* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CATCH ME IF YOU CAN
  • Availability : Available
  • Translators : JYOTSNA LELE
  • ISBN : 9788184980950
  • Edition : 1
  • Publishing Year : JANUARY 2010
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 264
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Print Books:
NOW A MAJOR MOTION PICTURE FROM DREAM WORKS PICTURES STARRING LEONARDO DICAPRIO AND TOM HANKS AND DIRECTED BY STEVEN SPIELBERG, CATCH ME IF YOU CAN IS THE UPROARIOUS BESTSELLING TRUE STORY OF ONE OF THE WORLD`S MOST SOUGHT-AFTER CON MEN. FRANK ABAGNALE, ALIAS FRANK WILLIAMS, ROBERT CONRAD, FRANK ADAMS, AND ROBERT MONJO, WAS ONE OF THE MOST DARING CON MEN, FORGERS, IMPOSTORS, AND ESCAPE ARTISTS IN HISTORY. DURING HIS BRIEF BUT NOTORIOUS CRIMINAL CAREER, ABAGNALE DONNED A PILOT`S UNIFORM AND COPILOTED A PAN AM JET, MASQUERADED AS THE SUPERVISING RESIDENT OF A HOSPITAL, PRACTICED LAW WITHOUT A LICENSE, PASSED HIMSELF OFF AS A COLLEGE SOCIOLOGY PROFESSOR, AND CASHED OVER $2.5 MILLION IN FORGED CHECKS-ALL BEFORE HE WAS TWENTY-ONE. A HILARIOUS, STRANGER-THAN-FICTION ACCOUNT OF HIS SUMPTUOUS LIFE ON THE LAM, INTERNATIONAL ESCAPADES, AND INGENIOUS ESCAPES, CATCH ME IF YOU CAN IS A CAPTIVATING TALE OF DECEIT. "IRRESISTIBLE! . . . TOUCHES THAT CURRENT OF LARCENY THAT LIES WITHIN ALL OF US." -HOUSTON CHRONICLE "A BOOK THAT CAPTIVATES FROM FIRST PAGE TO LAST" -WEST COAST REVIEW OF BOOKS "ZINGINGLY TOLD. . . RICHLY DETAILED AND WINNING AS THE DEVIL." -KIRKUS REVIEWS
बनावट सह्या, कागदपत्रं बनवणा-या, दुस-या नावाने वावरणा-या, कुठल्याही परिस्थितीतून सहीसलामत सुटणा-या त्या काळातल्या अनेक धाडसी गुन्हेगारांपैकी एक. त्याच्या गुन्हेगारीच्या काळात त्यानं वैमानिकाचा गणवेश घालून पॅन अ‍ॅमचं जेट विमान सहवैमानिकाच्या जागेवर बसून बेधडक चालवलं. एका रुग्णालयात बनावट रेसिडेण्ट डॉक्टर म्हणून काम केलं. जवळ परवाना नसताना वकिली केली, कॉलेजातून समाजशास्त्राचा प्राध्यापक बनला आणि चेक्समध्ये बदल करून पंचवीस लाख डॉलर्स मिळवले. आणि हे सगळं तो एकवीस वर्षांचा होण्याच्या आत! कल्पितापेक्षा अद्भुत असलेली सत्यकथा! फसवणुकीतला बादशहा, तोतयेगिरीमधला तज्ज्ञ, बनावट कागदपत्रं, चेक्स बनविण्यात हातखंडा असलेल्या या माणसाचं अद्भुत चरित्र!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #CATCHMEIFYOUCAN #CATCHMEIFYOUCAN #कॅचमीइफयूकॅन #BIOGRAPHY #TRANSLATED FROM ENGLISHTOMARATHI #JYOTSNALELE #FRANKABAGNALESTANRADDING "
Customer Reviews
  • Rating StarG.D. Parekh

    It`s worth reading very interesting book one will not leave it unless completed.

