WARREN BUFFETT IS KNOWN AS THE GREATEST STOCK MARKET INVESTOR TILL DATE. NATURALLY, HIS `GURU` MUST HAVE BEEN A PHENOMENAL PERSON! THAT IS BENJAMIN GRAHAM FOR YOU. RISING FROM EXTREME POVERTY HE SAW HIS MOTHER`S MEGERE SAVINGS GETTING WIPED OUT IN THE STOCK MARKET. USING HIS IMMENSE INTELLECT AND LOGICAL ABILITIES, GRAHAM COMPLETELY CHANGED HIS PERSONAL SITUATION. NOT STOPPING AT THIS, HE DEVELOPED A PROGRAMME FOR TEACHING INVESTING SKILLS. AFTER GETTING VERY RICH, HE DID NOT SEEK MORE WEALTH AND HAPPILY RETIRED FROM THE WORLD OF INVESTING. HIS CONCEPT OF `MARGIN OF SAFETY` BECAME A MANTRA FOR ALL SUCCESSFUL INVESTORS. TO PROPAGATE THIS AND HIS OTHER CONCEPTS, HE WROTE BEST-SELLING BOOKS. HIS `THE INTELLIGENT INVESTOR` IS CONSIDERED AS THE BIBLE OF INVESTING. FULL OF DRAMAS AND UPS-AND-DOWNS, THIS IS BENJAMIN GRAHAM`S FASCINATING LIFE STORY.
वॉरन बफे हे नाव ‘शेअरबाजारात अभूतपूर्व यश मिळवणारा मनुष्य ’ म्हणून जगप्रसिद्ध आहे. अशा वॉरन बफेचा गुरू असलेला माणूस म्हणजे काय जबरदस्त प्रकार असेल! बेंजामिन ग्रॅहॅम हे त्याचं नाव. विलक्षण गरिबीतून वर आलेल्या ग्रॅहॅमनं आपल्या आईनं शेअरबाजारात केलेली गुंतवणूक पूर्णपणे बुडताना अनुभवली. अफाट बुद्धिमत्ता आणि तर्कबुद्धी यांच्या जोरावर ग्रॅहॅमनं वैयक्तिक पातळीवर ही परिस्थिती साफ बदलून तर टाकलीच; पण शिवाय यशस्वी गुंतवणूक कशी करायची याचे वर्ग घ्यायलाही सुरुवात केली. भरपूर पैसे कमावून झाल्यावर तितक्याच शांतपणे ग्रॅहॅम गुंतवणुकीच्या विश्वातून आणखी लोभ न बाळगता बाहेर पडला. सगळ्यांना आपल्या ‘मार्जिन ऑफ सेफ्टी’ या संकल्पनेचा फायदा मिळावा आणि गुंतवणुकीच्या संदर्भातले बारकावे समजावेत यासाठी ग्रॅहॅमनं लिहिलेली पुस्तकं अजूनही ‘बेस्टसेलर’ मानली जातात. त्याचं ‘द इंटेलिजंट इन्व्हेस्टर’ हे पुस्तक तर गुंतवणुकीचं बायबल म्हणूनच ओळखलं जातं. उलथपालथींनी भरलेलं अतिशय नाट्यमय आयुष्य जगलेल्या ग्रॅहॅमची ही कहाणी.