* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: BEIJING CONFIDENTIAL
  • Availability : Available
  • Translators : MOHAN GOKHALE
  • ISBN : 9789386175496
  • Edition : 1
  • Publishing Year : OCTOBER 2016
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 332
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Print Books:
JAN WONG HAS RETURNED TO BEIJING. HER QUEST: TO FIND SOMEONE SHE ENCOUNTERED BRIEFLY IN 1973, AND WHOSE LIFE SHE WAS CERTAIN SHE HAD RUINED FOREVER. IN THE EARLY 70S, JAN WONG TRAVELLED FROM CANADA TO BECOME ONE OF ONLY TWO WESTERNERS PERMITTED TO STUDY AT BEIJING UNIVERSITY. ONE DAY A YOUNG STRANGER, YIN LUOYI, ASKED FOR HELP IN GETTING TO THE UNITED STATES. WONG, THEN A STARRY-EYED MAOIST, IMMEDIATELY REPORTED YIN TO THE AUTHORITIES. THIRTY-THREE YEARS ON, AND MORE THAN A DECADE AFTER THE PUBLICATION OF HER BESTSELLING RED CHINA BLUES, JAN WONG REVISITS THE CHINESE CAPITAL TO BEGIN HER SEARCH FOR THE PERSON WHO HAS HAUNTED HER CONSCIENCE. SHE WANTS TO APOLOGIZE, TO SOMEHOW MAKE AMENDS. AT THE VERY LEAST, SHE WANTS TO DISCOVER WHETHER YIN SURVIVED. AS JAN WONG HUNTS THROUGH THE CITY, SHE FINDS HERSELF TRAVELLING BACK THROUGH THE DECADES, BACK TO HER EXPERIENCES IN THE CULTURAL REVOLUTION, TO PLACES THAT WERE ONCE OF HUGE IMPORTANCE TO HER. SHE HAS CHANGED, OF COURSE, BUT NOT AS MUCH AS BEIJING. ONE OF THE WORLD’S MOST ANCIENT CITIES IS NOW ONE OF ITS MOST MODERN. THE NEON SIGNS NO LONGER SAY “LONG LIVE CHAIRMAN MAO” BUT INSTEAD TOUT MARY KAY COSMETICS AND KENTUCKY FRIED CHICKEN. PLACES SHE ONCE KNEW HAVE VANISHED, BULLDOZED INTO OBLIVION AND REPLACED BY AVANT-GARDE ARCHITECTURE, TRENDY BARS, AND SLEEK CONDOS. THE PEOPLE SHE ONCE KNEW HAVE CHANGED, TOO, FOR BETTER OR FOR WORSE. MEMORIES ARE EVERYWHERE. BY SEARCHING OUT OLD FRIENDS AND ACQUAINTANCES, JAN WONG UNCOVERS TANTALIZING CLUES ABOUT THE WOMAN SHE WRONGED. SHE REALIZES HER DEEPEST FEARS AND REGRETS WERE JUSTIFIED. BUT YIN HERSELF REMAINS ELUSIVE–UNTIL THE DAY SHE PHONES JAN WONG. EMOTIONALLY POWERFUL AND RICH WITH DETAIL, BEIJING CONFIDENTIAL WEAVES TOGETHER THREE DISTINCT STORIES–WONG’S JOURNEY FROM REMORSE TO REDEMPTION, YIN’S JOURNEY FROM DISGRACE TO RESPECTABILITY, AND BEIJING’S STUNNING JOURNEY FROM COMMUNISM TO CAPITALISM.
