* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE AUTOBIOGRAPHY OF BENJAMIN FRANKLIN
  • Availability : Available
  • Translators : SAI SANE
  • ISBN : 9789353172503
  • Edition : 1
  • Publishing Year : AUGUST 2019
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 168
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
BENJAMIN FRANKLIN WAS AN EXCEPTIONAL MAN WHO EXCELLED IN ALL FIELDS HE EVER SET FOOT IN: POLITICS, SCIENCE, AND PHILOSOPHY. A WRITER, REFORMER, EDITOR, SCIENTIST, AND A WITTY, SARCASTIC AMERICAN CITIZEN, BENJAMIN FRANKLIN IS CONSIDERED ONE OF THE GREATEST AMERICANS OF ALL TIMES. FRANKLIN HAS A LOT OF THINGS TO SAY IN HIS AUTOBIOGRAPHY. THE AUTOBIOGRAPHY OF BENJAMIN FRANKLIN WAS INITIALLY WRITTEN TO GUIDE HIS SON, BUT DUE TO HIS UNIQUE AND ANIMATED STYLE OF WRITING, IT IS NOW AMONG THE MOST WIDELY READ CLASSIC IN WORLD LITERATURE. HIS WORDS ETCHED IN THESE PAGES ARE AN INSPIRATION TO HUMANS EVERYWHERE, MAKING THE AUTOBIOGRAPHY HIS BEST WORK.
‘बेंजामिन फ्रॅंकलिन’ हे बेंजामिन फ्रॅंकलिन यांचं आत्मचरित्र. सुरुवातीला त्यांनी वृत्तपत्रलेखन केले. फिलाडेल्फियाला गेल्यावर सॅम्युएल किमर नावाच्या माणसाकडे नोकरी केली. गव्हर्नरकडून त्यांना स्वत:चा छापखाना काढण्याचा सल्ला मिळाला आणि नंतर गव्हर्नरसाहेबांनी केलेली फसवणूक त्यांच्या लक्षात आली. मग लंडनमध्ये एका मुद्रकाकडे नोकरी केली. मित्राबरोबर व्यापार केला. परत किमरकडे नोकरी केली. त्यानंतर त्यांनी विविध क्षेत्रांत विविध कामे केली. हार्वर्ड आणि येल विद्यापीठांकडून त्यांना मानद पदव्या मिळाल्या. ते अमेरिकेचे पोस्टमास्तर जनरल बनले. इंग्लंड आणि फ्रान्स यांच्यातील युद्धात सैन्य जमवणे, प्रशिक्षित करणे, तोफखाना, किल्लेबांधणी इत्यादी अनेक गोष्टींत त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#बेंजामिनफ्रॅंकलीन #लेविनलिअर #सईसाने #बोस्टन #फिलाडेल्फिया #अमेरिकनवसाहती #ज्युन्टो #पुअररिचर्डसअ‍ॅलमनॅक #विद्युतशक्ती #फ्रॅंकलीन #स्टोव्ह/शेगडी #डेबोरारीड #सॅम्युएलकिमर #फ्रेंचआणिइंडियनयुद्ध #पोस्टमास्तरजनरल #फिलाडेल्फिया #गॅझेट #आर्टऑफव्हर्च्यु #सद्गुण #असेंब्ली#मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक#BENJAMINFRANKLIN #BENFRANKLIN #KEIMER #LEWISLEARY #PRESIDENT#DENNYSTANDREW #BRADFORDMRWHITEFIELD #PCOLLINSON #CAPTAINKENNEDY DRFOTHERGILL #PENN-PETERCOLLINSON #AUTOBIOGRAPHY #ASSEMBLY #POSTMASTERGENERAL #MILITIALAW #PHILADELPHIA-BOSTAN-QUAKER-JUNTO # NATURALPHILOSOPHY-PRESBYTERIAN-LANCASTER #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
  • Rating StarRadhika

