NA
या पुस्तकात मातृत्वाच्या जाणिवेपासून म्हणजे ‘मी आई होणार’ या घोषणेपासून ते त्यांना पाय फुटले की होणार्या धावपळीपर्यंत आयांना येणारे अनुभव शब्दबद्ध केले आहेत. हे पुस्तक सगळ्या आयांसाठी एक भेट आहे. मातृत्वाचा किताब मिळाल्याचा हा उत्सव आहे. मूल वाढवण्याच्या धडपडीतून गेलेल्या, त्याचा आनंद उपभोगलेल्या सगळ्या आयांचा सन्मान म्हणजे हे पुस्तक आहे. आपली मुलं कितीही मोठी झाली तरी आपल्याला येणार्या नवनव्या अनुभवांमुळे आपण कायमच नव्या आया असतो; पण त्यातल्या त्यात पहिली काही वर्षं फारच धमाल असतात. अनेक आश्चर्य आणि आनंदाच्या भेटी मिळतात, या सगळ्यांचं वर्णन पुस्तकाच्या लेखकांनी खूप सुरेख केलं आहे. या पुस्तकातल्या गोष्टी सगळ्या पहिलटकरीण आयांसाठी अगदी योग्य आहेत. बाळ झोपलं असताना, आजीच्या मांडीवर खेळताना किंवा खुर्चीवर बसून पुढ्यातलं अन्न कुत्र्याकडे टाकताना तुम्ही या गोष्टी वाचू शकता; त्यामुळे तुम्ही स्वत:साठी थोडा वेळ काढून ‘चिकन सूप फॉर द सोल : न्यू मॉम्स’ वाचण्याचा आनंद घ्या.