जेन वाँग या, तिसNया पिढीतील चिनी-कॅनेडियन, पुरस्कारविजेत्या लेखिकेचे हे चीनसंबंधीचे तिसरे पुस्तक. सन १९७०च्या दशकाच्या सुरुवातीला बीजिंग विद्यापीठामध्ये मँडरिन भाषा शिकण्यासाठी प्रवेश मिळणाऱ्या पहिल्या दोन विद्यार्थिनींपैकी एक. माओ झेडाँग यांच्या `सांस्कृतिक क्रांतीच्या` ऐन बहराचा तो काळ होता. एकीकडे साम्यवादी विचारसरणीचे आकर्षण, तर दुसरीकडे कॅनडामध्ये परकेपणा अनुभवल्यामुळे कोठेतरी आपली चिनी ओळख पटवण्याची, त्यांच्यामध्ये सामावले जाण्यासाठी धडपड अशा द्वंद्वामध्ये सापडलेल्या लेखिकेच्या हातून अजाणतेपणे एक चूक झाली आणि त्यामुळे तिच्या मैत्रिणीचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. मनावरील दडपण असह्य झाल्याने आणि जमले तर झालेल्या चुकीचे परिमार्जन करण्याच्या उद्देशाने, तब्बल चौतीस वर्षांनी जेन वाँग चीनच्या राजधानीत, एक महिन्याची रजा घेऊन परतली. तिच्या हातामध्ये एक महिना होता आणि एकशेतीस कोटींच्या लोकसंख्येतून, संपूर्ण नावही धडपणे माहीत नसलेल्या मैत्रिणीला शोधून काढण्याचे आव्हान तिच्यासमोर होते. काहीही झाले तरी तिला तिच्या चुकीचे परिमार्जन करायचे होते. `यीन`ला शोधून तिची माफी मागायचीच होती आणि जमले तर तिच्यासाठी काहीतरी करायचे पण होते. `यीन`चा शोध घेण्याच्या प्रयत्नांत आणि जुन्या मित्र-मैत्रिणींच्या भेटीगाठींतून तिने चीनमधील गेल्या ५० वर्षांत झालेल्या सामाजिक, र्आिथक, सांस्कृतिक आणि राजकीय बदलांचा शोध पण घेतला आणि चीनच्या साम्यवादाकडून भांडवलशाहीकडे झालेल्या प्रवासादरम्यान चिनी जनतेच्या जीवनात झालेले परिवर्तन आणि मानसिकतेमधील झालेले बरेवाईट बदल पण संवेदनक्षमतेने टिपले. सामाजिक, आर्थिक बदलांविषयीची तिची निरीक्षणे आणि त्यावरील भाष्य आपल्याला पण कोठेतरी ओळखीचे वाटते. यीनला शोधण्यात ती यशस्वी झाली का? चढउतारांनी भरलेल्या आयुष्यात यीनने काय-काय भोगले होते? यीनने जेनला माफ केले का? जेनच्या शोधाची आणि यीनच्या आयुष्याची चित्तवेधक आणि हेलावून टाकणारी कहाणी म्हणजे हे पुस्तक- `बीजिंगचे गुपित`.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#JAN WONG #BEIJING CONFIDENTIAL #CHINA #CULTURAL REVOLUTION #MOHAN GOKHALE #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
  • Rating StarSAPTAHIK SAKAL 16-06-2018

    चीनच्या साम्यवादी राजवटीला कंटाळून यीन लुयी ही तरुणी चीन सोडून जायचा विचार करते आणि सरकारी कारवाईत अडकते. पलायनाचा प्रयत्न करत असताना यीन चीनमध्ये शिकायला आलेल्या जेनला मदत मागते पण हा प्रयत्न फसतो. या प्रसंगाची टोचणी जेनला लागून राहते. यीन लुयीचे न्की काय होते याचा शोध घेण्यासाठी पत्रकार झालेली जेन वाँग चीनमध्ये काही दशकानंतर परत येते. मधल्या काळात चीनमध्ये यीन लुयीवर काय वेळ येते? या तरुणीला कोणत्या हालअपेष्टांना तोंड द्यावे लागते? याची कहाणी म्हणजे ‘बीजिंगचे गुपित’... ...Read more

