* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: BEING MORTAL
  • Availability : Available
  • Translators : VASU BHARADWAJ
  • ISBN : 9789387789555
  • Edition : 1
  • Publishing Year : MAY 2018
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 272
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : HEALTHCARE & PSYCHOLOGY
  • Available in Combos :ATUL GAWANDE COMBO SET-4 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
IS IT TIME THE MEDICAL PROFESSION RETHOUGHT ITS APPROACH TO THE OLD AND TERMINALLY ILL? IN WHAT WAY? SHOULD DOCTORS BE TRAINED TO PREPARE PEOPLE TO DIE RATHER THAN SIMPLY BE KEPT ALIVE AS LONG AS POSSIBLE? IN BEING MORTAL, ATUL GAWANDE ADDRESSES THESE QUESTIONS AND ARGUES THAT AN ACCEPTANCE OF MORTALITY MUST LIE AT THE HEART OF THE WAY WE TREAT THE DYING. QUESTIONING, PROFOUND AND DEEPLY MOVING, BEING MORTAL IS A MUST-READ
"अलीकडे वाढत चाललेल्या सरासरी आयुर्मानामुळे आणि दुभंगत चाललेल्या कुटुंबव्यवस्थेमुळे वार्धक्य ही कटकटीची बाब होऊन बसली आहे. कुणाच्या तरी आधाराशिवाय आपली दैनंदिनीही न उरकू शकणारं वार्धक्य आणि विकलांग करणाऱ्या असाध्य आजारानं ग्रस्त असलेले रुग्णाईत हे दोन मोठे प्रश्न आहेत. औषधोपचार आहेतच; पण त्यासोबतच उरलेलं आयुष्य चांगलं कसं घालवता येईल, हाही एक दृष्टीकोन असायला हवा. अशा असाध्य आजारांनी ग्रासलेल्या रुग्णांमध्ये आणि वार्धक्यानं असहाय असलेल्या परावलंबी व्यक्तींमध्ये केवळ वैद्यकीय उपचार पुरेसा ठरत नाही; तर कुणाचा तरी मदतीचा हात महत्त्वाचा ठरतो, कुणीतरी समजून घेणं गरजेचं ठरतं तसेच विशिष्ट वेळापत्रकात बांधून आपली शुश्रूषा होतेय असं न वाटता, मिळणाऱ्या स्वायत्ततेचा थोडाफार उपयोग जगण्यासाठी करता येणंही गरजेचं असतं. याच भावना आणि उरलेलं आयुष्य सुखकर कसं होईल याचा विचार या पुस्तकामध्ये आहे. मृत्यूनं रुग्णावर झडप घालण्यापूर्वी त्याच्या चिमटीतून सुटणाऱ्या आयुष्याच्या अरुंद आणि अनिश्चित काळामध्ये मनाजोगं जगून घेण्याचा प्रयत्नही सफलपणे करता येतो. फक्त त्यासाठी हवी आहे थोडीशी मदत- जवळच्या व्यक्तींची आणि वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांची, जे स्पष्टपणे रुग्णाला सगळ्या गोष्टींची कल्पना देऊन, त्या अंतिम क्षणातही त्या आजारातून त्याला पूर्णपणे बरे करण्याची हमी देतात. येथे उपचारापेक्षाही गरज असते ती उरलेलं आयुष्य सुसह्य करण्यासाठी मदत करण्याची, ते वेदनामुक्त करण्याची आणि त्या अंतिम क्षणात शक्य तेवढं मनाप्रमाणे जगत आपल्या आवडत्या माणसांच्या सोबत घरीच मृत्यूला हसत हसत स्वीकारता येण्याची; यासाठी सर्वांचंच सहकार्य गरजेचं असतं. नेमकं हेच सारं या पुस्तकामध्ये रेखाटलं आहे. गेल्या काही दशकांमध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये उपशमन शुश्रूषेचा प्रांत नव्यानं आलाय, तो मृत्यूच्या मार्गावर असणाऱ्या रुग्णांच्या शुश्रूषेमध्ये या पद्धतीचा विचार आणण्यासाठीच आला आहे आणि ही पद्धत वाढत आहे, हीच पद्धत गंभीर आजारानं ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठीही वापरली जात आहे, मग तो मृत्युमार्गावर असो किंवा नसो. मत्र्यतेविषयी आधुनिक अनुभवाचं हे पुस्तक आहे - जीव जो वार्धक्याला पोहोचतो आणि मरतो, ही गोष्ट कशी वाटते, औषधोपचारांनी अनुभव कसा बदलला आहे आणि जिथं आपल्या परिमिततेशी सामना करण्याच्या कल्पनांना चुकीचं वास्तव कसं पाहायला मिळतं... तिथं नेमका अनुभव कसा बदलत नाही – याविषयीचं हे पुस्तक आहे. वैद्यकीय सेवेमध्ये आरोग्य आणि जीवन यांना आश्वस्त करणं याला विशेष महत्त्व आहे; पण वास्तवात ते त्यापेक्षाही जास्त आहे. खरं तर त्यामध्ये चांगलं जगणं शक्य करणं अपेक्षित आहे. "

