* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: WOMEN IN INDIAS FREEDOM STRUGGLE
  • Availability : Available
  • Translators : VASANTI PHADKE
  • ISBN : 9788177663600
  • Edition : 2
  • Publishing Year : JANUARY 2003
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 376
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE WORK THE WOMEN UNDERTOOK DURING THE FREEDOM FIGHT WAS A BIT EXTENDED FORM OF THEIR USUAL WORK. BUT A FEW OF THESE WOMEN WERE NOT SATISFIED WITH IT, THEY THREW OFF THE LIMITS OF THE TRADITIONS AND STOOD AGAINST THE SECONDARY POSITION OFFERED TO THEM. THEY MIXED THEIR ROLES AS NATIONALIST AND FEMINIST. THEY DID NOT WANT ANY POST OR POWER, THEY SERVED THEIR MOTHERLAND UNSELFISHLY. THEY GAVE A NEW DIMENSION TO THE NATIONAL FREEDOM MOVEMENT ON REGIONAL AND NATIONAL LEVEL. THIS CALLED FOR THE ENTHUSIASM ON A WIDE LEVEL, REGIONAL AS WELL AS STATE. THE HURDLES OF LOCATION, CLASS, CASTE, GENDER AND RELIGION WERE OVERCOME FAST. IT ALSO UNDERLINED THE DEVOTION OF PEOPLE IN THE LIGHT OF EQUALITY, SOCIAL JUSTICE, SECULARISM, AND NATIONALISM. THIS SAME DEVOTION THEN WAS SIPPED THROUGH TO THE CORE OF EVERY INDIAN AND GAVE A BOOST TO THE CONCLUDING NATIONAL FREEDOM MOVEMENT.
स्वातंत्र्य संग्रामातील कार्य हा बहुसंख्य स्त्रियांच्या दृष्टीने त्यांच्या परंपरागत कार्याचा थोडाफार विस्तार होता. तरीही फार थोड्या साहसी स्त्रियांनी परंपरा झुगारून त्यांच्या परंपरागत आणि दुय्यम दर्जाविरुद्ध बंड पुकारले, आणि स्त्रीवादी व राष्ट्रवादी भूमिकांचे एकत्रीकरण केले. कोणतेही पद किंवा सत्ता यांची अभिलाषा न धरता त्यांनी नि:स्वार्थपणे देशसेवा केली. राष्ट्रीय चळवळीला प्रथमच राष्ट्रीय आणि प्रादेशिक स्वरूप प्राप्त झाले. परिणामी मोठ्या संख्येने स्थानिक व प्रादेशिक स्तरावर उत्साह दिसून आला. त्यामुळे प्रदेश, वर्ग, जाती, लिंग व धर्म यांचे अडसर भारतीय इतिहासात दीर्घ कालांतराने दूर झालेले दिसले. समानतेच्या तत्त्वज्ञानात, सामाजिक न्यायात, निधर्मीवादात आणि राष्ट्रवादात झिरपलेली पायाभूत भावनिष्ठा स्पष्ट झाली. स्वातंत्र्याचे अंतिम ध्येय गाठण्यासाठी ही भावनिष्ठा सर्वत्र हळूहळू झिरपून चळवळीला मार्गदर्शक ठरली.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #BIOGRAPHY #NAWAZ B. MODI #VASANTI PHADKE #भारतीयस्वातंत्र्यलढ्यातीलस्त्रिया #WOMENININDIASFREEDOMSTRUGGLE
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL (KOLHAPUR) 13-04-2003