  • Rating StarLOKPRABHA - 21-07-2017

    मैत्रिणीसाठी चीनचा शोध... जेन वाँग यांच्या पत्रकारिता अभ्यासकालीन घटना, त्या वेळचे त्यांचे जीवनमान, चिनी पद्धती आणि दिनक्रम यांवर प्रकाश टाकणारे हे पुस्तक. महाविद्यालयीन जीवनात मैत्रिणीची चुगली करण्याची अनवधानाने झालेली चूक काही वर्षांनी लक्षात आल्यवर पश्चात्ताप झाल्याने आणि पापक्षालन करण्याच्या निमित्ताने त्या मैत्रिणीला एवढ्या मोठ्या चीनमध्ये शोधून काढणे, हा लेखिकेचा हेतू आहे. त्या दरम्यान इतर ही अनेक जुनी माणसे भेटणे, प्रत्येकाची भेट घेताना, ती ठरवताना होणारे अनेक अपेक्षाभंग, मनस्ताप, मानसिक त्रास, लेखिकेच्या या शोधकार्यात तिच्या कुटुंबाची कधी अनिच्छेने, कधी उत्साहाने मिळणारी साथ तसेच मुख्य शोधकार्यात अनपेक्षितरीत्या उलगडणारी अनेक रहस्ये, काही विलक्षण गंभीर काही उपयुक्त तर काही विनोदी आहेत. या सर्व गदारोळात जे घडलं ते कथानक म्हणजे या पुस्तकाचा मुख्य विषय. लिहिता लिहिता चीनची काही गुपितेही उघड करण्याची संधी लेखिकेने अनायसेच साधली आहे. किंबहुना चीनची काही गुपिते उघड करण्यासाठी हा विषय निवडला असावा. पुस्तकाचे शीर्षक आणि मुख्य कथानक यांचा संबंध एकमेकांशी मुद्दाम जुळवण्यात आला असावा असे जाणवते. माओवाद्यांचा अंमल सातत्याने जाणवत राहतो. आंतरराष्ट्रीय वार्ताहराला स्वत:चे काम करताना वैयक्तिक त्रासही बऱ्याच प्रमाणात होतो. उदा. एखादी विशिष्ट लक्षवेधी घटना लिहिल्यावर जे पडसाद जनमानसांत उठतात ते थेट घरापर्यंत जाऊन त्यांचे वैयक्तिक आयुष्य ढवळून काढतात. जेन वांग या उत्तम निरीक्षक आहेत हे काही वाक्यांवरून जाणवतं. त्यांनी चंद्रकोरीला नखाच्या तुकड्याची उपमा दिली आहे. शहरामधील घरांच्या सोनेरी रंगांच्या कौलावरून प्रकाश परावर्तित झाल्याने ‘ठिणग्या’ उडाल्याचा भास होतो. रात्रीच्या वेळी तर बीजिंग शहर एखाद्या प्रचंड व्हिडिओ गेमप्रमाणे दिसतं. तरुणाने नाईकेची सेलमधील जॉगिंग पॅन्ट घातली होती, हे अप्रतिम निरीक्षण आहे. लेखिकेच्या कॉलेजातील मँडरिन भाषेची शिक्षिका ‘फु मिन’ ही साम्यवादाची अतिआग्रही होती किंवा साम्यवाद हा तिच्या नसानसांमध्ये ठासून भरला होता. लेखिका त्या शिक्षिकेला हुकूमशहा म्हणत असे. चीनमध्ये लावल्या जाणाऱ्या पाट्यांची वर्णने वाचताना पुणेरी पाट्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. काही घटना अनावश्यक असल्या तरी चीनबाहेरील लोकांसाठी त्या अतिशय मजेदार ठरू शकतील. भाषांतरकार मोहन गोखले यांनी कथानक ओघवते ठेवण्याचे प्रयत्न केले आहेत. -पूर्वा देवधर ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 25-06-2017

