* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: BUSINESS LEGENDS
  • Availability : Available
  • Translators : ASHOK JAIN
  • ISBN : 9788177662795
  • Edition : 7
  • Publishing Year : APRIL 2002
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 496
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
G. D. BIRLA, WALCHAND HIRACHAND DOSHI, KASTURBHAI LALBHAI AND J. R. D. TATA ARE THE LIVING LEGENDS OF INDIA. THEIR LIVES ARE FULL OF CONTROVERSIES; YET THEY HAVE USED EVERY OPPORTUNITY SKILLFULLY TO PROVE THEIR CAPABILITY. THIS BOOK PRESENTS THE BIOGRAPHIES OF THESE LEGENDS. IT INCLUDES THEIR PERSONAL LIVES, THEIR HABITS, THE UPS AND DOWNS IN THEIR LIVES, THEIR LIFE-STYLES, THEIR THINKING, THEIR ABILITY OF PRECISION DECISION MAKING, THE TENSIONS BUILDING ALL AROUND, THE BASIC FOUNDATION OF DETERMINATION AND PERSISTENCE, THEIR STRUGGLE DURING THE UNFAVOURABLE BRITISH REGIME, THEIR STRENGTH TO CONVERT PROBLEMS INTO CHANCES, THEIR VISION WHICH TOOK THEM BEYOND THEIR FAMILIES, THEIR PATRIOTISM, THEIR IMMENSE EFFORTS TO MAKE THEIR NATION FINANCIALLY STRONG, ALL THESE AND SEVERAL OTHER RELATED ASPECTS ARE DESCRIBED HERE. THE PECULIAR THING ABOUT THIS BOOK IS THE AUTHOR HAS SUCCEEDED IN PRESENTING THEM ON THE WIDE CANVAS WITH THE BACKGROUND OF THE TENSE POLITICAL, SOCIAL AND FINANCIAL SITUATIONS. THE AUTHOR HAS UNDERGONE A LOT OF PAIN TO GAIN INFORMATION FROM THE SOURCES WHICH WERE NEVER TRIED BEFORE. THESE BIOGRAPHIES WILL SURELY BOOST THE INNOVATIVE AND WOULD BE INDUSTRIALIST MINDS TO SET UP THEIR UNIVERSE.
जी. डी. बिर्ला, वालचंद हिराचंद दोशी, कस्तुरभाई लालभाई व जे. आर्. डी. टाटा या आपल्या आयुष्यातच ‘आख्ययिका’ ठरलेल्या भारतातील चार महान उद्योगपतींच्या आयुष्याचा व अफाट कर्तृत्वाचा अत्यंत वेधक व विस्मयचकित करून टाकणारा पट येथे उलगडला आहे. ही या चार उद्योगमहर्षींची व्यक्तिचित्रं आहेत. त्यांचं व्यक्तिगत जीवन – त्यांच्या सवयी, जीवनशैली, त्यांची वैचारिक धारणा, अचूक निर्णयक्षमता, त्यांच्या आयुष्यातले चढउतार, भोवतालचे ताणतणाव यांचे मनोज्ञ, दुर्मीळ रंग भरता भरता, लेखिकेनं त्यांची पायाभूत काम करण्याची जिद्द कशी अफाट होती, ब्रिटिश राजवटीत – प्रतिकूल परिस्थितीत कोणकोणते संघर्ष करीत त्यांनी उद्योग उभारले, अडचणींचे ‘संधी’त रूपांतर करण्याचे त्यांचे सामथ्र्य किती प्रचंड होते, वैयक्तिक संपत्ती जमविण्याच्या पार पलीकडची त्यांची देशभक्तीमय उद्योजकता व आर्थिक राष्ट्रवादाची दुर्मीळ दूरदृष्टी किती प्रखर होती, याचे चैतन्यमय व गहिरे चित्र येथे रेखाटले आहे. त्यांच्या काळाच्या – देशाच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक