* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CHAKACHI KHURCHI
  • Availability : Available
  • ISBN : 9788177661798
  • Edition : 11
  • Publishing Year : SEPTEMBER 2001
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 248
  • Language : MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SHE WAS A GIRL OF 14 MAY BE 15 YEARS, LIKE ALL OTHERS OF HER AGE, BUSY IN PLAYING, DANCING AROUND, ENJOYING HER LIFE, FULL OF JOY AND ENTHUSIASM. ONE DAY, WITHOUT ANY SIGNAL, FALLS SICK WITH THE BACK PAIN AND IS STUCK TO THE WHEEL CHAIR AS A PARAPLEGIC PATIENT. IN THE BEGINNING, HER LIFE IS SHATTERED, BUT EVENTUALLY, SHE DECIDES TO OVERCOME HER ILLNESS, SHE EMERGES THROUGH IT AS A NEW PERSONALITY, NASIMA HURJUK. SHE IS A LADY WITH A VERY SENSITIVE MIND. TODAY, SHE AIMS ONLY AT THE BETTERMENT OF THE DISABLED. SHE TAKES CARE OF THE DISABLED; SHE GIVES THEM AFFECTION, HELPS TO MAKE LIFE TOLERABLE FOR THEM, MAKES THEM INDEPENDENT, AND AWAKES THEIR SELF-RESPECT. SHE SEES DREAMS, SHE HAS VISIONS BUT SHE DOES NOT FORGET THE FACTS OF LIFE. SHE PURSUES HER DREAMS WITH THE HELP OF HER WHEEL CHAIR. `HELPERS OF THE HANDICAPPED, KOLHAPUR`, IS THE INSTITUTION SHE HAS ESTABLISHED. IT COVERS MANY AREAS LIKE HOSTELS, TRAINING CENTERS, GAS AGENCY. TODAY, THE SPHERE OF HER ACTIVITIES IS INCREASING. SHE HAS BEEN FELICITATED BY MANY AWARDS; ONE IS THE `FI FOUNDATION`. THIS IS THE AUTOBIOGRAPHY OF A VERY STUBBORN LADY IN A NARRATIVE WAY AND IS FULL OF HONEST WORDS HAVING THE ABILITY TO PRESENT THE CLEAR PICTURE IN FRONT OF OUR MINDS.
वयाच्या चौदाव्या-पंधराव्या वर्षांपर्यंत नाचणारी-बागडणारी-उत्साहानं सळसळणारी एक मुलगी... अचानक पाठीच्या दुखण्यानं अंथरुणाला खिळते आणि पॅराप्लेजिक होऊन चाकाच्या खुर्चीवर जाऊन बसते...! सुरुवातीला अंतर्बाह्य उन्मळून पडते, पण नंतर त्यातूनच जन्माला येतं एक नवं व्यक्तिमत्त्व. नसीमा हुरजूक.अपंगांसाठी झटणारी एक संवेदनशील स्त्री. अपंगांना सहकार्याचा हात पुढे करणं, त्यांना जीवन सुसह्य करून देणं, स्वत:च्या पायावर उभं करणं, त्यांच्यात आत्मप्रतिष्ठेची भावना जागवणं, हेच त्यांच्या आयुष्याचं ध्येय आहे. वास्तवाचं उचित भान ठेवून त्या स्वप्नं बघतात आणि मग ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी बेभानपणे धावतात, आपल्या चाकाच्या खुर्चीतून... ‘हेल्पर्स ऑफ दि हॅण्डिकॅप्ड, कोल्हापूर’ ही संस्था, वसतिगृहं, प्रशिक्षण केंद्रं, गॅस एजन्सी... त्यांच्या कार्याचा व्याप झपाट्यानं वाढतो आहे. ‘फाय फाउंंडेशन’सारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या, प्रचंड जिद्दीच्या स्त्रीचं हे आत्मकथन. ओघवत्या शैलीतलं, निखळ प्रामाणिक, चित्रदर्शी, काळजाला भिडणारं...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
