* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789386745705
  • Edition : 1
  • Publishing Year : AUGUST 2017
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 176
  • Language : MARATHI
  • Category : BUSINESS & MANAGEMENT
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
DR. GIRISH WALAVALKAR`S BOOK `C.E.O CHYA KEBIN MADHOON...` ELUCIDATES THE IMPACT OF ECONOMIC DEVELOPMENTS ON CHANGING LIFESTYLES, PRIORITIES, AND  WAY OF THINKING OF A COMMON MAN.  CONTINUOUS EXPANSION AND DEVELOPMENT OF VARIOUS ORBITS IS THE CONSTANT FEATURE OF THE UNIVERSE. THIS HOLDS TRUE FOR INDUSTRY, TECHNOLOGY, ECONOMICS, POLITICS, SOCIAL STRUCTURE AS WELL AS FOR OUR INDIVIDUAL PERSONAL LIFE.  IN LAST FEW YEARS , THE WORLD  ESPECIALLY INDIA IS CHANGING ECONOMICALLY, POLITICALLY AND SOCIALLY  WITH A SPEED AND ACCERELATION WHICH WAS NEVER IMAGINED BEFORE. THESE  CHANGES ARE INFLUENCING COMMON MAN`S LIFE DIRECTLY. HIS LIFE STYLE, PRIORITIES AND CONCEPTS ARE  CHANGING DRASTICALLY.  `C. E. O. CHYA KEBIN MADHOON...` PROVIDES A GUIDELINE TO ADAPT TO THESE CHANGES AND IN TURN  IMPROVE THE QUALITY OF LIFE. AT THE SAME TIME, IT ALSO EXPLAINS THE NEED OF KEEPING OUR ROOTS INTACT TO ACHIEVE LASTING MENTAL PEACE IN THE THE WORLD WHICH IS BECOMING MORE AND MORE COMMERCIAL AND PRAGMATIC DAY BY DAY.
जागतिक स्तरावरील आर्थिक घडामोडी, चलनवाढ तसेच देशांतर्गत राजकारण यामुळे अर्थव्यवस्था, उद्योग, तंत्रज्ञान, समाजावस्था यांत व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे माणसाच्या खासगी जीवनावर होणारे त्याचे परिणाम यांचा सखोल अभ्यास करून लिहिलेल्या माहितीपूर्ण लेखांनी त्यांनी आपल्या वाचक वर्गाला अद्ययावत केले आहे. विकासामुळे आपले जीवन समृद्ध झाले. आधुनिक तंत्रज्ञान हा प्रगतीचा पाया ठरावा. संगणकामुळे सुखकर झालेल्या जीवनशैलीमुळे भारतीय तरुणांमध्येदेखील नवीन मनोवृत्तीचा विकास होत आहे. आधुनिकता आत्मसात करत आजची पिढी फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉन, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपसारख्या माध्यमांच्या वापरातून नवीन पिढीच्या गरजा ओळखून त्या दृष्टीने आपल्या व्यवसायाच्या कक्षा विस्तृत करून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवत आहे. डॉ. वालावलकर यांनी बदललेल्या या परिस्थितीवर दृष्टी टाकली आहे. आपल्या अनेक लेखांत त्यांनी निरनिराळ्या महत्त्वाच्या विषयांवर आपली भूमिका विशद केली आहे. ‘स्विस बँकांची वादग्रस्त व्यावसायिकता’ या आपल्या लेखात आर्थिक सत्ता, तिची राजकारणाशी होणारी सांगड आणि त्यानंतर निर्माण झालेले सार्वभौमत्व म्हणजेच जणू स्विस बँक, हे दाखवून दिले आहे. या आपल्या लेखातील अवैध मार्गाने मिळालेला पैसा, त्यांचा व्यवहार यात भारतीयांची