"BEST KEPT SECRET: BOOK THREE OF THE CLIFTON CHRONICLES IS THE THIRD INSTALLMENT IN THE MUCH ACCLAIMED SERIES, THE CLIFTON CHRONICLES, 1945 BY JEFFREY ARCHER. ARCHER DECIDES TO ENTHRALL HIS READERS WITH YET ANOTHER ONE OF HIS WRITING AND HE DOES IT SO MAGNIFICENTLY.
THE BOOK STARTS OFF WITH A VOTE TO DETERMINE THE FATE HARRY CLIFTON AND GILES BARRINGTON, AS TO WHO WILL INHERIT THE FAMED BARRINGTON FORTUNE. THE VOTING COMES TO AN END WITH A TIE THAT SERVES AS A CATALYST TO THE DISASTER THAT IS SLOWLY BUT SURELY BREWING. WITH A LONG SHADOW CAST ACROSS THEIR LIVES, HARRY CLIFTON AND GILES BARRINGTON STRUGGLE TO FIND A SOLID FOOTING IN THEIR OWN RESPECTIVE LIVES. HARRY LEAVES FOR AMERICA IN AN ACT OF PROMOTING HIS NEW NOVEL, WHILE HIS WIFE EMMA EMBARKS ON A JOURNEY OF HER OWN, TO FIND THE LITTLE GIRL WHO WAS ABANDONED AT HER FATHER`S OFFICE THE NIGHT OF HIS KILLING. WHEN THE GENERAL ELECTION ANNOUNCEMENT IS MADE, GILES BARRINGTON IS SHOCKED TO FIND THAT SEBASTIAN CLIFTON, HARRY AND EMMA`S SON, IS THE OPPONENT. THE CONSERVATIVES HAVE PUT HIM AGAINST AND ULTIMATELY HOW THE NEPHEW WILL ALTER HIS UNCLE`S LIFE IS DESCRIBED IN DETAIL.
"
"बॅरिंग्टन हे लंडनमधील एक सधन आणि नामवंत घराणं. ह्यूगो बॅरिंग्टन हा त्या घराण्याचा वंशज. गाइल्स आणि एमा ही त्याची दोन अपत्यं. हॅरी क्लिप्टन हा ह्यूगोचा अनौरस मुलगा. ह्यूगोची झालेली हत्या, हॅरी क्लिप्टन आणि एमा बॅरिंग्टन यांच्या लग्नाला चर्चने केलेली मनाई, ह्यूगोच्या हत्येनंतर बॅरिंग्टन घराण्याच्या वारसाबाबत न्यायालयात उभा राहिलेला वाद, या प्रकरणात गाइल्सच्या बाजूने लागलेला निकाल, त्यानंतर हॅरी व एमाचा झालेला विवाह, त्यानंतर त्यांच्या मुलाचा सॅबेस्टियनचा जन्म, ह्यूगोच्या एका महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधातून जन्माला आलेली मुलगी जेसिका हिला एमा आणि हॅरीने दत्तक घेणे, यथावकाश सॅबेस्टियनचा तारुण्यात प्रवेश, गाइल्सचा निवडणुकीत विजय, एमा आणि गाइल्सच्या आईचा एलिझाबेथचा मृत्यू, मृत्यूसमयी तिने हॅरीच्या हातात दिलेला लिफाफा, खट्याळ पण अतिशय हुशार असणारा सेबॅस्टियन एका डॉनच्या जाळ्यात सापडणं, डॉनचा सज्जन मुलगा ब्रूनोशी सेबॅस्टियनची चांगली मैत्री होणं, सेबॅस्टियनकडून आपल्या बनावट नोटा रोदिनने बनवलेल्या एका पुतळ्यातून इंग्लंडमध्ये आणण्याचा बेत डॉनने रचणं, सेबॅस्टियनला याची कल्पनाच नसणं, या बेताचा सुगावा पोलिसांसहित हॅरी, एमा आणि गाइल्सलाही लागणं, त्याच वेळी सेबॅस्टियनाला केंब्रिज विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळाल्याची बातमीही सर्वांना समजणं अशा नाट्यपूर्ण घटनांसाठी आणि डॉन या बनावट नोटा इंग्लंडमध्ये आणण्यात यशस्वी होतो का, डॉनच्या तावडीतून सुटून सेबॅस्टियन आपल्या आई-वडिलांचे केंब्रिज विद्यापीठात त्याने शिक्षण घ्यावे हे स्वप्न पूर्ण करू शकेल का, हे जाणून घेण्यासाठी ‘बेस्ट केप्ट सिक्रेट’ हे पुस्तक वाचलं पाहिजे.
"