WHILE WRITING THIS BOOK CHOTYANSATHI CHUMBAK, VIDYUT, DHVANICHE PRAYOG`, IT HAS BEEN DESCRIBED HOW LITTLE FRIENDS CAN BE SHOWN THE PROPERTIES OF MAGNETISM, ELECTRICITY, SOUND AND THE FUN IT BRINGS THROUGH SIMPLE EXPERIMENTS. AT THE SAME TIME, THEIR KNOWLEDGE IS IMPARTED THROUGH GAMES. THIS BOOK IS DIVIDED INTO THREE SECTIONS. EACH EXPERIMENT IS ILLUSTRATED. SO THEY CAN EASILY UNDERSTAND THE EXPERIMENTS. AS ALL THE ITEMS REQUIRED FOR THE EXPERIMENT ARE EASILY AVAILABLE, THERE WILL BE NO PROBLEM DURING THE EXPERIMENT. DURING THE EXPERIMENT, THE THEORETICAL KNOWLEDGE OF THE SUBJECT WILL BE GAINED, KNOWLEDGE WILL BE GAINED ON HOW TO MAKE THE CONNECTION AND FINALLY CONFIDENCE WILL BE CREATED AFTER THE EXPERIMENT IS COMPLETED.
‘छोट्यांसाठी - चुंबक, विद्युत, ध्वनीचे प्रयोग हे पुस्तक लिहिताना छोट्या मित्रांना चुंबक, विद्युत, ध्वनी यांचे गुणधर्म व त्यामुळे होणारी गंमत सोप्या प्रयोगांतून कशी दाखविता येते, याचे वर्णन केले आहे. त्याचबरोबर त्यांचे ज्ञान खेळतखेळत दिले आहे. या पुस्तकाचे तीन विभाग केले आहेत. प्रत्येक प्रयोगाला आकृती काढलेली आहे. त्यामुळे ते प्रयोग सहज समजू शकतात. प्रयोगासाठी लागणार्या सर्व वस्तू सहज उपलब्ध होणार्या असल्यामुळे प्रयोग करताना कोणतीच अडचण येणार नाही.प्रयोग करताना त्या विषयाचे तात्त्विक ज्ञान होईल, जोडणी कशी करायची याची माहिती होईल व शेवटी प्रयोग पूर्ण झाल्यावर आत्मविश्वास निर्माण होईल.