* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CHAI, CHAI : TRAVELS IN PLACES WHERE YOU STOP BUT NEVER GET OFF
  • Availability : Available
  • Translators : POORNIMA KUNDETKAR
  • ISBN : 9788184982909
  • Edition : 1
  • Publishing Year : OCTOBER 2011
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 172
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : MEMOIR
Quantity
Buying Options:
  • Print Books:
SOME YEARS AGO, A JOURNALIST EXPERIENCED SOMETHING OF AN EPIPHANIC MOMENT. BISHWANATH GHOSH HAD ALIGHTED ...FROM HIS TRAIN AT ITARSI STATION IN MADHYA PRADESH - TO STRETCH HIS LEGS AND GRAB A CUP OF TEA - BEFORE HE RESUMED HIS JOURNEY WHICH HAD BEGUN AT KANPUR AND WOULD END IN MADRAS. IT OCCURRED TO HIM, THEN, THAT MILLIONS OF PASSENGERS HAD KILLED PROBABLY BILLIONS OF HOURS AT RAILWAY JUNCTIONS SUCH AS ITARSI IN ORDER TO TAKE THE CONNECTING TRAIN TO THEIR DESTINATIONS. BUT NO ONE BOTHERED TO WONDER ABOUT WHAT LAY BEYOND THE PLATFORM. AND SO, GHOSH RESOLUTELY ROAMED THE TOWNS BEYOND THE STATION YARD — TOWNS SUCH AS MUGHAL SARAI, JHANSI, ITARSI, GUNTAKAL, JOLARPETTAI, ARAKKONAM AND SHORANUR — TO DISCOVER THE LIVES OF PEOPLE WHO MAY HAVE GROWN INURED TO THE CONSTANT WHISTLE OF PASSING TRAINS. IN CHAI, CHAI: TRAVELS IN PLACES WHERE YOU STOP BUT NEVER GET OFF BISHWANATH GHOSH COMBINES DESCRIPTIVE SKILLS WITH PERSONAL HISTORY AND HUMOUR TO BRILLIANTLY ILLUMINATE THESE OTHERWISE OBSCURE SMALL TOWNS – TOWNS THAT DENOTE THE REAL INDIA.
काही वर्षांपूर्वी एका पत्रकाराने काही वेगळेच क्षण अनुभवले होते.कानपूर ते मद्रास प्रवासादरम्यान इटारसी स्थानकावर विश्वनाथ घोष पाय मोकळे करायला आणि एक कप चहा प्यायला उतरले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, लाखो प्रवासी त्यांच्या मुक्कामाकडे जाणारी पुढची गाडी येण्यापूर्वी इटारसीसारख्या जंक्शनवर कदाचित करोडो तासांचा वेळ घालवत असतील. पण स्थानकापलीकडचे शहर कसे आहे हे शोधण्याची कधी कोणी तसदी घेत नाही. लेखक म्हणतो, ``भारतातील रेल्वे स्थानके ही शहरांना आणि गावांना जोडणा-या प्रदेशातील उत्कंठावर्धक अशी स्वतंत्र राज्ये आहेत. ती स्थानिक जीवनाच्या स्वादापासून पूर्णपणे भिन्न असतात. जणू दिल्लीतील एकाच अधिकाऱ्याच्या अखत्यारीतील तो एक वेगळाच प्रदेश असतो, रेल्वेच्या शिट्ट्यांच्या सहवासात लहानाचे मोठे झालेले लोक आणि त्यांचे जीवन याबद्दल जाणून घेण्यासाठी घोष मुद्दाम ह्या शहरांमध्ये फिरले. इटारसी, मुघलसराई, अरक्कोनम, जोलारपेटाई, झाशी, शोरानूर आणि गुंटाकल अशा विविध उत्कंठावर्धक नावांच्या शहरांमधून त्यांनी केलेला हा प्रवास....!``
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #CHAICHAI #CHAICHAI:TRAVELSINPLACESWHEREYOUSTOPBUTNEVERGETOFF #चायचाय #MEMOIR #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #POORNIMAKUNDETKAR BISHWANATH GHOSH "
