* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CHINTAMUKTA JIVAN
  • Availability : Available
  • ISBN : 9788177663228
  • Edition : 4
  • Publishing Year : NOVEMBER 2002
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 224
  • Language : MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
Quantity
Buying Options:
  • Print Books:
WE NOURISH OUR BODY WITH REGULAR DOSES OF PROTEINS, VITAMINS AND OTHER NUTRITIOUS FOOD ITEMS. LIKEWISE, OUR MIND ALSO NEEDS NOURISHMENT FOR REMAINING ENTHUSIASTIC AND CREATIVE. THIS BOOK UNCOVERS VARIOUS SIMPLE REMEDIES TO OVERCOME ALL YOUR TENSIONS, GRIEF, WHICH ARE HIDDEN DEEP INSIDE YOUR BODY, SOMEWHERE YET DEEP INTO YOUR MIND. THE SOLUTIONS SUGGESTED HERE HAVE A BASE OF PSYCHOLOGY. YOU WILL COME ACROSS VARIOUS INTERESTING WAYS TO MAKE YOUSELF FEARLESS, FRESH, TO UNDERSTAND YOURSELF IN A BETTER WAY, TO MAKE YOUR LIFE TENSION FREE. THIS BOOK IN ALL SENSE ATTEMPTS TO PROVIDE YOUR MIND WITH NOURISHING, UTRITIOUS, WELL-BALANCED DIET.
शरीराला सबल करण्यासाठी ज्याप्रमाणे जीवनसत्वे, प्रथिने व पौष्टिक पदार्थांची जरुरी असते, त्याचप्रमाणे मनाला क्रियाशील व उत्साही बनवण्यासाठी खास ‘मानसिक’ पौष्टिक आहाराची जरुरी असते. मनात व शरीरात खोलवर दडलेले ताणतणाव दूर करून आनंदी जीवन जगण्याचे अनंत उपाय या पुस्तकात दिलेले आहेत. यात भीतीवर विजय कसा मिळवावा, ताजेतवाने कसे व्हावे, स्वत:ला कसे ओळखावे, अशा अनेक समस्यांवर मानसशास्त्रीय सुयोग्य मार्गदर्शन केले आहे. चिंतामुक्त यशस्वी जीवनासाठी सर्वतNहेचा ‘मानसिक पौष्टिक आहार’ पुरवण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे.

No Records Found
No Records Found
Keywords
Customer Reviews
  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 08-12-2002

    चिंतामुक्त जीवन जगण्यासाठी... सध्याच्या जगात ताणतणाव प्रत्येकाला अपरिहार्यच आहेत. त्यामुळे ताणतणाव बाळगत जगणे अवघड बनले आहे. या तणावांपासून मुक्त होण्यासाठी अनेक गुरूंचे अनेक कोर्स आहेत. आर्ट ऑफ लिव्हिंग कोर्सचे प्रणेते श्री. श्री. रविशंकर यांच्या परेरणेने लिहिलेल्या ‘इमोशन्स अँड युवर हेल्थ’ या पुस्तकाचा हा मराठी अनुवाद आहे आपल्या मनोविकारांवर ताबा मिळवून आपण जीवनात आनंदी होऊ शकतो. भावनिक कणखरता, निचरा, तणाव-निर्माण करण्याचे मूळ कमी करा निरोगी राहणे, मानसिक प्रथमोपचार व इतर अनेक प्रकरणे आहेत. ज्यामुळे आपण ‘षड् रिपूवर नियंत्रण मिळवू शकू सध्याच्या युगात जगणाऱ्या प्रत्येकाने वाचावे असेच हे पुस्तक आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA (MUMBAI) 08-12-2002

    शरीराला सबल करण्यासाठी ज्याप्रमाणे जीवनसत्वे, पौष्टिके यांची गरज असते, तसेच मनाला उत्साही बनण्यासाठी मानसिक आहाराची जरुरी असते. मनात आणि शरीरात खोलवर दडलेले ताणतणाव दूर करून सुखी आनंदी जीवन जगण्यासाठी काही उपाय या पुस्तकात दिले आहेत. भावनिक कणखरता, आावादी दृष्टिकोन, तणाव कमी करा, मानसिक प्रथमोपचार, मन आणि शरीराचे नाते इत्यादी प्रकरणे बोलकी आहेत. ...Read more

