* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CHEAPER BY THE DOZEN
  • Availability : Available
  • Translators : MANGALA NIGUDKAR
  • ISBN : 9788177663334
  • Edition : 15
  • Publishing Year : MARCH 1983
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 144
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS A BIOGRAPHY BASED ON MR. FRANK GILBRETH WRITTEN BY HIS DAUGHTER AND HIS SON. IT IS VERY INTERESTING AND ENTERTAINING, YOU CANNOT LEAVE IT ASIDE UNLESS AND UNTIL COMPLETED. MR. FRANK WAS AN ENGINEER. HE WAS ALWAYS BUSY IN FINDING OUT VARIOUS METHODS AND WAYS TO SAVE TIME, AND TO UTILIZE TIME AT ITS BEST. HE ALWAYS TRIED OUT THE SOLUTIONS ON HIS CHILDREN. HIS WAYS INCLUDED UTILIZING TIME WHILE DOING DAILY CHORES. HE TAUGHT HIS CHILDREN THE FRENCH LANGUAGE BY MAKING THEM LISTEN TO THE CASSETTES WHILE TAKING BATH, HIS CHILDREN MASTERED THE LANGUAGE. THE FILM BASED ON THIS WAS SHOWN IN THE THEATERS OF AMERICA MANY A TIMES THEN. MANY FAMILIES WERE BENEFITTED BY HIS WAYS OF UTILIZING TIME WISELY. PEOPLE WERE ASTONISHED BY THE INNOVATIVE WAYS OF HIS TEACHING. I FIRMLY BELIEVE THAT THIS BOOK WITH ITS INNOVATIVE METHODS WILL BE IMMENSELY USEFUL TO ALL THE FAMILIES HERE.
फ्रंक गिलबर्ट या गृहस्थावर त्यांच्या एका मुलाने व मुलीने मिळूल लिहिलेले पुस्तक चरित्रवजा असूनही, ते इतके मनोवेधक व मनोरंजक आहे, की पूर्ण केल्याशिवाय खाली ठेववत नाही.हे गृहस्थ व्यवसायाने इंजिनीअर! कमीत कमी वेळात जास्तीत जास्त कामे कुशलतेने कशी करावीत, यावर ते संशोधन करत व त्याचे आपल्या मुलांवर प्रयोगही करुन पाहत. खास वेळ न खर्चता, स्नान करता-करता, फ्रेंच भाषेच्या टेप्स ऐकवून त्यांनी मुलांना उत्तम फ्रेंच बोलायला शिकविले होते. असे अनेक प्रयोग त्यांनी आपल्या मुलांवर केले होते. त्यांची फिल्म त्या वेळी अनेक अमेरिकन चित्रपटगृहांत दाखवली जात असे. इतके तिथल्या लोकांना त्यांच्या शिक्षणपद्धतीचे कौतुक वाटत असे.आपल्याकडील जास्तीत जास्त लोकांनी ते वाचावे व अमलात आणावे, असे वाटले, म्हणूनच त्याचा हा अनुवाद सिद्ध करून सुज्ञ वाचकांसमोर ठेवला आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #THEDEMONINTHEFREEZER #द डेमन इन द फ्रीझर #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #PRAMODJOGLEKAR #प्रमोदजोगळेकर #RICHARDPRESTON #रिचर्ड प्रेस्टन "
Customer Reviews
  • Rating StarDAYANAND POTDAR