    स्वातंत्र्य चळवळीला मार्गदर्शक ठरलेली भावनिष्ठा... भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील सहभाग, कार्य हा बहुसंख्य स्त्रियांच्या दृष्टीने त्यांच्या परंपरागत कार्याचा थोडाफार विस्तार होता. तरीही फार थोड्या साहसी स्त्रियांनी परंपरा झुगारून त्यांच्या परंपरागत णि दुय्यम दर्जाविरुद्ध बंड पुकारले; आणि स्त्रीवादी व राष्ट्रवादी भूमिकांचे एकत्रीकरण केले. कोणतेही पद किंवा सत्ता यांची अभिलाषा न धरता त्यांनी नि:स्वार्थपणे देशसेवा केली. राष्ट्रीय चळवळीला स्थानिक व प्रादेशिक स्तरावर नेण्याचे महत्त्वाचे काम स्त्रियांनी केले. प्रदेश, वर्ग, नाती, लिंग व धर्म या दीर्घकालीन अडसरीचा गुंता उलगडण्याचे काम या चळवळीद्वारे स्त्रियांनी साध्य केले. समानतेच्या तत्त्वज्ञानात, सामाजिक न्यायात, निधर्मीवादात आणि राष्ट्रवादात झिरपलेली पायाभूत भावनिष्ठा स्पष्ट झाली. स्वातंत्र्याचे अंतिम ध्येय गाठण्यासाठी ही भावनिष्ठा स्वातंत्र्य चळवळीला मार्गदर्शक ठरली. भारतीय स्वातंत्र्याला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मुंबई विद्यापीठाच्या नागरिकशास्त्र व राज्यशास्त्र विभागाने २१ व २२ मार्च १९९८ या दोन दिवशी ‘भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील स्त्रियांची भूमिका (असा परिसंवाद आयोजित केला होता. या परिसंवादात विविध अभ्यासकांनी सादर केलेले शोधनिबंधाचे संपादन परिसंवाद संचालिका डॉ. नवाझ मोदी यांनी या इंग्रजी पुस्तकाचा मराठी भाषा अनुवाद वासंती फडके यांनी केला. पुस्तकाचे दोन भाग केले आहेत. पहिल्या भागात राष्ट्रीय चळवळीतील क्रांती स्त्रियांच्या योगदानाविषयी माहिती आहे. येसूबाई सावरकर, कल्पना, क्रांतिकारी चाफेकर बंधूंच्या व अरुणा असफअली आणि कॅप्टन सेहगल यांच्याविषयक लेख आहे. दुसरा विभाग महात्मा गांधीनी विविध चळवळीत भाग घेऊन बजावणाऱ्या स्त्रिया व त्यांचा चळवळीवर झालेला परिणाम विषयावर आधारित आहे. मणिबेन नानावटी, मृदुला साराभाई, मणिबेन कारा, कमलाबेन पटेल स्वातंत्र्य आणि गुजरातमधील तळ सत्याग्रही कार्यकर्त्या अवंतिकाबाई गोखले यांच्यावर आहेत. प्रत्येक लेखाच्या संदर्भग्रंथाची सूची मराठीत दिली. महत्त्वाच्या विषयावरील अनुवाद मराठी भाषेत आणून प्रकाशकाने साहित्यात मोलाची भर घातली आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 24-12-2004

    स्त्रियांची ‘ऐतिहासिक कामगिरी’... मुंबई विद्यापीठाच्या नागरिकशास्त्र आणि राज्यशास्त्र विभागाने २१ व २२ मार्च १९९८ या काळात ‘भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील स्त्रियांची भूमिका या परिसंवादाचं आयोजन केलं होतं. वेगवेगळ्या अभ्यासकांनी त्यात आपले निबंध सादर कले. या शोधनिबंधाचं संपादन विभाग प्रमुख डॉ. नवाझ मोदी यांनी केलं आणि इंग्रजीतून एक ग्रंथ सिद्ध केला. याच पुस्तकाचा कराठीत अनुवाद ‘भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्त्रिया’ या शीर्षकाखाली वासंती फडके यांनी केला आहे. डॉ. य. दि. फडके यांनी या परिसंवादात केलेल्या बीजसंभाषणासह हे पुस्तक सिद्ध करण्यात आलं आहे. स्त्री सहभागाच्या चार वेगळ्या पायऱ्या कल्पून तसे चार विभाग पाडण्यात आले आहेत. त्यांना ‘राष्ट्रीय चळवळीतील क्रांतिकारी स्त्रियांचे योगदान’, ‘महात्मा गांधीच्या चळवळीतील स्त्रियांचा सहभाग’, ‘अल्पसंख्याक स्त्रियांचे योगदान’ आणि ‘परदेशी स्त्रियांचे चळवळीतील योगदान’ अशा स्वरूपाची शीर्षक आहेत. त्यावरून त्याला विभागातील लेखांची कल्पना येऊ शकते. इतिहासलेखनात ‘स्त्रियांची कामगिरी मोठ्या प्रमाणात दुर्लक्षिली, विकृत स्वरूपात मांडली गेली आणि मर्यादित केली गेली’, अशी खंत डॉ. य. दि. फडके यांनी व्यक्त केली आहे. पहिल्या भागात क्रांतिकारी स्त्रियांच्या संदर्भातील लेखांचा समावेश आहे. त्यामध्ये येसूबाई सावरकर यांनी थेट चळवळीत सहभाग न घेताही पार पाडलेल्या कामगिरीचं चित्र उत्तरा सहस्त्रबुद्धे यांनी मांडलं आहे. कल्पना दत्त, अरुण असफअली, कॅ. सहगल यांची कामगिरी कौतुकास्पद खरी पण चापेकर बंधूंच्या बायकांची कहाणीही त्यांच्या वेदना समोर मांडणारी आहे. चापेकर बंधूंच्या फाशीनंतर या स्त्रियांचे हाल झाले. त्यांना परंपरागत हिंदू विधवांचे जिणं जगावं लागलं. चार भिंतीआड राहिलेली या स्त्रियांची वेदना चटका लावून जाते. महात्मा गांधींच्या प्रेरणेने स्वातंत्र्यलढ्यात मोठ्या प्रमाणावर स्त्रिया सहभागी झाल्या. सूतकताई, स्वदेशीचा पुरस्कार, परदेशी मालाची होळी, मिठाचा सत्याग्रह असे वेगवेगळे लढ्याचे मार्ग हाताळले सत्याग्रह असे वेगवेगळे लढ्याचे मार्ग हाताळले गेले. त्यात स्त्रिया सामील होत्या. सामान्य स्त्रियांची संख्याही यात लक्षणीय होती. मणिबेन नानावटी, मृदुला साराभाई, मणिबेन कारा, कमलाबेन पटेल, अवंतिकाबाई गोखले अशा अनेक स्त्रियांबद्दलचे यातील लेख त्यांच्या कामगिरीचा सखोल वेध घेणारे आहेत. ब्रिटिशांशी जिद्दीने लढणाऱ्या आणि वेगवेगळ्या स्तरांवरील क्रांतिकार्यात भाग घेणाऱ्या या स्त्रियांची कामगिरी मोलाची होती यात शंकाच नाही. तर पेरीन कॅप्टन, तैयबजी कुटुंबातील स्त्रिया, मिठूबेन पेटिट, खिलाफत चळवळीतील महिला, दलित स्त्रिया अशा अल्पसंख्याक गटातील स्त्रियांचा सहभागाचे मूल्यमापन करणारे लेखही महत्त्वाची माहिती पुरवतात. त्याचप्रमाणे मीराबेन (मॅडेसीन स्लेड), भगिनी निवेदिता, दक्षिण आफ्रिका व गोवा मुक्ती आंदोलनातील स्त्रिया, अ‍ॅनी बेझंट अशा मूळच्या परदेशी असलेल्या स्त्रियांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी दिलेल्या लढ्याचे मोलही ऐतिहासिक आहे. या सर्वांबद्दलचं या पुस्तकातील लेखन स्वातंत्र्याच्या आंदोलनातील या स्त्रियांची उज्ज्वल कामगिरी अधोरेखित करतं. प्रीता नीलेश, रोहिणी गवाणकर, उषा ठक्कर, लीला पटेल, मृदुला देवस्थळे, यास्मीन