DR. DESHPANDE HAS INTRODUCED A FEW SELECTED SCULPTURES REPRESENTING THE ANCIENT INDIAN ART. THE WORK INCLUDED HERE IS RIGHT FROM THE GREEK-ROMAN SCULPTURES TO THE UNIQUE FEATURE OF INDIAN STYLE IN DETAIL. HE ALSO TAKES A REVIEW OF THE STYLES AND PROGRESS OF THE GANDHAR, SAANCHI, MATHURA, AMRAVATI, NAGARJUNKONDA, ETC. WITH THE BOUDDHA STYLE. HE HAS DISCUSSED IN DETAILS THE PROGRESS OF THE ART OF THE PRINCELY STATES SUCH AS YADAVAS, SHILARHARS, AND HOISALAS. HE HAS DISCUSSED IN DETAIL THE PASSIONATE SCULPTURES AT KHAJURAHO AND KONARK ALONG WITH THE FASCINATING SCULPTURES WITH THEIR PECULIAR STYLES IN THE CAVES AT AJANTHA, ELLORA, AND GHARAPURI. HE HAS GIVEN APPROPRIATE ILLUSTRATIONS WHEREVER REQUIRED. THIS BOOK WILL BE A VERY GOOD ASSET FOR THE LOVERS OF SCULPTURES AS IT CONTAINS NOT ONLY THE INFORMATION IN MUCH SIMPLER FORM BUT ALSO HAS SOME PICTURES TO MAKE THINGS CLEAR AND EASIER TO UNDERSTAND.
"भारतीय वास्तुशिल्पशैलीतील काही निवडक आणि प्रातिनिधिक शिल्पवैभवाचा डॉ. सुरेश देशपांडे यांनी प्रस्तुत ग्रंथात सौंदर्याभिरुचीच्या रसठाहणात्मक दृष्टिकोनातून परिचय करून दिला आहे.
ठाीको-रोमन शिल्पशैलीपासूनचे भारतीय शिल्पशैलीचे वेगळेपण, तिची वैशिष्ट्ये यांच्या मीमांसेबरोबरच गांधार, सांची, मथुरा, अमरावती, नागार्जुनकोंडा वगैरे बौद्ध शैलींचा प्रागतिक-वैकासिक आढावाही या ग्रंथात त्यांनी घेतला आहे.
अजिंठा, वेरुळ व घारापुरी या गुंफा-समूहांची महती, खजुराहो-कोणार्क ही कामशिल्पांसाठी प्रसिद्ध असलेली स्थळे आणि यादव, शिलाहार व होयसळ या राजघराण्यांची कला यांचीही सोदाहरण चर्चा या ग्रंथात समाविष्ट आहे.
विषयानुरूप निवडक छायाचित्रे आणि ओघवती भाषा यांमुळे हा ग्रंथ कलाप्रेमी तसेच शिल्पशास्त्राच्या अभ्यासकांना उपयुक्त ठरेल, असा विश्वास वाटतो.
"