गुंतवणूक व मोदी सरकारने वठविलेली भूमिका या गोष्टी वाचनीय आहेत. ‘नवीन संसाधने’मध्ये त्यांनी आधुनिकीकरणामुळे (MODERNISATION) प्राप्त झालेल्या निरनिराळ्या सोयी-सुविधांविषयी विस्तृत लिहिलेले आहे. ओला, उबर कॅब्स इत्यादामुळे वेळी-अवेळी घराबाहेर पडणाऱ्या चाकरमान्यांना ही सुविधा कशी अधिक सुखमय वाटते, याची माहिती दिली आहे. परदेशातील कथा-कादंबऱ्यादेखील आता भारतात सहज उपलब्ध आहेत. सुप्रसिद्ध ‘मिल्स आणि बून’च्या कादंबऱ्याचा प्रादेशिक भाषा स्वीकारून भारतात झालेला गृहप्रवेश डॉ. वालावलकर यांनी अप्रतिमरीत्या मांडला आहे. सध्या माणसांचे शेड्यूल इतके बिझी झाले आहे की, कुटुंब वा निरनिराळे ग्रुप्स एकत्र बाहेर जाणे, सहज भेटणे हे आता दुर्मीळ झाले आहे. त्यामुळे करमणुकीचे मार्गदेखील इंटरनेटपुरते मर्यादित राहिले आहेत. मनोरंजनासाठी वेबटेलिव्हिजनच्या सीरीजमध्ये लोक कसे गुंतलेत त्याचे उत्तम दर्शन आपल्याला ‘वेबसीरीज करमणूक ऑनलाईन’मध्ये वालावलकरांनी घडविले आहे. या सर्व सोयी-सुविधांसाठी पैसा महत्त्वाचा आहे. संपत्तीचा, मालमत्तेचा साठा करायला सुरुवात झाली आहे. LAVISH LIFESTYLE साठी अमाप कष्ट करण्याची तयारी तरुण वर्ग दाखवत आहे, हे एका दृष्टीने योग्य आहे. पण त्याचबरोबर विलासी वृत्तीमुळे हाच पैसा पाण्यासारखा खर्च करण्याकडेही त्यांचा कल वाढतोय. श्रीमंती आणि संतोष याची सांगड घातल्यावरच सुख चालून येते. आपल्या ‘उद्योगी श्रीमंती’मध्ये डॉ. वालावलकर यांनी ही सद्य परिस्थिती अभिव्यक्त केली आहे. माणसाच्या अपेक्षा वाढल्या की त्यातून मागण्या वाढत जातात. त्यात नैसर्गिक आपत्ती, राजकारणातील अस्थिरता, आकस्मिक उद्भवणाऱ्या आपत्ती यामुळे वाढणारी महागाई याच्या झळादेखील सर्वसामान्य नागरिकांना शेवूÂन काढतात. सुस्थितीतील लोकांचा कणादेखील महागाईने वाकला जातो. डॉ. वालावलकर यांनी कराडमध्ये अर्धपोटी राहणाऱ्या कामगारांवर प्राप्त परिस्थितीमुळे झालेल्या अत्याचाराचे दर्शन घडले, त्याविषयीही लिहिले आहे. जैवतंत्रज्ञानामधल्या या संशोधकाने नावाजलेल्या कंपन्यांत जबाबदारीची पदे भूषविताना, आपल्या अनुभवाच्या चष्म्यातून अभ्यासलेले जीवनातील विविध टप्प्यांतील निरीक्षण आपल्या लेखांमध्ये शब्दबद्ध केले आहे. आर्थिक, राजकीय विषयांवरील त्यांच्या लेखनातून त्यांनी वास्तविकतेचे आकलन केले. ही माहिती भरपूर प्रमाणात देशांतर्गत आणि परदेश प्रवास आणि विविध क्षेत्रांतल्या अनेक स्तरांवरच्या लोकांच्या भेटीगाठी आणि चर्चा, यामधून त्यांना मिळालेली आहे. हे लेख ज्यांच्याभोवती लिहिले गेले आहेत, ते विषय आणि घटना वेगवेगळ्या क्षेत्रांशी संबंधित आहेत. परंतु समोर येत असलेल्या एका सर्वव्यापी स्थित्यंतराचे ते निदर्शक आहेत. या स्थित्यंतरामुळे उद्याच्या औद्योगिक, राजकीय, आणि आपल्या वैयक्तिक जीवनातल्या यशाच्या संकल्पना आणि नियम आमूलाग्र बदलणार आहेत. त्यातूनच उद्याच्या औद्योगिक, राजकीय आणि सामजिक अवकाशाची संरचना आणि आपल्या जगण्याच्या समृद्धतेचं सूत्र सापडणार असल्याचे लेखक सांगतो.

