LIKE THE FIRST PART OF THE BOOK `CHICKEN SOUP FOR THE SOUL`, IN THIS NEXT PART, JACK CANFIELD AND MARK HANSON, THE BELOVED WRITERS OF THE AMERICAN PUBLIC, HAVE COLLECTED MANY STORIES FROM ABROAD. AS SOON AS YOU READ THESE STORIES, WHICH ARE A PANACEA FOR THE MENTAL STRESS OF TODAY`S ERA, THE DULLNESS AND DEPRESSION OF THE MIND IS INSTANTLY REMOVED AND THE READER FACES LIFE, ITS CRISES AND OBSTACLES WITH COURAGE.AFTER GETTING THE TONIC OF THESE STORIES, THE READER TELLS THE STORY OF THE CHANGE HE FEELS IN HIMSELF TO HIS CLOSE FRIENDS AND FRIENDS AND THEN THIS UNBROKEN CHAIN PROCESS OF EXCHANGE CONTINUES. REALLY, SOMETIMES SUCH SIMPLE, STRAIGHTFORWARD TRUE STORIES CAN BRING ABOUT A LITTLE BIT OF SOCIAL CHANGE, CAN`T IT?
‘चिकन सूप फॉर द सोल’ या पुस्तकाच्या पहिल्या भागाप्रमाणे या पुढच्या भागातही जॅक कॅनफिल्ड आणि मार्क हॅन्सन या अमेरिकन जनमानसाच्या लाडक्या लेखकांनी देशविदेशांतून अनेक कथा मागवून त्यांचं संकलन केलेलं आहे. आजच्या युगातल्या मानसिक ताणतणावावरचा रामबाण उपाय ठरलेल्या या कथा वाचताच मनाची मरगळ, नैराश्य झटकन दूर होतं व वाचक नवचैतन्याने आयुष्याला, त्यातील संकटांना, अडीअडचणींना हिमतीने सामोरा जातोच. या कथांचं टॉनिक मिळाल्यावर वाचकाला स्वत:त जो बदल जाणवतो त्या अनुभवाचं कथन तो आपल्या जवळच्यांना, मित्रमैत्रिणींना ऐकवतो व मग ही देवाणघेवाणीची न तुटणारी साखळीप्रक्रिया पुढेपुढे जात राहते. खरंच कधीकधी अशा साध्या, सरळ सत्यकथांतून थोडंफार तरी समाजपरिवर्तन होऊ शकतं ना?