* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: BETTER:A SURGEONS NOTES ON PERFORMANCE
  • Availability : Available
  • Translators : SUNITI KANE
  • ISBN : 9789353172572
  • Edition : 1
  • Publishing Year : JUNE 2019
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 240
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : REFERENCE AND GENERAL
  • Sub Category : RESEARCH & INFORMATION
  • Available in Combos :ATUL GAWANDE COMBO SET-4 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
THE NEW YORK TIMES BESTSELLING AUTHOR OF COMPLICATIONS EXAMINES, IN RIVETING ACCOUNTS OF MEDICAL FAILURE AND TRIUMPH, HOW SUCCESS IS ACHIEVED IN A COMPLEX AND RISK-FILLED PROFESSION THE STRUGGLE TO PERFORM WELL IS UNIVERSAL: EACH ONE OF US FACES FATIGUE, LIMITED RESOURCES, AND IMPERFECT ABILITIES IN WHATEVER WE DO. BUT NOWHERE IS THIS DRIVE TO DO BETTER MORE IMPORTANT THAN IN MEDICINE, WHERE LIVES ARE ON THE LINE WITH EVERY DECISION. IN HIS NEW BOOK, ATUL GAWANDE EXPLORES HOW DOCTORS STRIVE TO CLOSE THE GAP BETWEEN BEST INTENTIONS AND BEST PERFORMANCE IN THE FACE OF OBSTACLES THAT SOMETIMES SEEM INSURMOUNTABLE. GAWANDE`S GRIPPING STORIES OF DILIGENCE, INGENUITY, AND WHAT IT MEANS TO DO RIGHT BY PEOPLE TAKE US TO BATTLEFIELD SURGICAL TENTS IN IRAQ, TO LABOR AND DELIVERY ROOMS IN BOSTON, TO A POLIO OUTBREAK IN INDIA, AND TO MALPRACTICE COURTROOMS AROUND THE COUNTRY. HE DISCUSSES THE ETHICAL DILEMMAS OF DOCTORS` PARTICIPATION IN LETHAL INJECTIONS, EXAMINES THE INFLUENCE OF MONEY ON MODERN MEDICINE, AND RECOUNTS THE ASTOUNDINGLY CONTENTIOUS HISTORY OF HAND WASHING. AND AS IN ALL HIS WRITING, GAWANDE GIVES US AN INSIDE LOOK AT HIS OWN LIFE AS A PRACTICING SURGEON, OFFERING A SEARINGLY HONEST FIRSTHAND ACCOUNT OF WORK IN A FIELD WHERE MISTAKES ARE BOTH UNAVOIDABLE AND UNTHINKABLE. AT ONCE UNFLINCHING AND COMPASSIONATE, BETTER IS AN EXHILARATING JOURNEY NARRATED BY "ARGUABLY THE BEST NONFICTION DOCTOR-WRITER AROUND" (SALON). GAWANDE`S INVESTIGATION INTO MEDICAL PROFESSIONALS AND HOW THEY PROGRESS FROM MERELY GOOD TO GREAT PROVIDES RARE INSIGHT INTO THE ELEMENTS OF SUCCESS, ILLUMINATING EVERY AREA OF HUMAN ENDEAVOR.