No Records Found
No Records Found
Keywords
BRAND#FACEBOOKCHYA SANVADALA HAVA SAYYAM# BANDAR UDYOGACHYA LATA# BHARTIYA VAHAN UDYOGACHI GHODDAUD# SARKARCHYA HATAT SIGARET# SHEETPEYANCHI TAHAN# CHAINEECHA VYAVHAR# SUNDAR MI HONAR, KODAK FILMCHA ROOL SAMPALA, WEBSERIES- EK KARAMNOOK, BHARTIYA CHITRAPATANCHA NAVA PADADA, IPL, UDHYOGI SHRIMANTI#SHIKHARAPARYANTCHYA VATCHALISATHI# KARANCHA SWARG# UMBARTHTYAVARCHI MAHAGAI# BHRASHTACHARACHE VASTAV# FLY OVER# JAPAN# BHARAT CHIN#ENGLISH BUSINESS #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKMAT 12-05-2019

    आर्थिक आलेखाचा लेखसंग्रह... मागील दोन दशकांत भारतात झालेल्या उदारीकरणाने अतिशय वेगाने आर्थिक आणि सामाजिक बदल घडले. त्याचे पडसाद सामान्य माणसाच्या जीवनावर पडून त्याच्या जीवनशैलीतही फरक पडला. डॉ. गिरीश वालावलकर यांचे ‘सी.ई.ओ.च्या केबिनमधून’ हे पुस्तकनेमके काय बाबींवर भाष्य करत आर्थिक विकासाचे सामान्य माणसांच्या जीवनावरील परिणाम स्पष्ट करते. एवढंच नाही तर बदलत्या परिस्थितीला प्रसन्नतेने स्वीकारून जीवनशैली उंचावण्यासाठी मार्गदर्शनही करते. यातील विविध विषयांवरील लिहिलेल्या एकोणपन्नास लेखांतून खूप माहितीपूर्ण ऐवज खुमासदार शैलीत वाचायला मिळतो. लेखकाने स्वत: नावाजलेल्या कंपन्यामध्ये ‘सीईओ’ पदावर काम केले असल्याने त्याच्या अनुभवी नजरेने न्याहाळलेल्या निरीक्षणांनी पुस्तकाची खोली वाढली आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 03-02-2019

    भौतिक जगताचा लेखाजोखा... आपल्या आसपासचं जग झपाट्याने बदलत आहे. बदलणाऱ्या जगाचा परिणाम माणसांच्या दैनंदिन आयुष्यावरसुद्धा होत आहे. या स्पर्धात्मक जगात अनेक उदयोन्मुख कंपन्या स्वत:चं अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड करत आहेत. कुठलीही परिस्थिती असो या कंपन्यंची वार्षिक उलाढाल काही कोटींच्या घरात असते. आपल्या भोवतालच्या या जगावर डॉक्टर गिरीश वालावलकर यांनी ‘सी.ई.ओ.च्या केबिनमधून या पुस्तकाद्वारे क्ष-किरण टाकला आहे. डॉक्टर गिरीश वालावलकर यांनी मोठमोठ्या कंपन्यांमध्ये उच्च पदावर काम केले आहे. त्यांनी आसपासच्या जगाचं सूचक पद्धतीने निरीक्षण करून त्यासंदर्भात अनेक वर्तमानपत्रांमध्ये लेख लिहिले. ते लेख एकत्रितरीत्या या पुस्तकात समाविष्ट आहेत. या पुस्तकातल्या बऱ्याच गोष्टींचा समावेश आपल्या दैनंदिन जीवनात असतो. परंतु त्यावर सखोल आणि संशोधनात्मक लेखन वाचून आपल्याला या गोष्टींची नव्याने माहिती मिळते. सध्या ऑनलाइन विश्वात धुमाकूळ घालणाऱ्या वेबसीरिजचं विश्व त्यांनी आपल्या लेखातून मांडलं आहे. त्याचबरोबर आजही लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या ‘अमूल’ कंपनीची वाटचाल त्यांनी आपल्या लेखातून स्पष्ट केली आहे. तसेच व्हिडिओ गेम्सची वेगळी दुनिया आणि या क्षेत्रातली व्यावसायिकता त्यांनी उलगडली आहे. त्याचबरोबर ओला, उबरसारख्या टॅक्सी क्षेत्रातल्या कंपनीची व्यवसाय उलाढाल स्पष्ट केली आहे. तसेच हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीचं त्यांनी डोळसपणे निरीक्षण केलं आहे. राजकारणामध्ये असलेला उद्योगसमूहांचा प्रभाव यांनी स्पष्ट केला आहे आणि हिंदुस्थानी ग्राहकांच्या बदलत्या