Customer Reviews
  • Rating StarAvinash Jadhav

    संघर्ष म्हणजे काय हे जाणून घ्यायचे असेल तर हे आत्मचरित्र जरूर वाचावे, प्रत्येक प्रसंग विचार करायला भाग पाडतो आपल्याला... गेल्या काही दिवसांपूर्वी वाचनासाठी एक आत्मचरित्र पर पुस्तक घेतलं. अतिशय थक्क करणारी कहाणी आपल्याला अपंगत्व आले पाहून न थकणारी, आजाराला जुमाणणारी ध्येय गाठण्यासाठी येईल त्या प्रसंगावर मात करणारी एक "स्त्री" आहे. यावर विश्वास बसणे कठीण आहे. हॉस्पिटलमध्ये आजार पणात आपल्या कमरे खाली मुंग्याचं थारोळ झालं आहे, हे कळल्यावर किती तो जीव कासावीस झाला असे, ते वाचूनच अंगावर शहारे आले. अपंगत्वासाठी अनेक प्रवास दौरे मान्यवरांच्या भेटी असे अनेक प्रसंग आणि त्यातील वर्ण हे अचंबित करतात. आपल्याला आलेल्या अपंगत्ववर मात करून दुसऱ्यासाठी जगणारी ती दुसरी "मदर तेरेसा" आहे हे म्हटलेलं सुध्दा वावग नाही. अपंग संस्थे मार्फत अनेकांना त्याच्या स्वाभिमानच आयुष्य जगता यावे आणि त्यांना धौर्य,चिकाटी, प्रेरणा मिळावी. आशा अनेक गोष्टींची उकल नेहमी बाळगून आहे. आशा अनेक अपंगांची "आई" एक "स्त्री" खूप साध्या व सोप्या भाषेत अनेक गोष्टी शिवून बळ देण्याचं काम करते. प्रत्येकाला आपल्या चाकाच्या खुर्चीतुन जग दाखवण्याचं काम करणाऱ्या स्वतःला अभिमानन जगायला लावणाऱ्या या चाकाच्या खुर्ची तुन एक नवीन उमेद,चिकाटी,बळ,प्रेरणा देणार आत्मचरित्र नसून "नवसंजीवनी" देणारं अमृत प्यालाच आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 16-09-2001

    वयाच्या चौदाव्या-पंधराव्या वर्षांपर्यंत नाचणारी, बागडणारी, उत्साहानं सळसळणारी एक मुलगी... अचानक पाठीच्या दुखण्यानं अंथरुणाला खिळते आणि पॅराप्लेजिक होऊन चाकाच्या खुर्चीवर जाऊन बसते!... सुरुवातीला अंतर्बाह्य उन्मळून पडते; पण नंतर त्यातूनच जन्माला येतंएक नवं व्यक्तिमत्त्व, नसीमा हुरजूक. अपंगांसाठी झटणारी एक संवेदनशील स्त्री. अपंगांना सहकार्याचा हात पुढे करणं, त्यांना जीवन सुसह्य करून देणं, स्वत:च्या पायावर उभं करणं, त्यांच्यात आत्मप्रतिष्ठेची भावना जागवणं, हेच त्यांच्या आयुष्याचं ध्येय आहे. ‘हेल्पर्स ऑफ दि हँडिकॅप्ड, कोल्हापूर’ ही संस्था वसतिगृह, प्रशिक्षण केंद्र, गॅस एजन्सी... त्यांच्या कार्याचा व्याप झपाट्यानं वाढतो आहे. ‘फाय फाऊंडेशन’सारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या, प्रचंड जिद्दीच्या स्त्रीचं हे आत्मकथन. ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 11-08-2002

    धीरोदात्त अपंग स्त्रीची कहाणी... कोल्हापूरच्या अपंग लेखिका नसीमा हुरजूक यांचे हे आत्मकथन. अपंगांनी लिहिलेली आत्मकथनं तसंच कार्य करणाऱ्यांना खूप उपयोगी पडतात. १९९९ मध्ये नसीमाने ‘चाकाची खुर्ची’ हे सदर कोल्हापूर ‘सकाळ’साठी लिहिलं. त्याचंच हे पुस्तकरूप नसीमा जन्मापासून अपंग नाही. वयाच्या सोळाव्या वर्षांपर्यंत चांगली उंडारत होती. नृत्यात भाग घेत होती. खेळांमध्ये भाग घेत होती. अभ्यासात उत्तम, घरात भाऊ-बहिणी, आईवडील अशा कुटुंबात रंगलेली. पण अचानक पाठीत दुखू लागलं. दुखण्याचं