    लग्ना नंतरच्या पहील्याच प्रवासात फ्रँक आणि लिली या दोघांनी ठरवले की आपल्याला बारा मुलं असावीत . फ्रँक ला मूलं आवडायची आणि लिलीला झालेली मूलं आवडू लागली . " चिपर बाय द डझन "ही शंभर वर्षापूर्वी लिहीली गेलेली भन्नाट विनोदी सत्यघटनेवरची कादंबरी . याला आ्मकथन म्हणावे लागेल , कारण त्या बारा मूलांपैकी बहीणभाऊ या दोघांनी मिळून त्या कुटूंबाची मजेदार कहाणी लिहीलीय . फ्रँक जुनियर व अर्नेस्टाईन यांनी फक्त 140 पानांत कादंबरी संपविलीय . पुस्तक हातात घेतले व सुरु झाला स्वतःशीच हासरा संवाद . दररोज हसता यावे यासाठी थोडेथोडे करून आठ दिवसात कादंबरी संपवीली . शैक्षणिक , गतिविषयी , वेळाविषयी अश्या कांही भन्नाट कल्पना अमलात आणल्यात की बस्स् . फ्रँक स्वतः इंजीनीयर . अमेरीकेतील व जर्मनीतील मोठ मोठ्या कंपनींचा सल्लागार .कमीत कमी वेळात जास्तीत जास्त काम अचुकपणे कसे करावे यावरचे धडे देण्यासाठी फ्रँक ला बोलावले जायचे . आजच्या भाषेत "मॅनेजमेंट गुरु " . सर्व संकल्पना घरी अमलात आणल्या जायच्या यातूनच फक्त सतरा वर्षात बारा मुलांचे कुटूंब उभे राहीले . अनेक उपक्रमांचा जनक , स्वतःच्या शैक्षणिक कल्पना त्यावेळी थियेटर मध्ये दाखविल्या जायच्या .. लिलीही कांही कमी नव्हती . ती होती निष्णात भाषणतज्ञ . तिच्या भाषणांचे कार्यक्रम व्हायचे . एवढ्या प्रचंड कुटूंबात प्रत्येकजन शिस्तीत प्रगती करतोय ही खरेच कमालीची गोष्ट आहे . एक दोन मूलांना सांभाळताना होणारी कसरत आठवली की बारा मूलांचा सांभाळ ही भयावह कल्पना वाटतेच . कादंबरी वाचावीच कारण बेस्टसेलर आहे , त्याच कादंबरी वर छानसा सिनेमाही पाहाच. अनेक भाषात भाषांतरे झालीत. पानापानात छाटे छोटे विनोद व नवनवीन प्रयोग , हास्याचे फवारे , कुणीतरी पाहतय म्हणून चोरून हासण्याचा नवीन प्रकारही वाचताना घडतोच . ... दयानंद पोतदार ..... ...Read more

