मिक विवेचन केले आहे. ‘बिफोर मेमरी फेड्स..’ हे त्यांचे आत्मकथन. विधिवर्तुळात अतिशय आदराने ज्यांचे नाव घेतले जाते आणि त्यांच्या देदीप्यमान कामगिरीचा आलेख सतत उंचावत गेला, असे हे व्यक्तिमत्त्व. नरिमन हे नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे व स्वातंत्र्याचे खंदे पुरस्कर्ते आहेत. आणीबाणी लागू होताच निषेध व्यक्त करण्यासाठी देशाचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल या पदाचा राजीनामा त्यांनी तात्काळ सरकारकडे पाठवून दिला होता. आणीबाणीच्या काळात नागरिकांच्या या अधिकारांची जी गळचेपी झाली आणि सर्वोच्च न्यायालयानेही त्या बाबत ‘ब्र’ ही न काढता ती निमूटपणे सहन केली, या विषयी नरिमन यांनी आपला संताप अतिशय तीव्र शब्दांमध्ये नोंदवला आहे. एडीएम जबलपूर प्रकरणी निर्णय देताना न्यायालयाने ‘कयद्याने राज्य’ हा ‘अविचारी विचार’ मांडला. नशीब बलवत्तर म्हणून तो घटनाकारांनी संविधानाचा पाया म्हणून स्वीकारलेला नाही. हा विचार ‘कायद्याचे राज्य’ असाच असला पाहिजे. म्हणजे राजदंड व न्यायदंड न्यायालयाच्या हाती राहिल. ‘कायद्याचे राज्य’ ही संकल्पना म्हणजे त्याला न्यायसंस्थाही आव्हान देऊ शकत नाही. परिणामी लोकप्रतिनिधींच्या हाती निरंकुश सत्ता एकवटेल. मी ‘कायद्याने चालवलेल्या राज्यापेक्षा कायद्याच्या राज्यात’ राहणे पसंत करीन, असे नरिमन यांनी नि:संदिग्धपणे या आत्मकथनात सांगितले आहे. नरिमन कुटुंब हे ब्रह्मदेशातील रंगूनचे. दुसऱ्या महायुद्धाच्या झळा बसू लागल्याने भारतात येण्याची वेळ त्यांच्यावर आली. १९५० मध्ये नरिमन यांनी वकिलाची सनद घेतली आणि त्यानंतर त्यांनी प्रख्यात वकील सर जमशेदजी कांगा यांच्याकडे काम सुरू केले होते. ते नरिमन यांना गुरुस्थानी. कांगा हे अतिशय ज्ञानी व निर्गवी व्यक्तिमत्त्व. हरिलाल कनिया (भारताचे प्रथम सरन्यायाधीश) यांच्यासह अनेक ज्येष्ठ न्यायमूर्ती, वकील त्यांच्याबरोबर काम करून पुढे महत्त्वाच्या पदांवर गेले किंवा ख्यातनाम वकील झाले. मुख्य न्यायमूर्ती एम. सी. छागला यांच्या व्यक्तिमत्त्वानेही नरिमन आकर्षिक झाले. मुंबईतील मुख्य न्यायमूर्ती, न्यायमूर्ती आणि जेष्ठ वकिलांबरोबरच्या विविध अनुभवांमधून आपण कसे शिकत गेलो, याचे विस्तृत विवेचन नरिमन यांनी या आत्मकथनात केले आहे. त्यांनी जिल्हा न्यायालयांपासून उच्च न्यायालयापर्यंत सर्वत्र काम केले. सर्वोच्च न्यायलयात वकिली करीत असताना असंख्य महत्त्वाच्या याचिकांमध्ये नरिमन यांनी काम पाहिले. देशाच्या इतिहासात आणि न्यायालयीन वर्तुळात महत्त्वाच्या असलेल्या घटनात्मक प्रकरणांमध्ये त्यांनी हिरीरीने बाजू मांडली या संदर्भातील घटनापीठांच्या निर्णयांचे नरिमन यांनी परखड विवेचनही केले आहे. पथदर्शक न्यायमूर्ती म्हणून सरन्यायाधीश के. सुब्बाराव आणि न्यायमूर्ती व्ही. आर. कृष्णा अय्यर यांचा उल्लेख यांनी केला आहे. व्यक्तिगत स्वातंत्र्याचा मूलभूत हक्क म्हणून २१व्या कलमाचा व्यापक अर्थ सुब्बाराव यांनी खरकसिंग प्रकरणात स्पष्ट केला. कोणाही व्यक्तीस एका जागेवरून दुसऱ्या जागी कोणत्याही नियंत्रणावाचून, निर्बंधावाचून जाण्याचा अधिकार आहे, हे त्यांनी नमूद केले. गोलकनाथ प्रकरणी दिलेल्या निकालाचा फेरविचार करण्यासाठी केशवानंद भारती प्रकरणात सरन्यायाधीश एस.