मूळ स्पाईनल कॉर्ड्समध्ये होतं. ती कुणालाच दोष देत नाही, पण म्हणते, योग्य वेळी, योग्य निदान व योग्य उपचार झाले असते तर आज मी खेळाच्या वा नृत्याच्या क्षेत्रात असते; पण ते नाही झालं. कमरेखाली सर्व अंग लुळं पडलं आणि संवेदनाच नाहीशा झाल्या. तरीही न हरता देशात-परदेशात प्रवास केला. अपंगाच्या स्पर्धेत भाग घेतला. बक्षिसं मिळवली. अपंगांसाठी संस्था स्थापन केली, पण कुंपणानंच शेत खाल्लं. अपंग संस्थेचे पैसे येथे काम करणाऱ्यांनी खाल्ले. त्यांची साधनेसुद्धा विकली नि पैसे खाल्ले. पण न डगमगता ‘हेल्पर्स ऑफ दि हँडिकॅप्ड कोल्हापूर’ ही संस्था स्थापन केली. आज ही संस्था जोरात काम करत आहे. राजीव गांधी, मनोहर जोशी, मोरारजी देसाई या थोरामोठ्यांनी ही संस्था बघितली आणि मदत केली. हे पुस्तक लिहिताना पुन्हा प्रत्ययाचा आनंद तर राहू द्याच, पण दु:खच कारंजासारखं उडत होतं. नसीमाच्या दुखण्याचं नाव पॅराप्लेजिक असं आहे. सतत मदतनीस जवळ असावा लागतो. तिच्या संस्थेसाठी तिचे बहीण-भाऊ, बहिणींचे यजमान व भावांच्या बायका आजही कार्यरत आहेत. सारे घरच काम समजून करतात. एकदा लंडनमध्ये ती तिच्या मदतनीस बाईबरोबर गेली होती. तर ती मदतनीस नसीमाला एकटं टाकून मौजमजा करायला निघून गेली. नसीमाचे तिच्याशिवाय खूप हाल झाले. मदतनीसाशिवाय या माणसांना जगणं अशक्य असतं. पण हीच माणसं माणूसपण अधिक जपतात. जागोजागी याची उदाहरणे आहेत. तिच्या वडिलांनाच त्याच्या हाताखालच्या माणसाने मारलं, पोस्टमार्टम करू दिलं नाही, पण तिची आई म्हणाली, ‘केलं सर्व, कोर्टात गेलो, जिंकलो, तरी तुमचे बाबा येणार का परत? त्या माणसाचं मन आयुष्यभर त्याला स्वस्थ आयुष्य जगू देणार नाही, हीच मोठी शिक्षा नाही का?’ चाकाच्या खुर्चीत बसलेल्या मुलीला पंख फुटले आहेत, आणि ती आनंदाने उडू पाहते आहे, असं मुखपृष्ठावरचं चित्रच नसीमाची विजय कहाणी सांगून जातं. चित्राखाली सुंदर वाक्य आहे, ‘For us too the sky is the limit.’ संस्थेतले अपंग, त्यांच्या व्यथा नि कथा, पैसे मिळवण्यासाठी केलेली धडपड, कधी आलेले अपेक्षाभंगाचे दु:ख, तर कधी अचानक कुणी केलेली मदत यांनी पुस्तकाचा उत्तरार्ध व्यापला आहे. ही कहाणी आहे एका धीरोदत्त अपंग स्त्रीची. शब्दांचे फापटपसारे नाहीत. साधी, सोपी, सरळ भाषा म्हणूनच अंत:करणाला भिडते. आपण अशी पुस्तके वाचली तर आपल्यावरही नि:संशय काही उत्तम संस्कार आपोआप होतात. -प्रभा जोग ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 11-03-2006

    शारीरिक सक्षमतेपेक्षा मन:शक्ती... मनाची उभारी कित्येक पटीनं बलशाली असते. एकवेळ शरीर थकेल, पण मनानं जर उभारी धरली असेल तर शरीरही मनाला आपोआप साथ देईल. याचा प्रत्यत नसीमा हुरजूक यांचं ‘चाकाची खुर्ची’ हे आत्मचरित्र वाचताना येतो. गेली अनेक वर्षें चाकाच्ा खुर्चीला जखडलेल्या नसीमा दीदींची भरारी थक्क करणारी आहे. अपंग म्हणजे दुसऱ्याच्या दयेवर जगणारी ‘बिच्चारी’ व्यक्ती हे आपण गृहितच धरतो. पण इथे नसीमा दीदींच्या कार्यासमोर बाकीचा सगळा शरीराने सक्षम असणारा समाज ‘बिच्चारा’ वाटतो. त्या समाजातले असे