    अथांग भावनांचे शब्दचित्र... एक पत्रकार व्यक्ती विविध बातम्या किंवा विशिष्ट विषयांवरील लेख या व्यतिरिक्त अन्य साहित्यप्रकारातील लेखन करते, त्यावेळी त्या व्यक्तीमधल्या पत्रकाराच्या ठायी असलेली शोधक व चिकित्सक वृत्ती आणि घटनेच्या गाभ्याला हात घालण्याचेधाडस असे पैलू त्यांच्या लेखनात अवतरतात आणि या मर्मग्राही लेखनामुळे त्या कलाकृतीला वेगळा आयाम प्राप्त होतो. जेन वाँग ही एक पारितोषिकप्राप्त व लोकप्रिय महिला पत्रकार असून तिने यापूर्वी तीन वेगवेगळ्या पुस्तकांचे लेखन केले आहे. यानंतर ‘बीजिंगचे गुपित’ ही त्यांची नवीन कादंबरी नुकतीच प्रकाशित झाली आहे. आणि या कादंबरीचा मराठी अनुवाद मोहन गोखले यांनी केला आहे. बीजिंगच्या विद्यापीठात ‘जेन वाँग’ आणि ‘येल’हून आलेली चिनी-अमेरिकन ‘एरिका’ या केवळ दोनच परदेशी विद्यार्थिनींना प्रवेश मिळतो. तेथील वास्तव्यात ‘जेन’ला यीन लूओयी’ नामक विद्यार्थिनी भेटते आणि अमेरिकेला जाण्यासाठी तिची मदत मागते, परंतु माओवादाचा प्रभाव असलेली जेन ही खबर साम्यवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्याला देते. यानंतर ‘यीन’चे काय होते याची माहिती न मिळाल्याने जेन अस्वस्थ होते, ती स्वत:ला अपराधी समजते आणि साधारणपणे तीस वर्षांनतर पुन्हा बीजिंगला येते. कॅनडास्थित जेन वाँग ही नेवार्क विमानतळावर विमानात बसल्यापासून बीजिंगला पोहचून तेथे अठ्ठावीस दिवस राहून स्वगृही परतण्यासाठी विमानात बसेपर्यंतच्या कालावधीमधील घडलेल्या घडामोडी आणि विषयाच्या अनुषंगाने दिलेली माहिती यांचा समग्र गोफ म्हणजे ‘बीजिंगचे गुपित’ ही कादंबरी होय. ‘यीन’ला विद्यापीठातून काढून टाकण्यास आपणच कारणीभूत आहोत या भावनेने जेनला पश्चात्ताप झालेला आहे. या चुकीचे प्रायश्चित्त घेण्याचे ठरवून ‘यीन’ला शोधण्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेत तिला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे; सोबतीच्या विद्यार्थ्याना संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत असताना, ‘गु वेमिंग’ या एका मित्राकडून तिला ‘पॅन’चा पत्ता मिळतो आणि याचवेळी पॅनची दूरध्वनीवरून भेट होते. यानंतर ‘जेन’ला ‘यीन’च्या अस्तित्वाचा सुगावा लागतो. साधारणपणे कादंबरीच्या मध्यंतरानंतर तिला ‘यीन’चा ठावठिकाणा समजतो आणि अखेर महत्प्रयासाने तिची यीनशी भेट होते. या कादंबरीमध्ये ‘यीन’च्या भेटीपूर्वी तिला शोधण्याच्या प्रयत्नात असताना वेगवेगळ्या ठिकाणी जाताना किंवा अनेक लोकांच्या भेटीमधल्या चर्चेतून लेखिकेने अनेक गोष्टींचे स्पष्टीकरण दिले आहे. बीजिंगच्या व