* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: BHANDARBHOG
  • Availability : Available
  • ISBN : 9788177660630
  • Edition : 6
  • Publishing Year : FEBRUARY 1988
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 260
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
`DEVDASI`, A PREY FALLEN TO THE TRADITIONS AND CULTURE. BUT THERE IS ONE MORE PREY FALLEN TO THESE HIDEOUS TRADITIONS, `JOGTYA`, HIS LIFE IS WORSE THAN THAT OF A `DEVDASI`. WE COME ACROSS MANY SUCH `JOGTE` IN THE RURAL AREAS WHO HAVE BEEN OFFERED TO THE GODS. `DEVDASI`S` LIFE IS MUCH BETTER THAN THAT OF A `JOGTYA`. SHE CAN AT LEAST GET IN RELATIONSHIP WITH SOMEONE, THROUGH THE TRADITIONAL `ZULWA`, SHE CAN BE A `MISTRESS` OF SOMEONE. IF SHE DIES, THEN PEOPLE GATHER TO COMPLETE THE LAST RITUALS FOR HER, SHE GETS A PLACE FOR HER PYRE SOMEWHERE. BUT NOBODY COMES TO COMPLETE THE LAST RITUALS FOR A `JOGTYA`. HE IS CONSIDERED TO BE UNTOUCHABLE EVEN AFTER HIS DEATH. ALIVE OR DEAD, HE HAS TO BEFRIEND ONLY THE DARKNESS. HE IS NOT ALLOWED TO SEE THE LIGHT AT ALL. HE IS ALSO A MAN, A NORMAL MAN, BUT THE RITUALS AND TRADITIONS TAKE AWAY EVERYTHING FROM HIM. THIS NOVEL IS BASED ON THIS THEME. THE HERO OF THIS NOVEL EXPRESSES HIMSELF BY SAYING, `WHEN I WAS OFFERED TO GOD, I WAS NO DIFFERENT THAN YOU PEOPLE, I HAD EVERYTHING JUST LIKE YOU, BUT I WAS CRUSHED UNDER THE OFFERING AND OVER THE PERIOD OF TIME, I ALSO DID NOT REALIZE WHEN I LOST MY BEING ME. THE LIFE OF EACH AND EVERY `JOGTYA` RESEMBLES MY LIFE IN ALL RESPECTS. HOW MUCH EVER I TRY TO TELL THIS TO ALL, BUT NOBODY WANTS TO BELIEVE ME, I HAVE ONLY WORDS, NO OTHER PROOF TO SHOW, ALL I HAVE IS RAGS! THE AUTHOR HAS VERY SUCCESSFULLY PRESENTED THE LIFE STORY OF `JOGTYA` THROUGH THIS NOVEL. HE ALSO PRESENTS THE LIFE-STYLE OF OTHER TRIBES SUCH AS CHAUNDKYA, JOGTINEE, ETC. THIS NOVEL MAKES US THINK ABOUT THESE TRIBES AND THEIR TRADITIONS. IT MAKES US THINK ABOUT THEM AS HUMAN BEINGS.
रूढीपरंपरांचा बळी म्हणजे देवदासी... याच रूढीपरंपरांचा आणखी एक बळी म्हणजे जोग्या! ग्रामीण भागात असे देवीला वाहिलेले किती तरी जोगते आढळतात. यांचं जीवन देवदासीपेक्षाही भयावह...! देवदासी झुलवा लावू शकते. एखाद्या पुरुषाची रखेल म्हणून राहू शकते. ती मेली, तर प्रेताला माणसं जमतात. कुणाच्या तरी बांधाला जागा मिळते; पण जोगत्याच्या तिरडीला माणूसच मिळणं कठीण... त्याचा स्पर्शही इंगळीसारखा... त्याच्या नशिबी फक्त अंधार... तोही पुरुषासारखा पुरुष असतो; पण रूढीपरंपरांच्या ओझ्यानं त्याला सगळंच गमवावं लागतं. हाच या कादंबरीचा विषय आहे. या कादंबरीचा नायक आपल्या वेदना व्यक्त करताना म्हणतो– ‘मला देवाला सोडलं, तवा सगळं व्हंत. आगदी तुमच्यावाणी... देवाच्या वझ्यानं पिडून खाल्लं आनी माझ्यातलं सगळंच कव्वा सपलं, माझं मलाच कळलं न्हाई... परतेक देवाच्या जोग्याचं आसंच हाय. सांगून पटत न्हाई... दाकवाय तर ईत न्हाई... आमचं सगळंच फटकुरागत...!’ लेखकानं या जीवनाची समस्या मोठ्या ताकदीनं या कादंबरीत मांडली आहे. जोगत्याच्या जीवनाबरोबरच चौंडक्या, मेळ्यातल्या जोगतिणी यांचं एक विश्वच या कादंबरीनं वाचकासमोर उभं केलं आहे. ही कादंबरी वाचकाला सुन्न करून सोडते, विचार करावयास लावते. हेच कादंबरीचं यश आहे.