  • Rating StarVilas V. Kuvalekar

    चीपर बाय दी डझन हे फ्रॅंक गिलब्रेथ या गृहस्थावर त्याच्या फ्रॅंक ( ज्यू.) या मुलाने आणि अर्नेस्टाईन या मुलीने मिळून लिहिलेले चरित्रवजा पुस्तक.हे गृहस्थ व्यवसायाने इंजिनिअर.कमीत कमी वेळात जास्तीत जास्त कामे कशी करावीत यावर ते संशोधन करत व त्याचे प्रयोगी आपल्या मुलांवर करून पहात.त्यांची फिल्म त्यावेळी अनेक अमेरिकन चित्रपट गृहात दाखवली जात असे.इतके तिथल्या लोकांना त्यांच्या शिक्षणपद्धतीचे कौतुक वाटत असे.सुरुवातीला हा अनुवाद स्त्री मासिकात क्रमशः प्रकाशित करण्यात आला.अनेक ठिकाणांहून मूळ पुस्तकाची चौकशी करणारी तसेच फ्रॅंक गिलब्रेथ यांच्या पद्धती वापरून आपण आपल्या मुलांना शिकवणे सुरू केल्याबाबतची वाचकांची पत्रे आली व मग किर्लोस्कर प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले. फ्रॅंक व त्यांची पत्नी लिली हे विलक्षण जोडपं होतं. आपण दोघं जे काम हाती घेऊ ते निश्चितच उत्तम आणि यशस्वी होणार याचा त्यांना पूर्ण विश्वास असे आणि तसं ते होतही असे.लग्न झाल्यावर फ्रँकनी आपल्याला एक डझन मुलं पाहिजेत असं सांगितलं होतं आणि लिलीनं त्यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला होता.त्यांना बारा मुलं झाली.त्या सर्वांना त्यांनी कसं वाढवलं याविषयी हे पुस्तक अत्यंत रंजक आणि उद्बोधक पद्धतीनं माहिती देतं. मुलांच्या स्नानगृहात ग्रामोफोन्स ठेवून त्यावर भाषांच्या तबकड्या लावायची त्यांनी सोय केली.मुलांनी स्नान करताना,दात घासताना,केस विंचरताना, त्या तबकड्या लावून फक्त ऐकायच्या असत.त्यामुळे अल्पावधीत मुलं जर्मन आणि फ्रेंच बोलण्यात तरबेज झाली.स्नानगृहात तक्ते लावलेले असत.त्यावर प्रत्येकानं स्नान,दात घासणे,केस विंचरणे, आदि कामांना किती वेळ लागला ती सर्व माहिती दररोज भरून सही करायची असे.यांतून सर्व कामे नीट आणि झटपट करण्याची मुलांना प्रामाणिक सवय लागली.सर्व प्रकारची गणितं झटपट करण्याच्या पद्धतीही त्यांनी मुलांना शिकवल्या होत्या. त्यांनी घरातील सर्व कामे करणे,निर्णय घेणे,यांसाठी व्यवस्थापन समिती निर्माण केली होती.साफसफाई,गवत काढणे,कुंपण रंगवणे,अशा सर्व कामांची निविदा पद्धत होती.कमीत कमी रक्कम आकारणाऱ्या मुलाला काम मिळे,मात्र ते त्याला पूर्ण करावे लागे. यातून मुलांना काटकसर,जबाबदारी,पैशाचं मूल्य,आदि महत्वाच्या मूल्यांचा संस्कार मिळाला. बायको आणि सर्व मुलांना घेऊन फ्रॅंक कुठेही जात त्यावेळी या साऱ्यांना पहायला गर्दी होत असे.ही सारी मुलं पिवळट तांबूस केसांची होती.दर्शकातील कुणीतरी विचारे,` ही एवढी गाजरं कशी काय वाढवता भाऊ ?या एवढ्या मुलांना खाऊपिऊ तरी कसं घालता,मिस्टर ?` त्यांना फ्रँक उत्तर देत,` डझनावारीनं साऱ्या गोष्टी स्वस्त पडतात,नाही का ?`  म्हणून या पुस्तकाचं चीपर बाय दी डझन हे चपखल नाव आहे.एवढी मुलं असूनही फ्रँकनी त्यांना उत्कृष्ट शिक्षण आणि संस्कार दिले.प्रत्येक गोष्टीचं मूल्य,महत्व मुलांच्या लक्षात आणून देण्याची त्यांची हातोटी अनोखी होती.एकदा घर बदलायची वेळ आल्यावर त्यांनी सर्वांना गाडीत घातलं आणि एका अत्यंत दुरावस्थेतल्या घराजवळ नेलं.सगळी अगदीच नाराज झाली आणि आपण कोणत्याही परिस्थितीत या घरात राहणार नाही,असं मुलांनी घोषित केलं. मग ते त्यांना ठरलेल्या घरी घेऊन गेले.मुलं खुष झाली आणि हेच घर ठरलेलं होतं तर आधीच इथे का आणलं नाही,असं मुलांनी विचारल्यावर त्यांनी सांगितलं, `आधीच तुम्हाला इथं आणलं असतं तर तुम्ही या घरातही दोष काढले असतेत, पण दुरावस्थेतलं घर पाहून आल्यामुळे आता या घरात तुम्हाला दोष दिसणार नाहीत.` डझनभर मुलांवर सतत लक्ष ठेवणं सोपं नसतं. त्यातूनही कधी कधी गमती व्हायच्या. एकदोन वेळा मुलं चुकण्याचे प्रसंग आले आणि मग कुठूनही परतताना मुलांना एका ओळीत उभं करून हजेरी घेण्याचा परिपाठ सुरू झाला. एवढं मोठं कुटुंब असूनही लिली रांधा वाढा उष्टी काढा यातच सतत गुंतलेली नसे.तिचीही व्याख्यानं, प्रवास असं सारं सुरू असे.तिच्या व्यक्तीत्व विकासाच्या आड घराची जबाबदारी कधीच आली नाही.मुलांच्या संगोपनात लिलीच्या बरोबरीनं फ्रँकचा सहभाग असे.एकदा लिली अशीच कामासाठी बाहेर जाणार असते आणि फ्रँक मुलांवर लक्ष ठेवणार असतो. लिली साऱ्या सूचना देऊन जाते.काम संपल्यावर ती परतते आणि कुणी त्रास दिला नाहीना याची चौकशी करते. पलीकडे हिरमुसून बसलेल्या एक मुलाकडे निर्देश करत फ्रॅंक तिला सांगतो,` काही विशेष नाही,फक्त तो मुलगा जरा गडबड करत होता, पण एक चपराक दिल्यावर बघ कसा शांत बसलाय.` त्यावर लिलीनं त्याच्या लक्षात आणून दिलं की,तो त्यांचा मुलगा नव्हता,शेजाऱ्यांचा होता.केवळ त्याचे केसही तांबूस असल्यानं फ्रँकला तो आपला मुलगा वाटला होता.अशा बऱ्याच गमतीजमती या पुस्तकात आहेत.एकदा एक संतती नियमनाची प्रचारिका त्यांच्याकडे येते आणि तुम्ही या कार्याचा प्रचार करा असं लिलीला सांगते आणि लिलीची बारा मुलं पाहून तिला फेपरं यायची वेळ येते. फ्रॅंक तसा कांहीसा पुराणमतवादीच असतो.मुलींनी पारदर्शक अंतर्वस्त्र घालणं, पातळ पायमोजे घालणं, केस कापणं, रंगभूषा करणं,उंच टाचांचे बूट घालणं, नखरंग लावणं,जाझ संगीत ऐकणं,मुलांशी मैत्री करणं,अशा बऱ्याच गोष्टी त्याला आवडत नसत.पण हे सारं मुलांच्या काळजीपोटी होतं.या माणसानं आयुष्यभर अनावश्यक हालचाली टाळून कामातली गती कशी वाढवावी याचाच ध्यास घेऊन काम केलं होतं.एकदा कुणीतरी त्याला विचारलं,` प्रत्येक गोष्टीत वेळ वाचवून या वेळाचं करायचं तरी काय ?` त्यावर फ्रँकनं मिश्कीलपणे सांगितलं होतं,` त्या वेळात आणखी काम करायचं ,शिक्षण घ्यायचं,कलानिर्मिती करायची,मौज करायची आणि तुमचं मन त्यातच गुंतलं असेल तर एक पेग घ्यायचा.` अनुवादातून परभाषेतली जी अप्रतिम पुस्तकं मराठीत आली त्यातलं हे एक अत्यंत वाचनीय पुस्तक आहे. आजच्या एखाद दुसऱ्या मुलाला वाढवताना मेटाकुटीला येणाऱ्या जमान्यात हे पुस्तक जादूचा दिवा वाटावं असं आहे.संस्कार होण्याची प्रक्रिया ही देणारा आणि घेणारा या दोघांच्या क्षमतेवर निर्भर असते,हे खरं.पण देणाराला तो किती वैविध्यानं आणि छानपणे देता येतो याचं हे पुस्तक म्हणजे साक्षात दीपस्तंभ आहे असं मला वाटतं. ...Read more