मानसिकतेवर त्यांनी भाष्य केलं आहे. या पुस्तकातील लेख वाचून लेखकांची आसपासच्या जगाकडे पाहण्याची अभ्यासू मनोवृत्ती दिसून येते. लेखकांनी प्रत्येक गोष्टीमधील सूक्ष्म घटकांचा अभ्यास करून त्यावर आपलं मत मांडलं आहे. ही मतं मांडतांना त्यांनी विशिष्ट कंपनीच्या इतिहासाचा संदर्भ घेऊन त्या कंपनीच्या सध्याच्या नफा-तोट्यांवर सोप्या भाषेत आकडेवारीच्या आधाराने लेखन केलेले आहे. त्यामुळे हे लेखन वरवरचं न वाटता या लेखांना एक विश्वासर्हता प्राप्त होते. लेखक स्वत: सी.ई.ओ. म्हणून अनेक वर्षे काम करत असल्याने कामानिमित्त त्यांनी अनेक देशांना भेटी दिल्या. त्यामुळे या अनुभवांचा आणि कामाचा पूरेपूर वापर त्यांनी आपल्या लेखांमधून केलेला आहे. त्यांनी अनेक बाबतीत मांडलेली मते विचार करण्यास भाग पाडतात. एका गोष्टीचा अनेक अंगांनी आणि विविध बाजूंनी त्यांनी विचार केला आहे. सारस्वत बँकेचे चेअरमन गौतम ठाकूर यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे. तसेच प्रसिद्ध उद्योजक डॉक्टर विठ्ठल कामत यांचे शुभाशीर्वाद या पुस्तकाला मिळाले आहेत. आपण रोज जगत असलेल्या जगातील अनेक अज्ञात गोष्टी या पुस्तकामुळे कळून येतात. त्यामुळे ज्यांना या व्यावसायिक क्षेत्रात स्वत:चं अस्तित्व निर्माण करायचं आहे त्यांनी हे पुस्तक आवर्जून संग्रही बाळगण्यासारखं आहे. – देवेंद्र जाधव ...Read more

  • Rating StarVinay V Nandurdikar

    आज वाचून पूर्ण...या पुस्तकामुळे निश्चितच महत्त्वाच्या विषयांची ओळख होते, विषयाचे महत्त्व आणि गांभीर्य लक्षात येते.

  • Rating Starलोकप्रभा, 30 मार्च २०१८

    ‘सी.ई.ओ.च्या केबिनमधून’ या डॉ. गिरीश वालावलकर लिखित पुस्तकातून कॉर्पोरेट जगाची एक वेगळी झलक पाहायला मिळते. एकूण ४३ प्रकरणे असणाऱ्या या पुस्तकात आपल्या आजूबाजूला घडणारे आर्थिक बदल, त्यातून निर्माण होणाऱ्या विकासाच्या संधी आणि त्याचे देशातल्या प्रत्येकस्तरातल्या नागरिकांच्या जीवनशैलीवर होणारे परिणाम याचे ओघवत्या भाषेत वर्णन करण्यात आले आहे. लेखकाला अनेक बहुराष्ट्रीय कंपन्याच्या सी.ई.ओ. आणि संचालक पदांवर काम करण्याचा अनुभव असल्याने हे पुस्तक अतिशय अभ्यासपूर्ण झालंय. पुस्तकातल्या लेखांच्या विषयांमध्ये वैविध्य आहे. ‘उद्योगी श्रीमंती’ या लेखाची स्वतःची नीतिमूल्यं जपूनसुद्धा संपत्ती कमावता येते, हे विविध उद्योगपती आणि त्यांनी आपली औद्योगिक साम्राज्ये उभी करण्यासाठी वापरलेले मार्ग यांची उदाहरणे देऊन विशद केलं आहे. ‘स्विस बँकांची वादग्रस्त व्यावसायिकता’ या लेखात स्विस बँकांची व्यवसाय करण्याची पद्धती आणि त्यांच्या ग्राहकांचं जगभर पसरलेलं जाळं याविषयी सविस्तर चर्चा केली आहे. ‘इंग्लिश बिझनेस’ या लेखामध्ये ब्रिटिश लोकांच्या मानसिकतेवर प्रकाशझोत टाकला आहे. आज आपल्या देशात अनेक संधी उपलब्ध होत आहेत. आपल्या तरुणांजवळ एखादी नवी कल्पना असेल आणि प्रामाणिकपणे कष्ट करण्याची तयारी असेल, तर ते शेकडो कोटी रुपयांची उलाढाल करणारी कंपनी उभी करू शकतात हे ‘नावीन्यपूर्ण कल्पनेवर आधारलेली उद्योजकता’ या लेखात व्हाट्सअ‍ॅप आणि फेसबुकचे उदाहरण देऊन लेखकाने स्पष्ट केले आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात सर्वोच्च पदापर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्या प्रकारची मानसिकता जोपासावी लागते, त्याचा उहापोह ‘शिखरापर्यंतच्या वाटचालीसाठी’ या लेखात केले आहे. लेखक सांगलीसारख्या एकेकाळच्या छोट्या गावातून आलेले आहेत. त्यांना स्वतःला शाळेत जाण्यासाठी तीन किलोमीटरची पायपीट करायला लागायची. आज शेकडो कोटी बाजारमूल्य असणाऱ्या वंâपन्यांच्या सी.