एम.सिक्री यांच्या अध्यक्षतेखाली १३ न्यायमूर्तीचे घटनापीठ १९७३ मध्ये स्थापन करण्यात आले होते. संसदेला कलम ३६८ नुसार घटनादुरुस्तीचे विस्तूत व विनाअट अधिकार असले तरी संविधानाच्या पायाभूत रचनेत बदल करण्याचा कोणताही अधिकार देण्यात आलेला नाही, असा ऐतिहासिक निर्णय देण्यात आला. पण या घटनापीठात जोरदार मतभेद झाले. तब्बल ११ निकलापत्रे वाचली गेली, ७ विरुद्ध ६ अशा बहुमताने दिलेल्या निर्णयाच्या अंतिम निकालपत्रावर फक्त ९ न्यायमूर्तींनी स्वाक्षरी केली. सिक्री यांच्यानंतर न्यायमूर्ती जे.एम.शेलाट हे ज्येष्ठतम न्यायमूर्ती होते. त्यांनी सरकार विरोधात मत नोंदवल्याने त्यांचा सरन्यायाधीशपदाचा हक्क डावलून न्यायमूर्ती ए.एन.रॉय यांना हे पद देण्यात आले. अशा न्यायालयीन वर्तुळातील महत्त्वाच्या अनेक प्रकरणांचा उल्लेख आपल्या परखड टिप्पणीसह नरिमन यांनी आत्मकथनात केला आहे. पंतप्रधान इंदिरा गांधी यांची निवडणूक अलाहाबाद उच्च न्यायालयाने रद्द केल्यावर त्याविरुद्धची त्यांची याचिका सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती व्ही. आर. कृष्णा अय्यर यांच्यापुढे १९७५ च्या उन्हाळी सुट्टीकालीन न्यायमूर्ती म्हणून काम पाहताना आली. त्यावेळी त्यांनी कोणत्याही दबावाला न झुकता निकालाला सशर्त स्थगिती दिली. त्यामुळे इंदिरा गांधी यांना लोकसभेच्या कामकाजात भाग घेता आला नाही. त्यानंतर पुढे देशावर आणीबाणी लादली गेली. न्यायव्यवस्था आणि कार्यकारी यंत्रणा यांनी कायमच एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. पण कोणत्याही दबावाला न झुकता न्यायालयांनी राज्य घटनेतील तरतुदींचा व्यापक अर्थ लावत राज्यघटनेने नागरिकांना दिलेल्या अधिकारांची बूज राखली आणि काही अपवाद वगळता उच्च प्रथा व परंपरांचे पालन केले, याचाही आढावा नरिमन यांनी घेतला आहे. नरिमन यांना उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आणि सरन्यायाधीशांनी न्यायमूर्तीपद स्वीकारण्याची विनंती केली होती, पण त्यांनी ठाम नकार दिला. त्याबद्दल कुठलाही पश्चात्ताप होत नसल्याचे नरिमन यांनी नमूद केले आहे. नर्मदा प्रकल्प, युनियन कार्बाईडसह आंतरराज्य पाणी लवाद आणि असंख्य महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये आलेले अनुभव आणि राज्यसभा सदस्य काळात काय केले, यांचे विवेचनहीयात आहे. आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात नरिमन यांना कोणताही खेद नाही. कृतार्थतेचा आनंद ते अनुभवत आहेत. भारतासारख्या धर्मनिरपेक्ष राष्ट्रात अनेकांनी प्रेम व आनंद दिला, भरभराट झाली आणि येथेच समाधानाने मरण येवो, अशा शब्दांत त्यांनी आपल्या आत्मकथनाचा शेवट केला आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more