लुकमानी, अभिनया गायकवाड अशा अनेकांचे लेख खात आहेत. संशोधकांना, वाचकांना, अभ्यासकांना उपयुक्त असं हे लेखन तरुण पिढीलाही मार्गदर्शक ठरेल असं आहे. २१ व्या शतकातील भारताची उत्तरोत्तर विकासांच्या पथावरून होणारी वाटचाल या सर्व आणि इतर असंख्य अनामिक स्त्रियांच्या विना शक्य झाली नसती ही जाणीव हे लेखन मनात जागी करतं. स्त्रियांचा हा वाटा यापुढच्या इतिहासाला दुर्लक्षित करता येणार नाही. -नंदिनी आत्मसिद्ध ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

NAGZIRA
NAGZIRA by VYANKATESH MADGULKAR Rating Star
कृष्णा DIWATE

आजच्या पुस्तकाचा विषय माझ्या आवडीचा - जंगलाचा... *जंगल - काय असतं ?* म्हटलं तर फक्त झाडे, नदी-नाले, प्राणी पक्षी यांनी भरलेला जमिनीचा एक तुकडा .... की वन-देवता? की पशु-पक्ष्यांचं घर? की जीवनचक्रातील अति-महत्वाचा घटक? की आपल्यातल्या दांभिकपणाला - दिखव्याला - व्यवहाराला गाळून टाकणारं आणि आपल्यालाही त्याच्यासारखाच सर्वसमावेशक, निर्मळ बनवणारं आणि आपल्यातल्या originality ला बाहेर आणणारं, असं एक अजब रसायन? *जंगल भटक्यांना विचारा एकदा... बोलतानाच त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात जी चमक दिसेल ना, त्यातून फार वेळ वाट न बघता सरळ जंगल गाठण्याची इच्छा न होईल तरच नवल!* आमचा एक मित्र- ज्याने असंच जंगलांचं वेड लावलं आणि अजून एक भटकी मैत्रीण - जिने त्या वेडात भरच घातली..... आणि असे अजून अनेक भटके निसर्गप्रेमी ... आणि मुळातूनच निसर्गाची ओढ , या सर्व गोष्टी माझ्या जंगल -प्रेमासाठी कारणीभूत ठरल्या. *आणि मग अरण्यऋषी श्री. मारुती चितमपल्ली, शंकर पाटील (कथा), डॉ. सलीम अली, जिम कॉर्बेट, व्यंकटेश माडगूळकर इत्यादींनी या निसर्गदेवतेकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी दिली. त्या सर्वांनाच आजचा हा पुस्तक-परिचय सादर अर्पण!!* कथांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लेखकाने हे नागझिरा पुस्तक का बरे लिहिले असावे? मनोगतात ते स्वतः म्हणतात - *"महाराष्ट्रातील एखाद्या आडबाजूच्या जंगलात जाऊन महिना दोन महिने राहावे, प्राणी जीवन, पक्षी जीवन, झाडेझुडे पाहत मनमुराद भटकावे आणि या अनुभवाला शब्दरूप द्यावे हा विचार गेली काही वर्षे माझ्या मनात घोळत होता. काही परदेशी प्राणी शास्त्रज्ञांनी असा उद्योग करून लिहिलेली उत्तम पुस्तके माझ्या वाचण्यात आल्यापासून ही इच्छा फारच बळवली. मी इथे तिथे प्रयत्न करून पाहिले आणि निराश झालो. हे काम आपल्या आवाक्यातले नाही असे वाटले. मग शेल्लरने कुठेतरी लिहिल्याचे वाचले की भारतातील लोक प्राणी जीवनाच्या अभ्यासात उदासीन आहेत, आफ्रिकेच्याही फार मागे आहेत. त्यांना वाटते अशा संशोधनासाठी प्रचंड खर्च करावा लागतो, पाण्यासारखा पैसा लागतो. पण तसे नाही. गळ्यात दुर्बीण, मनात अमाप उत्साह आणि आस्था असली की अभ्यास होतो. मी शक्य तेव्हा एकट्यानेच उठून थोडेफार काम करत राहायचे ठरवले. कधी काझीरंगा, मानस या अभयारण्यावर, कधी नवेगाव-बांधावर तर कधी कोरेगावच्या मोरावर लिहित राहिलो.