MY NAME IS SURANJAN. YOU DONT RECOGNIZE ME? YOU WROTE A NOVEL ABOUT ME. IT WAS CALLED LAJJA. ONE DAY IN CALCUTTA, TASLIMA SUDDENLY FINDS HERSELF FACE TO FACE WITH SURANJAN, THE PRINCIPAL CHARACTER FROM HER CONTROVERSIAL NOVEL LAJJA. PERSECUTED IN THEIR NATIVE BANGLADESH, SURANJAN AND HIS FAMILY HAVE, LIKE TASLIMA, MOVED TO THE CITY ACROSS THE BORDER. BUT IS LIFE FOR A HINDU FAMILY FROM AN ISLAMIC NATION ANY BETTER IN A COUNTRY WHERE A MAJORITY OF THE POPULATION HAPPENS TO BE HINDU? LEADING POOR, UNMOORED LIVES, EXPLOITED AND FRUSTRATED AT EVERY STEP OF THE WAY, AND ALWAYS CARRYING WITH THEM THE MEMORIES OF A SCARRED COMMUNAL HISTORY, SURANJAN AND SO MANY OTHERS LIKE HIM SEEM TO LEAD INCOMPLETE LIVES IN THEIR SO-CALLED SAFE HAVEN. SHAMELESS, THE EXPLOSIVE SEQUEL TO LAJJA, IS AN UNCOMPROMISING, HEART-BREAKING LOOK AT ORDINARY PEOPLES LIVES IN OUR TROUBLED TIMES.
तसलिमा नासरिन यांची ही कादंबरी स्थलांतरितांच्या जीवनाची चित्तरकथा आहेण् आपली जन्मभूमि सोडून परक्या मुलखातए जगभरच्या कानाकोपऱ्यातए वेगवेगळ्या वातावरणात स्वतःला रूजवू पाहणाऱ्यांची ही गोष्ट आहेण् अर्थात तसलिमा यांनी स्वतः हे आयुष्य जवळून अनुभवलेले आहेण् म्हणूनच स्वतः तसलिमा यांचं जगणंही यात प्रतिबिंबित होत राहतंण् त्यांच्या ष्लज्जाष् कादंबरीमुळे त्यांना कट्टरपंथी लोकांनी देश सोडायला लावलाण् लज्जामध्ये अनुभवाला येणाऱ्या प्रसंगांचीच पुढील आवृत्ती या कादंबरीत पाहायला मिळतेण्
तसलिमा यांनी मोठा काळ देशाबाहेर व्यतित केला आहेण् आपली मूळे उखडली जाण्याची ही वेदना या कादंबरीत प्रकर्षाने येतेण् कादंबरीची सुरुवातच एका भेटीने होतेण् लज्जा कादंबरीतील पात्र असणारा सुरंजन लेखिकेला अचानक भेटायला येतोण् हा तोच सुरंजन असतोए जो लज्जा कादंबरीच्या केंद्रस्थानी आहेण् लेखिका या गोष्टीपासून अनभिज्ञ आहे की सुरंजन आणि त्याचे कुटुंब बांगलादेशातील 1993मधील सांप्रदायिक दंगलीवेळी स्वतःचा बचाव करत भारतात येण्यात यशस्वी झाले होतेण् या भेटीत लेखिकेला कळतं की सुरंजनचे वडील सुधामय यांचे निधन झाले आहेए तर त्याची आई आणि बहीण जिवंत आहेतण् या भेटीत सुरंजनच्या स्थलांतराचे गोष्ट समोर येतेण् या दोघांच्या संवादातून एकेक धागा उलगडत जातोण्
याच धर्तीवर लेखिकेला एकेक पात्र भेटत जातेण् आणि त्यांच्या कथा समोर येत जातातण् हे पुस्तक कट्टरपंथीयांची बेशरमी वृत्ती अधोरेखित करत त्या विरोधात आवाज उठवण्याच्या संभावनांची चाचपणी करतंण् पण हे पुस्तक राजकीय नाहीए तर सामाजिक स्तरावरील स्थितीबाबत अधिक निवेदन करतंण् लेखिका अर्थात तसलिमा यांना सुरंजनए किरणमयीए माया आणि जुलेखा ही चार पात्र भेटतातण् आणि या पात्रांसोबतचा संवाद कादंबरी प्रवाहित करतोण्