UPROOTED FROM A BUSTLING CITY, THE THIRTEEN-YEAR-OLD PROTAGONIST OF THE SMALL-TOWN SEA IS REPLANTED IN HIS FATHER`S HOME TOWN WHERE HE STRUGGLES TO COPE WITH HIS NEW LIFE. HE RELUCTANTLY MAKES FRIENDS WITH BILAL, A BOY WHO LIVES IN THE ORPHANAGE RUN BY THE LOCAL MOSQUE. TOGETHER, THEY EMBARK ON CLANDESTINE ADVENTURES WHILE HIS AILING FATHER-A WRITER WHOSE LAST WISH IS TO DIE LISTENING TO THE SEA HE HAS GROWN UP BY-REDISCOVERS PEOPLE FROM HIS CHILDHOOD. BUT HIS FATHER`S DEATH UNSETTLES THE BOY`S LIFE AGAIN, AND HE FINDS HIMSELF GRAPPLING WITH ALTOGETHER UNEXPECTED CHALLENGES.
ही गोष्ट आहे आयुष्याच्या पटावरील घटनांना अनिवार्यपणे सोसणाऱ्या एका किशोरवयीन मुलाची. वडिलांच्या दुर्धर आजारामुळं त्यांना त्यांच्या मूळ गावी अखेरचा श्वास घ्यायचा असतो. पण त्यांच्या इच्छेनं नायकाचं आयुष्य मात्र ढवळून निघतं. त्याचं मोठ्या शहरातलं धावपळीचं आयुष्य उखडून छोट्या शहरात रूजवलं जातं. तिथं जुळवून घेण्यासाठीची त्याची धडपड..नव्या अवकाशातील माणसं..त्यांचं जगणं..नायकाच्या आयुष्याचा भाग होत जातं..पण तेव्हाच एक नवी वेदना त्याच्या पुढ्यात येऊन उभी राहते. प्रेम, मैत्री आणि नातेसंबंधांवरील मनाची पकड घेणारी कादंबरी.