* *मला चांगली जाणीव आहे की हा प्रयत्न नवशिक्याचा आहे. तो अपुरा आहे, भरघोस नाही. त्यात बऱ्याच त्रुटी आहेत, पण नव्या रानात शिरण्यासाठी पहिल्यांदा कोणीतरी वाट पाडावी लागते. पुढे त्या वाटेने ये-जा सुरू होते. मी लहानशी वाट पाडली आहे एवढेच!"* लेखक आत्ता असते तर त्यांना नक्की सांगितले असते की तुम्ही पाडलेली पायवाट आता जवळ-पास राजमार्ग बनत चालली आहे. आज अनेक वन्य-जीव अभ्यासक, जंगल भटके सुजाण व सतर्क झाले आहेत, जंगले आणि प्राणी वाचले पाहिजेत यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ह्या प्रयत्नांमागे लेखकासारख्या अनेक वनांचा अभ्यास करून ते आपल्यासमोर आणणाऱ्यांचा मोठा हात आहे. आज पक्षी-निरीक्षक किरण पुरंदरेंसारखे व्यक्ती शहरातील सगळा गाशा गुंडाळून जंगलात राहायला गेलेत ... काय नक्की thought -process झाली असेल त्यांची? फक्त जंगल-भटकंती करताना पाळावयाचे नियम अत्यंत महत्वाचे आहे. मुख्यत्वे-करून कुठल्याही वृक्षांचे, प्राणी-पक्ष्यांचे आपल्या असण्याने कुठलाही त्रास किंवा धोका - हानी संभवू नये, याची काळजी आपल्यासारख्या सुज्ञ भटक्यांनी नक्की घ्यावी. तरच हे भटकणे आनंद-दायी होईल. *भंडारा जिल्यातील नागझिरा हे एक अभयारण्य! फार सुंदर आहे.* हे पुस्तक फक्त लेखकाच्या दृष्टीने त्यांना भावलेलं जंगल आहे का? फक्त जंगलाचं वर्णन आहे का? तर नाही. एक पट्टीचा कथालेखक आणि मानव-स्वभाव चितारणारा लेखक केवळ वर्णन करू शकत नाही. माझ्या मते ही एक प्रक्रिया आहे, त्यांच्या अंतर्बाह्य बदलाची, जी त्यांना जाणवली, अगदी प्रकर्षाने. आणि तोच स्वतःचा शोध त्यांनी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. बाकी प्रत्येकाचं जंगल वेगळं, खरं जंगल नाही तर स्वतःच्या आतलं एक जंगल. ते ज्याचं त्याने शोधायचं, त्यात डुंबायच, विहार करायचा आणि काही गवसत का ते बघायचं .... लेखकानेही तेच केलं... एक स्वगत मांडलं आहे.... आणि त्यातून संवादही साधला आहे. हे पुस्तक ललित म्हणावे की कादंबरी, वर्णन म्हणावे की आत्मकथन, अशा हिंदोळ्यावर हे वाचताना मी सतत राहते. अतिशय आशयपूर्ण गहिऱ्या अर्थाचे लिखाण आहे यात. लेखकाने नागझिरा आणि त्याचे वर्णन कसे केले आहे ते आपण रसिक वाचकांनी हे पुस्तक वाचूनच त्याचा आनंद घ्यावा. ते इथे मी सांगत बसणार नाही, उगाच तुमचं आनंद का हिरावून घेऊ? मी इथे मला भावलेले लेखकच मांडण्याचा अल्पसा प्रयत्न करत आहे, ते ही या पुस्तकाच्या माध्यमातून... पहिल्याच पानावर ते काय लिहितात बघा - *"गरजा शक्य तेवढ्या कमी करायच्या, दोनच वेळा साधे जेवण घ्यायचे, त्यात पदार्थ सुद्धा