* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789353174613
  • Edition : 3
  • Publishing Year : DECEMBER 2008
  • Weight : 500.00 gms
  • Pages : 188
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THRILLING CHASE TO ACQUIRE THE MYSTERIOUS OBJECT ENDS AT BINDU LAKE. TILL REACHING THERE PILGRIMS GET MANY MYSTERIOUS ENIGMATIC EXPERIENCES. THEY HAVE TO CROSS THREE GATES ON THREE DIFFERENT PLANES CROSSING EACH GATE LEADS THEM INTO A DIFFERENT KIND OF LAND SPECTACULAR IN THEIR IMAGERY
‘बिंदूसरोवर’ ही राजेन्द्र खेर यांची अद्भुतरम्य उत्वंठावर्धक कादंबरी. बिंदूसरोवर हे काल्पनिक ठिकाण असलं, तरी त्याची लेखकाने वर्णिलेली रमणीयता आपल्याला वास्तवसदृश अनोख्या विश्वात घेऊन जाते. हिमालय हे योगी-तपस्वी यांचं तपसाधना करण्याचं ठिकाण. स्वामी शिवानंद आपल्या दोन शिष्यांसह एका गुहेत साधना करीत असतात. त्यांच्याकडे परग्रहावरील अतिमानवाने दडवलेली पंचधातूची पेटी असते; ज्यात एक वौQश्वक रहस्य जपलेलं असतं. चिनी सैनिक तिबेटमधल्या पुरातन मंदिरातून त्या पेटीची माहिती मिळवून शोध घेत शिवानंदांच्या गुहेपर्यंत पोहोचतात. योगी आपल्या विश्वनाथन् नामक शिष्याकडे पेटी सुपूर्द करून त्याला दूर रवाना करतात. प्रा. विश्वनाथन यांच्याकडून व्याख्यानात अनवधानाने या रहस्याचा उल्लेख होतो... आणि पेटी हस्तगत करण्यासाठी अज्ञात व्यक्ती प्राध्यापकांच्या घरी पोहोचतात. तत्पूर्वी ते आपला सुहृद विक्रमकडे पेटी सोपवून त्याला दक्षिणेकडे पाठवतात. रेल्वेत विक्रमला कोण कोण भेटतात... संकटं झेलत ते स्वप्नमयी रमणीय बिंदूसागरापर्यंत कसे पोहोचतात... तेथे त्यांना कोणत्या वौQश्वक रहस्याचा बोध होतो, हे जाणून घेण्यासाठी ही अत्यंत उत्वंÂठावर्धक कादंबरी अवश्य वाचायला हवी.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#बिंदूसरोवर #राजेन्द्रखेर #हिमालय #परग्रहावरीलअतिमानव #तिबेटमधीलपुरातनमंदिर #चिनीसैनिक #स्वामीयोगानंद #पंचधातूचीगूढपेटी #विश्वनाथनजगमोहन #विक्रम #महानंद #अपूर्वा #त्रिदंडीमहाराज #कीथ #शंकर #ऑस्कर #पिंड #इंद्रधनुष्य #देव #गंधर्व #मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #BINDUROVAR #RAJENDRAKHER #HIMALAYAS #TIBELATED ANCIENT TEMPLES #CHINESEMILITARY #VISHWANATHANJAGMOHAN #VIKRAM #MAHANANDA #APURVA #TRIDANDIMAHARAJ #KEITH #SHANKAR #OSCAR #PIND#INDRADHU#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
  • Rating Starसुप्रिया हळबे - ठाणे वार्ता