डॉ. अतुल गवांदे या शल्यविशारदाचं गुणवत्तेबाबतचं चिंतन प्रकट करणारं पुस्तक आहे ‘बेटर.’ वैद्यकीय क्षेत्रातील कार्यक्षमता, प्रयोगशीलता, कल्पकता, विश्वासार्हता, एकूणच या क्षेत्रातील गुणवत्ता कशी वाढेल, याकडे डॉ. गवांदे यांनी लक्ष वेधलं आहे. या गुणवत्तेसंबंधी विवेचन करताना त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील अनेक विषयांना स्पर्श केला आहे. अगदी हात स्वच्छ करण्यापासून ते फाशीच्या कोठडीतील डॉक्टर्सपर्यंत. त्यांनी या विवेचनाला उदाहरणांची जोड दिल्यामुळे त्यांच्या मुद्द्यांमध्ये स्पष्टता आली आहे. या पुस्तकाचा समारोप आणि एकूणच हे पुस्तक वैद्यकीय क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्या क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठीही मार्गदर्शक ठरावं. अगदी साध्या-सोप्या भाषेत लिहिल्यामुळे हे पुस्तक वाचनीय झालं आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#अतुलगवांदे #सुनितीकाणे #वैद्यकशास्त्र #परिश्रम #जंतुसंसर्ग #स्वच्छंती #योग्यकार्यप्रणाली #रुग्ण #डॉक्टर #पोलिओलसीकरणमोहिम #युद्धातीलदुर्घटना #उपकारबद्धता #फाशीच्याकोठडीतलेडॉक्टर्स #कल्पकता #कामाचादर्जा #समस्या #मर्यादा #ATULGAWANDE #MEDICALSCIENCE #CASUALTIESOFWAR #DOCTORS #OWE #PIECEWORK #WASHING HANDS #DEATHCHEMBER #CANCER #ARMY #INGENUITY #NAKED #SURGERY #POLIO #MEDICALMYSTERIES #DOCTOR #RULES #LAW
Customer Reviews
  • Rating Starविलास भांदिर्गे

    डाॅ.अतुल गवांदे यांनी लिहलेल "बेटर" एका शल्यविशारदचं गुणवत्तेचं चिंतन .पुस्तक खूप छान. मला आपला अनुवादही आवडला.

  • Rating StarKrishna Jadhav

    आपण प्रकाशित केलेले डॉक्टर अतुल गवांदे यांनी लिहिलेले व सुनीती काणे यांनी अनुवादित केलेले "बेटर "हे पुस्तकं नुकतेच वाचले. खूप आवडले, भावले. पुस्तकं खूप माहितीपूर्ण आहे. लेखकाचे व अनुवाद करणाऱ्या काणे यांचे कौतुक व मनापासून आभार. असं खूप माहितीपूर्ण पस्तकं छापल्याबद्दल आपलेही कौतुक व मनापासून आभार. ...Read more

  • Rating StarDivya Marathi 9.11.19

    वैद्यकीय क्षेत्राचा सखोलतेने, अभ्यासपूर्णतेने आणि सोदाहरण घेतलेला वेध... डॉ. अतुल गवांदे हे अमेरिकेत शल्यविशारद म्हणून प्रॅक्टिस करतात. वैद्यकीय क्षेत्रात अधिक गुणवत्ता, अचूकता, सुसूत्रता कशी आणता येईल, या विषयी त्यांनी सखोल आणि सोदाहरण चर्चा केली हे त्यांच्या ‘बेटर’ या पुस्तकातून. या पुस्तकाची त्यांनी तीन विभागांत विभागणी केली आहे. पहिला भाग आहे ‘परिश्रमपूर्वक लक्ष पुरविणे’, दुसरा भाग आहे ‘कार्यप्रणाली वापरणे’ आणि तिसरा भाग आहे ‘कल्पकता.’ या पुस्तकाचा अनुवाद केला आहे सुनीति काणे यांनी. ‘परिश्रमपूर्वक लक्ष पुरविणे’ या विभागात त्यांनी ‘हात धुण्याबाबत’ या प्रकरणात जंतुसंसर्ग टाळण्यासाठी हात धुणं कसं आवश्यक आहे, ते केव्हा आणि कशा पद्धतीने धुतले पाहिजेत याचं विवेचन केलं आहे. त्याचबरोबर विविध रोग पसरविणारे विविध रोगजंतू, जंतुसंसर्ग नियंत्रण विभाग याविषयीही माहिती दिली आहे. बाळंतरोग हा जंतुसंसर्गामुळे होतो, हे शोधून काढून निर्जंतुकतेचा आग्रह धरणाऱ्या डॉक्टरची कथा, जंतुसंसर्गाच्या संबंधातील उदाहरणं इ. बाबींचा समावेशही या प्रकरणात करण्यात आला आहे. ‘स्वच्छ करून टाकणे’ या प्रकरणात त्यांनी पोलिओ निर्मूलनाच्या मोहिमेचं तपशीलवार विवेचन केलं आहे. पोलिओ मोहीम कशी सुरू झाली, इथपासून ते या मोहिमेचं जगभर पसरलेलं जाळं, कर्नाटकमधील त्यांच्या एका डॉक्टर मित्राबरोबर फिरताना पोलिओ निर्मूलन मोहिमेच्या बाबतीत आलेले अनुभव इ. बाबत त्यांनी सविस्तर लिहिलं आहे. ‘युद्धातील दुर्घटना’ या प्रकरणात त्यांनी युद्धात जखमी होणाऱ्या सैनिकांच्या जखमा कशा प्रकारच्या असतात, सैनिकांवर उपचार करण्याच्या पद्धतींमध्ये होत गेलेल्या सुधारणा, सैनिकांना तातडीने उपचार करण्यासाठी केलेली व्यवस्था, त्यात येणाऱ्याb अडचणी, त्यावर शोधलेले उपाय इ.बाबत सविस्तर विवेचन केलं आहे. ‘योग्य कार्यप्रणाली वापरणे’ या विभागातील ‘नग्न रुग्ण’ या प्रकरणात स्त्री-पुरुषांच्या गुप्तांगांची, नाजूक अवयवांची तपासणी वेगवेगळ्या देशांत कशा प्रकारे केली जाते, या तपासणीच्या वेळी स्त्रियांनी कशा प्रकारचे कपडे घालावेत, पुरुष डॉक्टर जेव्हा एखाद्या स्त्रीच्या नाजूक अवयवांची तपासणी करत असेल तेव्हा तिथे शॅपेरॉन (नर्स किंवा दुसरी स्त्री) असावी का, याबाबतची डॉक्टरांची आणि रुग्णांची विविध मतं सांगितली आहेत. काही डॉक्टर्सचे आणि रुग्णांचे या संदर्भातील अनुभव नोंदवले आहेत. ‘तुकड्यातुकड्यातलं काम’ या प्रकरणात डॉक्टरांच्या अर्थकारणाची चर्चा केली आहे. डॉक्टरांनी प्रत्येक सेवेसाठी किती मोबदला घ्यावा, याबाबत सुनिश्चितता नसली तरी सर्वसाधारणपणे त्याचे दर ठरवता येऊ शकतात. कोणताही डॉक्टर एखाद्या विमा कंपनीशी जोडलेला आहे का नाही, यावरही त्याची आमदनी ठरलेली असते. डॉक्टरची व्यावसायिकता आणि त्याचा सेवाभाव यावरही गवांदे यांनी सोदाहरण चर्चा केली आहे. अर्थातच ती अमेरिकेतील वैद्यकीय सेवेच्या संदर्भात आहे. एकूणच हे प्रकरण डॉक्टरांच्या अर्थकारणावर सविस्तरपणे प्रकाश टाकणारं आहे. ‘फाशीच्या कोठडीतले डॉक्टर्स’ या प्रकरणात कैद्यांना प्रत्यक्ष मृत्युदंड देताना डॉक्टरांचा त्यात प्रत्यक्ष सहभाग असावा की नाही, यावर तपशीलवार चर्चा केली आहे. फाशीच्या कोठडीत डॉक्टरच्या उपस्थितीची गरज का भासली, अमेरिका आणि कॅलिफोर्नियातील डॉक्टर संघटनांनी मृत्युदंडाच्या वेळी डॉक्टरचा त्यात सहभाग असण्याला केलेला विरोध, कैद्यांना मृत्युदंड देण्याचे प्रकार, त्यातील त्रुटी, मृत्युदंडाच्या अंमलबजावणीत डॉक्टरांच्या सहभागाबाबतची आचारसंहिता, ज्या डॉक्टरांनी कैद्यांच्या मृत्युदंडात सहभाग घेतला त्यांचा दृष्टिकोन आणि त्यांचे त्या संदर्भातील अनुभव इत्यादी