    very nice

  • Rating StarDAINIK LOKSATTA 01-12-2019

    फ्रँकलिन समजून घेण्यासाठी... मानवी आयुष्य सुखावह करण्यासाठी आवश्यक असणारे शक्य तितके सारे काही एकाच आयुष्यात साध्य करणारे बेंजामिन फ्रँकलिन हे एक जगप्रसिद्ध असं प्रतिभावंत व्यक्तिमत्त्व. अमेरिकेत सार्वजनिक क्षेत्रातील अग्निशमन दल, पोलीस यंत्रणा, सारवजनिक ग्रंथालये अशा यंत्रणांपासून अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. खरं तर बेंजामिन यांचा जन्म एका गरीब कुटुंबातला. दारिद्र्याशी झगडत, पडेल ती कामं करत ते जीवन कंठत होते. मात्र या परिस्थितीपासून जगातील एक प्रभावशाली व्यक्ती बनेपर्यंतचा त्यांचा प्रवास खडतर होता. अनेक नाट्यमय वळणं त्यात आली. मात्र त्यामुळे बेंजामिन यांची जीवनदृष्टी अधिक प्रगल्भ होत गेली. वयाच्या बाराव्या वर्षापासून मुद्रक असलेल्या भावाच्या व्यवसायात मदत करताना त्यांनी जो अनुभव कमावला, त्यामुळेच पुढे ते मुद्रण व्यवसायातही यशाची भरारी मारू शकले. ‘नाही रे’पासून ‘आहे रे’पर्यंतचा त्याचा हा प्रवास समजून घेण्यासाठी ‘बेंजामिन फ्रँकलिन’ हे आत्मचरित्र उपयुक्त आहे. सई साने यांनी या पुस्तकाचा अनुवाद केला आहे. ‘बेंजामिन फ्रँकलिन - एक आत्मचरित्र’ ...Read more

