* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: BLUEBIRD - A MEMOIR
  • Availability : Available
  • Translators : MAITRIYEE JOSHI
  • ISBN : 9789387789524
  • Edition : 1
  • Publishing Year : MAY 2018
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 200
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Print Books:
"VESNA MARIC LEFT BOSNIA THE BEGINNING OF THE WAR, AT THE AGE OF SIXTEEN, ON A CONVOY OF COACHES CARRYING REFUGEES TO PENRITH IN THE NORTH OF ENGLAND. BLUEBIRD IS VESNA`S FUNNY, VIVID AND IMMENSELY READABLE MEMOIR OF THE EXPERIENCE, FROM THE BEGINNING OF THE WAR THROUGH TO HER EVENTUAL RETURN TO BOSNIA YEARS LATER. UNLIKE MANY BOOKS ON BOSNIA, AND REFUGEES IN GENERAL, BLUEBIRD IS NEVER SELF-PITYING, NEVER GRAVE. IT`S REFRESHING TO READ AN ACCOUNT OF THESE EXPERIENCES FILTERED THROUGH THE EYES OF A TEENAGER WITH ATTITUDE - WRITTEN WITH BRILLIANT COMIC TIMING AND A GREAT STORYTELLING GIFT. "
"बोस्निया-हरझेगोविना या ठिकाणी युद्धाला सुरुवात झाल्यावर लेखिका आणि तिची बहीण निर्वासित म्हणून इंग्लंडला आल्या. इंग्लंडला आल्यावर तिथली संस्कृती, राहणीमान हे आपल्यापेक्षा भिन्न आहे हे त्यांना समजले. या भिन्नतेमुळे लेखिका आणि तिची बहीण यांना अनेक मजेदार प्रसंगांना तोंड द्यावे लागेल. त्याच स्मृतिचित्रांचे वर्णन लेखिकेने केले आहे. इंग्लंडसारख्या देशात बोलली जाणारी भाषा हेच सर्वांत मोठे आव्हान लेखिकेपुढे होते. वेळोवेळी सॉरी, प्लीज, थँक्यू सारखे शब्द वापरणे, हा त्यांच्यासाठी विनोदच होता. परंतु केवळ एकच वर्षात लेखिका ही भाषा सराईतपणे बोलू लागली. पुढे ती अनुवादाचे कामही करू लागली. अपरिचित, अनोळखी अशा ठिकाणी वयाच्या केवळ सोळाव्या वर्षी नाइलाजाने स्थलांतरित झालेली लेखिका इंग्लंडच्या संस्कृतीशी- वातावरणाशी एकरूप झाली. शिक्षणाद्वारा तिने आपली प्रगती साधली. बोस्नियाच्या जुन्या आठवणींना उजाळा देत आणि नवे अनुभव घेत तिने इंग्लंडमधील संस्कृती आपलीशी केली. या तिच्या जीवनप्रवासाचे वर्णन तिने तिच्या शब्दांत मांडले आहे. "

No Records Found
No Records Found
Keywords
#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%#REFUGEES# VESNA MARIC# SARAJEVO# WAR# RADIO# HOLIDAY INN# SNIPERS# BOSNIA-HERZEGOVINA# BOMBING#MOSTAR# ARMY# GRANDMA# PARIS DRAGAN# GORDANA# HIROSHIMA# COFFEE# ESMA BRITAN# CASTLE# SHADOWS# MISFITS# JUDE ACCOUNTANT# JONI# JEHOVAN# INDEPENDENCE# TESTIMONY# LORRY DRIVER# FRIENDSHIP# BEAUTY QUEEN# SPICE# LOTTERY #साराजेव# सैनिक# युद्ध# हॉलिडे इन रेडिओ# मरँग बोस्निया# हरझेगोविना# क्रोएशिया# निर्वासित# आजी# ड्रॅगन# गोर्डाना# हिरोशिमा# मोस्टार# कॉफी# पॅरिस# एस्मा# ब्रिटन# रेड क्रॉस# किल्ला# ज्यूद# पेनरिथ# अकाउंटंट# स्वातंत्र्य# अनुवाद# स्मृतिशिल्प# स्वयंसेवक# लॉरी ड्रायव्हर# लॉटरी# भ्रमंती# स्पाईस# सौंदर्यसम्राज्ञी# ब्ल्यू बर्ड:अ मेमॉयर# मैत्रेयी जोशी# वेस्ना मरीच
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL 07-10-2018

    वेस्ना मरीच हिनं लिहिलेल्या ‘ब्ल्यूबर्ड - अ मेमॉयल’ या पुस्तकाचा हा अनुवाद मैत्रेयी जोशी यांनी केला आहे. मरीच ही बोस्नियातली तरुण मुलगी. बोस्नियन युद्ध सुरू झाल्यामुळं ती बहिणीसह ब्रिटनमध्ये गेली. त्या देशात तिला आलेले अनुभव, तिथली भाषा, रीतिरिवाज, सस्कृती आत्मसात करताना आलेले अनुभव, मानसिक जडणघडण या सर्व गोष्टींविषयी तिनं लिहिलं आहे. निर्वासितांचं जगणं जगतानाही सूक्ष्म विनोदी पद्धतीने आणि सहजतेनं ती आपली कहाणी मांडत जाते. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 17-06-2018

    -निर्वासित मुलीचं आत्मकथन... ‘युद्धस्य कथा’ श्रोत्यांसाठी ‘रम्य’ असली तरी प्रत्यक्षात जे युद्धपीडित असतात त्यांच्यासाठी मात्र तो अनुभव एखाद्या अंतहीन नरकवासासमान असतो. मग ते दुसऱ्या महायुद्धातील छळछावणीतील यातनाकांड असो किंवा घरदार सोडून रातोरात परकया देशात पळून जाणं आणि निर्वासित म्हणून जगणं असो. दोन्हीकडे युद्धाची होरपळ सारखीच. म्हणूनच वेस्ना मरीच सारखी युरोपची नवोदित लेखिका ‘ब्लू बर्ड’ या तिच्या पहिल्यावहिल्या पुस्तकात युद्धग्रस्तांच्या कहाण्या शब्दबद्ध करते तेव्हा वाटतं, या विषयावरचं आणखी एक पुस्तक. या पुस्तकात व्यक्तिचित्रणं आहेत, कथा आहेत. आणि सगळ्यांना युद्धाची पार्श्वभुमी आहे. मानवी स्वभावातील विसंगती टिपून निर्माण होणारा विनोदही पुस्तकात ठायी ठायी दिसतो, हे लेखिकेचे सर्वांत मोठे यश. किंबहुना तिच्या लेखनशैलीची ती सर्वांत मोठी ताकद मानावी लागेल. हे पुस्तक वाचून कुणा अभागी विस्थापिताच्या ओठांवर हसू उमलेल. कुणी जगण्याची प्रेरणा घेईल तर कुणी नव्या उमेदीनं ‘द ग्लास इज हाफ फुल’ म्हणत आनंदाचं गाणं गात पुढं चालू लागेल. लेखिकेला मिळणारं तेच सर्वांत मोठं अ‍ॅवॉर्ड असेल. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more