मुद्द्यांच्या आधारे सखोल चर्चा केली आहे. ‘लढा देण्याबाबत’ या प्रकरणात गुंतागुंतीच्या काही केसेसचे अनुभव सांगितले आहेत. डॉक्टरी कौशल्य पणाला लावूनही काही वेळेला गुंतागुंतीच्या केसेसमध्ये कसं अपयश येतं आणि काही वेळेला आश्चर्यकारकरीत्या पेशंट कसा बचावतो, हे या अनुभवांवरून दिसून येतं. शेवटी डॉक्टरांच्या प्रयत्नांनाही कधी कधी मर्यादा येते, हे या प्रकरणावरून दिसून येतं. या पुस्तकाच्या ‘कल्पकता’ या तिसऱ्या भागातील ‘गुणसंख्या’ या प्रकरणात बाळंतपणाच्या वेळेस उद्भवणाऱ्या अडचणी, त्याबाबत केल्या जाणाऱ्या उपाययोजना इ.बाबत सविस्तर आणि सोदाहरण चर्चा केली आहे. ‘बेल कव्र्ह’ या प्रकरणात सी. एफ. या कफाशी संबंधित आजाराबाबत तपशीलवार आणि सोदाहरण चर्चा केली आहे. ‘कामगिरी सुधारण्यासाठी’ या प्रकरणात डॉ. गवांदे यांनी नांदेड (कर्नाटक) जिल्हा रुग्णालयातील रुग्णांच्या बाबतीतील अनुभव सांगितले आहेत आणि त्या अनुभवांच्या आधारे सरकारी रुग्णालयातील डॉक्टर्स अनेक अडचणींवर मात करून किती कार्यक्षमतेने सेवा बजावत असतात, याची चर्चा केली आहे. जिल्हा रुग्णालयातील कार्यक्षम डॉक्टर्स बघितल्यानंतर गवांदे यांनी आपलं मत नोंदवताना लिहिलं आहे, ‘असं असूनही मला जे दिसलं, ते होतं : सुधारणा घडवणं शक्य असतं! त्यासाठी तीव्र बुद्धिमत्ता गरजेची नसते. त्यासाठी नेटानं, प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहणं गरजेचं असतं. त्यासाठी स्वच्छ नैतिक विचार गरजेचे असतात आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, त्यासाठी प्रयत्न करत राहण्याची तयारी गरजेची असते.’ समारोपात, सरासरीपेक्षा अधिक चांगली कार्यक्षमता प्राप्त करण्याच्या काही युक्त्या त्यांनी सांगितल्या आहेत. तर, वैद्यकशास्त्रातील काही महत्त्वाच्या बाबींची सोदाहरण आणि साधक-बाधक चर्चा करणारं हे पुस्तक वैद्यकीय क्षेत्रात येऊ घातलेल्या विद्याथ्र्यांसाठी आणि कार्यरत असणाऱ्यांसाठीही मार्गदर्शक असलं, तरी ते कुठेही कंटाळवाणं किंवा रटाळ होत नाही; कारण गवांदे यांची साधी, सोपी भाषा आणि त्यांनी दिलेली उदाहरणं. त्यामुळे सर्वसामान्य वाचकही हे पुस्तक अगदी रुचीने वाचू शकतो. गवांदे यांनी वैद्यकीय क्षेत्राच्या संदर्भात केलेली चर्चा अन्यही क्षेत्रांना लागू होऊ शकते. त्यांची ही चर्चा मानवी मू्ल्यांनाही स्पर्श करते. अगदी प्रस्तावनेपासून समारोपापर्यंत हे पुस्तक वाचकाच्या मनाची पकड घेतं. तेव्हा वैद्यकीय क्षेत्राच्या विविध पैलूंचं दर्शन घडविणारं, त्या क्षेत्राविषयीची माहिती आणि ज्ञान वाचकांपर्यंत सहजतेने पोचवणारं हे पुस्तक अवश्य वाचावं असं आहे. सुनीति काणे यांचा अनुवाद उत्तम. -अंजली पटवर्धन ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 18-08-2019