पर्यायाने चीनच्या ऐतिहासिक घटनांची माहिती देताना मानवाच्या उत्क्रांतीच्या काळापासून बाराव्या व तेराव्य शतकातील अनुक्रमे ‘खितान’ व ‘जुर्चेड’ या रानटी जमातींच्या लोकांच्या राज्यापासून नंतरची मिंग राजवट आणि आतापर्यंत चीनमध्ये झालेल्या राजवटींचा इतिहास येथे मांडला आहे. ‘यीन’च्या भेटीनंतर तिच्याशी झालेल्या संवादातून तिच्या भूतकाळातील परिस्थितीचे संपूर्ण वर्णन येथे झाले आहे. ‘यीन’ने ज्यांच्यावर विश्वास टाकला तो साम्यवादी पक्ष, तिचे मित्र-मैत्रिणी व शिक्षक या सर्वांनीच तिचा विश्वासघात कसा केला आणि ज्या शेतकऱ्यांबद्दल तिच्या मनात कणव होती त्यांनीच तिला कसे वाळीत टाकले या वर्णनासह तिची शोकांतिका, तिला सोसाव्या लागलेल्या यातना व तिच्यावर आलेले प्रसंग याचेही वर्णन येथे केले आहे. जेन वाँग ही ‘यीन’चा शोध घेण्यासाठी गुप्तहेर संघटनेची मदत घेण्याचे ठरवते तेव्हा गुप्तहेर संस्था, विवाहबाह्य संबंध शोधून काढणे, व्यावसायिक बोधचिन्हांच्या होत असलेल्या चोरीचा छडा लावणे, स्थावर व जंगम मालमत्तांचा शोध घेणे, दूरध्वनीवरील संभाषणांचा माग काढणे, घरापासून दूर असलेल्या मुलांवर लक्ष ठेवणे, औद्योगिक क्षेत्रात हेरगिरी करणाNयांचे पुरावे शोधणे आणि हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेणे अशी अनेक कामे करीत असल्याचे तिला आढळून येते. यावरून तेथील सामाजिक परिस्थितीची ओळख करून देण्याचा तिने प्रयत्न केला आहे. याशिवाय बीजिंगचे पोलीस व गुप्तहेर यांची व्यक्तिमत्त्वे कशी असतात हेही दाखवले आहे. तसेच गुप्तहेरांच्या कार्यपद्धतीचे वर्णन करताना त्यांच्यामध्ये साम्यवाद व भांडवलशाही यांचा संगम झाल्याचे म्हटले आहे. एका पत्रकार महिलेने धाडसी वृत्तीमधून, शोधक नजरेतून आणि सूक्ष्म निरीक्षणातून लिहिलेली ही सत्यकथा असून, लेखिकेच्या अथांग भावनाच्या या शब्दचित्राचा मोहन गोखले यांनी ओघवत्या शैलीत मराठी अनुवाद करून अनुवादित साहित्यात मोलाची भर घातली आहे. -कमलाकर राऊत ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL - SAPTRANG - 26-3-2017

    चीनमधल्या जुन्या आणि समकालीन व्यवस्थेचं चित्रण करणारी ही वेगळ्या प्रकारची कादंबरी. जेन वाँग ही पत्रकार बऱ्याच वर्षांनी चीनमध्ये परतते. चौतीस वर्षांपूर्वीच्या एका घटनेची सल तिच्या मनात आहे. कॅनडामधून बीजिंगमध्ये शिकायला गेली असताना यीन लुयी नावाच्या एा तरुणीनं अमेरिकेला जायची इच्छा तिच्याकडे व्यक्त केलेली असताना वाँगनं ती गोष्ट साम्यवादी पक्षाच्या पदाधिकाऱयांकडे सांगितलेली असते. त्या घटनेचा नक्की काय परिणाम झाला, हे वाँगला आता जाणून घ्यायचं आहे. तिच्या या प्रवासात चीनमधली बदलत गेलेली संस्कृती, साम्यवादाकडून भांडवलशाहीकडे झालेला बदल अशा अनेक गोष्टी कादंबरीत उलगडत जातात. जेन वाँगनंच तटस्थपणे चित्रण केले आहे. मोहन गोखले यांनी या कादंबरीचा अनुवाद केला आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