  • Rating Starदैनिक सामना १७-११-१९

    प्रेरणादायी चरित्र... काही माणसं अशी असतात की, जीवनाची निश्चित अशी रूपरेषा त्यांनी आखलेली नसते. जीवन जसं समोर येईल त्या पद्धतीने ती वागत जातात; पण जीवनाशी अशी टक्कर देताना ती बहुआयामी होतात. बेंजामिन फ्रँकलिन हे अशा लोकांपैकीच एक. ‘बेंजामिन फ्रँकलन’ हे त्यांचं आत्मचरित्र त्यांच्या बहुआयामित्वाचं दर्शन घडवतं. लेविस लिअरी यांनी हे आत्मचरित्र वाचकांसमोर आणलं आहे. मराठीत अनुवाद सई साने यांनी केला आहे. बेंजामिन फ्रँकलिन यांचा जन्म १७०६ मध्ये बोस्टन येथे झाला. त्यांचे वडील साबण, मेणबत्त्या इत्यादी तयार करत असत. बेंजामिन हे जोशुआ फ्रँकलिन यांच्या १७ अपत्यांपैकी १५ वे अपत्य होते. अगदी लहान वयातच त्यांना त्यांच्या भावाच्या- जेम्स यांच्या- मुद्रणालयात शिकाऊ उमेदवार म्हणून काम करावे लागले; परंतु भावाशी न पटल्यामुळे त्यांनी ती नोकरी सोडून दिली आणि ते फिलाडेल्फियाला निघून गेले. भावाच्या वृत्तपत्रात त्यांनी थोडे लेखन केले. ती त्यांची वृत्तपत्रलेखनाची सुरुवात होय. फिलाडेल्फियाला गेल्यावर त्यांनी सॅम्युएल किमर नावाच्या माणसाकडे नोकरी धरली. तिथे त्यांच्या अनेक ओळखी झाल्या. तरुण फ्रँकलिनच्या वृत्तीची धडाडी आणि चमक गव्हर्नरच्या नजरेत भरली आणि त्यांनी लहान वयातच फ्रँकलिनला स्वत:चा छापखाना काढण्याची कल्पना सुचवली. त्यासाठी लागेल ती मदत आपण करू असेही सुचवले. फ्रँकलिनच्या वडिलांचा त्यांच्या लहान वयामुळे या गोष्टीला विरोध होता. तरीही फ्रँकलिन इंग्लंडला गेले आणि तिथे गेल्यावर त्यांच्या लक्षात आले की, गव्हर्नर साहेबांनी त्यांना फसवले. तिथे त्यांनी एका मुद्रकाकडे नोकरी केली. १७२६ मध्ये डनहॅम नावाच्या आपल्या ज्येष्ठ मित्राबरोबर त्यांचा व्यापार सांभाळावा या कल्पनेने ते परत आले; परंतु लवकरच डनहॅमचे निधन झाल्यावर त्यांनी परत किमरकडे नोकरी धरली. दोन वर्षांनी किमरचे पॅनसिल्व्हानिया गॅझेट ताब्यात घेऊन त्यांनी ते वृत्तपत्र यशस्वीरीत्या चालवले. त्यांची जुनी प्रेयसी डेबोरा रीड हिच्याशी त्यांनी विवाह केला. त्यांना दोन मुले होती. पहिला मुलगा विल्यम यालाच उद्देशून या आत्मचरित्राचा पहिला भाग लिहिला आहे. १७३० च्या दशकात फ्रँकलिन यांनी अनेक छोटी-मोठी पदं भूषवली. सरकारचे छपाईचे काम त्यांच्याकडे होते. त्याच वेळी त्यांनी आपल्या ‘पुअर रिचर्ड्स अ‍ॅलमनॅक’ लिहायला सुरुवात केली. ते फिलाडेल्फियाचे पोस्टमास्तर बनले. या दशकाच्या शेवटी त्यांनी फ्रँकलिन स्टोव्हची निर्मिती केली. १७४० च्या दशकात त्यांनी अनेक कामं हातात घेतली, ज्यात अग्निशमन दल, पोलीस खातं, पॅनसिल्व्हानिया विश्वविद्यालय, रस्तेसफाई अभियान आणि इतर छोट्या सार्वजनिक कामांचा समावेश आहे. १७४८ मध्ये ते मुद्रणाच्या व्यवसायातून निवृत्त झाले आणि त्यांनी विद्युतशक्तीच्या वैज्ञानिक प्रयोगांवर आपले लक्ष केंद्रित केले. १७५३ मध्ये त्यांना हार्वर्ड आणि येल विद्यापीठांकडून मानद पदव्या मिळाल्या. ते अमेरिकेचे पोस्टमास्तर जनरल बनले. पुढल्या वर्षी जेव्हा इंग्लंड आणि फ्रांस यांच्यातील युद्ध सुरू झाले. (फ्रेंच आणि इंडियन युद्ध), तेव्हा वसाहतींच्या संरक्षणाकरता लागणारा निधी कसा गोळा करता येईल, त्याची योजना फ्रँकलिन यांनी आखायला सुरुवात केली. प्रत्यक्ष युद्धातही त्यांचा सहभाग मोठा आहे. सैन्य जमवणे, प्रशिक्षित करणे, तोफखाना, किल्ले बांधणी इत्यादी अनेक गोष्टींत त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या काळातील ते एक उत्तम राजनैतिक मुत्सद्दी होते. हे आत्मचरित्र १७५७ च्या घटनांपाशी येऊन अचानकच थांबतं. ते अपूर्णच राहिलं. हे आत्मचरित्र तीन वेगवेगळ्या काळात फ्रँकलिननी लिहिलं– १७७१ मध्ये इंग्लंड येथे, १७८३ मध्ये फ्रांस मध्ये आणि १७८८ मध्ये अमेरिकेत. ते पूर्ण करण्यापूर्वीच फ्रँकलिन यांचा १७९० मध्ये मृत्यू झाला. एक माणूस किती प्रकारची कामं करू शकतो, त्याचा प्रत्यय हे आत्मचरित्र वाचल्यावर येतो. अर्थातच हे आत्मचरित्र प्रेरणादायक आहे. - अंजली पटवर्धन ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 06-10-2019

    मार्गदर्शक आत्मचरित्र... बेंजामिन फ्रँकलिन हे अमेरिकेच्या इतिहासातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व! अठराव्या शतकात जगभरात होऊन गेलेल्या महनीय व्यक्तिंपैकी फ्रँकलिन हे एक महत्त्वाचं नाव. उत्तम अ‍ॅथलिट, चांगला लेखक, हजरजबाबी वक्ता आणि याशिवाय मुद्रक, शास्त्रजञ अशी त्यांची अनेक रूपं होती. एवढंच नाही, तर सार्वजनिक ग्रंथालय, अग्निशमन दल, पोलीस दल अशा महत्त्वाच्या बाबींची सुरुवातही त्यांनी केली. अशा या उत्तुंग माणसाने स्वत:चं आत्मचरित्र लिहिलं आहे आणि तेही स्वत:च्या मुलाला मार्गदर्शक ठरावं म्हणून. त्याचा मराठी अनुवाद ‘बेंजामिन फ्रँकलिन’ नुकताच प्रकाशित झाला आहे. – रसिक भोळे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more