    शल्यविशारदाचं चिंतन... वैद्यकीय क्षेत्रातील कामाचा दर्जा सुधारण्याबाबत बरेचदा नामवंत लोक क्रीडापटूंचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवतात. चिकाटी, परिश्रम, मेहनत, सराव आणि अचूकपणा यांचे यथोचित समतोल या क्रीडापटूंमध्ये पाहायला मिळतो. पण प्रत्येक गोष्टीचं ज्ञान े केवळ कुठल्यातरी परिणामावर अवलंबून राहून कसे मिळवता येईल. त्यासाठी अवचित अतिप्रसंगाचे होणारे आगमनदेखील तितकाच महत्त्वाचा भाग असतो. जीवन-मरणाच्या सीमारेषेवर असलेल्या जीवाची घालमेल अत्यवस्था यांना सामोरे जाताना तुम्हाला अचूक आणि तितकाच विनाविलंब निर्णय घ्यायचा असतो. तो अनुभव थरारक व जीवनाच्या परिभाषेवर डॉक्टरांचे महत्त्व अधोरेखित होते. अतुल गवांदे लिखित ‘बेटर’ हे पुस्तक एका शल्यविशारदाचं गुणवत्तेबाबतचं चिंतन आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

NAGZIRA
NAGZIRA by VYANKATESH MADGULKAR Rating Star
कृष्णा DIWATE

आजच्या पुस्तकाचा विषय माझ्या आवडीचा - जंगलाचा... *जंगल - काय असतं ?* म्हटलं तर फक्त झाडे, नदी-नाले, प्राणी पक्षी यांनी भरलेला जमिनीचा एक तुकडा .... की वन-देवता? की पशु-पक्ष्यांचं घर? की जीवनचक्रातील अति-महत्वाचा घटक? की आपल्यातल्या दांभिकपणाला - दिखव्याला - व्यवहाराला गाळून टाकणारं आणि आपल्यालाही त्याच्यासारखाच सर्वसमावेशक, निर्मळ बनवणारं आणि आपल्यातल्या originality ला बाहेर आणणारं, असं एक अजब रसायन? *जंगल भटक्यांना विचारा एकदा... बोलतानाच त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात जी चमक दिसेल ना, त्यातून फार वेळ वाट न बघता सरळ जंगल गाठण्याची इच्छा न होईल तरच नवल!* आमचा एक मित्र- ज्याने असंच जंगलांचं वेड लावलं आणि अजून एक भटकी मैत्रीण - जिने त्या वेडात भरच घातली..... आणि असे अजून अनेक भटके निसर्गप्रेमी ... आणि मुळातूनच निसर्गाची ओढ , या सर्व गोष्टी माझ्या जंगल -प्रेमासाठी कारणीभूत ठरल्या. *आणि मग अरण्यऋषी श्री. मारुती चितमपल्ली, शंकर पाटील (कथा), डॉ. सलीम अली, जिम कॉर्बेट, व्यंकटेश माडगूळकर इत्यादींनी या निसर्गदेवतेकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी दिली. त्या सर्वांनाच आजचा हा पुस्तक-परिचय सादर अर्पण!!* कथांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लेखकाने हे नागझिरा पुस्तक का बरे लिहिले असावे? मनोगतात ते स्वतः म्हणतात - *"महाराष्ट्रातील एखाद्या आडबाजूच्या जंगलात जाऊन महिना दोन महिने राहावे, प्राणी जीवन, पक्षी जीवन, झाडेझुडे पाहत मनमुराद भटकावे आणि या अनुभवाला शब्दरूप द्यावे हा विचार गेली काही वर्षे माझ्या मनात घोळत होता. काही परदेशी प्राणी शास्त्रज्ञांनी असा उद्योग करून लिहिलेली उत्तम पुस्तके माझ्या वाचण्यात आल्यापासून ही इच्छा फारच बळवली. मी इथे तिथे प्रयत्न करून पाहिले आणि निराश झालो. हे काम आपल्या आवाक्यातले नाही असे वाटले. मग शेल्लरने कुठेतरी लिहिल्याचे वाचले की भारतातील लोक प्राणी जीवनाच्या अभ्यासात उदासीन आहेत, आफ्रिकेच्याही फार मागे आहेत. त्यांना वाटते अशा संशोधनासाठी प्रचंड खर्च करावा लागतो, पाण्यासारखा पैसा लागतो. पण तसे नाही. गळ्यात दुर्बीण, मनात अमाप उत्साह आणि आस्था असली की अभ्यास होतो. मी शक्य तेव्हा एकट्यानेच उठून थोडेफार काम करत राहायचे ठरवले. कधी काझीरंगा, मानस या अभयारण्यावर, कधी नवेगाव-बांधावर तर कधी कोरेगावच्या मोरावर लिहित राहिलो.