NAGZIRA
NAGZIRA by VYANKATESH MADGULKAR Rating Star
कृष्णा DIWATE

आजच्या पुस्तकाचा विषय माझ्या आवडीचा - जंगलाचा... *जंगल - काय असतं ?* म्हटलं तर फक्त झाडे, नदी-नाले, प्राणी पक्षी यांनी भरलेला जमिनीचा एक तुकडा .... की वन-देवता? की पशु-पक्ष्यांचं घर? की जीवनचक्रातील अति-महत्वाचा घटक? की आपल्यातल्या दांभिकपणाला - दिखव्याला - व्यवहाराला गाळून टाकणारं आणि आपल्यालाही त्याच्यासारखाच सर्वसमावेशक, निर्मळ बनवणारं आणि आपल्यातल्या originality ला बाहेर आणणारं, असं एक अजब रसायन? *जंगल भटक्यांना विचारा एकदा... बोलतानाच त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात जी चमक दिसेल ना, त्यातून फार वेळ वाट न बघता सरळ जंगल गाठण्याची इच्छा न होईल तरच नवल!* आमचा एक मित्र- ज्याने असंच जंगलांचं वेड लावलं आणि अजून एक भटकी मैत्रीण - जिने त्या वेडात भरच घातली..... आणि असे अजून अनेक भटके निसर्गप्रेमी ... आणि मुळातूनच निसर्गाची ओढ , या सर्व गोष्टी माझ्या जंगल -प्रेमासाठी कारणीभूत ठरल्या. *आणि मग अरण्यऋषी श्री. मारुती चितमपल्ली, शंकर पाटील (कथा), डॉ. सलीम अली, जिम कॉर्बेट, व्यंकटेश माडगूळकर इत्यादींनी या निसर्गदेवतेकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी दिली. त्या सर्वांनाच आजचा हा पुस्तक-परिचय सादर अर्पण!!* कथांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लेखकाने हे नागझिरा पुस्तक का बरे लिहिले असावे? मनोगतात ते स्वतः म्हणतात - *"महाराष्ट्रातील एखाद्या आडबाजूच्या जंगलात जाऊन महिना दोन महिने राहावे, प्राणी जीवन, पक्षी जीवन, झाडेझुडे पाहत मनमुराद भटकावे आणि या अनुभवाला शब्दरूप द्यावे हा विचार गेली काही वर्षे माझ्या मनात घोळत होता. काही परदेशी प्राणी शास्त्रज्ञांनी असा उद्योग करून लिहिलेली उत्तम पुस्तके माझ्या वाचण्यात आल्यापासून ही इच्छा फारच बळवली. मी इथे तिथे प्रयत्न करून पाहिले आणि निराश झालो. हे काम आपल्या आवाक्यातले नाही असे वाटले. मग शेल्लरने कुठेतरी लिहिल्याचे वाचले की भारतातील लोक प्राणी जीवनाच्या अभ्यासात उदासीन आहेत, आफ्रिकेच्याही फार मागे आहेत. त्यांना वाटते अशा संशोधनासाठी प्रचंड खर्च करावा लागतो, पाण्यासारखा पैसा लागतो. पण तसे नाही. गळ्यात दुर्बीण, मनात अमाप उत्साह आणि आस्था असली की अभ्यास होतो. मी शक्य तेव्हा एकट्यानेच उठून थोडेफार काम करत राहायचे ठरवले. कधी काझीरंगा, मानस या अभयारण्यावर, कधी नवेगाव-बांधावर तर कधी कोरेगावच्या मोरावर लिहित राहिलो.