    एक अप्रतिम कादंबरी. विविध विषयांनी नटलेली. मनाला आनंद देणारी पण नकळत चिंतन, आत्मशोध घ्यायला लावणारी अनोखी अशी ही कादंबरी... "बिंदुसरोवर." राजेन्द्र खेर लिखित बिंदुसरोवर ही कादंबरी म्हणजे एक उत्तम रहस्यमय प्रवास. लेखकाबरोबर वाचक नकळत कल्पने्या प्रवासाला सुरूवात करतो आणि कादंबरीतील साऱ्या घटनांमधील एक विशेष पात्र होऊन त्या रहस्यमय, अद्भुत, अध्यात्मिक प्रवासाची अनुभूती घेत जातो.. तिबेटमध्ये घुसखोरी करून चीनचे सैनिक अनेक मंदिरांचा विध्वंस करतात. त्याचवेळी त्यांना माहिती मिळते की, भारतात एका गूढ ठिकाणी अशी एक वस्तू आहे की तिच्या साहाय्याने संपूर्ण विश्वाची रहस्ये उलगडत जातील आणि माणूस संपूर्ण विश्वावर ताबा मिळवू शकेल.. योगी शिवानंद यांचे दोन शिष्य..विश्वनाथ आणि मोहनीश. जे हिमालयात आपल्या गुरुसमवेत योगाभ्यासाची ज्ञानोपासना करीत असतात. नेमके त्याचवेळी चिनी आक्रमक तो संपूर्ण परिसर व्यापून टाकतात. पन्नास वर्षे एका विलक्षण धातूच्या पेटीचा सांभाळ केल्यानंतर ती पेटी आणि एक भूर्जपत्र योगी शिवानंद, विश्वनाथ यांच्याकडे सुपूर्त करतात. त्या पेटीत नेमकं काय असतं...? प्रा.विश्वनाथ यांच्यावर विश्वास ठेवून सुपूर्त केलेल्या धातूच्या पेटीचं पुढे काय होतं...? याचा संपूर्ण अध्यात्मिक, रोमांचक प्रवास म्हणजे बिंदुसरोवर ही कादंबरी.. विज्ञानाच्या अभ्यासाबरोबरच अध्यात्माची, योगिक क्षेत्राची आवड असलेले, अनुभूती घेतलेले प्रा.विश्वनाथ त्यांच्यावर विश्वास ठेवून किंवा त्यांच्याबद्दल खात्री बाळगून त्यांचे गुरु त्यांच्यावर ती पेटी जीवापाड जपण्याची जबाबदारी देतात. पण त्यानंतर जेव्हा त्यांच्यावर संकट येते तेव्हा प्रा.विश्वनाथ काय करतात...ती धातूची पेटी पुढे कुणाकडे सुपूर्त करतात...प्रत्येक टप्प्यावर पेटीचा सांभाळ करायला मदत करणारे महानंद नेमके असतात तरी कोण...? ह्या सर्व गोष्टींची उत्कंठा प्रत्येक पानासरशी वाढत जाते. शेवटच्या टप्प्यात तर उत्कंठा शिगेला पोहोचते, विचारांचे वादळ मनात घोंगावू लागते आणि त्याचमुळे वेळेचे भान न राहता वाचक हातात घेतलेली कादंबरी संपूर्ण वाचल्याशिवाय खाली ठेवत नाही.. कादंबरी वाचून झाल्यानंतर देखील त्यातील अध्यात्मिक विचारांनी घेतलेली मनाची पकड चटकन सैल होत नाही. बराच काळ वाचकाच्या मनावर त्याचे गारूड तसेच राहते. ही कादंबरी निव्वळ कल्पनेत रमवणारी नसून, वाचकाला विचार करायला प्रवृत्त करणारी आहे. सध्याच्या काळात प्रत्येकजण भौतिक सुखाच्या मागे धावत असतो. अनेक उत्तम, मनाला पटणाऱ्या गोष्टी मागे सारत निव्वळ ध्येयपूर्तीसाठी योग्य अयोग्यतेच्या पलीकडे जाऊन काम करत असतो. पण बिंदुसरोवर ही कादंबरी वाचल्यानंतर वाचक नक्कीच चिंतनशील अवस्थेत जाण्यासाठी प्रवृत्त होतो.. बिंदुसरोवर वाचताना, कुठेही ते रटाळ, कंटाळवाणे होत नाही. लेखक राजेन्द्र खेर यांच्या ओघवत्या लेखनशैलीचा प्रभाव नक्कीच वाचकाच्या मनाचा वेध घेते. प्रत्येक घटनेत आपण प्रत्यक्ष तिथे आहोत याची अनुभूती घेत एक अद्भुत, अविस्मरणीय आनंददायी प्रवास करत वाचक " बिंदुसरोवरात" नाहून जातो.. ह्या रहस्यमय, अद्भुत, अविस्मरणीय आणि अध्यात्मिक प्रवासाचा आनंद घेण्यासाठी राजेन्द्र खेर लिखित बिंदुसरोवर ही कादंबरी जरूर वाचावी. ...Read more

  • Rating StarVaishali Joshi Nagarkar

    नुकतेच बिंदू सरोवर हे पुस्तक वाचले, रम्य, रहस्यमय कथानक. एक वेगळे पुस्तक म्हणून नक्कीच वाचनीय.