  • Rating StarChinmayi Vyavahare

    छान आहे हे पुस्तक उत्कंठा वाढवणारे

  • Rating StarPooja Kuchekar

    "कल्पितापेक्षा अद्भूत असलेली सत्यकथा"! असलेले पुस्तक. नक्की वाचा.

  • Rating StarSHRAMIK EKJOOT 29-8-2010

    प्रख्यात दिग्दर्शक स्टिव्हन स्पिलबर्ग यांनी दिग्दर्शित केलेला ‘कॅच मी इफ यू कॅन’ हा चित्रपट बघून ज्योत्सना लेले यांनी तो चित्रपट ज्या पुस्तकावर आधारित आहे, ते पुस्तक मिळवून वाचून काढले. ते पुस्तकही त्यांना आवडले. ते मराठीत आणायला हवे असे त्यांना वाटे. कारण वयाच्या १६ ते २१ वर्षाच्या दरम्यान एका देखण्या तरुणाने खोटे चेक देऊन जगभराच्या बँकांना लुबाडण्याच्या भामटेगिरीतले त्या पुस्तकातील एकाहून एक अफलातून किस्से हे केवळ कल्पनेने रंगवलेले नव्हते तर ते प्रत्यक्षात घडलेले होते आणि तेही भामटेगिरी करणाऱ्या फ्रँक अबॅग्नेल याने स्वत:च लिहून काढलेले होते. १९८० साली फ्रँकचे ‘कॅच मी इफ यू कॅन’ हे पुस्तक प्रथम प्रसिद्ध झाले. त्यावेळी फ्रँक बत्तीस वर्षांचा होता, आणि त्याने गुन्हेगारी सोडून अमेरिकेतील एफबीआय या केंद्रीय गुन्हा अन्वेषण संस्थेशी सहकार्य करून आर्थिक क्षेत्रातील अनेक गैरव्यवहारांचा बीमोड केलेला होता. अनेक बँकांमधील लबाडीच्या तसेच फसवणुकीच्या घटनांचा छडा लावून जगातील एक अग्रगण्य कॉन्फिडन्स मॅन म्हणून त्याने लौकिक मिळवलेला असतो. चोराच्या वाटा चोरालाच ठाऊक असतात, या उक्तीप्रमाणे फ्रँकने पाच वर्षाच्या आपल्या गुन्हेगारीच्या जीवनाचा त्याग करून, गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी आपले उत्तरायुष्य सार्थकी लावले. अमेरिकेतील न्यायखात्याचेही कौतुक करायला हवे कारण आर्थिक गुन्हे सफाईने करणाऱ्या फ्रँकला जन्मठेपेची वा तत्सम शिक्षा देऊन कारावासात डांबून ठेवण्याऐवजी अमेरिकन लॉ एन्फोर्समेंट एजन्सीला विनामोबदला मदत करण्याच्या अटीवर त्याला मुक्त केले आणि त्याच्या या क्षेत्रातील बुद्धिमत्तेचा आणि प्राविण्याचा उपयोग देशहितासाठी करून घेण्याचे धोरण राबवले. सोळाव्या वर्षापर्यंत फ्रँकचे जीवन एखाद्या मध्मयवर्गीय कुटुंबातील मुलाप्रमाणेच गेले. न्यूयॉर्कमधील ब्रांक्सव्हिल भागातील एका सुखवस्तू ज्यु कुटुंबात फ्रँकचा जन्म झाला. वडील दुसऱ्या महायुद्धात सैन्यदलात होते. युद्ध संपल्यावर ग्रामर्सीज नावाचे स्टेशनरी दुकान ते चालवत. राजकारण, क्रीडा क्षेत्र यातही ते सक्रिय होते. रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते म्हणूनही त्यांचा दबदबा