No Records Found
No Records Found
Keywords
#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%#BEING MORTAL# MARAN AAHE MHANUN# ATUL GAWANDE# DR. VASU BHARADWAJ#बीइंग मॉर्टल# मरण आहे म्हणून... # वसु भारद्वाज# अतुल गवांदे
Customer Reviews
  • Rating StarMAHARASHTRA TIMES 06-09-2020

    रुग्ण-स्वास्थ्याचे सखोल चिंतन... जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला मृत्यू येणारच हे त्रिकालबाधित सत्य असले, तरीही कोणीही हे वास्तव सहज स्वीकारत नाही. जीवनाचा अंतिम क्षण जवळ आलेला रुग्णदेखील, व्याधीमुक्त होण्यासाठी विविध उपचार करवून घेत असतो आणि जगणयाची धडपड करीत असतो. अशाच असाध्य व्याधी जडलेल्या रुग्णांवर त्यांच्या मृत्यूच्या क्षणापर्यंत केले जाणारे उपचार, रुग्णाची मानसिक स्थिती, त्यांच्या कुटुंबीयांची मानसिकता आणि त्यांचे अनुभव कसे असू शकतात, याची माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी डॉ. अतुल गवांदे यांनी ‘बीइंग मॉर्टल’ हे इंग्रजी पुस्तक लिहिले आहे. त्याचा मराठी अनुवाद डॉ. वसु भारद्वाज यांनी केला आहे. डॉक्टर गवांदे यांनी या पुस्तकातून अनेक प्रकारच्या व्याधींनी ग्रस्त असलेल्या रुग्णांची माहिती करून दिली आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर विज्ञानाने अनेक शोध लावले. वैद्यकीय क्षेत्रात नवनवीन औषधांची निर्मिती करण्यात आली आणि रुग्णालये ही आरोग्य केंद्र बनली. विदेशातील वृद्ध रुग्णांना शुश्रुषागृहात ठेवण्यात येऊ लागले. अशा रुग्णालयात ठेवण्यात आलेल्या वेगवेगळ्या क्षेत्रांतील, वेगवेगळ्या सामाजिक स्तरातील आणि वेगवेगळ्या व्याधींनी ग्रस्त असलेल्या अनेक रुग्णांवर, डॉ. गवांदे यांनी उपचार केले, तेव्हा केलेल्या निरीक्षणातून हे पुस्तक आकाराला आले आहे. रुग्णांवर उपचार करताना काही मर्यादा असतात आणि मरणाच्या दारात असलेल्या रुग्णांकडे असहायपणे पाहण्यापलीकडे डॉक्टर काहीच करू शकत नाही, अशी कबुली डॉक्टरांनी येथे दिली आहे. कोणत्याही व्यक्तीला जडलेल्या व्याधी, त्यावरील उपचार आणि मृत्यू या अनुषंगाने येणाऱ्या अन्य बाबी याबाबत अनेक तत्त्वज्ञ, विचारवंत, लेखक आणि अभ्यासक यांनी वेगवेगळ्या प्रकारे कसे भाष्य केले आहे, याची माहिती देताना टॉलस्टॉय, कास्र्टेन्सेन, शेर्विन न्युलँड, जोसी रॉयसी अशा अनेक विचारवंतांनी या विषयावर मांडलेले विचार, त्यांचे भाष्य, त्यांचा अभ्यास आणि त्यांच्या निरीक्षणांचीही माहिती करून दिली आहे. गंभीर स्वरूपाच्या व्याधींवर उपचार करून घेत असलेल्या आणि जीवनाच्या अंतिम टप्प्यात असलेल्या रुग्णांना आपल्या संस्कृतीत जगण्याचे उद्दिष्ट विचारले जात नाही. विदेशात मात्र डॉक्टर गवांदे यांच्याकडे उपचार घेत असलेल्या रुग्णांना तसे विचारण्यात आले आहे. अखेर मरण येणारच आहे, तर हव्याहव्याशा गोष्टींमधून आनंद मिळवून, मृत्यूला हसतहसत सामोरे जावे, अशी भावना व्यक्त करणाऱ्या आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहणाऱ्या अनेक रुग्णांची माहिती येथे दिली आहे. कोणत्याही रुग्णावर केले जाणारे उपचार मर्यादित असतात, ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन, रुग्णाच्या व्याधीकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहताना सामाजिक-कौटुंबिक मानसिकतेशी त्याचा संबंध जोडला आहे. रुग्णशय्येवरच्या रुग्णाला औषधोपचारांचीच गरज असते असे नाही, त्याचे मन आनंदी राहील अशा वातावरणाचीही गरज असते, हे या पुस्तकात पटवून दिले आहे. एका डॉक्टरने लिहिलेल्या पुस्तकाचा अनुवाद एका डॉक्टरने केल्यामुळे, या पुस्तकातील संपूर्ण विवेचन वाचकांसमोर अतिशय सुलभ पद्धतीने येते. – कमलाकर राऊत ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 10-06-2018