RAJYA PURASKAR- 1988 MAHARASHTRA SAHITYA PARISHAD, PUNE`S G.L.THOKAL PURASKAR-1988
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#RAJANGAVAS #DEVDASI# JOGTIN# DEV #YALLUBAI #SULI #SUBANA #BAYAJA #PARADI #LIMB #JAT #BABANYA #SHEWANTAKKA #LAGNA #MELA #NAVAS #HITNI #DONGAR #BHANDARBHOG #RIVANAVAYALIMUNGI #CHOUNDAKA #AAPANMANSATJAMANAHI
Customer Reviews
  • Rating StarVijay Saravate

    भारतीय समाज पूर्णतः जातीव्यवस्था आणि रूढी-परंपरांनी पोखरला गेलाय. हे फारच भयाण व अस्वस्थ करणारं आहे. या विदारक जातीव्यवस्थेचं चित्रण अनेक दिग्गजांनी केलंय, अगदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आण्णा भाऊ साठे पासून ते हल्ली अलिकडचं शरणकुमार लिंबाळे वगैरेपर्यंत या जातिव्यवस्थेची पाळंमुळं थोडीफार आता सैलही होताहेत. पण अजून बरच काही होणं आवश्यक आहे, अजूनहि बरेच आदिवासी समाज आहेत ज्यांना तर हेही माहित नाही कि ते स्वतंत्र्य आहेत, अजूनही त्यांची दैना संपलेली नाही. हे कमी कि काय म्हणून बऱ्याच घाणेरड्या रूढी - परंपरांनी वेढलंय, यात देव-देवस्की, पशु बळी, नर बळी, जोगते-जोगतिणी आणि बरंच काही ..... :(. या सगळ्यात भरडला जाणारा सर्वसामान्य माणूस, जो जातीव्यवस्थेचं खालचं टोक आहे. असो, यात जोगते-जोगतिणी हे बऱ्याच जातीतले असतात, तर हे जोगते-जोगतिणी होतात कसे? तर केसात केसांची जट सापडली तर ती देवीची, म्हणून तीला भंडारा लावून पुजलं जातं आणि तीला जोगतीण म्हणून सोडलं जातं आणि सांगितलं जातं कि रोज वडाचा-पिंपळाचा चीक केसाला लावून त्यावर भंडारा टाका. म्हणजे होत काय कि हि छोटी असणारी बट कालगणिक वाढत जाते. तर आजारी मुलांना / पुरुषांना बरं व्हावं म्हणून भंडारा लावून देवाला सोडलं जातं. एकदा यांना देवार्पित केलं कि पुन्हा आयुष्यभर त्यातून सुटका नाही, त्यातून मृत्यूच सोडवून नेतो. याना कोणी वाली नसतो, नुसती आयुष्यभर फरफट चालू असते. किमान जोगतीणीला कुणी तरी रखेल म्हणून ठेवतो, तिला हवं तेव्हा सोडून देतो. तीच्या पोटात गर्भ राहिला तर पाडून टाकतात वा नशिबानं जन्माला तर कुठेही तो मांसाचा जिवंत गोळा कुठंही उकिरड्यावर फेकला जातो त्यातून, तो वाचला-जगाला तर तो एखाद्या मेळ्यात चौंडकं वाजवत फिरतो, भिकारी होतो. जोगतीण मेल्यावर तीचा अंत्यविधी तरी गावकरी करतात. पण जोगत्याला तर मेल्यावर कुणी खांदा द्यायलाही तयार होत नाही कारण त्यांना अप्रतिष्ठेची भीती असते. पण तीच त्यांच्या बरोबर अंधारात झोपताना होत नाही. किती वाईट हे जगणं ... !! तर जोगते-जोगतिणी या विषावर #राजन_गवस यांची #भंडारभोग बेतलेली आहे. अजून लिहवत नाही .. थांबतो इथंच .. विजय सरवते २६-११-२०२० ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more