  • Rating StarYogesh Ugale

    बिंदुसरोवर. केवळ अद्भुत कादंबरी. या कादंबरीत केवळ कल्पनाविलास नाही तर कल्पनांना वैचारिक अधिष्ठान आहे. यातील लेखन केवळ मनोरंजन करणारे नसून मनात विचारांचे अंजन घालणारे असे आहे. अतिशय प्रवाही लेखनशैली, खिळवून ठेवणारी प्रसंगमांडणी आणि वारंवार अचंबित करणरे धक्के देऊन उत्कंठा वाढवणारी ही कादंबरी वेळोवेळी अंतर्मुख व्हायला भागही पाडते. प्रचलित fiction या प्रकारातील कादंबऱ्यांपेक्षा या कादंबरीचा गाभा वेगळा आहे. अनेक प्रसंगांमधून सामाजिक उन्नती - अवनतीचे चिंतन समोर येते. अद्भुतरम्य कल्पनाविश्वात विहरणाऱ्या वाचकाला हे लेखन अगदी अलगदपणे विचारांच्या लाटेवर बसवून आत्मजाणीवेपर्यंत घेऊन जाते. हा प्रवास अतिशय आनंददायी आहे. नववीत असताना मी ही कादंबरी पहिल्यांदा वाचल्याचे आठवते. या कादंबरीकडे मी आकर्षित झालो ते तिच्या मनोवेधक मुखपृष्ठामुळे. आजही ते आकर्षण कायम आहे. आज तिसऱ्यांदा ही कादंबरी वाचताना कोणताही प्रसंग कंटाळवाणा वाटत नसून पहिल्याइतक्याच आतुरतेने वाचला जातो, यात कोणतेही नवल वाटण्याचे कारण नाही. कारण यातील लेखनात नित्य नाविन्यता जाणवते. त्याच त्या प्रसंगांतून चिंतन आणि अध्ययनाचे नवनवीन बिंदू दरवेळी गवसत जातात. जाणिवसमृध्द आत्मिक बिंदुसरोवराकडे चिंतनशील मनाची यात्रा सुरु राहते.. २०२५ सालची परिस्थिती कल्पनेतून साकार करुन कादंबरीची सुरुवात होते. विज्ञानाच्या सहाय्याने केलेली प्रचंड प्रगती, केवळ भौतिक उपभोगांत रममाण झालेली भारतासहित सगळ्या जगातील मानवजात, अशा पार्श्वभूमीवर एकेक प्रसंग पुढे सरकू लागतो. विज्ञानाच्या अध्ययनाबरोबरच आध्यात्मिक सत्याची अनुभूती घेतलेले प्रा. विश्वनाथन सर. आपल्या साधनाकाळात त्यांच्या गुरुजींनी त्यांच्याकडे एक पेटी रक्षणासाठी सोपविली, जिच्यात असे रहस्य दडले आहे की ज्यायोगे संपूर्ण विश्वावर नियंत्रण मिळवता येईल. जगातील अनेक शक्ती ती पेटी प्राप्त करण्यासाठी आपली शक्ती पणाला लावतात. विक्रम भार्गव नावाच्या आपल्या एका विद्यार्थ्याला प्रा. विश्वनाथन ती पेटी बिंदुसरोवरात न्यायला सांगतात. येथून सुरु होतो बिंदुसरोवराचा रोमांचक प्रवास.. प्रत्येक पान उलटताना उत्कंठा वाढतच जाते. मनोमन त्या चित्तथरारक प्रवासाचा आनंद घेताना मनाच्या एका