    आनंदी वार्धक्यासाठी मार्गदर्शन... वाढत चाललेल्या सरासरी आयुर्मानामुळे आणि दुभंगत चाललेल्या कुटुंबव्यवस्थेमुळे वार्धक्य ही चिंताजनक बाब बनली आहे. कुणाच्या तरी आधाराशिवाय आपली दैनंदिनीही न उरकू शकणारं वार्धक्य आणि विकलांग करणाऱ्या असाध्य आजारानं ग्रस् असलेले रुग्णाईत हे दोन मोठे प्रश्न आज आहेत. औषधोपचार आहेतच, पण त्यासोबतच उरलेलं आयुष्य चांगलं कसं घालवता येईल, हाही एक दृष्टिकोन हवा. अशा असाध्य रोगांनी ग्रस्त रुग्णांमध्ये आणि वार्धक्यानं असहाय असलेल्या परावलंबी व्यक्तींमध्ये केवळ वैद्यकीय उपचार पुरेसा ठरत नाही; तर कुणाचा तरी मदतीचा हात, कुणीतरी समजून घेणं गरजेचं ठरतं. अशा रुग्णांना उरलेलं आयुष्य सुसह्य करण्यासाठी मदत करण्याची गरज असते. त्यांचं आयुष्य वेदनामुक्त करण्याचा, त्यांचं उर्वरित आयुष्य सुखकर कसं होईल व त्यांच्या जीवनाच्या अंतिम काळात शक्य तेवढं मनाप्रमाणे जगत आवडत्या माणसांसोबत घरीच मृत्यूला हसत हसत कसं स्वीकारता येईल, याचा विचार या पुस्तकात मांडला आहे. एका डॉक्टरनं विज्ञानाधिष्ठित विवेकाच्या आधारे केलेलं हे विश्लेषण डॉ. वसू भारद्वाज यांनी समर्थपणे अनुवादित केले आहे. ...Read more

  • Rating StarThe Week, December 2014 issue

    Atul Gawande, the doctor author with a list of books that have been runaway successes, is out with one that looks set to be his best so far. The title¯Being Mortal: Medicine and What Matters in the End¯suggests that the book would be for those in ther sunset years or are on its threshold. But anyone who has read the book would know better than to judge it by the title. Drawing from history, sociology, anthropology and all the sciences, and from scientific researches, Gawande reminds us that “for most of our hundred-thousand-year existence¯all but the past couple of hundred years¯the average life span of human beings had been thirty years or less”. Living beyond 30 years was seen as rare and extraordinary, in fact unnatural. Every day beyond 30 years is a gift of modern medical science. And so, the implication is we all have a life span that we were not naturally programmed for. But what do we choose when things look bleak? An extension? How? In a hospital, with tubes and injections and a depressing regimen? Or simply stay put at home or a homely place and spend the sunset time with family and friends, doing all that you like? And, what should your choices be based on? Through the lives of young and not-so-young, Gawande takes us through what we may want to consider for ourselves. His only advice is that we must give these choices a consideration. It is a very timely book on excessive medication, hospitalisation, treatment and experimenting with treatment. It also refers to the inability or reluctance of doctors to help patients take that final call. Gawande`s book does not, even remotely, hint at anything like voluntary euthanasia. Quite the contrary, he talks of living the way one wants to against all odds. Yet, it reminds me of what Dr P.N. Chuttani, then director of the Postgraduate Institute of Medical Education & Research in Chandigarh, once said when we spoke on euthanasia. “It is not enough to have a biology. It is important to have biography.” How to ensure that biography during treatment is either a problem or a positive is the focus of the book. Gawande has written it like a beautiful human interest story, stringing all the stories he has heard from all kinds of people¯healthy, not so healthy, young, old, patient, attendant, neighbour, doctor, nurse and social worker. He has culled the best of authentic research, taken a bit from history, and, above all, real stories. One may have a subjective view on what matters in the end. But read the book, objectively. ...Read more

  • Rating StarThe Asian Age

    Old age and death are inevitable but we refuse to acknowledge the need to discuss ageing and dying. We don’t teach ourselves how to prepare to die. The book urges us to have hard conversations about death, dying, retirement, what can go wrong as we gow older. In his trademark style, Gawande mixes solid research with taut storytelling. We are invited to sit at the bedsides of his former patients, his family and his friends and experience their final days. There are passages which bring a lump to your throat... But as you turn the final page, you are not left with a feeling of despair. You realise that growing older, retirement, assisted leaving and even preparing for death can be positive experiences The one message which runs through many of the stories is the pitfall of medicalising mortality. Gawande is severe when he addresses the shortcomings of his own profession “The problem with medicine and the institutions it has spawned for the care of the sick and the old is not that they have had an incorrect view of what makes life significant. The problem is that they have almost no view at all. Medicine’s focus is narrow. Medical professionals concentrate on repair of health, not sustenance of the soul. Yet — and this is the painful paradox — we have decided that they should be the ones who largely define how we live in our waning days,” he writes There are passages which describe in poignant detail the final days of patients who were in such denial of their imminent deaths and whose families continued to ask for futile life-saving measures... Common to all the stories is a message that we all know but do not always want to hear — death is normal. Death may be the enemy, but it is also the natural order of things. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more