ताणाबाणाच्या विस्तृत अवकाशावर हे चित्र उभं केलं आहे, हा या लेखनाचा विशेष आहे. लेखिकेनं आजवर अस्पर्श राहिलेल्या अनेक स्त्रोतांतून तपशील मिळवून संशोधनपूर्वक केलेलं हे लेखन नव्या उद्योजकांना प्रेरक ठरेल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#BUSINESSLEGENDS #GITAPIRAMAL #GHANSHYAMDAS BIRLA #WALCHAND HIRACHAND DOSHI #KASTURBHAI LALBHAI # JAHANGIR # DADABHOY #RATANTATA #मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #GEETA PIRAMAL #BUSINESS MAHARAJAS #गीता पिरामल #बिझिनेस महाराजे #BUSINESS LEGENDS #BIOGRAPHY #ASHOK JAIN
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    भारताच्या औद्योगिक प्रगतीचे प्रमुख शिल्पकार... ‘बिझिनेस महाराजे’ या पुस्तकाद्वारे गीता पिरामल यांनी काही अग्रगण्य उद्योगपतींच्या कार्यशैलीचे, जीवनशैलीचे व मूल्यप्रणालीचे एक वेधक रूप वाचकांसामोर ठेवले. पीएचडीसाठी गीता पिरामल यांनी ८ वर्षे खपून मुंबईचया आर्थिक व औद्योगिक विकासाचा इतिहास तयार करण्याचा प्रयत्न केला. तो प्रबंध त्यांनी प्रसिद्ध केला नाही. परंतु त्या निमित्ताने अग्रगण्य भारतीय औद्योगिक घराण्यांबद्दलचे त्यांचे कुतूहल जागे झाले आणि त्यातून काही धाडशी व नशीबवान उद्यागपतींच्या कर्तृत्वाचे आपल्याला जाणवलेले विशेष ‘बिझिनेस महाराजे’मध्ये त्यांनी चुरचुरीत शैलीत टिवले. रतन टाटा, आदित्य विक्रम बिर्ला, धीरूभाई अंबानी, राहुलकुमार बजाज, रमाप्रसाद गोएन्का, ब्रिजमोहन खैतान, भरत व विजय शहा या सात उद्योगपतींचा समावेश त्यात होता. ‘बिझिनेस महाराजे’च्या प्रकाशनाच्या वेळी सूत्रसंचालक टिटू अहलुवालिया यांनी गोएन्कांना विचारले, ‘‘तुमच्या उद्योगसमूहाचे भवितव्य काय?’’ त्यावेळी गोएन्कांनी जे उत्तर दिले, त्यातून बिझिनेस लेजंडस या पुस्तकाचा जन्म झाला. गोएन्कांचे उत्तर होते, ‘‘पुढच्या दहा वर्षांचा विचार करायचा झाला तरी स्वप्ने बाळगणारी व दूरदृष्टी असणारी व्यक्ती हवी. गेल्या काही दशकात भारतात जेआरडी टाटा, घनश्यामदास बिर्ला आणि धीरूभाई अंबानी या औद्योगिक क्षेत्रातील तीन स्वप्नाळू व्यक्ती होत्या. तुमच्याजवळ स्वप्नं बाळगणारा कोणी नसेल तर तुमच्याकडे दूरदृष्टी असणाराही कोणी असत नाही. मी स्वप्नाळू आहे, पण माझ्याजवळ दूरदृष्टी नाही. त्यामुळे माझ्यासमोर मोठाच प्रश्न आहे.’’ गोएन्का यांच्या या उत्तरामुळे गीता पिरामल यांना जी.डी.बिर्ला, वालचंद हिराचंद, कस्तुरभाई लालभाई आणि जेआरडी टाटा या चौघा स्वप्नदृष्ट्यांच्या कार्यकर्तृत्वाची नव्याने छाननी करावीशी वाटली; आणि या व्यक्ती औद्योगिक क्षेत्रात आख्यायिका व दंतकथा यांचा विषय कशा बनल्या याचा शोध घ्यावासा वाटला. या चौघांचीही उद्योग-शैली स्वतंत्र होती; ब्रिटिश सत्ता प्रभावशाली असताना भारतात उद्योगधंद्यांची उभारणी करण्याच्या मार्गात अनेक अडचणी होत्या. परंतु या चौघांनी त्या सर्व अडचणींना तोंड देऊन आपापल्या उद्योगांची