* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789386745224
  • Edition : 1
  • Publishing Year : AUGUST 2017
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 744
  • Language : MARATHI
  • Category : CLASSIC
  • Available in Combos :BHARTIYA SAMAJVIDNYAN KOSH COMBO SET-2 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS 6TH SOCIAL SCIENCE ENCYCLOPEDIA WHICH PUTS FOCUS ON THE INDIAN SOCIETAL CONDITION DURING THE WIDE SPAN OF THOUSAND YEARS. ARTICLES IN THIS BOOK DESCRIBES THE CHANGES HAPPENED IN THE VARIOUS FIELDS OF THE SOCIETY. IT COVERS EVERY ASPECT OF SOCIETY INCLUDING AGRICULTURAL PROBLEMS, SOCIAL PROBLEMS, ENVIRONMENT PROTECTION, POLITICAL SITUATIONS ETC. IT IS A GREAT WORK OF INFORMATIVE DOCUMENTATION WHICH COULD BE USEFUL FOR STUDENTS, TEACHERS & ACADEMICIAN.
भारतीय समाजविज्ञानाच्या सहाव्या खंडात बदललेल्या सहस्रकातील सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या लेखांचे संकलन केले आहे. बदललेल्या सहस्रकातील राजकारण, अर्थकारण आणि समाजकारणाने जागतिक पातळीवर किती वेगवान आणि धक्कादायक बदल घडवून आणले आहेत, याची प्रामुख्याने दखल या कोशात घेण्यात आली आहे. भारतात मोठ्या प्रमाणात श्रीमंतांच्या संख्येत झालेली वाढ, तेवढ्याच गतीने श्रीमंत व गरीब या दोन वर्गातील रुंदावत चाललेली दरी, तसेच शेतीक्षेत्रामध्ये झालेली क्रांती आणि त्याचवेळेस शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या प्रमाणात झालेली वाढ हा विरोधाभास सदर कोशातून टिपला आहे. आर्थिक क्षेत्रातील बदल व नवीन क्रांतिकारक घडामोडींची अद्ययावत नोंद घेतली आहे. आंतरराष्ट्रीय राजकारण, बिनसरकारी संस्थांच्या खाजगी कामांची नोंद, या कोशातून घेण्यात आली आहे. आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व स्वावलंबी होणाऱ्या स्त्रियांमुळे कुटुंबव्यवस्थेवर अटळपणे होणारे परिणाम, जागतिक तापमान वाढ (ग्लोबल वार्मिंग), वसुंधरा बचाव, यांसारख्या चळवळीला प्राप्त झालेले विशेष महत्त्व, दहशतवाद या मुद्द्यांकडेही या कोशात लक्ष वेधण्यात आले आहे.

No Records Found
No Records Found
Keywords
BHARTIYA SAMAJVIDNYAN KOSH : KHAND 6# ADHIKAR : MAHITICHA TE HUKUMSHAHI# KAI. S. M. GARGE ARTHSHASTRA# RAJYSHASTRA# SAMAJSHASTRA# DR. ARVIND NAGARKAR# DR.SURESH KAKADE# DR. SHRUTI TAMBE# EKNATH BAGUL# ASTITVVAD# AKHATI YUDDH# ILICH# E-KARBHAR# UTTAR SANRACHANA VAD# OORJA ANI SAMAJ# AIDS : JAGTIK SAMASYA# OBAMA# AUDYOGIK MANASSHASTRA# COMMUNIST PAKSH : BHARAT# KHAJGIKARAN# GIFEN VASTU# JAMATWAD
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL (SAPTRANG) 05-11-2017

    समाजशास्त्राचे गाढे अभ्यासक डॉ. स. मा. गर्गे यांनी पाया घातलेल्या भारतीय समाजविज्ञान कोशाचा सहावा खंड पुरवणी खंडाच्या रूपानं (अधिकार : माहितीचा ते हुकूमशाही) त्यांच्या पश्चात प्रसिद्ध झाला आहे. गेल्या २५-३० वर्षांत आर्थिक, राजकीय आणि सामाजिक परिस्थितत आमूलाग्र बदल झाले. त्यापैकी अनेक गोष्टींचा समावेश या खंडात करण्यात आला आहे. अगदी ई-कारभारापासून रोख राखीव गुणोत्तरापर्यंत अनेक गोष्टींवर दिलेली मुद्देसूद, नेमकी आणि नेटकी माहिती हे या कोशाचं वैशिष्ट्य. प्रस्थापित लेखकांबरोबरच तरुण अभ्यासकांनीही लेखन केलं आहे. एकीकडं माहितीचा स्फोट होत असतानाही ‘अधिकृत’ माहिती मिळत नाही. त्या पार्श्वभूमीवर हा कोश अनेकांना उपयोगी पडेल. विशेषत: वेगवेगळ्या विषयांवर माहितीपर लेखन करणारे लेखक, स्पर्धापरिक्षा देणारे विद्यार्थी यांना या कोशाचा उपयोग होऊ शकेल. एकनाथ बागूल प्रमुख संपादक आहेत. गर्गे यांच्या काळात मूळ पाच कोशांबरोबर पारिभाषिक शब्दसंग्रहांचा समावेश असलेला सहावा खंडही प्रकाशित करण्यात आला होता. आता सहावा पुरवणी खंड प्रकाशित झाल्यानं त्यातल्या महत्त्वाच्या शब्दांची जोड असलेला पारिभाषिक शब्दसंग्रही नव्याने प्रकाशित करण्यात आला आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more