ODELL DEEFUS MAY BE A LITTLE DUMB, BUT WHEN HE DISCOVERS A FRESHLY DUG GRAVE AT THE BACK OF DEAN LOWRY`S HOUSE, HE UNDERSTANDS THAT IT`S INTENDED FOR HIM. WHEN HE FINDS AN OLD LADY`S CORPSE IN THE FREEZER, HE KNOWS THAT SHE HAS BEEN MURDERED. AND WHEN THE BOMB IN HIS CAR EXPLODES, LEVELLING EVERY BUILDING IN THE VICINITY, AND ODELL MUST SUDDENLY HIDE THE BODY OF A TERRORIST, EVEN HE RECOGNISES THAT THINGS ARE GETTING SERIOUSLY WEIRD. THIS BLACKLY FUNNY NOVEL OF OUR TIMES FOLLOWS WHAT HAPPENS WHEN ODELL DEEFUS TAKES ONE WRONG TURN ON THE JOURNEY OF HIS LIFE AND CRASHES INTO A WORLD OF ODDBALLS, MISFITS, DRUG-DEALERS, RELIGIOUS FANATICS AND CROOKED COPS, HYPOCRISY, TORTURE AND BLOODY MURDER. IN "CALLISTO", ODELL DEEFUS DISCOVERS A VAST WEB OF CORRUPTION AND DECEIT LEADING TO THE DARK HEART OF AMERICA.
अमेरिकेतील ‘कॅलिस्टो’च्या पाश्र्वभूमीवर ही कथा घडते. योडर योमिंग या ठिकाणी राहणाNया ओडेल डीफस या २२ वर्षीय मुलाभोवती ही कथा फिरते. आकर्षक व्यक्तिमत्त्व असणारा ओडेल हा विचारांनी मात्र बालिश आहे. त्यामुळे बघताक्षणी त्याच्याकडे आकर्षित होणाऱ्या मुली त्याच्या मंद स्वभावामुळे लगेचच दूरही जातात. बालकथांमध्ये रमणारा हा ओडेल आयुष्यात घडणाNया घटनांचा संबंध सतत कार्टून्स आणि बालकथांमधील पात्रांशी जोडताना दिसतो. स्वतःला तो खूपच ‘हुशार’ समजतो. परंतु जगाच्या दृष्टीने तो ‘मंद’ असतो. बारावी नापास ओडेल एका वाण्याच्या दुकानात कमी मजुरीवर खूप जोखमीचे काम करत असताना नियमित पगार व चांगल्या करिअरच्या आमिषाने लष्करात भरती होण्याचे ठरवतो. यासाठी तो ‘कॅलिस्टो’कडे जायला निघतो. लष्करात नावनोंदणी करायला जात असतानाच ‘कॅलिस्टो’च्या जवळच त्याची खटारा गाडी बंद पडते. मदत मिळवण्यासाठी तो एका एकांड्या वाटणाऱ्या घरात प्रवेश करतो. तेथे त्याची भेट ‘डीन लोरी’ या माणसाशी होते आणि तिथूनच त्याच्या आयुष्यात गूढ आणि विचित्र घटनांची मालिकाच सुरू होते.
कथेच्या अनुषंगाने पुढे लोरेन, वेब, ब्री मावशी, कोल, चेड अशी पात्रे येतात. ओडेलच्या अपरिपक्व स्वभावामुळे आणि एका गैरसमजातून नकळतपणे त्याच्या हातून डीनचा खून होतो. त्यातूनच पुढे ड्रग्ज रॅकेट, दहशतवाद यांच्याशी त्याचा संबंध जोडला जातो. स्थानिक पोलीस, एफबीआय, होमलँड सिक्युरिटी हात धुवून त्याच्या मागे लागतात. दारूचे व्यसन आणि स्त्री-आकर्षण त्याला अधिकच संकटात ढकलतात. डीनचे गायब झालेले प्रेत, पोलिसांना तो दहशतवादी असल्याचा वाटणारा संशय त्याला हवाई बेटांवरील एका जेलमध्ये नेऊन टाकण्यास पुरेसे असतात. ओडेल तुरुंगातून सुटण्यात यशस्वी होईल का?