उभारणी भक्कम पायावर व्हावी यासाठी प्रयत्नांची शर्थ केली आणि एकेका क्षेत्रात पाय रोवत वेगवेगळ्या क्षेत्रात मुसंडी मारण्याचा धडाका चालू ठेवला. गीता पिरामल यांना या चौघांच्या काही कागदपत्रांची पाहणी करता आली; त्यामुळेही त्यांच्या या लेखनाला पुराव्यांचा आधार आहे. आपापले औद्योगिक साम्राज्य उभे करताना या चौघांनी व्यवस्थापन, कामगार, स्पर्धा, मालाचा दर्जा, वितरण वगैरे सर्वच बाबतीत धडाडीने नवनवे ठोकताळे बसवले आणि यशही मिळवले. त्यांच्या औद्योगिक साम्राज्यांची उभारणी ही दीर्घकालीन परिश्रमाची परिणती आहे. घनश्यामदास (जी.डी.) बिर्ला हे मूळ पिलानीचे. १९०० सालापासून त्यांचे वडील मुंबईत कापसाचा व्यापार करीत. १९०३ मध्ये माटुंगा भागात दोन मजली घर त्यांनी बांधले आणि व्यवसायात मदतीसाठी आपल्या तिसऱ्या क्रमांकाच्या मुलाला - घनश्यामला - मुंबईला बोलावून घेतले. इंग्रजी शिकवण्यासाठी शिकवणी ठेवली. वयाच्या अकराव्या वर्षी दुर्गा सोमाणी यांच्याशी लग्न. १९०९ मध्ये प्रथम पुत्र लक्ष्मीनिवासचा जन्म. त्यानंतर अल्पावधीतच दुर्गाचे निधन. १९१०मध्ये, वयाच्या सोळाव्या वर्षी घनश्यामदास बिर्ला यांनी स्वत:चा वेगळा व्यवसाय कलकत्त्याला सुरू केला. लोकमान्य टिळकांची व्याख्याने ऐकून जीडी प्रभावित झाले; आणि क्रांतिकारकांना शस्त्रास्त्रे मिळवण्यास मदत करू लागले. आपल्या गोडाऊनमध्ये शस्त्रास्त्रांचा साठा करण्यास त्यांनी जागा दिली. पोलिसांनी धाड घातली आणि जीडींना पकडण्यासाठी पोलिसांनी जाळे पसरले. जीडींनी पळ काढून साधूच्या वेषात मदुरा-नाथद्वारा अशी भटकंती केली. पुढे वॉरंट रद्द झाले, आणि वर्षाने जीडी कलकत्त्याला परतले. स्वातंत्र्याबद्दल त्यांना आच होती पण सशस्त्र उठावाची कल्पना त्यांना व्यावहारिक वाटत नव्हती. त्यामुळे पुढे त्यांना गांधीजींचा अहिंसक मार्ग अधिक रास्त वाटला, आणि गांधीजींशी त्यांचा चांगला स्नेह जमला. ज्यूट निर्यात व्यवसायात जम बसवण्यासाठी जीडींना त्यांचे सासरे महादेव सोमाणी यांची मदत झाली. युद्धकाळात कलकत्त्यात वाळूसाठी ज्यूटच्या पोत्यांना मागणी एकदम वाढली आणि ज्यूटचे शेअर्स वधारले. बिर्लांनी लंडनमध्ये आपले ऑफिस उघडले. भारतीय मालकीच्या कंपनीनं लंडनमध्ये निर्यात कार्यालय उघडणे हे धाडस प्रथम बिर्लांनीच केले. १९२०पर्यंत ज्यूटच्या तीन प्रमुख निर्यातदारांमध्ये जीडींचे नाव घेतले जाऊ लागले. बिर्लाचे उत्पन्न २० लाखांवरून ८० लाखावार पोचले. कच्च्या तागापासून पोती बनवण्याचं तंत्रज्ञान हस्तगत करून जास्त कमाई करता येईल हे लक्षात आल्यावर त्यांनी हुकमचंद ज्यूट आणि बिर्ला ज्यूट गिरण्या सुरू केल्या.(१९२०) ब्रिटिशांशी स्पर्धा करण्याच्या या कृतीबद्दल इंपीरिअल बँकेने कर्ज नाकारले, ब्रिटिश निर्यातदारांनीही असहकार दाखवला. ‘तुम्ही व्यापार करा. गिरण्या चालवण्याच्या भानगडीत पडू नका.’ म्हणून बिर्लांनी गिरणीसाठी खरेदी केलेल्या जागेशेजारच्या जमिनी अँड्र्यू यूल या कंपनीने खरेदी करून त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. ब्रिटिश व्यापारी ज्यूट उद्योगात जीडींचा प्रवेश ही गोष्ट सहन करू शकत नव्हते. त्यांनी मारवाडी समाजावरच हल्ले सुरू केले. परंतु जीडींनी नेटाने त्यांना टक्कर देऊन आपल्या व्यवस्थापन कौशल्याने उत्तम उत्पादन करून लक्षावधींचा नफा मिळवला. त्यावेळी त्यांनी व्यवसायाची तीन सूत्रे ठरवली व ती पुढेही पाळली. १) निर्णय घेतला की त्याची लगेच अंमलबजावणी करायची. २) जुनी गिरणी खरेदी करण्यापेक्षा नवी गिरणी उभारणं हे अधिक सोयीचं असतं. ३) पदवीधरांपेक्षा पदवी नसलेल्या कर्मचाऱ्यांना भरती करावे; त्यांना आरंभापासून प्राधान्य द्यायचे. कारखाने ताब्यात घेण्याऐवजी नव्याने उभारावेत हे सूत्र आजही पाळले जाते. (जीडींचे नातू आदित्य बिर्ला यांनी वीस वर्षात वेगवेगळ्या देशात ७० कारखाने उभारले.) १९२२मध्ये ग्वाल्हेरचे राजे शिंदे यांच्या आमंत्रणावरून जीडींनी ग्वाल्हेरला जियाजीराव कॉटन मिल्सचा शुभारंभ केला. भावंडांत जीडींचा तिसरा नंबर होता, परंतु अशा धाडसी व्यवहारांमुळे जीडी हेच कुटुंबाचे नेते ठरले. १९२३मध्ये कलकत्त्यात त्यांनी नवा बंगला बांधला. त्यात १९५५पर्यंत त्यांचे वास्तव्य होते. बिर्ला घराण्याचं स्वतंत्र अस्तित्व दाखविणारा तो बंगला होता. महात्मा गांधींशी जीडींची मैत्री जुळली. १९२७मध्ये जीडींनी हिंदुस्थान टाइम्स हे वृत्तपत्र ताब्यात घेतले. जीडी १९२६मध्ये बनारस गोरखपूर मतदार संघातून श्रीप्रकाशना हरवून असेंब्लीवर निवडून आले. राजकारणात पडल्यावर बिर्लांचे उद्योगाकडे दुर्लक्ष झाले. १९२२ ते १९३१ या नऊ वर्षात बिर्लांनी एकही नवी कंपनी सुरू केली नाही. १९३०मध्ये जीडींनी असेंब्लींचा राजीनामा देऊन पुन्हा कारखान्यांकडे लक्ष देणे सुरू केले. पुढच्या तीन वर्षात त्यांनी ५ नवे साखर कारखाने उभारले. नवनव्या उद्योगात प्रवेश करणे आणि कारखान्याची क्षमता उत्पादनदृष्ट्या प्रचंड ठेवणे हे धोरण त्यांनी ठेवले. भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे साखर उत्पादक म्हणून त्यांनी अल्पावधीत स्थान मिळविले. ज्यूट व कापड गिरण्या यांचा नफा घटत होता, तेव्हा साखरेने हात दिला. १९३६मध्ये ब्रजमोहन या त्यांच्या धाकट्या भावाने ओरिएंट पेपर ही कंपनी सुरू केली. जीडींनी पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर महादेवी खरवा यांच्याशी विवाह केला. कृष्णकुमार (१९१८) व बसंतकुमार (१९२१) अशी दोन मुले झाली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात बिर्लांच्या उत्पन्नात अवाढव्य वाढ झाली. मोटारी, सायकली, पंखे, रेयॉन, प्लॅस्टिक, प्लायवूड, वनस्पती तेल, बॉलबेअरिंग, नॉनफेरस मेटल, चहा, कोळसा, विमान वाहतूक, बँकिंग- अशा अनेक क्षेत्रात बिर्लांनी आपले पाय पसरले. १९५८पर्यंत १५१ कंपन्यांपर्यंत मजल गेली. गीता पिरामल यांनी जवाहरलाल नेहरूंचे एक पत्र उद्धृत केले आहे. त्यात नेहरूंनी म्हटले आहे,‘‘माझ्याकडे स्वत:ची मोटार नाही. माझे मेव्हणे रणजित पंडित यांची मोटार मी वापरतो. पण पेट्रोलच्या स्थितीमुळे तेही आता कठीण झालेय. तेव्हा हिंद सायकल वापरण्याचे मी ठरविले आहे. पण ती बाजारात उपलब्ध नाही. ती कोठे मिळेल हे कळवा. (६जानेवारी, १९४२)’’ तेव्हा जीडींनी एक नव्हे दोन सायकली नेहरूंना पाठविल्या. ‘‘महात्मा गांधीजींना दारिद्र्यात राहता यावं यासाठी बिर्लांचे लक्षावधी रुपये खर्च झाले.’’ असा शेरा एकदा सरोजिनी नायडू यांनी मारला होता. ‘‘बिर्लांनी सर्वात जास्त गुंतवणूक केली ती महात्मा गांधी यांच्यात.’’ असेही म्हणण्यात येते. महात्मा गांधी आणि जीडी बिर्ला यांचे स्नेहसौहार्द हे अलौकिक होते. ‘इन दि शॅडो ऑफ द महात्मा’या पुस्तकात जीडींनी गांधींशी झालेला पत्रव्यवहार दिला आहे. पुढे या पत्रांचे चार खंड प्रसिद्ध झाले. ब्रिटिश सरकार आणि महात्मा गांधी यांचे अनधिकृत दूत व दुभाषे म्हणून जीडी काम करीत, असे म्हटले जाते. तेही खरेच आहे. धनिक मारवाडी समाजातील जीडींच्या प्रभावाची उपयुक्तता गांधीजींनी जाणलेली होती आणि जीडींनीही गांधीजींना आर्थिक व अन्य मदत देण्यात कधीही हात आखडता घेतला नाही. जीडी स्वत: देणग्या देत, इतरांनाही देण्यास प्रवृत्त करीत. जीडी बिर्ला यांचे व नेहरू घराण्याचे संबंध मात्र फारसे आत्मीयतेचे नव्हते. जीडींच्या असेंब्ली निवडणुकीत मोतीलाल नेहरूंनी त्यांच्याविरोधी भूमिका घेतली होती. जवाहरलालजींनी स्वातंत्र्योत्तर काळात बिर्लाच्या संपत्तीची चौकशी करण्यासाठी हजारी कमिशन नेमले. जवाहरलाजींच्या निधनानंतर जीडींनी म्हटले, ‘‘नेहरू हे भावनाप्रधान होते. त्यांच्यासारखी संवेदनशील माणसे ही कार्यक्षम प्रशासक बनू शकत नाहीत.’’ या दोघांच्या संबंधातील ताणतणाव दहाव्या प्रकरणात विस्ताराने आलेले आहेत. जीडींनी पुढे म्हटले, ‘‘फक्त एकाच राष्ट्रीय नेत्याने आमच्याकडून पैसे घेतलेले नाहीत, आणि ते म्हणजे जवाहरलालजी.’’ जवाहरलालजींच्या भगिनी विजयालक्ष्मी यांनी मात्र बिर्लांकडून प्रचंड रकमा घेतल्या होत्या. जयप्रकाश नारायण यांना जीडींचे खासगी सचिव म्हणून दरमहा वेतन पाठवले जाई. (पृष्ठ१०४) बिर्लांच्या मालमत्तेची १९८३मध्ये विभागणी झाली. अशोक(८५कोटी), एमपी(२४५कोटी), एलएन-एसके (२००कोटी), केके (३१५कोटी), बीके/एव्ही (१२२०कोटी), जीपी/सीके (६९०कोटी) ही वाटणी स्वत: जीडींनी केली होती. तिच्याबद्दल कुटुंबात बरीच नाराजी राहिली. ११जून १९८३ रोजी जीडी लंडनमध्ये वारले. जीडी बिर्ला आणि जेआरडी टाटा हे दोघे तसे समकालीन पण दोघांच्या विचारसरणीत, कार्यपद्धतीत, व्यवस्थापन तंत्रात, राजकीय दृष्टिकोनात बराच फरक होता. जीडी रिकाम्या जागांसाठी कधीही जाहिराती देत नसत. जुन्या संचालकांची मुलं, नातवंडं यांना सहज सामावून घेत. तरुण नवशिक्या पण भरवशाच्या माणसांना प्राधान्य देत. परदेशातील एमबीएपेक्षा भारतीय चार्टर्ड अकाऊंटंटची निवड करीत. बिर्लांकडची नोकरी ही आयुष्यभरची कमिटमेंट असे ते मानत. धंद्यात तोटा म्हणजे आपल्या जमातीचा अपमान असे ते मानत. गलथान