होता. खोल पाण्यातल्या समुद्रातले मासे पकडण्याचा छंद त्यांना होता. त्यासाठी ते मासेमारी मोहिमेवर अधूनमधून जात. २८ व्या वर्षी त्यांनी पॉलेट या पंधरा वर्षे वयाच्या सुंदर तरुणीशी लग्न केले. या दांपत्याला ४ मुले झाली. फ्रँक हा चार भावंडामधला तिसरा मुलगा. फ्रँक बारा वर्षाचा असताना आईने मुलांसह नवऱ्याचे घर सोडले आणि ब्राँक्स डेंटल कॉलेजमध्ये टेक्निशियनच्या कोर्ससाठी नाव घातले. फ्रँकच्या वडिलांचे बायकोवर प्रेम होते. त्यांनी खूप मनधरणी केली, मुलांच्या मार्फत रदबदली केली. पण फ्रँकच्या आईने दाद दिली नाही. फ्रँक १४ वर्षांचा असताना आई-वडील यांचा घटस्फोट झाला. फ्रँक वडिलांबरोबर राहू लागला. वडिलांचे मित्र हे उच्च स्तरातील असल्याने फ्रँकला शेअर ब्रोकर्स, काँट्रॅक्टर्स, उद्योगपती, कामगार नेते, ट्रकचालक वगैरेंचे जीवन बघायला मिळाले. तो चलाख होता. शाळेच्या अभ्यासापेक्षा वाह्यात मित्रांबरोबर तो कँडी चोरणे, सिनेमागृहात तिकीटाशिवाय घुसणे, गाड्या चोरणे असले धंदे करायला लागला. पोलिसांनी त्याला पकडले. वडिलांनी त्याला सोडवले. त्याच्या चोरीतल्या सहभागाचा पुरावाही खोडून टाकायला लावला. फ्रँकला हे प्रकरण जादूच्या कांडीसारखे वाटले. वडील त्याला न रागावता म्हणाले, ‘‘चुका सर्वांच्याच हातून होतात, तू काय काय भानगडी करतोस ते मला ठाऊक आहे. पण या गोष्टी अशा प्रकारे करायच्या नसतात. कायद्याच्या दृष्टीने तू अजून बच्चा आहेस, पण तू दिसतोस प्रौढ तेव्हा तू आता प्रौढ व्यक्तीप्रमाणे विचार करायला शिक. लहान मुलासारख्या खोड्या करण्यात वेळ घालवू नकोस.’’ त्यावेळी फ्रँक फक्त १५ वर्षांचा होता पण तो ६ फूट उंच होता. १७० पौंड वजन होते. दांडगा, दणकट होता. शिक्षकही त्याला टरकून असत. वडिलांच्या बोलण्यामुळे तो प्रौढाप्रमाणे वागू लागला. बाँक्सव्हिलच्या गोदामात अर्धवेळ नोकरी करू लागला. त्यामुळे खुश होऊन वडिलांनी त्याला एक जुनी फोर्ड कार घेऊन दिली. या कारमुळे फ्रँकला भलताच चेव आला. पोरींना गटवण्यात तो तरबेज झाला. पोरींना फिरवण्यात त्याला मजा वाटू लागली. पेट्रोलसाठी वडीलांकडे पैसे मागणे भाग पडे. तेव्हा तो एकदा म्हणाला, ‘‘मला एक गॅस क्रेडिट कार्ड घेऊन द्या. तुमच्याकडे सारखे पैसे मागण्याचा संकोच वाटतो. शाळा, खेळ, जेवण, डेटिंग, पेट्रोल याला तुम्ही देता तो पॉकेटमनी कमी पडतो. गॅसकार्ड दिलेत तर पैसे मी भरीन.’’ वडील त्याला आपले स्वत:चे मोबिल गॅसचे कार्ड देतात. ‘हे कार्ड वापर... त्याचे दरमहाचे बिल मात्र भरायची काळजी घे. तुझ्यावर माझा विश्वास आहे.’ पहिल्याच महिन्यातले मोलिब गॅसचे बिल भरल्यावर फ्रँक कफल्लक झाला. आता पैसे कुठून आणायचे? त्याने गॅस भरताना पेट्रोल पंपावर टायर सेट १६० डॉलर्सना बदलून मिळेल असा बोर्ड वाचला. तेथील अटेंडंटला तो म्हणाला, ‘मला टायर बदलायचे आहेत.’ अटेंडंट म्हणाला, ‘पण तुझे टायर तर चांगले आहेत.’ फ्रँक म्हणाला, ‘खरं आहे. टायर्स घेतल्याची कार्डवर नोंद कर. टायर्स तूच ठेव. मला १०० डॉलर्स दे. तू ते १६० ला कुणाला तरी विकत दे. तुला साठ डॉलर्सचा फायदाही होईल. तो अटेंडंट या गोष्टीला राजी होतो. ते तंत्र मग फ्रँक सहजपणे राबवतो. पुढच्या महिन्यात टायर्सच्या १४ जोड्या बदलून, गॅसकार्डचे बिल ३४०० डॉलर्सचे येते. वडील ते बिल भरतात. बँकेचे अधिकारी वडिलांचे मित्र. वडील फ्रँकला विचारतात, ‘‘तू हे काय केलेस ते खरे खरे सांग. मी तुला क्षमा करीन.’’ ‘‘डॅड, हे सगळं मुलींमुळे घडले. त्या मुलींना पटवण्यासाठी चमत्कारिक गोष्टी कराव्या लागतात. मला त्या स्पष्ट करता येणार नाहीत.’’ वडील क्षमा करतात. आई मात्र रागावते. ती फ्रँकला वडिलांच्या घरातून स्वत:च्या घरात राहण्यास भाग पाडते. त्याला पुढे शाळा-कम-सुधारगृहात टाकते. वर्षभर फ्रँक त्या सुधारगृहात राहतो. त्याच वेळी वडिलांची आर्थिक स्थिती ढासळते. ते आपली आलिशान कार विकून साधी सेकंड हँड कार घेतात. ‘मी कोण आहे हे मला ठाऊक आहे. माझ्याकडे कुठली कार आहे हे महत्त्वाचे नाही. मोठी कार असण्यापेक्षा मी प्रामाणिक आहे ह्या गोष्टीचे महत्त्व जास्त आहे.’ वडिलांची ही वाक्ये फ्रँकला पुढच्या आयुष्यात प्रेरक ठरतात. फ्रँकला सोळाव्या वर्षी स्वत:चा शोध घेण्यासाठी घराबाहेर पडतो. १९६४ साली. त्यावेळी त्याच्या बँकेतल्या खात्यावर २०० डॉलर्स शिल्लक असतात. एका आठवड्यात वेगवेगळी कामे करून थोडेफार पैसे मिळवतो. पण त्यात जगणे अशक्य आहे हे त्याच्या ध्यानात येते. तो वयापेक्षा थोराड असला तरी ड्रायव्हर्स लायसन्सवर वय १६ च असल्याने पगार निम्मा मिळतो. तेव्हा त्या लायसन्सवरचे जन्मवर्ष १९४८ ऐवजी तो १९३८ तो बदलतो. एका रात्रीत १६ ऐवजी २६ वर्षांचा होतो. त्यावेळी चेक वटवण्याचे एक तंत्र फ्रँक शोधून काढतो. त्याच्या बँकेतील खात्यावर २०० डॉलर्स शिल्लक होते. या शिल्लक रकमेला हात लावायचा नाही हे ठरवलेले. १० किंवा २० डॉलर्सचा चेक लिहायचा. तो हॉटेल किंवा डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये जाऊन वटवायचा. पैशाची जरूर असले तेव्हा चेक वटवायचे. मौजमजा करायची. पगाराला पूरक म्हणून रोज २/३ चेक खोटे लिहून द्यायचे. चेक न वटवण्यासाठी पैसे कमी पडले तर वडील भरपाई करतील, असे तो म्हणे चेकचा खरेपणा पडताळून न पाहता लोक चेक स्वीकारण्याएवढे मूर्ख असतील तर त्यांची फसवणूक समर्थनीय आहे असा फ्रँकचा युक्तिवाद होता. कुमारवयामुळे आपण पकडले गेलो तरी कडक शिक्षा होणार नाही असाही दिलासा तो स्वत:ला द्यायचा. खोटे चेक वटविण्याचा प्रकार न्यूयॉर्कमध्ये २ महिने केल्यावर न्यूयॉर्क सोडण्याचा विचार फ्रँकने केला. खोटे चेक वटविण्यात आपण प्रवीण असलो तरी केवळ यावर दीर्घकाळ निभाव लागणार नाही हेही त्याला मनोमन पटले होते. आपण वैमानिक असलो तर देशोदेशी, गावोगावी भटकू शकू, खोटे चेक वटवू शकू, पकडले जाणार नाही असे त्याला वाटले. वैमानिकाचे प्रशिक्षण घेऊन वैमानिक व्हायचे हा मार्ग दीर्घ पल्ल्याचा आणि प्रचंड खर्चाचा तो फ्रँकला जमण्यासारखा नव्हता. वैमानिकाचा पोशाख मिळवणे, बॅच मिळवणे, तोतया वैमानिक बनून विमानातून प्रवास करणे हे कितपत शक्य आहे याचा त्याने मागोवा घेतला. पॅन अ‍ॅम वर्ल्ड एअरवेज या अमेरिकन विमान कंपनीत जाऊन ‘आपण सहवैमानिक आहोत, आपला गणवेश हरवला आहे, तातडीने गणवेश मिळाला नाही तर मला विमान घेऊन लॉस एंजेलिसला जाता येणार नाही’ असा कांगावा करून फ्रँक गणवेश मिळवतो. वैमानिकाला उपलब्ध असणारे फुकट प्रवास करण्याचे दोन मार्ग त्याला कळतात. एक तर, फक्त तिकीटावरचा टॅक्स भरून पास मिळवणे. दुसरा डेड-हेडिंग, पिंक स्लीप भरून पास मिळवणे, ‘आपण न्यूयॉर्कमध्ये आहोत. उद्या लॉस एंजेलिसवरून दुसऱ्या देशाला उड्डाण करण्याचा आदेश बॉसने दिला आहे. तर न्यूयॉर्कहून कुठल्याही कंपनीच्या विमानाने लॉस एंजेलिसला आपण जाऊ शकतो.’ विमानात जागा नसली तरी कॉकपिटमधील जम्प सीटवर बसून प्रवास करता येतो. त्यासाठी पिंक स्लिप तेवढी भरावी लागते. फ्रँक या डेड हेडिंगचा वापर पुढच्या पाच वर्षात अनेकदा करतो. त्याचे सहवैमानिक हे पद खोटे आहे, तो फसवणूक करीत आहे हे लक्षात यायला विमान कंपन्यांना दीर्घकाळ लागतो. वैमानिकाच्या नाटकानेही खोटे चेक वटवणे फ्रँकला सोपे जाते. पाच वर्षाच्या अवधीत फ्रँक २६ देशात मिळून २५ लाख डॉलर्सची माया जमवतो. एकविसाव्या वर्षी त्याला फ्रेंच पोलीस पकडतात. शिक्षा होते. परंतु पाच वर्षांनी त्याला सरकारला मदत करण्याच्या काही अटींवर अमेरिकन गुप्तहेर खात्याच्या मार्फत सोडवण्यात येते. त्याचबरोबर नॅशनल सायबर सिक्युरिटी अलयान्स वगैरे संस्थांसाठी फ्रँक काम करतो. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more