* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CHICKEN SOUP FOR THE SOUL TRUE LOVE
  • Availability : Available
  • Translators : USHA MAHAJAN
  • ISBN : 9789386342003
  • Edition : 1
  • Publishing Year : JANUARY 2017
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 224
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :CHICKEN SOUP SERIES COMBO OFFER-61 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
CSS TRUE LOVE WILL WARM THE HEART AND UPLIFT THE SPIRIT OF ANY READER WHO IS LOOKING FOR, OR HAS FOUND, HIS OR HER SOULMATE. STORIES OF DATING, ROMANCE, LOVE, AND MARRIAGE, WITH ALL THEIR UPS AND DOWNS, WILL ENCOURAGE, INSPIRE, AND AMUSE READERS. EVERYONE LOVES A GOOD LOVE STORY. AND WE ALL LOVE STORIES ABOUT HOW THE LOVE STARTED AND BLOSSOMED. THIS FUN NEW BOOK ABOUT DATING, ROMANCE, LOVE, AND MARRIAGE, WILL MAKE YOU LAUGH AND MAKE YOU CRY, AND IS GUARANTEED TO INSPIRE YOU TO RENEW THAT SEARCH FOR YOUR SOUL MATE OR OPEN YOUR HEART A LITTLE MORE TO THE ONE YOU ALREADY HAVE. READ ABOUT HOW COUPLES MET, WHEN "THEY KNEW", GOOD AND BAD DATES, PROPOSALS, MAINTAINING THE RELATIONSHIP, SECOND CHANCES, AND ALL THE OTHER UPS AND DOWNS OF LOVE, ROMANCE AND MARRIAGE.
प्रियकर-प्रेयसी विंÂवा नवरा-बायको यांच्यातल्या प्रेमाला प्रणयाचा भरजरी पदर असतो. शारीर आणि आत्मिक अशा दोन्ही पातळ्यांवरचं हे प्रेम असतं. अशा प्रेमाची विविध रूपं ‘चिकनसूप फॉर द सोल –ट्र लव्ह’ मध्ये अधोरेखित केली आहेत. या कथा सत्य कथनातून साकारलेल्या असल्यामुळे त्यात विविधता, प्रांजळपणा, साधेपणा आहे. प्रेमिकांची पहिली भेट हा प्रेमातील पहिला आणि इंटरेस्टिंग अध्याय ‘आमची भेट कशी झाली ?’ या विभागातील नऊ कथांमधून हा अध्याय रंगला आहे. या नऊ कथांतून प्रेमिकांच्या भेटीचे विविध किस्से वाचायला मिळतात. कधी लव्ह अ‍ॅट फस्ट साइट, तर कधी गैरसमज, कधी तिरस्कार तर कधी विनोद अशा विविध छटा या पहिल्या भेटीतून अनुभवायला मिळतात. तर ‘डेटिंगमधील धाडसे’ या विभागात नायक -नायिकांनी डेटिंगसाठी आणि डेटिंगदरम्यान केलेलं धाडस, त्यातून घडलेल्या गमतीजमती वाचताना गंमत वाटते. ‘हे घडणारच होतं’ या विभागातील कथा नायक-नायिकेच्या एकत्र येण्यातील अपरिहार्यता अधोरेखित करणाNया आहेत. ‘लग्नाची मागणी’ या विभागातील कथांमध्ये नायक-नायिकेमधील अनिवार ओढ, रोमँटिक पद्धतीने, नायिकेला सरप्राइज देत नायकाने प्रपोझ करणं अशा पद्धतीच्या कथा आहेत. तर ‘विवाह’ या विभागात नायक-नायिकेची विवाह सोहळ्याविषयीची मते, स्वप्ने, नायक-नायिकांच्या पालकांचा विवाह सोहळ्यातील सहभाग, विवाह सोहळ्यावरून झालेले मतभेद इत्यादी बाबींचं चित्रण केलेलं आहे. अर्थातच या कथांमध्येही विविधता आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#CHICKEN SOUP FOR THE SOUL TRUE LOVE #JACK CANFIELD #MARK VICTOR HANSEN #AMY NEWMARK #KRISTI YAMAGUCHI #DATING, ROMANCE #LOVE #MARRIAGE #HEARTWARMING STORIES #USHA MAHAJAN #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
  • Rating StarSmita Litake

    अनुवादित छान पुस्तक.या मालिकेतील सर्व पुस्तके छान.

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more