`CHEERS!` THE GLASSES CLINK ON EACH OTHER. OF COURSE, THAT IS NOT THE ONLY TIME FOR `CHEERS`.
VAPU`S `CHEERS` TOUCHES EVERY SOUL AND PRODUCES THE RHYTHMIC CLINKING, RESULTING INTO CHEERING UP OF THE HEARTS TOGETHER, SPREADING HAPPINESS. VAPU, A PATRON OF HAPPINESS, A COLLECTOR OF HUMAN BEINGS, A FAN OF UNIQUE CHARACTERS; HELPING US TO MEET ALL THESE EXCLUSIVE AND EXQUISITE PEOPLE THROUGH HIS WORD-PORTRAITS, IN `CHEERS!`
ANNA ADVISES VAPU, `DON`T EVER DISCARD THE OLD. WHILE PRACTISING IT, YOU WILL COME ACROSS NEW. THE FIRST LETTER THAT WE WRITE IS AT THE AGE OF THREE. THEREAFTER, WE KEEP ON WRITING TILL OUR LAST BREATH.`
SOMEWHERE SOME NOBLE BHAUSAHEB IMPLANTS THE SEED OF CONFIDENCE, DEEP DOWN.
WE COME ACROSS MANY SUCH `GLASSES`, TRANSPARENT IN THEIR ATTITUDE AND CLEAR IN THEIR MIND. THEY REMAIN FULL FOREVER. THEY REFRESH OUR MINDS WHILE CHEERING US UP. INTRODUCTION OF PERSONALITIES SHOULD ALWAYS CHEER UP PEOPLE. SOME GET THE OPPORTUNITY TO BE IN THE COMPANY OF SUCH NOBLE PEOPLE. VAPU HAD BEEN ONE OF THEM. HIS GREATNESS LIES IN HIS READING SKILLS WHICH HE FURTHER PEN-PORTRAYED FOR HIS READERS.
THAT IS HOW WE READERS ARE TOUCHED WITH HIS `CHEERS!`
IT IS INTOXICATING BUT NOT INTIMIDATING; IT IS ALCOHOLIC BUT NOT SEDUCING.
THERE ARE GLASSES, BUT THEY ARE NOT EMPTY.
THERE ARE COLOURS, BUT THEY DO NOT SPOIL THE BEAUTY.
CHEERS!
‘चिअर्स’ फक्त पेल्याला पेला भिडल्यावर होत नाही.
वपुंचं ‘चिअर्स’ हृदयाला भिडलेलं हृदय आणि त्यातून उमलणारी आनंदधून अधोरेखित करतं. ज्यांच्या सहवासात आयुष्य बहरुन जावं, अशी वपुंच्या आयुष्यातील विलक्षण माणसं या पुस्तकात भेटतात.
एखादे अण्णा वपुंना सांगतात, ‘जुनं काहीही सोडायचं नाही, जुनं सगळं करता करताच नवं सापडेल.. वयाच्या तिसऱ्या वर्षी आपण श्री गिरवतो. ती श्री इतिश्री होईतो राहतेच.’ तर भाऊसाहेबांसारखा उमदा माणूस आत्मविश्वासाचं खोल बीज रुजवतो.
असे अनेक पेले इथे भेटतात. रिते होत नाहीत तर रसिकांच्या मनोवृत्तीला चिअर्स करतात. आयुष्य असंही जगता येतं हे सांगून जातात. व्यक्तिपरिचय हा मनाला उभारी देणारा असावा, उत्तेजन देणारा असावा आणि त्यासाठी अशा व्यक्तींचा सहवास मिळावा. वपुंना सहवास मिळाला आणि म्हणून ते त्या व्यक्तींना वाचू शकले.
चिअर्स म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवू शकले.
नशा आहे पण धुंदी नाही. मद्य आहे पण ग्लानी नाही. पेले आहेत पण रितेपण नाही. रंग आहेत जे बेरंगी करत नाहीत.
चिअर्स !