Customer Reviews
  • Rating Starसाप्ताहिक सकाळ ६-२-२०२१

    अनोखा प्रवास दोन वस्तूंना एकत्र बांधण्यासाठी जशी गाठ बांधलेली असते. तशी दोन रेल्वे मार्गांना गाठीने एकत्र बांधून ठेवायची जागा म्हणजे रेल्वे जंक्शन. भारतासारख्या खंडप्राय देशात मोठ्या शहरांना रेल्वेने जोडायचे काम या रेल्वे जंक्शनरूपी गाठी करतात. रल्वे जंक्शनच्या बाहेर पडून त्या गावाचे दर्शन घडवणारे `Chai, Chai` हे विश्वनाथ घोष यांचे पुस्तक. पुस्तकाच्या मुखपृष्ठावरून चहाने भरलेल्या मातीच्या कुल्लडचे चित्र व रेल्वेरुळांचा फोटो पुस्तकांबद्दल खूप काही सांगतो. लेखक विश्वनाथ घोष यांनी या पुस्तकात उत्तरेतल्या मुघलसराई, झाशी व मध्य भारतातल्या इटारसीबद्दल, तर दक्षिणेतल्या गुंटकल, अरक्कोणम व जोलरपेट आणि शोरणूर या ठिकाणांबद्दल लिहिले आहे. मुघलसराई म्हटले कि डोळयांसमोर येते आशिया खंडातील सर्वात मोठे रेल्वे यार्ड किंवा बनारसला जाण्यासाठी उतरायचे ठिकाण पण स्टेशनबाहेरचे मुघलसराई विश्वनाथ घोष आपल्याला या पुस्तकातून दाखवतात.मुघलसराई स्टेशन जेवढे मोठे तेवढेच गाव मात्र लहान. मुघलसराई हे भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे जन्म ठिकाण लेखक विश्वनाथ घोष त्या रेल्वे कॉलनीतील शास्त्रीजींचे जन्मस्थान व त्यांची शाळा बघून येतात. या व्यतिरिक्त स्थानिक लोकांशी बोलताना लेखकाला मुघलसराई स्टेशनचे नामांतर `पंडित दीनदयाळ उपाध्याय` कसे झाले याचीही माहिती मिळते. पुस्तकाच्या पुढच्या प्रकरणात विश्वनाथ घोष आपल्याला घेऊन जातात झाशीला. ऐतिहासीक दृष्टया झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंमुळे झाशीला विशेष महत्व आहे. पण या झाशीचे आणखीन एक वैशिष्ट्य विश्वनाथ घोष लिहितात, ते म्हणजे झाशीमधला एलिट चौराहा (चौक). त्या चौकाला त्याचे नाव कसे मिळाले आणि चौकाची वैशिष्ट्ये पुस्तकामध्ये वाचायला मिळतात. झाशीजवळील ओरछा येथील जहांगीर महाल बघून विश्वनाथ घोष जातात जगप्रसिद्ध खजुराहो व ओरछा हे मध्यप्रदेशात, तर झाशी उत्तरप्रदेशात आहे. भारताच्या नाभी स्थानी असलेले जंक्शनचे ठिकाण म्हणजे इटारसी. उत्तर भारताला दक्षिण भारतापासून वेगळे करणारी विंध्य पर्वतरांग ओलांडून होशंगाबाद या जिल्ह्याच्या ठिकाणचा थांबा घेऊन गाडी पोहोचते इटारसीला. इटारसीतून फिरताना विश्वनाथ घोष यांना एखाद्या रेल्वे जंक्शनमुळे गावात चालणारे अर्थकारण समजते. आंध्रप्रदेशातील गुंटकल हे पश्चिम भारत व दक्षिण भारताला जोडणारे जंक्शन. मुंबईहून चेन्नई , बेंगरूळला जाणाऱ्या गाड्यांसाठी गुंटकल हे महत्वाचे जंक्शन. गुंटकल गावात एक स्थानिक रिक्षावाला त्यांना गुंटकलजवळच्या सैद मस्तान अली बाबा दर्ग्यात घेऊन जातो. या दर्ग्यात आलेल्या लोकांशी बोलताना त्यांना गुंटकलबद्दल आणखीनच माहिती मिळते. यानंतर विश्वनाथ घोष आपल्याला घेऊन जातात तामिळनाडूतल्या अरक्कोणम व जोलारपेट या रेल्वे जंक्शन असलेल्या गावांमध्ये. अरक्कोणम हे स्वतःची ओळख नसलेले