कारभार व आळस यामुळे तोटा होतो; त्यांना आपल्याकडे थारा नाही असे ते म्हणत. चांगलं काम करणाऱ्यांना ते जादा वेतन व बढत्या भराभर देत. जादा जबाबदाऱ्या त्यांच्यावर टाकत. मनुष्य स्वभावाचं व वर्तनप्रक्रियेचं ज्ञान जीडींना अप्रतिम होतं. ‘हिंदुस्थान टाइम्स’चे संपादक देवदास गांधी १९५७मध्ये वारले; तेव्हा चौघा जेष्ठ सहसंपादकांना डावलून जीडींनी एका कनिष्ठ सहसंपादकाला हंगामी संपादक नेमले... कारण संभाव्य संपादक दुर्गादास हे त्यावेळी व्हिएन्नाला होते. ज्येष्ठ संपादकांपैकी कोणाला हंगामी संपादक नेमले असते तर नंतर आपली पदावनती झाली असे त्यांना वाटले असते, म्हणून जीडींची ही योजना होती. मनुष्य स्वभावाची पारख त्यांना चांगली होती. (१२२-१२३) आपल्या चांगल्या अधिकाऱ्यांनी निवृत्ती घेऊन स्वत:च्या संस्था सुरू कराव्या या गोष्टीलाही ते उत्तेजन देत. साबू, मंडेलिया, खैतान, मुरारका, हाडा, केसरीवाल वगैरे बिर्लांच्या अधिकाऱ्यांनीही आपापली उपसाम्राज्ये नंतर उभारली. (१२४) दररोज त्यांच्या टेबलावर प्रत्येक कारखान्याचा अहवाल असे. त्यात रोजचा खर्च, उत्पादन, विक्री, उत्पादनाचं वेळापत्रक, यंत्रसामग्रीचा वापर, कच्चा माल, स्टोअर्स, वसुली, प्रत्येक यंत्राचं उत्पादन यांची नोंद असे. (१२७) कारखान्यातील गुंतवणुकीचा २५-३०टक्के भाग ते राखीव निधीत कायम ठेवत. अडचणीच्या काळात त्यामुळे सोय होई. असे अनेक तपशील गीता पिरामल यांनी या पुस्तकात दिलेले आहेत. जीडी हे एक विसंगतींनी भरलेले व्यक्तिमत्त्व होते असे त्या मानतात. (१३१) त्यांनी पिलानीला तंत्रज्ञान संस्था काढली. पण आपल्या कोणाही मुलाला पदवीधर केले नाही. पदव्यांवर त्यांचा विश्वास नव्हता. त्यांना उत्तम कपडे, उत्तम फर्निचर आवडे. पण त्यांच्या वैयक्तिक गरजा कमी होत्या. ‘‘जीडींना विसरून जा. इतकी वर्षे मी एक भला माणूस बनण्याचा प्रयत्न केला एवढंच लक्षात ठेवा.’’ असे त्यांनी एका मासिकाला दिलेल्या अखेरच्या मुलाखतीत म्हटले होते. जीडी बिर्लांप्रमाणेच ‘बिझिेनेस लेजंडस’मध्ये वालचंद हिराचंद दोशी, कस्तुरभाई लालभाई, आणि जेआरडी टाटा यांच्याही कर्तृत्वाचा व व्यक्तित्वाचा इतकाच अंतर्भेदक वेध घेण्यात आलेला आहे. भारताला औद्योगिक क्षेत्रात स्वतंत्र व सार्वभौम बनविण्याची जिद्द या सर्वांनी बाळगली आणि त्यासाठी लागणारी यंत्रणा उभी केली. आरंभी ब्रिटिश राज्याशी टक्कर त्यांना द्यावी लागली आणि स्वातंत्र्यानंतर समाजवादाच्या अव्यावहारिक कल्पनांनी बहकलेल्या राज्यकर्त्यांच्या आणि नोकरशाहीच्या लायसेन्स परमिटराजशी जुळते घेऊन टिकाव धरून राहिलेल्या आणि उदारीकरणाच्या काळात या दूरदर्शी उद्योगपतींनी निर्माण केलेल्या औद्योगिक पायावरच आपण टिकून राहणार आहोत. म्हणून या उद्योगपतींच्या जीवनाचाही परिचय आपल्याला प्रेरणादायक ठरल्यावाचून राहणार नाही. ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 01-09-2002