कोपर्‍यात त्या पेटीत दडलेल्या रहस्याविषयी गूढ तसेच राहते. शेवटी शेवटी ही उत्कंठा परमोच्च अवस्थेला पोहचते. या कादंबरीत विविध प्रसंगांद्वारे आणि पात्रांच्या आपापसांतील संवादाद्वारे जीवन, विज्ञान आणि धर्मविषयक जे चिंतन मांडले आहे, त्याचा प्रभाव अंतरंगी दरवळत राहतो. विकासाच्या दिशेने झपाट्याने वाटचाल करणारा भारत बघता बघता आपण खेड्यांतील, गिरीकंदरातील दारिद्र्यात जीवन कंठणाऱ्या भारतापर्यंत येऊन पोहचतो. परंतु याच अविकसित लोकांनी जपलेल्या संस्कृतीचे दर्शनही घडते. स्वतःला नास्तिक म्हणवणाऱ्यांची कट्टरता आणि भौतिक उत्थानात गुरफटलेल्या बुवा - महाराजांची भोंदुगिरीही डोकावते. कादंबरी शेवटाकडे धावत राहते. पण मनात चिंतनाची बीजपेरणी करुन.. महानंद नावाचा कादंबरीतील व्यक्तिरेखांचा वाटाड्या नकळतपणे आत्मजाणीवेच्या दिशेने प्रवास करणाऱ्या वाचकाचाही वाटाड्या होऊन जातो. संवादातून अनेक प्रश्नांची उत्तरे मिळत जातात. काही उत्तरे नवीन प्रश्नांना जन्म देतात. असे प्रश्न चिंतनाची पायवाट उजळवून जातात. बिंदुसरोवरापर्यंतचा प्रवास अतिशय आकर्षक आहे. या लेखनातून होणारे बिंदुसरोवराचे दर्शन तर केवळ विलक्षण आहे. तेथील वेगवेगळ्या विश्वांचे वर्णन, त्या प्रत्येकातील अंतर्बाह्य वेगळेपण, वेगवेगळ्या मितींचे जीवन सारंकाही अचंबित करणारं आहे. हे वर्णन वाचताना माझ्या डॉ. कार्ल सगन यांच्यासारख्या थोर शास्त्रज्ञाने लिहिलेल्या `कॉसमॉस` या विज्ञानग्रंथाची आठवण डोकावत राहिली.. त्या पेटीत दडलेल्या रहस्याविषयीचे कुतूहल शेवटपर्यंत टिकून राहते. काय आहे त्यातील गुपित ज्याद्वारे माणूस संपूर्ण विश्वावर ताबा मिळवू शकतो..? या रहस्याला जाणून घेण्यासाठी, बिंदुसरोवराचे अद्भुत दर्शन घडण्यासाठी आणि तो रोमहर्षक प्रवास अनुभवण्यासाठी प्रत्येकाने ही कादंबरी वाचायला हवी. चिंतनशील मनाला सत्प्रवृत्त करणारी, सत्प्रवृत्तांना आत्मभान देणारी अशी ही अभिनव कादंबरी. यातील सहजसुंदर आणि तरीही आपल्या वेगळेपणाची जाणीव करुन देणारी लेखनशैली राजेन्द्र खेरांच्या लेखनप्रेमात पडायला पुरेशी होती. काही पुस्तकं जीवनाला विचारसमृध्द करतात, कारण त्यांतील लेखनामागे व्रतस्थ लेखकाची तपश्चर्या असते, एवढे मात्र निश्चित.. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more