"CHICKEN SOUP FOR THE SOUL IS THE “GO TO” BOOK LINE FOR EMOTIONAL SUPPORT DURING CHALLENGING TIMES. THESE ARE ALL NEW STORIES, COLLECTED IN 2009, ON AN ALL NEW TOPIC NEVER COVERED BEFORE IN CSS’ 16-YEAR HISTORY.
3. TOPICAL, MUCH ASKED FOR BOOK. READERS ARE LOOKING FOR STORIES THAT SHOW THEM THEY ARE NOT ALONE IN THESE DIFFICULT TIMES.
4. CSS IS A POPULAR PUBLISHER OF BOOKS ON CHALLENGES, OVERCOMING OBSTACLES, GRIEF, WITH MANY BESTSELLING BOOKS ON THESE TOPICS.
5. PEOPLE LOVE READING ABOUT OTHER PEOPLE’S PROBLEMS IN ORDER TO PUT THEIR OWN IN PERSPECTIVE AND ALSO GET SOME VALUABLE ADVICE FROM OTHER PEOPLE’S EXPERIENCES.
6. CONTAINS 10 BONUS STORIES OF FAITH ABOUT PEOPLE USING THEIR FAITH TO HELP THEM THROUGH TOUGH TIMES.
TOUGH TIMES WON’T LAST, BUT TOUGH PEOPLE WILL. MANY PEOPLE HAVE LOST MONEY AND MANY ARE LOSING THEIR JOBS, HOMES, OR AT LEAST MAKING CUTBACKS. MANY OTHERS HAVE FACED LIFE-CHANGING NATURAL DISASTERS, SUCH AS HURRICANES AND FIRES, AS WELL AS HEALTH AND FAMILY DIFFICULTIES CHICKEN SOUP FOR THE SOUL: TOUGH TIMES, TOUGH PEOPLE IS ALL ABOUT OVERCOMING ADVERSITY, PULLING TOGETHER, MAKING DO WITH LESS, FACING CHALLENGES, AND FINDING NEW JOYS IN A SIMPLER LIFE. INCLUDES 10 BONUS STORIES OF FAITH.
"
कोणतंही दु:ख पचविण्यासाठी माणसाला आवश्यक असते सकारात्मकता. केवळ दु:ख पचविण्यासाठी नाही तर आहे त्या आर्थिक परिस्थितीत सुख मानणे, आनंदात राहणे यासाठीही सकारात्मकतेची गरज असते. प्रत्येकाच्या अंगी अशी सकारात्मकता असेलच नाही. त्यामुळे ज्या माणसांकडे अशी सकारात्मकता असते त्या व्यक्तींचं वेगळेपण जाणवतं. तर अशा होकारात्मक लोकांच्या कथा त्यांनी स्वत:च कथन केल्या आहेत ‘चिकनसूप फॉर द सोल टफ टाइम्स टफ पीपल भाग १’मधून. थोड्या पैशांतून समाधान कसं मिळवायचं इथपासून घराला आग लागून वस्तूंसहित सगळं घर जळालेलं असताना स्वत:चं मन शांत कसं ठेवायचं, आईला कॅन्सर झालेला असताना केमोथेरपीमुळे तिचे केस गळतील म्हणून तिचे केस कापताना कसं हसायचं आणि आईलाही हसवायचं यांसारख्या प्रसंगांतूनही हे पुस्तक मन:शक्तीचा प्रत्यय देतं. कोणत्याही गोष्टीची कमतरता किंवा त्या गोष्टीचं प्रमाण कमी असताना, कोणताही दु:खद प्रसंग ओढवल्यावरही आनंदी राहण्याचा संदेश या पुस्तकातून मिळतो. तर खऱ्या अर्थाने जगायला शिकवणारं आणि जगण्यासाठी ऊर्जा देणारं हे पुस्तक अवश्य वाचायला पाहिजे.