* *मला चांगली जाणीव आहे की हा प्रयत्न नवशिक्याचा आहे. तो अपुरा आहे, भरघोस नाही. त्यात बऱ्याच त्रुटी आहेत, पण नव्या रानात शिरण्यासाठी पहिल्यांदा कोणीतरी वाट पाडावी लागते. पुढे त्या वाटेने ये-जा सुरू होते. मी लहानशी वाट पाडली आहे एवढेच!"* लेखक आत्ता असते तर त्यांना नक्की सांगितले असते की तुम्ही पाडलेली पायवाट आता जवळ-पास राजमार्ग बनत चालली आहे. आज अनेक वन्य-जीव अभ्यासक, जंगल भटके सुजाण व सतर्क झाले आहेत, जंगले आणि प्राणी वाचले पाहिजेत यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ह्या प्रयत्नांमागे लेखकासारख्या अनेक वनांचा अभ्यास करून ते आपल्यासमोर आणणाऱ्यांचा मोठा हात आहे. आज पक्षी-निरीक्षक किरण पुरंदरेंसारखे व्यक्ती शहरातील सगळा गाशा गुंडाळून जंगलात राहायला गेलेत ... काय नक्की thought -process झाली असेल त्यांची? फक्त जंगल-भटकंती करताना पाळावयाचे नियम अत्यंत महत्वाचे आहे. मुख्यत्वे-करून कुठल्याही वृक्षांचे, प्राणी-पक्ष्यांचे आपल्या असण्याने कुठलाही त्रास किंवा धोका - हानी संभवू नये, याची काळजी आपल्यासारख्या सुज्ञ भटक्यांनी नक्की घ्यावी. तरच हे भटकणे आनंद-दायी होईल. *भंडारा जिल्यातील नागझिरा हे एक अभयारण्य! फार सुंदर आहे.* हे पुस्तक फक्त लेखकाच्या दृष्टीने त्यांना भावलेलं जंगल आहे का? फक्त जंगलाचं वर्णन आहे का? तर नाही. एक पट्टीचा कथालेखक आणि मानव-स्वभाव चितारणारा लेखक केवळ वर्णन करू शकत नाही. माझ्या मते ही एक प्रक्रिया आहे, त्यांच्या अंतर्बाह्य बदलाची, जी त्यांना जाणवली, अगदी प्रकर्षाने. आणि तोच स्वतःचा शोध त्यांनी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. बाकी प्रत्येकाचं जंगल वेगळं, खरं जंगल नाही तर स्वतःच्या आतलं एक जंगल. ते ज्याचं त्याने शोधायचं, त्यात डुंबायच, विहार करायचा आणि काही गवसत का ते बघायचं .... लेखकानेही तेच केलं... एक स्वगत मांडलं आहे.... आणि त्यातून संवादही साधला आहे. हे पुस्तक ललित म्हणावे की कादंबरी, वर्णन म्हणावे की आत्मकथन, अशा हिंदोळ्यावर हे वाचताना मी सतत राहते. अतिशय आशयपूर्ण गहिऱ्या अर्थाचे लिखाण आहे यात. लेखकाने नागझिरा आणि त्याचे वर्णन कसे केले आहे ते आपण रसिक वाचकांनी हे पुस्तक वाचूनच त्याचा आनंद घ्यावा. ते इथे मी सांगत बसणार नाही, उगाच तुमचं आनंद का हिरावून घेऊ? मी इथे मला भावलेले लेखकच मांडण्याचा अल्पसा प्रयत्न करत आहे, ते ही या पुस्तकाच्या माध्यमातून... पहिल्याच पानावर ते काय लिहितात बघा - *"गरजा शक्य तेवढ्या कमी करायच्या, दोनच वेळा साधे जेवण घ्यायचे, त्यात पदार्थ सुद्धा दोन किंवा तीनच. स्वतःचे कामे स्वतःच करायची. पाणी आणणे, कपडे धुणे अंथरून टाकणे आणि काढणे या