* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788190779128
  • Edition : 3
  • Publishing Year : JANUARY 1975
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 184
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :MAHADEO MORE COMBO SET - 21 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THERE IS A WHOLE WORLD OUT; NOT OF THE SO CALLED LITERATE AND MIDDLE CLASS PEOPLE BUT OF THOSE WHO ARE DOWN TRODDEN, THERE ARE FARMERS, WORKERS, LABOURERS, DRIVERS, CLEANERS, MECHANIC, PROSTITUTES...; THEY ALL LEAVE WITH THEIR INSULTS, THEIR POVERTY, AND THEIR INSECURITIES; STILL THEY HAVE THE SPIRIT TO FIGHT ALL THESE ADVERSITIES IN THEIR LIVES. THIS WORLD HAS INSPIRED THE AUTHOR. THE STORIES IN THIS BOOK ARE BASED ON ALL SUCH PEOPLE, OF THEIR AFFLICTION AND ALSO OF THEIR HAPPY MOMENTS. CHITAAK WILL HELP YOU TO REALIZE THAT THE BASE OF RURAL STORIES IS NOT ALWAYS THE RURAL LANGUAGE. THE FARMERS SPEAK THE LANGUAGE IN NORMAL TONE AND STYLE TOO; AT THE SAME TIME THERE ARE OTHER PEOPLE WHO HAS THE RURALITE ACCENT TO THEIR SPOKEN SKILLS.
सुशिक्षित पांढरपेशांच्या सुरक्षित टीचभर जगाबाहेरही पदोपदीच्या अपमानांचे व दु:खांचे हालाहल पचवीत नियतीशी चिवटपणे झुंजत जगणाया शेतकरीकामकरीमजूरड्रायव्हरक्लीनरमेकॅनिक वारयोषिया आदि पददलित लोकांचं एक विशाल असं जग आहे. हेच जग लेखनाची प्रेरणा व शक्ती... ‘चिताक’मध्ये कथा आहेत त्या ह्याच जगातील लोकांच्या, रखरखीत व्यथांच्या व सुखाच्या थंडगार झुळकांच्याही. चाकोरीबद्ध ग्रामीण वाङ्मय वाचून ग्रामीण बोली खेड्यापाड्यातील केवळ शेतकरीच नित्य बोलत असतो असा जो समज सर्वसामान्य मराठी वाचकांत रूढ झाला आहे, त्याला ‘चिताक’मुळे छेद जायला हरकत नाही.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #EGIN #MATTIR # CHITAK #MANASA-ASHIHI #KONDVADA #PANIKUTHAVARALAAHE #MAHADEOMORE
Customer Reviews
  • Rating StarShrikant Adhav

    सुशिक्षित पांढरपेशांच्या सुरक्षित टीचभर जगाबाहेरही, पदोपदीच्या अपमानांचं व दु:खांचं हलाहल पचवीत नियतीशी चिवटपणे झुंजत जगणाऱ्या शेतकरी, कामकरी, मजूर, ड्रायव्हर, क्लीनर, मेकॅनिक, जोगते, जोगतिणी, वारयोषिता आदी पददलित लोकांचं एक विशाल असं जग आहे. हेचजग श्री. महादेव मोरे यांच्या लेखनाची प्रेरणा व शक्ती. समाजाच्या तळागाळातील हे जग... ‘चिताक’मध्ये कथा आहेत त्या याच जगातील लोकांच्या... त्यांच्या ओढगस्तीच्या जगण्यातील रखरखीत व्यथांच्या व सुखाच्या थंडगार झुळकांच्याही... या संग्रहास महाराष्ट्र शासनाचा १९७५-७६ सालचा राज्यपुरस्काराचा सन्मानही प्राप्त झाला आहे. ग्रामीण महाराष्ट्रातील स्त्रिया आपल्या गळ्यात एक विशिष्ट प्रकारचा सोन्याचा दागिना वापरतात, त्याला ‘चिताक’ म्हणतात. कोल्हापूर-राधानगरी भागात हे ‘चिताक’ आजही आढळते. ...Read more

