* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177662924
  • Edition : 11
  • Publishing Year : OCTOBER 1993
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 112
  • Language : MARATHI
  • Category : SCIENCE
  • Available in Combos :D.S.ITOKAR COMBO SET-13 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SCIENCE IS A COMPULSORY SUBJECT IN TODAY`S EDUCATION SYSTEM. BUT MANY A TIMES WE FIND THAT CHILDREN ARE NOT ABLE TO GRASP IT PROPERLY. WHAT IS THE REASON BEHIND THIS? WE TEACH SCIENCE THROUGH BOOKS. CHILDREN DO NOT GET A CHANCE TO LEARN IT THROUGH EXPERIMENTS. THIS BOOK WILL GIVE THEM A CHANCE TO LEARN ABOUT THE MAIN PRINCIPLES OF SCIENCE IN A PLAY WAY. AT THE SAME TIME, THEY WILL BE ABLE TO CREATE SOMETHING INTERESTING AND INFORMATIVE. THIS BOOK WILL HELP TO INCREASE THE SCIENTIFIC ASPECT OF EVERY YOUNG MIND. THE VARIOUS EXPERIMENTS WILL SHOW THE HOLLOWNESS BEHIND MANY SO CALLED MYSTERIES AND BLIND FAITH. THEY WILL ALSO PROVIDE AN OPPORTUNITY TO FIND OUT SOLUTIONS ON SOME BASIC PROBLEMS. THIS BOOK THOUGH IS DESIGNED FOR THE SCHOOL GOING CHILDREN WILL BE EQUALLY INTERESTING FOR THE PARENTS AND GRANDPARENT OF THE CHILDREN.
`छंदातून विज्ञान` यामध्ये एकूण ६२ प्रयोगाची माहिती आहे. हवा व पाणी, प्रकाश, ऊर्जा, चुबकतत्व, विद्युत आणि इतर सहा शीर्षकाखाली वर्गीकृत केलेली आहे. हवा व पाणी यांच्या सहायाने मजेदार भिंगरी, पानी पिणारा राक्षस, चमच्याचे चक्र, जादूचे पाणी, हवेने वजन उचलणे, उष्णतेने घसरणारा पेला, पाण्याने वजन वर उचलणे इत्यादी प्रयोगाचे सचित्र वर्णन लेखकाने अत्यंत सोप्या भाषेत केले आहे. दैवी चमत्काराच्या मागे विज्ञान कसे आहे जसे भस्म काढण्याचा प्रकार, आगपेटीच्या साहाय्याशिवाय आपोआप धूर कसा निघतो जाळ कसा तयार होतो हे `बुवांची माया` या प्रयोगात बाल वाचकांचे मन वेधून घेते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #CHHANDATUNVIDNYAN #CHHANDATUNVIDNYAN #छंदातूनविज्ञान #SCIENCE #MARATHI #D.S.ITOKAR #डी.एस.इटोकर "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK MATRUBHUMI 08-03-1994

    विद्यार्थ्यांच्या शोधक बुद्धीला चालना देणारे पुस्तक... प्रस्तुत पुस्तक हे लेखकाचे सहावे पुस्तक आहे यामधे एकूण ६२ प्रयोगाची माहिती हवा व पाणी, प्रकाश, ऊर्जा, चुंबकत्व, विद्युत आणि इतर सहा शीर्षकाखाली वर्गिकृत केलेली आहे. हवा व पाणी यांच्या सहाय्यानेमजेदार भिंगरी, पाणी पिणारा राक्षस, चमच्याचे चक्र, जादूचे पाणी, हवेने वजन उचलणे, उष्णतेने घसरणारा पेला पाण्याने वजन वर उचलणे इत्यादी प्रयोगाचे सचित्र वर्णन लेखकाने अत्यंत सोप्या भाषेत केलेले आहे. दैवी चमत्काराच्या मागे विज्ञान कसे आहे जसे भस्म काढण्याचा प्रकार, आगपेटीच्या सहाय्या शिवाय आपोआप धूर कसा निघतो जाळ कसा तयार होतो हे ‘बुवांची माया’ या प्रयोगात बाल वाचकांचे मन वेधून घेते. एका पदार्थाची प्रतिमा डोळ्यात उमटली म्हणजे तिची संवेदना आपल्या मेंदूत १/१० सेकंद टिकते आणि ह्याच वेळी जर दुसरी प्रतिमा उमटली, तर दोन्ही प्रतिमांचा एकत्र परिणाम होवून जी नवीन प्रतिमा तयार होते ती पाहिल्याचा आपणास भास होतो ह्यालाच शास्त्रीय भाषेत दृष्टीसातत्य असे म्हणतात याचेच आधारे पंख फडफडवणारा पक्षी, चांदीचा चमचा फसवे डोळे, विलक्षण सायफन इत्यादी प्रयोगाची माहिती विद्यार्थ्यांचे ज्ञान वाढविणारी आहे. उर्जा आणि तीही गतीजन्य उर्जाच्या आधाराने वेगवेगळी कार्ये कशी पार पाडल्या जातात उदा. नाण्याला सुईच्या टोकाने छिद्र कसे पाडल्या जाते, थर्माकॉलची नाव पाण्यात आपोआप कशी चालू शकते, काही पदार्थात शक्ती भरल्यास जसे ताणलेली स्प्रिंग, ताणलेले रबर, वरुन पडणारा चेंडू, वरुन खाली वाहणारे पाणी, पीळ दिलेले रबर ह्या गोष्टीत साठविलेल्या ऊर्जेच्या सहायाने पळणारे विमान तयार करणे, बूमरॅग उडविणे, आज्ञाधारक चेंडू, कवायती, विदुषक इत्यादी प्रयोगाची लेखकाने दिलेली माहिती विद्यार्थ्यांचे मनोरंजन करणारी आहे. चुंबकाचा उपयोग करुन दिशादर्शक बाहुली, झोका घेणारा चेंडू, जागरुक जवान, मजेदार कुत्रा, फिरणारे मासे, तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना, आपोआप चालू होणारा पंखा, इत्यादी मजेदार उपकरणे व खेळणी अतिशय कमी खर्चात कशी तयार केल्या जावू शकतात याची माहिती बाल वाचकांना अत्यंत उपयुक्त ठरणारी आहे. लोखंड निकेल ह्या धातूंना चुंबकीय पदार्थ असे म्हणतात, त्यावर विद्युत प्रवाहाच्या सहायाने बदलणारा रोधक, इलेक्टोप्लेटिंग, भुताचे प्रकरणे पेटवा काडी लावा दिवा, सफरचंदाची चोरी, पळणारे घोडे, सौर गाडी आदी प्रयोगाची दिलेली माहितीच्या आधारे विद्यार्थ्यांची वैज्ञानिक दृष्टी वाढीस लागते. या व्यतिरिक्त बिनविजेची घंटी, जाड पुठ्याचा धावपटू, आकाश पाळणा, पाण्याची कारंजी उडविणे, शिशीत ढग तयार करणे आदी प्रयोगही मनोरंजक आहेत. ह्या पुस्तकात वैज्ञानिक तत्वावर आधारलेली उपकरणे कशी तयार करावीत ह्याची माहिती तर आहेच पण त्याचबरोबर अंधश्रद्धा व हातचलाखी यांचे मागेसुद्धा विज्ञानच आहे हे सिद्ध करुन दाखविले आहे. सोपी भाषा व चित्रात्मक माहिती, आकर्षक बांधणी यामुळे सर्वस्तरातील वाचक, विद्यार्थी, शिक्षक व पालक यांचे संग्रही असावे, असे हे पुस्तक आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more