* *मला चांगली जाणीव आहे की हा प्रयत्न नवशिक्याचा आहे. तो अपुरा आहे, भरघोस नाही. त्यात बऱ्याच त्रुटी आहेत, पण नव्या रानात शिरण्यासाठी पहिल्यांदा कोणीतरी वाट पाडावी लागते. पुढे त्या वाटेने ये-जा सुरू होते. मी लहानशी वाट पाडली आहे एवढेच!"* लेखक आत्ता असते तर त्यांना नक्की सांगितले असते की तुम्ही पाडलेली पायवाट आता जवळ-पास राजमार्ग बनत चालली आहे. आज अनेक वन्य-जीव अभ्यासक, जंगल भटके सुजाण व सतर्क झाले आहेत, जंगले आणि प्राणी वाचले पाहिजेत यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ह्या प्रयत्नांमागे लेखकासारख्या अनेक वनांचा अभ्यास करून ते आपल्यासमोर आणणाऱ्यांचा मोठा हात आहे. आज पक्षी-निरीक्षक किरण पुरंदरेंसारखे व्यक्ती शहरातील सगळा गाशा गुंडाळून जंगलात राहायला गेलेत ... काय नक्की thought -process झाली असेल त्यांची? फक्त जंगल-भटकंती करताना पाळावयाचे नियम अत्यंत महत्वाचे आहे. मुख्यत्वे-करून कुठल्याही वृक्षांचे, प्राणी-पक्ष्यांचे आपल्या असण्याने कुठलाही त्रास किंवा धोका - हानी संभवू नये, याची काळजी आपल्यासारख्या सुज्ञ भटक्यांनी नक्की घ्यावी. तरच हे भटकणे आनंद-दायी होईल. *भंडारा जिल्यातील नागझिरा हे एक अभयारण्य! फार सुंदर आहे.* हे पुस्तक फक्त लेखकाच्या दृष्टीने त्यांना भावलेलं जंगल आहे का? फक्त जंगलाचं वर्णन आहे का? तर नाही. एक पट्टीचा कथालेखक आणि मानव-स्वभाव चितारणारा लेखक केवळ वर्णन करू शकत नाही. माझ्या मते ही एक प्रक्रिया आहे, त्यांच्या अंतर्बाह्य बदलाची, जी त्यांना जाणवली, अगदी प्रकर्षाने. आणि तोच स्वतःचा शोध त्यांनी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. बाकी प्रत्येकाचं जंगल वेगळं, खरं जंगल नाही तर स्वतःच्या आतलं एक जंगल. ते ज्याचं त्याने शोधायचं, त्यात डुंबायच, विहार करायचा आणि काही गवसत का ते बघायचं .... लेखकानेही तेच केलं... एक स्वगत मांडलं आहे.... आणि त्यातून संवादही साधला आहे. हे पुस्तक ललित म्हणावे की कादंबरी, वर्णन म्हणावे की आत्मकथन, अशा हिंदोळ्यावर हे वाचताना मी सतत राहते. अतिशय आशयपूर्ण गहिऱ्या अर्थाचे लिखाण आहे यात. लेखकाने नागझिरा आणि त्याचे वर्णन कसे केले आहे ते आपण रसिक वाचकांनी हे पुस्तक वाचूनच त्याचा आनंद घ्यावा. ते इथे मी सांगत बसणार नाही, उगाच तुमचं आनंद का हिरावून घेऊ? मी इथे मला भावलेले लेखकच मांडण्याचा अल्पसा प्रयत्न करत आहे, ते ही या पुस्तकाच्या माध्यमातून... पहिल्याच पानावर ते काय लिहितात बघा - *"गरजा शक्य तेवढ्या कमी