    आधुनिक तीर्थक्षेत्राचे निर्माते... काही वर्षांपूर्वी गीता पिरामल यांनी ‘बिझनेस महाराजे’ नावाचं पुस्तक लिहिलं. बजाज, अंबानी, गोएंका, शहा बंधू आदी सध्या चर्चेत असलेल्या उद्योगपतींची थोडक्यात सांगितलेली चरित्रं, असं या पुस्तकाचं चरित्र होतं. त्या ठरावी मर्यादेत ते पुस्तक निश्चितच छान होतं. आपल्याकडे पौराणिक, ऐतिहासिक किंवा राजकीय नेत्यांची चरित्रं लिहिली जातात, पण उद्योगपतींची क्वचितच लिहिली जातात. ‘बिझनेस महाराजे’ पुस्तकाद्वारे गीता पिरामलनी तो नवा पायंडा पाडला. पण जाणत्या वाचकांना ते पुस्तक वाचताना असं आश्चर्य वाटत होतं की, अलीकडच्या या केवळ नफ्यासाठी व्यवसायात उतरलेल्या आणि सामाजिक, राष्ट्रीय दृष्टिकोन बेताचाच असणाऱ्या उद्योगपतींची चरित्रं गीता पिरामलनी का सांगावीत? हिंदुस्थानात उद्योगधंदे वाढूच नयेत, हिंदुस्थान हा कायम इंग्लंडला कच्चा माल पुरवणारा देशच राहावा, असं धोरण असलेल्या ब्रिटिश राजवटीच्या कालखंडात ज्यांनी अथक परिश्रमांनी हिंदुस्थानी उद्योगांचा पाया घातला त्यांची चरित्रं कुणी सांगायची? गीता पिरामल यांना स्वत:लाच ही जाणीव झाली आणि त्यातून साकारलं प्रस्तुत पुस्तक ‘बिझिनेस लेजंड्स.’ कारखाने, उद्योगधंदे, धरणे, वीजनिर्मिती केंद्र इत्यादी प्रकल्प ही आधुनिक हिंदुस्थानची मंदिरं आहेत, तीर्थक्षेत्रं आहेत असं पंडित नेहरू म्हणत असत. ही मंदिरं, ही तीर्थक्षेत्रं ज्यांनी स्वत:च्या घामातून, उद्योगपतींची जीवनकहानी इथे वर्णन केलेली आहे. या चारही उद्योगपतींना नफा नको होता अशातला भाग नाही. नफ्याशिवाय उद्योग हा फक्त समाजवादाच्या पुस्तकातच असतो हे त्यांना पुरेपूर माहीत होतं. पण नफा मिळवत असतानाच काही सामाजिक, काही राष्ट्रीय मूल्यं जपायची असतात, जोपासायची असतात हेही त्यांना माहीत होतं. त्यामुळे समाजवादाच्या कोणत्याही गप्पा न मारता त्यांनी समाजवाद आचरणात आणला. आणि त्यामुळेच घनश्यामदास बिर्ला, वालचंद हिराचंद, कस्तुरभाई लालभाई व जे.आर.डी. टाटा ही नावं उच्चारली गेली की कोणत्याही सुजाण वाचकाच्या मनात पहिली भावना निर्माण होते ती आदराची. अलीकडची ‘टायकून्स’ मंडळी नाना लटपटी करून कंपन्या ताब्यात घेतात, शेअर बाजारात खटपटी करून लाखांचे कोटी करतात, राजकारण्यांना कच्छपी लावून महान बनतात. वरील चौघांनी झटपट पैसा मि झटपट प्रसिद्धीचा हा सोपा मार्ग चोखाळला नाही. या चौघांनी उद्योगधंद्यात पाऊल टाकलं त्यावेळेस ब्रिटिश या देशाची मनसोक्त आर्थिक लूट करीत होते. बव्हंशी हिंदुस्थानी नागरिक गरीब होते. सततचे दुष्काळ, दंगली आणि प्लेग, फ्ल्यू यांसारख्या प्राणघातक साथींनी देश हैराण होऊन गेला होता. हिंदुस्थानातून फक्त कच्चा माल आणि थोडा शेतीमाल निर्यात होत होता. बाकी बहुसंख्या उत्पादनांची आयातच होत होती. आयातीच्या फायदेशीर धंद्यात उखळ पांढरं करून घेतलेले व्यापारी अनेक होते. वरील चौघांनी भरभराटीचे हे सोपे मार्ग अनुसरले नाहीत. त्यांनी खेड्यापाड्यांत कारखाने उभारले, ओसाड, पडीक, जमिनीचं रूपांतर त्यांनी संपत्ती निर्माण