  • Rating StarTARUN BHARAT MUMBAI 5-1-2003

    आपल्याला सुखानं जगण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असते? या एका ओळीच्या प्रश्नाचं उत्तर अनेक ओळीत देता येईल. अनेक तत्त्ववेत्त्यांनी यावर पुस्तकं लिहिली आहेत. प्राचीन ग्रंथांतील ज्ञान आपल्याला जगणं शिकवतात. धर्मग्रंथ हे नीतिशास्त्राचेच ग्रंथ असतत. असे ग्रंथ आधुनिक काळात आणि विज्ञानयुगात असंख्य चिंतातुरांना औषधोपचाराप्रमाणे जवळचे वाटू लागले आहेत. खरं तर विज्ञानानं अनेक प्रश्न सोडविले आहेत. अनेक प्रश्न सोडविण्याचे मार्ग सोपे झाले आहेत. तरीही साधुसंतांच्या मार्गदर्शनाची गरज मात्र कमी झालीय असं वाटत नाही. म्हणूनच नवनवी पुस्तकं प्रकाशित होताना दिसतात. त्यातही ‘जगावं कसं ?’ या प्रश्नाचा ऊहापोह करणारी अधिक असतात. ‘चिंतामुक्त जीवन’ हे असंच एक पुस्तक प्रकाशित झालंय. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ या कोर्सचे प्रणेते रविशंकर महाराज यांच्या प्रेरणेनं भावभावनांवर आधारित ‘इमोशन्स् अ‍ॅन्ड युअर हेल्थ’ या मुनोत यांच्या इंग्लिश पुस्तकांचं रुपांतर त्यांनी स्वत:च केलंय. विचार आणि भावना म्हणजे मनाचा खुराक. देहस्वास्थ्य उत्तम राखण्यासाठी सर्वप्रकारची जीवनसत्तवं जशी आवश्यक असतात तसेच मन:शक्ती वाढण्यासाठी ताणतणाव दूर करणं आवश्यक असतात. सुखसमाधानानं जगण्यासाठी निर्भय व्हावं. प्रसन्नपणे जगावं त्यासाठी स्वत:ला ओळखावं या साऱ्या गोष्टी घडवून आणण्यासाठी मार्गदर्शन करण्याचा उद्देश या पुस्तकात स्पष्टपणे मांडला आहे. एकूण बारा प्रकरणात विस्तारानं चिंतामुक्त जीवनाचा आलेख काढला आहे. भावनिक कणखरता ही सुखमय आयुष्याची गुरुकिल्ली आहे. व्यायामाबरोबरच प्रकृतीची जोपासना करावी. भावसंस्करणासाठी मित्र जोडावेत. लोकसंग्रह करावा. अनुकूलतेचा विचार करून आशावादी दृष्टिकोन ठेवावा. सर्वांवर सारखंच प्रेम करावं. इतरांना आवडेल असं वागावं. उगाच ‘जगाचं कसं होईल?’ असल्या मूर्ख प्रश्नानं व्याकुळ होऊन मुर्दाड चेहऱ्यानं जगण्यात काय हंशील? नकारात्मक भावनांचा निचरा करावा. प्रतिकूलतेवर मात करताना राग शांत करण्याचा आरोग्यदायक मार्ग लेखकानं सांगितला आहे. यातनांवर फुंकर घालून भीतीवर विजय मिळवावा. एवढंच नाही तर एकटं रहावं लागलं तरी हरकत नाही पण एकलकोंडं होऊ नये. ‘कंटाळा’ या शब्दाला थारा न देता बुजरेपणा घालवावा. खरं तर अनेक प्रकारे आपणच तणाव निर्माण केलेला असतो. जगातही तो पावलोपावली भेटतो. अशावेळी आपण निरोगी मनानं आणि शरीरानं राहणं जवळजवळ अशक्यच असतं. केव्हा केव्हा तर मानसिक उपचार करण्याचा प्रसंग ओढवतो. तेव्हा काय करावं? या प्रश्नाचं उत्तरही लेखकानं विस्तारपूर्वक दिलंय. स्वत:ची जाणीव उंचावणं तसं कठीणच ! त्यासाठी ‘मी कोण आहे?’ हे शोधावं लागतं. त्या शोधाचं नवं तंत्र शास्त्रज्ञांनी विकसित केलंय. आपल्या निशब्द भावनांना व्यक्त करण्याची प्रतिभा जागृत करावी. तत्पूर्वी व्यसनमुक्त (व्यसने असल्यास!) व्हावं. कामातील दिरंगाई टाळण्याचा प्रयत्न करावा. कामाइतकाच जीवनाचा आनंदही महत्त्वाचा असतो. - अर्थात हे सारे प्रयोग स्वत:वर स्वत:च करताना लेखकानं इशारा दिलाय की ‘जे कराल ते चांगलंच करा’ मर्यादित धोके पत्करण्याचं धाडस मात्र आपल्यात हवंच! आपल्याच भावभावनांचा उपयोग करून आपली मन:स्थिती उत्तम कशी राखावी? दुसऱयांना बरे करणारे स्वत: बरे होतात असं म्हणतात, त्याची प्रचीती येण्यासाठी प्रस्तुत पुस्तकाचा उपयोग समाजातील सर्वच थरांतील व्यक्तींना होईल असा विश्वास वाटतो. मन आणि शरीर यांचं नातं कसं आहे ? या प्रश्नाच्या उत्तरादाखल लेखकानं अनेक महत्त्वपूर्ण मुद्दे दिले आहेत. इच्छाशक्तीच्या बळावर अ‍ॅलर्जी घालविणं तसंच संधिवात, पाठदुखी, कॅन्सर वगैरे अनेक व्याधींवर उपाय सांगितले आहेत. अखेरच्या बाराव्या प्रकरणात ‘मनौषधींचा साठा’ मध्ये लेखकानं काही अंतर्मुख करणाऱ्या गोष्टी सांगितल्या आहेत. रंग, सर्जनशीलता, कौंटुंबिक गाठीभेटी, स्नेहसंमेलनं, हसणं आणि हसवणं वगैरे. दैनंदिन व्यवहारात जीवनसौंदर्य शोधणं आणि वाढवणं कसं गरजेचं आहे हेही पटवून दिलंय. ‘प्रेम’ या विषयावर मात्र केवळ ‘पाव पान’च निवेदन केलंय, असं का? जो विषय संपूर्ण ग्रंथाचा विषय होऊ शकतो त्याची वासलात थोडक्यात लावली आहे हे प्रकर्षानं जाणवतं. संगीत आणि गीत, आवडते पाळीव प्राणी, क्रीडा, कविता, सांत्वन करणाऱ्या वस्तू आणि स्पर्शसुख हे विषयही थोडक्यात आल्यानं लेखकास सुचवावंसं वाटतं की, या विषयांवरही मानसशास्त्रीय पुस्तकं लिहावीत. प्रकाशक ‘मेहतां’ च्या निरामय यशासाठी ध्यान, मनावर विजय आदी मनोवैज्ञानिक पुस्तकांप्रमाणेच हेही पुस्तक वाचकांच्या पसंतीस उतरेल असे वाटते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more