करायच्या, दोनच वेळा साधे जेवण घ्यायचे, त्यात पदार्थ सुद्धा दोन किंवा तीनच. स्वतःचे कामे स्वतःच करायची. पाणी आणणे, कपडे धुणे अंथरून टाकणे आणि काढणे या साध्या सुध्या गोष्टींसाठी माणसांनी दुसऱ्यावर का अवलंबून राहावे? एकांत, स्वावलंबन आणि प्रत्येक बाबतीत मितव्यय ही त्रिसूत्री पाळून जंगलात पायी भटकायचे, जंगलाच्या कुशीत राहून निरागस असा आनंद लुटायचा या माफक अपेक्षेने गेलो आणि माझा काळ फार आनंदत गेला . रेडिओ, वृत्तपत्रे, वाङ्मय चर्चा, वाचन, कुटुंब, मित्र, दुसऱ्याच्या घरी जाणे येणे, जेवण देणे आणि घेणे यापैकी काहीही नसताना कधी कंटाळा आला नाही. करमत नाही असे झाले नाही. रोज गाढ झोप आली. स्वप्न पडले असतील तर ती सकाळी आठवली नाही. शिवाय मित आहार आणि पायी हिंडणे यामुळे चरबी झडली. एकूणच मांद्य कमी झाले."* हे वाचून आपल्याला नक्की काय हवे असते, आणि रोजच्या रहाटगाडग्यात आपण काय करतो, याची मनातल्या मनात तुलना व्हावी. खरंच काय हवं असतं आपल्याला? आपण सतत प्रेम, शांती, समाधान आणि मनःशांती याच्याच तर शोधात असतो ना? आणि नेमक्या ह्याच सर्व गोष्टी बाजूला पडून आपण नुसते धावतच असतो... कशासाठी?? जीवनाचं तत्वज्ञान हे फार गंभीर नाहीये, अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून आपण ते समजून घेऊन शकतो. फक्त ती जाण असली पाहिजे. थोडासा थांबून विचार झाला पाहिजे. मनःचक्षु उघडे पाहिजे आणि मुख्य म्हणजे मी कुणीतरी मोठा , हा भाव पहिल्यांदा गाळून पडला पाहिजे. *अगदी तसंच जसं पानगळीच्या मोसमात जुनं पान अगदी सहज गळून पडतं ... नव्यासाठी जागा करून देतं ... जंगल आपल्याला हेच शिकवतं ... न बोलता ... त्याच्या कृतीतून ... आपली ते समजून घेण्याची कुवत आहे का?* शेवटच्या प्रकरणात लेखक परतीसाठी रेल्वे फलाटावर येतो. तेव्हाचचं त्यांचं स्वगत फार विचार करायला भाग पाडतं - *"ह्या दोन तासात करण्याजोगे असे काहीच महत्त्वाचे कार्य नसल्यामुळे मी आरशासमोर बसून दाढी केली, मिशा काढून टाकल्या. सतत अंगावर होते ते हिरवे कपडे काढून टाकले आणि इतके दिवस माझ्या कातडी पिशवीच्या तळाशी परिटघडी राहिलेले झुळझुळीत कपडे चढवून पोशाखी बनलो.`* किती साधी वाक्य आहेत, पण `पोशाखी बनलो` यातून किती काय काय सांगायचे आहे लेखकाला... गहिरेपण जाणवते! मला विचार करायला भाग पाडते. ट्रेक करून गड -किल्ल्यांहून परतताना माझीही अवस्था काहीशी अशीच व्हायची... जाड पावलांनी घरी परतणे आणि पुन्हा निसर्गात भटकायला मिळण्याची वाट पाहणे, याशिवाय गत्यंतर नसायचे. *जंगलांवर , निसर्गावर निस्सीम प्रेम करणाऱ्या आणि त्यांच्या संवर्धनासाठी झटणाऱ्या अनेक वेड्यांमुळे आज आपली वसुंधरा टिकली आहे. पुढील पिढ्यांसाठी तिला असच बहरत ठेवायचं असेल, किमान टिकवायचं जरी असेल तरी आपणही थोडेसे निसर्ग-वेडे व्हायला काय हरकत आहे??* *वृक्षवल्ली आम्हा सोयरे... वनचरे ...* धन्यवाद! जय हिंद!!! ...Read more