करणाऱ्या स्वर्गात केलं. त्यांनी इथल्या जनतेच्या मनात औद्योगिकीकरणाची बीजं रुजवली. घनश्यामदास बिर्ला १९८३ साली वयाच्या ८९व्या वर्षी वारले. तेव्हा बिर्ला उद्योगसमूहात दोनशे कंपन्या होत्या. एकूण मालमत्ता पंचवीसशे कोटी रुपये होती आणि विक्री तीन हजार कोटी रुपयांवर पोहोचली होती. वालचंद हिराचंद दोशी हे सोलापूरचे मराठी जैन. त्यांच्या बांधकाम कंपनीने मुंबई-पुणे दरम्यानचा बोरघाट बांधला. मुंबई शहराला पाणी पुरवणारी प्रचंड पाइपलाइन त्यांनीच उभारली. असंख्य धरणे, पूल, रेल्वेमार्ग त्यांनीच उभारले. हिंदुस्थानातील पहिला जहाजबांधणी कारखाना, पहिला विमान कारखाना, पहिला मोटार कारखाना त्यांनीच उभारला. सिंदिया स्टीमशिप ही त्यांची जहाज कंपनी म्हणजे हिंदुस्थानी किनारा वाहतूक व्यवसायातली पहिली पूर्णपणे देशी कंपनी. कस्तुरभाई लालभाई हे नुसतेच उद्योगपती नव्हते तर आज उद्योग व आर्थिक क्षेत्रात अव्वल क्रमांकावर असलेल्या अनेक संस्थांचा पाया कस्तुरभार्इंनी घातलेला आहे. अहमदाबाद एज्युकेशन सोसायटी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, आयसीआयसीआय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, अहमदाबाद टेक्स्टाईल अँड इंडस्ट्रीज रिचर्स असोसिएशन या त्यापैकी काही. जहांगीर रतन दादाभाय ऊर्फ जे.आर.डी. टाटा हे एकच नाव परदेशी लोकांना वर्षांनुवर्षं परिचयाचं होतं. महान उद्योगपती म्हणजे टाटा. ‘एक्स्वायर’ या मासिकाने १९७० साली जगातील महत्त्वाच्या शंभर व्यक्तींची एक यादी प्रसिद्ध केली. त्यातली बहुसंख्य नावं अर्थातच युरोप-अमेरिकेतली आणि राजकारण्यांची होती. फक्त दोनच नावं हिंदुस्थानी होती – इंदिरा गांधी आणि जे.आर.डी. टाटा. मात्र टाटांची ही जगन्मान्यता मान्य करायला काँग्रेस सरकारने नेहमीच फार खळखळ केली. अखेर १९९१ मध्ये नरसिंह राव सरकराने त्यांना ‘भारतरत्न’ ही सर्वोच्च पदवी दिली. नेहरू घराणं आणि जे.आर.डी. टाटांचे संबंध तणावाचेच राहिले. प्रस्तुत पुस्तकात लेखिकेने चारही चरित्रनायकांच्या जीवनाचा आढावा आटोपशीर, नेटका आणि वाचनीय अशा प्रकारे घेतला आहे. चरित्रनायकावर कल्पनारम्य कादंबरी न लिहिताही वाचनीय, प्रवाही, बांधून ठेवणारं लेखन करता येतं हे लेखिकेनं सध्याच्या चरित्रात्मक कादंबरीच्या जमान्यातही दाखवून दिलं आहे. पुस्तक उत्तमच आहे, पण काही मुद्दे सांगायलाच हवेत. कस्तुरभाई लालभार्इंचं कर्मक्षेत्र अहमदाबाद, पण वालचंद हिराचंदांचं कर्मक्षेत्र मुख्यत: महाराष्ट्र, टाटा आणि बिर्लांचे कारखाने देशभर पसरलेले असले तरी देशाची आर्थिक राजधानी मुंबईच असल्यामुळे त्यांच्या उद्योगातही महाराष्ट्राचा मोठाचा वाटा आहे. तेव्हा या मोठ्या माणसांची चरित्रं मूळ मराठीतून का लिहिली जाऊ नयेत? अशोक जैन यांचा मराठी अनुवाद चांगला. सचिन जोशी यांचं मुखपृष्ठ व रेखाचित्रं नेत्रसुखद. मेहता प्रकाशनाची सुबक निर्मिती. -मल्हार कृष्ण गोखले ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more