साध्या सुध्या गोष्टींसाठी माणसांनी दुसऱ्यावर का अवलंबून राहावे? एकांत, स्वावलंबन आणि प्रत्येक बाबतीत मितव्यय ही त्रिसूत्री पाळून जंगलात पायी भटकायचे, जंगलाच्या कुशीत राहून निरागस असा आनंद लुटायचा या माफक अपेक्षेने गेलो आणि माझा काळ फार आनंदत गेला . रेडिओ, वृत्तपत्रे, वाङ्मय चर्चा, वाचन, कुटुंब, मित्र, दुसऱ्याच्या घरी जाणे येणे, जेवण देणे आणि घेणे यापैकी काहीही नसताना कधी कंटाळा आला नाही. करमत नाही असे झाले नाही. रोज गाढ झोप आली. स्वप्न पडले असतील तर ती सकाळी आठवली नाही. शिवाय मित आहार आणि पायी हिंडणे यामुळे चरबी झडली. एकूणच मांद्य कमी झाले."* हे वाचून आपल्याला नक्की काय हवे असते, आणि रोजच्या रहाटगाडग्यात आपण काय करतो, याची मनातल्या मनात तुलना व्हावी. खरंच काय हवं असतं आपल्याला? आपण सतत प्रेम, शांती, समाधान आणि मनःशांती याच्याच तर शोधात असतो ना? आणि नेमक्या ह्याच सर्व गोष्टी बाजूला पडून आपण नुसते धावतच असतो... कशासाठी?? जीवनाचं तत्वज्ञान हे फार गंभीर नाहीये, अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून आपण ते समजून घेऊन शकतो. फक्त ती जाण असली पाहिजे. थोडासा थांबून विचार झाला पाहिजे. मनःचक्षु उघडे पाहिजे आणि मुख्य म्हणजे मी कुणीतरी मोठा , हा भाव पहिल्यांदा गाळून पडला पाहिजे. *अगदी तसंच जसं पानगळीच्या मोसमात जुनं पान अगदी सहज गळून पडतं ... नव्यासाठी जागा करून देतं ... जंगल आपल्याला हेच शिकवतं ... न बोलता ... त्याच्या कृतीतून ... आपली ते समजून घेण्याची कुवत आहे का?* शेवटच्या प्रकरणात लेखक परतीसाठी रेल्वे फलाटावर येतो. तेव्हाचचं त्यांचं स्वगत फार विचार करायला भाग पाडतं - *"ह्या दोन तासात करण्याजोगे असे काहीच महत्त्वाचे कार्य नसल्यामुळे मी आरशासमोर बसून दाढी केली, मिशा काढून टाकल्या. सतत अंगावर होते ते हिरवे कपडे काढून टाकले आणि इतके दिवस माझ्या कातडी पिशवीच्या तळाशी परिटघडी राहिलेले झुळझुळीत कपडे चढवून पोशाखी बनलो.`* किती साधी वाक्य आहेत, पण `पोशाखी बनलो` यातून किती काय काय सांगायचे आहे लेखकाला... गहिरेपण जाणवते! मला विचार करायला भाग पाडते. ट्रेक करून गड -किल्ल्यांहून परतताना माझीही अवस्था काहीशी अशीच व्हायची... जाड पावलांनी घरी परतणे आणि पुन्हा निसर्गात भटकायला मिळण्याची वाट पाहणे, याशिवाय गत्यंतर नसायचे. *जंगलांवर , निसर्गावर निस्सीम प्रेम करणाऱ्या आणि त्यांच्या संवर्धनासाठी झटणाऱ्या अनेक वेड्यांमुळे आज आपली वसुंधरा टिकली आहे. पुढील पिढ्यांसाठी तिला असच बहरत ठेवायचं असेल, किमान टिकवायचं जरी असेल तरी आपणही थोडेसे निसर्ग-वेडे व्हायला काय हरकत आहे??* *वृक्षवल्ली आम्हा सोयरे... वनचरे ...* धन्यवाद! जय हिंद!!! ...Read more