  • Rating Star SAKAL SAPTRANG 8-3-2009

    ग्रामीण महाराष्ट्रातील स्त्रिया गळ्यात विशिष्ट प्रकारचा सोन्याचा दागिना वापरतात. या दागिन्याला ‘चिताक’ असे म्हणतात. जुन्या काळातील हा दागिना कोल्हापूर-राधानगरी भागातील स्त्रियांच्या गळ्यात आजही आढळतो. महादेव मोरे यांच्या कथासंग्रहाचे नाव हेच आहे. मोर हे त्याच भागातील (निपाणी) असल्याने त्या भागातील एका खणखणीत शब्दाचे शीर्षक त्यांनी त्या संग्रहाला दिले आहे. या पुस्तकाची पहिली आवृत्ती १९७५ मध्ये प्रसिद्ध झाली होती. या वर्षी ही दुसरी सुधारित आवृत्ती प्रसिद्ध झाली आहे. मोरे हे विपुल लेखन करणारे लेखक आहेत. आजवर त्यांचे सतरा कथासंग्रह (एक अनुवादित, एक निवडक), तितक्याच कादंबऱ्या (एक अनुवादित), एक ललित लेखसंग्रह आणि व्यक्तिचित्रांचे तीन संग्रह प्रकाशित झालेले आहेत. ‘चिताक’ या शीर्षकाची एकही कथा या संग्रहात नाही. मात्र, सर्व कथांचा मिळूनच हा एक कथादागिना (चिताक) आहे, असा अर्थ घेता येईल. एकंदर वीस कथा संग्रहात आहेत. मोरे यांची लेखनशैली वाचकाला खिळवून ठेवणारी आहे. ग्रामीण भाषेतील विविध अर्थसंपन्न शब्दांनी लगडलेली अशी ही शैली वाचकाला वेगळ्याच जगात घेऊन जाते. सुशिक्षित, पांढरपेशाच्या छोट्या जगाबाहेरही एक जग असते. शेतकऱयांचे, कामकाऱयांचे, मजुरांचे, जोगत्यांचे, वारयोषितांचे... या जगातील माणसे पदोपदी अपमान, मानहानी, वंचना, उपेक्षा, दु:खे यांचे हलाहल पचवीत नियतीशी झुंज देत जगत असतात. मोरे यांच्या लेखनाची मुख्य प्रेरणा आहे ती या जगातील माणसांचीच. ‘चिताक’मधून त्यांनी याच माणसांची सुख-दु:खे, कथा-व्यथांचे चित्रण केले आहे. हा कथासंग्रह ग्रामीण भागातील वाचकांना आपल्या मातीतील वाटेल; तर शहरी भागातील वाचकांना दैनंदिन जीवनाहून एका वेगळ्याच जगाचे दर्शन घडवेल. ...Read more

  • Rating StarDAINIK DESHDOOT 19-4-2009

    साहित्यातून जे बहुपेडी जीवनानुभव व्यक्त होतात, त्यातून अनेक अनुभवांचे ज्ञान मिळून आपले जीवन संपन्न बनते. शहरातल्या लोकांना ग्रामीण जीवनाचे तर खेड्यातल्या लोकांना शहरी जीवनाचे आकर्षण कायम असते. चिताक या ग्रामीण कथा आहेत. ग्रामीण महाराष्ट्रातील स्त्रया गळ्यात एक विशिष्ट प्रकारचा सोन्याचा दागिना वापरतात त्याला `चिताक` म्हणतात. कोल्हापूर, राधानगरी भागात हे चिताक आजही वापरतात. पांढरपेशा जीवनाशी जवळीक साधू पाहणारे त्यात आपली जागा पक्की करून त्यात अस्तित्व टिकवू पाहणारी शेतकरी, कामकरी, मजूर, ड्रायव्हर, क्लीनर, मेकॅनिक, जोगते आदी पददलित लोकांचं विशाल असं जग, तेच मोरे यांच्या लेखनाची प्रेरणा व शक्ती. माणूस आपल्या जीवनात आनंद शोधत असतो. ओढगस्तीच्या जगण्यातील रखरखीत व्यथांच्या व सुखाच्या थंडगार झुळका या कथातून वेगळाच अनुभव देतात. माणसाच्या सुखाच्या शोधाची ही धडपड कथांना एक वेगळेच परिमाण देते. भजी हांदलली, गाडी लहडून गेली, बोंबडी मारला, दवडणे, परतडमदी अशा प्रकारच्या वेगळ्या रचना मराठीचा वेगळा बाज व्यक्त तर करतातच पण त्यातून त्यांचा जीवनानुभव जास्त भिडतो. विविध कष्टांची कामं करत आयुष्य जगणाऱ्या मोरेंना आपल्या अवतीभवती जी कथाबीजं मिळाली तीच त्यांनी फार सुंदर फुलवली असं या कथातून जाणवतं. माणसांची हतबलता त्याला कसं जीवन जगायला भाग पाडते, हे मांडताना काही वेळा त्यातूनही जीवन जगतांना क्षणाक्षणाला आनंदाचा शोध मनोहारी वाटतो. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more