दोन किंवा तीनच. स्वतःचे कामे स्वतःच करायची. पाणी आणणे, कपडे धुणे अंथरून टाकणे आणि काढणे या साध्या सुध्या गोष्टींसाठी माणसांनी दुसऱ्यावर का अवलंबून राहावे? एकांत, स्वावलंबन आणि प्रत्येक बाबतीत मितव्यय ही त्रिसूत्री पाळून जंगलात पायी भटकायचे, जंगलाच्या कुशीत राहून निरागस असा आनंद लुटायचा या माफक अपेक्षेने गेलो आणि माझा काळ फार आनंदत गेला . रेडिओ, वृत्तपत्रे, वाङ्मय चर्चा, वाचन, कुटुंब, मित्र, दुसऱ्याच्या घरी जाणे येणे, जेवण देणे आणि घेणे यापैकी काहीही नसताना कधी कंटाळा आला नाही. करमत नाही असे झाले नाही. रोज गाढ झोप आली. स्वप्न पडले असतील तर ती सकाळी आठवली नाही. शिवाय मित आहार आणि पायी हिंडणे यामुळे चरबी झडली. एकूणच मांद्य कमी झाले."* हे वाचून आपल्याला नक्की काय हवे असते, आणि रोजच्या रहाटगाडग्यात आपण काय करतो, याची मनातल्या मनात तुलना व्हावी. खरंच काय हवं असतं आपल्याला? आपण सतत प्रेम, शांती, समाधान आणि मनःशांती याच्याच तर शोधात असतो ना? आणि नेमक्या ह्याच सर्व गोष्टी बाजूला पडून आपण नुसते धावतच असतो... कशासाठी?? जीवनाचं तत्वज्ञान हे फार गंभीर नाहीये, अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून आपण ते समजून घेऊन शकतो. फक्त ती जाण असली पाहिजे. थोडासा थांबून विचार झाला पाहिजे. मनःचक्षु उघडे पाहिजे आणि मुख्य म्हणजे मी कुणीतरी मोठा , हा भाव पहिल्यांदा गाळून पडला पाहिजे. *अगदी तसंच जसं पानगळीच्या मोसमात जुनं पान अगदी सहज गळून पडतं ... नव्यासाठी जागा करून देतं ... जंगल आपल्याला हेच शिकवतं ... न बोलता ... त्याच्या कृतीतून ... आपली ते समजून घेण्याची कुवत आहे का?* शेवटच्या प्रकरणात लेखक परतीसाठी रेल्वे फलाटावर येतो. तेव्हाचचं त्यांचं स्वगत फार विचार करायला भाग पाडतं - *"ह्या दोन तासात करण्याजोगे असे काहीच महत्त्वाचे कार्य नसल्यामुळे मी आरशासमोर बसून दाढी केली, मिशा काढून टाकल्या. सतत अंगावर होते ते हिरवे कपडे काढून टाकले आणि इतके दिवस माझ्या कातडी पिशवीच्या तळाशी परिटघडी राहिलेले झुळझुळीत कपडे चढवून पोशाखी बनलो.`* किती साधी वाक्य आहेत, पण `पोशाखी बनलो` यातून किती काय काय सांगायचे आहे लेखकाला... गहिरेपण जाणवते! मला विचार करायला भाग पाडते. ट्रेक करून गड -किल्ल्यांहून परतताना माझीही अवस्था काहीशी अशीच व्हायची... जाड पावलांनी घरी परतणे आणि पुन्हा निसर्गात भटकायला मिळण्याची वाट पाहणे, याशिवाय गत्यंतर नसायचे. *जंगलांवर , निसर्गावर निस्सीम प्रेम करणाऱ्या आणि त्यांच्या संवर्धनासाठी झटणाऱ्या अनेक वेड्यांमुळे आज आपली वसुंधरा टिकली आहे. पुढील पिढ्यांसाठी तिला असच बहरत ठेवायचं असेल, किमान टिकवायचं जरी असेल तरी आपणही थोडेसे निसर्ग-वेडे व्हायला काय हरकत आहे??* *वृक्षवल्ली आम्हा सोयरे... वनचरे ...* धन्यवाद! जय हिंद!!! ...Read more