  • Rating StarVilas Patil

    चिपर बाय दि डझन एक सुंदर व वाचनीय पुस्तक. चरित्रवजा पण मनोरंजक . असेच एका ठिकाणी पुस्तक परिचय वाचला, संकल्पना छान वाटली आणि ते मिळवून वाचून काढले. ह्या पुस्तकात किस्से आहेत गिल्ब्रेथ परिवाराचे. ज्या मध्ये गिलब्रेथ जोडप्याला बारा आपत्ये आहेत . 6 मुलेव 6 मुली . त्यांच्या कमाल धमाल ,गमती जमती अश्या प्रकारे रंजक मार्गाने जावून मुलांवर संस्कार कसे करावेत त्यांचे पालन पोषण कसे करावे हे पुस्तक शिकवते. 100 वर्षापूर्वीच्या घटना जरी असल्या तरी आजही तितकेच लागू होते. एक सुंदर अभिजात कलाकृती. ...Read more

  • Rating StarVilas Patil

    चिपर बाय दि डझन एक सुंदर व वाचनीय पुस्तक. चरित्रवजा पण मनोरंजक . असेच एका ठिकाणी पुस्तक परिचय वाचला, संकल्पना छान वाटली आणि ते मिळवून वाचून काढले. ह्या पुस्तकात किस्से आहेत गिल्ब्रेथ परिवाराचे. ज्या मध्ये गिलब्रेथ जोडप्याला बारा आपत्ये आहेत . 6 मुे व 6 मुली . त्यांच्या कमाल धमाल ,गमती जमती अश्या प्रकारे रंजक मार्गाने जावून मुलांवर संस्कार कसे करावेत त्यांचे पालन पोषण कसे करावे हे पुस्तक शिकवते. 100 वर्षापूर्वीच्या घटना जरी असल्या तरी आजही तितकेच लागू होते. एक सुंदर अभिजात कलाकृती. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more