ठिकाण. चेन्नईचे उपनगर असलेले, रेल्वेच्या दृष्टीने महत्वाचे. विश्वनाथ घोष जेव्हा अरक्कोणम स्टेशनच्या बाहेर पडतात, तेव्हा इथे रेल्वेस्टेशन शिवाय दुसरे बघण्यासारखे काहीच नाही हे त्यांच्या लक्षात येते. अधिक चौकशी केल्यावर त्यांना समजते कि अरक्कोणमला एक नाविक तळ आहे व या तळावरची विमानाची धावपट्टी हि जगातील सर्वात मोठी आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीत होणाऱ्या संचलनात प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी विमान याच धावपट्टीवरून आकाशात झेपावतात. जोलारपेट हे चेन्नई व बेंगरूळ या रेल्वे मार्गावरचे मध्यावरचे जंक्शनचे ठिकाण. कर्नाटक व दक्षिण तामिळनाडूत जाणाऱ्या गाड्यांसाठी हे महत्वाचे जंक्शनचे ठिकाण. आर के नारायण यांच्या `मालगुडी डेज` मधल्या एका कथेत जोलारपेट जंक्शनचा उल्लेख येतो. जोलारपेट गावाजवळ रेल्वे स्टेशन व्यतिरिक्त बघण्याचे आणखीन एक ठिकाण म्हणजे `येलागिरी` हिल स्टेशन. येलागिरीची तुलना उटी किंवा कोडाईकॅनॉलशी होऊ शकत नाही. कारण तेवढी या हिल स्टेशनची `उंची` च नाही. रेल्वेच्या दृष्टीने जोलारपेट जंक्शनचे महत्व म्हणजे सालेम, चेन्नई व बेगरूळ या तीन विभागांना एकत्र आणणारे हे ठिकाण. या ठिकाणी रेल्वेचा चालकदल बदलतो. पुस्तकाच्या शेवटाकडे आपण पोहोचतो केरळातल्या शोरणुर जंक्शनला. केरळहून मुंबईला जाणाऱ्या गाड्यांसाठी हे जंक्शनचे ठिकाण. एकेकाळचे केरळचे मुघलसराई जणू काही. स्वांतत्र्य पूर्व काळात साऊथ इंडियन रेल्वे कंपनीने मद्रास व मँगलोर दरम्यान लांब पल्ल्याच्या गाड्या सुरु करेपर्यंत शोरणुरला फारसे महत्व नव्हते. मद्रास (आता चेन्नई) ते मँगलोर (आता मंगरुळ ) दरम्यान रेल्वेसेवा सुरु झाल्यावर कोचीच्या राजाने साऊथ इंडिया रेल्वे कंपनीला विनंती करून हि रेल्वे कोचीपर्यंत नेली व शोरणुर स्टेशनला महत्व आले. शोरणुर हे गाव केरळची गंगा समजल्या जाणाऱ्या `भारतपूझा` नदीच्या काठावर वसले आहे. भारतपूझा नदीच्या पलीकडे १९३० साली मल्याळी भाषेतील कवी वल्लाथोल नारायण मेनन यांनी स्थापन केलेल्या `केरळ कलामंडलम` या प्रायोगिक कला केंद्राला विश्वनाथ घोष भेट देतात. मुघलसराई पासून शोरणुरपर्यंतचा प्रवास विश्वनाथ घोष यांनी रेल्वे जंक्शन बाहेरचे गाव बघणे या उद्देशाने केलेला, पण शोरणुर ते नीलांबुर हा रेल्वे प्रवास मात्र प्रवासाचा अनुभव घेण्यासाठी केला. हिरव्या कांच झाडांमधून वाट काढणारा रेल्वे मार्ग, आजूबाजूला उंचच उंच सागवानी झाडे. एखाद्याच प्रवाशाची चढउतार असेल अशी छोटी छोटी स्टेशने. असा दोन तासाचा प्रवास करत गाडी पोहोचते.नीलांबुर या शेवटच्या स्टेशनला. स्टेशनवर उतरल्यावर जवळपास कुठलेही गाव असेल अशी शक्यताही वाटणार नाही एवढ्या दाट जंगलातले हे स्टेशन. याच गाडीने विश्वनाथ घोष शोरणुरपर्यंतचा परतीचा प्रवास करतात. `चाय चाय` या पुस्तकाचा प्रवास खरे तर इथेच संपतो. पण वाचकाच्या मानत या जंक्शन बद्दल उत्सुकता निर्माण करून एका नवीन प्रवासाची सुरुवात होते एवढे मात्र नक्की. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more