ई.ओ. आणि संचालकसारख्या मोठ्या पदापर्यंत पोहोचलेल्या लेखकाला मोठ्या कष्टाने मोठे होणे म्हणजे काय असते हे चांगले माहित आहे. हे पुस्तक लेखकाला असणारे फक्त आर्थिक भान दाखवते का? तर नाही. त्यांच्या सामाजिक जाणिवासुद्धा प्रचंड जागरूक असल्याचा प्रत्यय पुस्तक वाचताना येतो. याचे एक उदाहरण येथे देता येईल. ‘उंबऱ्यावरची महागाई’ या प्रकरणात कराडला काही दिवस राहात असताना त्यांच्या घराजवळच्या वस्तीतल्या माथाडी कामगारांशी त्यांची बNयांपैकी ओळख झाली. आपली कुटुंबे खेड्यात सोडून रोजीरोटीसाठी ते कराडमध्ये येऊन राहिले होते. हे कामगार एका तात्पुरत्या उभारलेल्या ताडपत्रीच्या हॉटेलात रात्री जेवायला जायचे. महागाईमुळे हॉटेल मालकाने दर वाढवल्याने त्या कामगारांवर झुणका भाकर खाण्याऐवजी फक्त भाकर मिर्ची खाण्याची वेळ आली. कधी कधी तर त्यांना अर्धपोटीही झोपावे लागायचे. सामान्य माणसावर होणारे महागाईचे परिणाम विशद करताना दिलेले माथाडी कामगारांचे वास्तवादी उदाहरण हे लेखकाचे आर्थिक बाबींवरचे विवेचन उथळ नसून देश आणि नागरिक त्याच्या केंद्रस्थानी असल्याचे दिसून येते. ‘चित्राच्या व्यापाराचे रंग’ या लेखामध्ये आपण केवळ एक कलाकृती म्हणून पाहात असलेल्या पेटिंग्जमागे किती सखोल व्यावसायिक आराखडे असतात ते उत्तम रीतीने समजावून सांगितलं आहे. जर्मनीमध्ये पहिल्यांदा गेल्यावर लेखक ज्या टॅक्सीत बसतात ती ‘मर्सिडीस बेन्झ’ असते. टॅक्सीचा ड्रायव्हर सांगतो की, जर्मनीमध्ये ‘मर्सिडीझ बेन्झ’ ही दुय्यम दर्जाची गाडी समजली जाते आणि ती टॅक्सी म्हणून वापरली जाते. भारतात अति श्रीमंतांची गाडी म्हणून मान्यता असलेल्या ‘मर्सिडीझ बेन्झ’बद्दलच, ती गाडी जिथे बनते त्या देशातीलच हे स्थानिक मत’ लेखकाप्रमाणेच आपल्यालासुद्धा आश्चर्याचा धक्का देऊन जातं. ‘उद्योग जगतात काटकसर हा फार महत्त्वाचा गुण मानला जातो. कष्ट करून श्रीमंत झालेली माणसं ही कधी अनाठायी खर्च करत नाहीत आणि जी करतात ती श्रीमंत राहात नाहीत. हा अतिशय महत्त्वाचा संदेश ‘उद्योगी श्रीमंती’ या प्रकरणात लेखक देऊन जातात. फक्त कॉर्पोरेट क्षेत्र विंâवा व्यवस्थापकीय शिक्षण घेणाऱ्या विद्याथ्र्यांनीच नाही तर अगदी सामान्य माणसानेही वाचावे आणि त्याला सहजगत्या समजावे असे हे पुस्तक आहे. आज आपल्याभोवतीचे जग विलक्षण वेगाने बदलते आहे. या बदलत्या जगाची गती समजून घेऊन स्वतःची उन्नती करून घेण्यासाठी हे पुस्तक प्रेरणा देते. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या आर्थिक बदलांचे परिणामकारकपणे विवेचन करणाऱ्या पुस्तकाची मराठी साहित्यात असलेली कमतरता डॉ. गिरीश वालावलकर लिखित ‘सी.ई.ओ.च्या केबिनमधून हे पुस्तक नक्कीच भरून काढते. लेखकाची भाषाशैली साधी आणि सरळ आहे. त्यामुळे ती थेट मनाला भिडते. स्वतःचे काही अनुभव लेखकाने मिश्किल आणि मनोरंजक शब्दात सांगितेले आहेत. ते वाचताना वाचकाला खेळकर प्रसन्नता जाणवत राहते. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more