अनेक घटक आहेत ज्यांनी त्यांच्या कार्यात अडथळे आणले, त्यांची हेटाळणी केली ते तर अगदी कीव करण्याइतके ‘बिच्चारे’ वाटतात. आपल्या चाकांच्या पायांनी यशोशिखरापर्यंत पोहोचणाऱ्या नसीमा दीदी जन्मापासून अपंग नव्हत्या. त्यांनी मुक्त बालपण, हुंदडणं, खेळणं सगळं अनुभवलंय. वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत त्या अगदी तुमच्या-आमच्यासारख्या धडधाकट होत्या. आता इतकी वर्षं सक्षम आयुष्य जगल्यानंतर पुढे आलेल्या आजारपणाला तोंड देणं हे कमनशीब की निदान इतकी वर्षं तरी सक्षम आयुष्य जगायला मिळालं हे नशीब! हे ज्याच्या त्याच्या मानण्यावर आहे. वयाच्या सोळाव्या वर्षी पाठीच्या दुखण्याचा इलाज करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट झाल्या आणि अचानक कमरेखालील भागाचे चैतन्यच हरवून बसल्या. खेळ आणि नृत्यात कायम आघाडीवर असणाऱ्या नसीमा दीदींचे पाय त्यांची साथ सोडून गेले आणि त्यांचं संपूर्ण आयुष्यच अंधकारमय झालं. पुढे काय? हा भीषण प्रश्न त्यांच्यासमोर होता. त्या प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळाले ते बाबूकाकांच्या रूपानं. त्यांच्याचसारखे बाबूकाकाही शरीरानं पॅराप्लेजिक होते, तरी त्यांचा उत्साह, त्यांच्यातील चैतन्य अनन्यसाधारण होते. त्यांना बघूनच नसीमा दीदींच्या मनानं उभारी धरली. आणि अपंगांना मदत करण्याची नवी दिशा त्यांना गवसली. या त्यांच्या कार्यात त्यांचे आई-वडील बहिणी-भाऊ या सगळ्यांची तर त्यांना कायम साथ मिळालीच. याशिवाय समाजातील इतर अनेकांचीही साथ मिळाली. या चांगल्या लोकांबरोबरच अनेक वाईट लोकही त्यांच्या मार्गात आले. चांगल्यांनी जर त्यांना आधार दिला असेल तर वाईट प्रवृत्तींनी त्यांना मानसिक खंबीरता दिली. समोर आल्या प्रसंगाला कणखरपणे समोर जाऊन ध्येयापर्यंत पोहोचायला शिकवलं. मग कोणी त्यांन असं रडत आयुष्य काढण्यापेक्षा आत्महत्या करण्याचा सल्ला दिला. प्रमोदसारखी स्वत:ची गरज संपली की, संस्थेकडे पाठ फिरवणारी स्वार्थी, मतलबी लोकं तर त्यांना असंख्य भेटली. माधवासारखा संस्थेच्या पैशावर चैन करणारा मुलगा भेटला. या सगळ्यांना मागे टाकत त्या पुढे जात राहिल्या. त्यांच्या ‘हेल्पर्स ऑफ दी हँडिकॅप्ड’ संस्थेने अनेकांना आधार दिला. जगण्याचं बळ दिलं. या आनंदासमोर ते चार वाईट अनुभव त्यांनी खिजगणतीतही धरू नयेत इतके ‘शुल्लक’ होते. अनेक अपंगांचे त्यांनी अनुभव सांगितले आहेत. त्यातला शैलेंद्र जोशींचा अनुभव तर चटका लावण्यासारखा आहे. अतिशय बुद्धिमान, कर्तृत्ववान माणूस डॉक्टरांच्या एका चुकीमुळे त्या माणसाचं सगळं आयुष्य बरबाद झालं. तीन-चार महिन्यांच्या कोमानंतर जेव्हा ते शुद्धीवर आले तेव्हा त्याचं सगळं हिरावून घेतलं गेलं होतं. अगदी स्मरणशक्तीसुद्धा! अशा माणसाला आपलं जग निर्माण करण्यासाठी नसीमा दीदींनी मदतीचा हात दिला... हेच त्यांचं स्वप्न आहे, त्यांच्या जगण्याचं ध्येय आहे... अपंग आणि सुदृढांनी एकमेकांच्या मदतीनं आयुष्यात, समाजात उभं राहावं ही त्यांची इच्छा आहे. -गायत्री ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more