* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: BLACK LIST
  • Availability : Available
  • Translators : BAL BHAGWAT
  • ISBN : 9789353171438
  • Edition : 1
  • Publishing Year : NOVEMBER 2018
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 376
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SOMEWHERE DEEP INSIDE THE UNITED STATES GOVERNMENT IS A CLOSELY GUARDED LIST ONCE YOUR NAME IS ON THE LIST IT DOESNT COME OFF UNTIL YOURE DEAD SOMEONE HAS JUST ADDED COUNTERTERRORISM OPERATIVE SCOT HARVATHS NAME SOMEHOW HARVATH MUST EVADE ASSASSINATION LONG ENOUGH TO UNTANGLE WHO HAS TARGETED HIM AND WHY
माहिती तंत्रज्ञानाचा गैरफायदा घेऊन अमेरिकेचं ( आणि पर्यायाने तेथील प्रत्येक नागरिकाचं) अस्तित्वच धोक्यात आणण्याचं एटीएस या कंपनीचं जबरदस्त नियोजन असतं. हे नियोजन नक्की काय आहे, हे जाणून घ्यायचा प्रयत्न कार्लटन ग्रुप करत असतो; कारण एटीएस कंपनी जे काही करते आहे, ते देशाच्या विरोधात आहे, याची कुणकुण कार्लटन ग्रुपला लागलेली असते. हा ग्रुप दहशतवादाच्या विरोधात काम करत असतो. दहशतवाद्यांना आणि त्यांच्या नेत्यांना शोधा, गाठा आणि ठार करा, अशी त्यांची कार्यपद्धती असते. तर असा हा ग्रुप आपली योजना उधळून लावू शकतो, याची कल्पना एटीएस कंपनीला असते. त्यामुळे कार्लटन ग्रुपच्या सदस्यांना ठार मारण्याचा सपाटा एटीएस कंपनीने लावलेला असतो. एटीएस आणि कार्लटन ग्रुप यांच्यामधील जीवघेणा संघर्ष ‘ब्लॅक लिस्ट’ या कादंबरीत रंगवला आहे.

No Records Found
No Records Found
Keywords
#BRAD THOR#BAL BHAGAWAT#BLACK LIST# #ब्रॅड थॉर#बाळ भागवत #ब्लॅकलिस्ट
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKMAT 13-01-2019

    वास्तव कल्पनेला भिडणारी कादंबरी... गुप्तहेरांच्या जगात संवेदनशीलतेने हाताळणाऱ्या कामगिऱ्यांना ब्लॅक ऑपरेशन्स म्हणतात. यावर आधारित लेखन करणारे अमेरिकन रहस्यमय कादंबरीकार ब्रॅड थॉर यांची ‘ब्लॅक लिस्ट’ ही आणखी एक दहशतवादावरील चित्तथरारक कादंबरी. हेरगिर, विश्वासघात आणि कटकारस्थाने यांच्या काळ्याकुट्ट पटावर अमेरिकेत या कादंबरीची कथा घडते. अमेरिकन सरकार गुप्तपणे एक यादी बनवत असते. त्या यादीत एखाद्याचे नाव आले, की ते कधीच काढले जात नाही, अगदी त्याचा मृत्यू झाला तरी, त्या यादीत दहशतवाद्यांविरुद्ध लढणाऱ्या एजन्ट स्कॉट हॉर्वाथ याचेच नाव घातले जाते आणि एक धावत्या घटनांचा सिलसिला सुरू होतो. अन मग त्यात गुंफलेल्या वेगवान घटना आणि साहसे यांचे अनोखे मिश्रण वाचताना अखेरच्या पानापर्यंत कादंबरी वाचकाला खिळवून ठेवते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

TANUJA Bankar

This book is so much informative. The imagination and the way of telling this kind of story is just amazing!!! It doesn`t getting bored to read this. Each page is interesting and About mysterious truth. It`s a pleasure to know about our culture and sme mysterious stories that we don`t know. I just want to Thank you so much dear AKSHAT GUPTA SIR for this wonderful book. #Must read book Lots of good wishes Akshat sir👏😊 ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा.डाॅ. राहुल हांडे .... संगमनेर

"जिसे भी देखिए वो अपने आप मे गुम है जूबा मिली है मगर हुंजुबा नही मिलता कभी किसिको मुकम्मल जहा नही मिलता..." संज्ञापन व दळणवळण याची अत्यंत वेगवान साधने सहज उपलब्ध असलेल्या आजच्या जगात वावरणाऱ्या माणसाची व्यथा उपरोक्त गझल सहजपणे व्यक्त करून जाते. मणसाच्या जीवनात भौतिक समृद्धीचा अतिरेक झालेला असताना माणसाचा माणसाशी संवाद मात्र क्षीण होत चाललेला दिसतोय. आजचा माणूस मोबाईलवर बोलायला कितीही वेळ देतोय;परंतु प्रत्यक्षात भेटून दुसऱ्याशी संवाद साधण्यासाठी त्याच्याकडे अजिबात वेळ नाही. भौतिक सुख सोयी व संज्ञापन-संपर्क साधनांचा सुळसुळाट आपल्या समाजात झालेला नव्हता तेव्हा एकमेकांशी बोलणं हा मनोरंजनच नव्हे तर एकूण जीवन व्यवहाराचा अविभाज्य भाग होता. दैनंदिन जीवन व्यवहाराच्या पलीकडे जाऊन शिळोप्याच्या गप्पा मारण्यासाठी प्रत्येक जणाला त्याच्या सोयीची कंपनी देखील उपलब्ध होती. त्यावेळी माणसाची आर्थिक व भौतिक परिस्थिती दुबळी असली तरी मनस्थिती बळकट होती. आज हे सर्व इतिहास जमा झालेले आहे. असे असताना जी. बी. देशमुख यांचे `छाटितो गप्पा` हे भारतीय समाजाच्या गप्पामय जीवनाची आठवण पुन्हा ताजी करणारे पुस्तक नुकतेच मेहता पब्लिशिंग हाऊस,पुणे यांनी प्रकाशित केले आहे. घरातील छोट्या मोठ्या प्रसंगांपासून सुरू झालेल्या या गप्पा कार्यालयीन कामकाजात देखील रंगलेल्या आहेत. सुमारे गेल्या पाच दशकांचा मराठी समाज त्याच्या समग्र वैशिष्ट्यांसोबत ह्या गप्पांमध्ये मनमुराद वावरताना दिसतो. पुस्तकाचे लेखक जी.बी. देशमुख यांचे बोट धरून वाचक जेव्हा ह्या गप्पांच्या आखाड्यात उतरतो तेव्हा हौदातील मातीत केव्हा रंगून जातो याचे भान राहत नाही. माणसाशी माणसाचा संवाद तुटला आहे. अशी तक्रार सतत कानावर पडत असताना `छाटितो गप्पा` हे पुस्तक आपल्याला पुन्हा एकवार भोवतालच्या माणसांशी संवाद साधण्यासाठी नक्कीच प्रेरित करते. माणसाशी माणसाचा तुटलेला संवाद जोडण्याच्या प्रयत्नांमध्ये जी.बी. देशमुख यांचे `छाटितो गप्पा` हे पुस्तक निश्चितच महत्त्वाचे योगदान देणारे ठरेल यात शंका नाही. ...Read more