* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: BLASPHEMY
  • Availability : Available
  • Translators : BHARATI PANDE
  • ISBN : 9788177665017
  • Edition : 5
  • Publishing Year : AUGUST 2001
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 252
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
AS FAR AS I WAS CONCERNED, IT WAS MY HUSBAND WHO HAD KILLED MY SON. HE WAS THE ONE WHO HAD TRIED TO RAPE MY DAUGHTER. HE WAS A PARASITE, HE WAS LUCIFER, GNAWING THE HOLY KORAN. HE WAS THE MONSTER WHO DRAGGED ME TOWARDS DARKNESS EVERY NIGHT, CLUTCHING MY NECK IN HIS STRONG HANDS. HE WAS A DEMON, RAPING THE ORPHANS; HE GAINED HIS STRENGTH FROM SUCKING THE WEEK. BUT ON THE TOP OF THIS, HE WAS CONSIDERED TO BE THE MESSENGER OF THE GOD, HE WAS SUPPOSED TO BE THE ONE WHO COULD REACH THE ALLAH, THE MESSENGER OF GOD WHO COULD PROTECT US FROM REACHING THE HELL.
माझ्या दृष्टीनं — माझा नवरा हा माझ्या मुलाचा खुनी होता. माझ्या लेकीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाराही तोच होता. एक बांडगूळ – पवित्र ग्रंथाला कुरतडणारं. तो ल्यूसिफर होता. माझा गळा पकडून मला रोज रात्री पापाकडे लोटणारा सैतान होता. अनाथांवर बलात्कार करणारा, दुर्बलांचं रक्तशोषण करून स्वत: पुष्ट होणारा राक्षस. परंतु... या सर्वांहून अधिक भयंकर होतं – त्याला अल्लाचा दूत मानलं जाणं — अल्लाजवळ पोचू शकणारा – आमचं सर्वांचं नरकापासून रक्षण करू शकणारा देवदूत मानलं जाणं.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BLASPHEMY #BHARATIPANDE #TEHMINADURRANI #BIOGRAPHYA&TRUESTORIES
Customer Reviews
  • Rating StarHarshda Maheshwari

    नक्की वाचा विषेशतः महिला वर्गानी..

  • Rating StarYashashri Rahalkar

    वाचलय... काही दिवस अत्यंत अस्वस्थपणा वाटत होता वाचून पार हादरले होते मी .... प्रत्येक स्त्री ने जरूर वाचावे .... हे पुस्तक वाचले की आपल्या धर्माची, देशाची आणि स्वातंत्र्याची खरी किंमत कळते .

  • Rating StarSandip R Chavan‎

    चीड,राग,संताप आणणारी सत्य घटनेवर आधारित कादंबरी...... एखादा मनुष्य(?) किती हैवान होऊ शकतो? सैतान कोणाला म्हणतात? या प्रशांची उत्तरे पाकिस्तानातील एक धर्मगुरू ‘पीरसाई’ याच्याबद्दल वाचल्यावर मिळतात. ही कादंबरी एका हिर नावाच्या सुंदर तरुणीची करुण कहणी आहे. तिच्या स्वप्नांचा चुराडा होऊन तिला किती अनन्वित अत्याचाराला बळी पडावं लागते हे वाचल्यावर मनाचा थरकाप उडतो. धर्माच्या नावाखाली किती निचपणा केला जातो हे या कादंबरीत समजते. पाकिस्तान सारख्या धर्मांध राष्ट्रात धर्मगुरूविरुद्ध एखादं पुस्तक लिहणे व धर्माच्या नावाने कोणते काळे धंदे होतात हे जगापुढे आणण्याचे धाडस तेहमिना दुर्रानी यांनी केले त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे एवढे थोडेच आहे. भारती पांडे यांनी केलेला अतिशय उत्तम असा अनुवाद वाचकास जागच्याजागी खिळवून ठेवतो. पुस्तकाच्या सुरवातीला पुस्तकाबद्दल थोड्यात माहिती आहे ती खालीलप्रमाणे:- ही कादंबरी दक्षिण पाकिस्तानमध्ये घडते. एका सत्य घटनेतून स्फुरलेली ही कादंबरी पराकोटीच्या दुष्टत्वाचे कठोर दर्शन घडवते. रक्तपिपासू धर्मनेत्यांनी भ्रष्ट केलेल्या इस्लामचे स्वरूप कोणतीही लपवाछपवी न करता वाचकांपुढे ठेवण्याचे धाडसाचे काम ही कादंबरी करते. हीर नावाच्या एका सुंदर तरुणीची करुण कहाणी लेखिकेने अत्यंत उत्कटतेने, प्रभावशाली भाषेत सांगितली आहे. वयाच्या केवळ पंधराव्या वर्षी या अलौकिक सुंदरीचा विवाह तिच्याहून अठरा वर्षांनी मोठ्या असलेल्या पीरसाई या धर्मगुरुशी होतो. हीरवर अनन्वित अत्याचार करत पीरसाईने हीरला अध:पतनाच्या अंतहीन खाईत नेऊन ठेवले आहे. परंतु ज्या भयंकर दुःस्वप्नामध्ये हीर कैद झालेली आहे, ते दुःस्वप्न तिचे एकटीचे नाही; पीरसाईशी, धर्माशी एकनिष्ठ असणाऱ्या त्या साऱ्या जमातीचेच ते दुर्दैव आहे. पीरच्या हवेलीमध्ये रोज दिवस-रात्र वर्णन करता येणार नाहीत, अशी भयंकर क्रूर कृत्ये केली जातात - हे सारे अल्लाच्या नावाने केले जाते. तिच्या धन्याने निर्माण केलेल्या या रौरवामध्ये ओढली गेल्यावर हीरची आत्मप्रतिष्ठा, तिचे स्वातंत्र्य तर नष्ट होतेच, परंतु तिच्यामधील उपजत माणुसकीही संपून जाते....अखेर एका भयंकर निर्णयाने हीरला आपले अस्तित्व गवसते. एक संतप्त आणि धाडसी कादंबरी. या कादंबरीने उपखंडातील आघाडीच्या साहित्यिकांमध्ये तेहमिना दुर्रानी यांची प्रस्थापना केली आहे. या कादंबरीचे मुखपृष्ठ तेहमिना दुर्रानी यांचेच आहे. ‘अ मिरर टू द ब्लाईंड’ हे अब्दुल सत्तार एढी यांचे चरित्र हे दुर्रानी यांचे दुसरे पुस्तक. ‘ब्लास्फेमी’ ही त्यांची पहिली कादंबरी. तेहमिना दुर्रानी पाकिस्तानामध्ये लाहोर येथे राहतात. ...Read more

  • Rating StarArchana Chinchanikar

    सुन्न करणारे पुस्तक

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more