NA
निसर्गाने दिलेला आनंद आणि निसर्गानेच दिलेलं संकट, नक्की महत्त्वाचं काय? खरं तर काहीच नाही. ‘निसर्ग’ एकमेव महत्त्वाचा. या निसर्गाच्या साक्षीने पृथ्वीवर अखंड न संपणारं नाटक चालू आहे. ह्या नाटकाच्या रंगभूमीवर वावरणारा प्रत्येकजण कलाकार आहे. ह्या कलाकारांच्या वेगवेगळ्या भूमिका म्हणजे माणसांच्या वृत्ति आणि प्रवृत्ति. प्रत्येक कलाकार प्रत्येक वृत्तीची भूमिका निभावतो. त्या वृत्तींच्याच ह्या गोष्टी. त्या कुणा एखाद्या व्यक्तीवर नाहीत. वृत्ती परिचयाच्या असतात, म्हणून गोष्टी आपल्याशा वाटतात. ह्या रंगभूमीवर प्रत्येक कलाकार निसर्गाने दिलेल्या संकटातून बाहेर पडून आनंदाच्या शोधात दिवस-रात्र फिरत असतो. आनंद नाही गवसला तर नैराश्य आणि गवसलाच तर त्या तेवढ्या काळापुरतं ‘सेलिब्रेशन.’