* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CHOUNDAKA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177666878
  • Edition : 5
  • Publishing Year : AUGUST 1985
  • Weight : 200.00 gms
  • Pages : 168
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS NOVEL REPRESENTS THE SADDENING STORY OF THE `DEVDASI` TRIBE. WHAT IS A DEVDASI? IT IS A TRADITION CREATED BY PEOPLE WITH EVIL INTENTIONS FOR THEIR OWN BENEFITS. SHE IS A VICTIM TO MISCONCEPTIONS, WRONG TRADITIONS, SO CALLED RELIGION, ALL CREATED IN THE NAME OF THE GOD. A DEVDASI IS OFFERED TO THE GOD AND THUS BECOMES A PUBLIC PROPERTY. ANY MALE MEMBER CAN CLAIM HER. SHE FALLS PREY TO THE HARASSMENT OF THE PEOPLE. THIS NOVEL PRESENTS A TRUE PICTURE OF HER TORTURE IN THE NAME OF TRADITIONS. THE AUTHOR HAS PRESENTED THE ANGUISH THROUGH `SULI`, THE MAIN CHARACTER. HE NEATLY AND IMMACULATELY PRESENTS THE VARIOUS ASPECTS OF A FEMALE MIND, THE LANGUAGE, THE FEELINGS, ETC. `CHAUNDAK` SHOULD BE RECOGNIZED AS A NOVEL PENETRATING THE REAL FACTS OF THE LIFE OF A `DEVDASI`.
आपल्या समाजातील देव, धर्म, अनिष्ट रूढीपरंपरांचा बळी म्हणजे देवदासी. `जोगतीण देवाची, मालकी गावाची` ही आपल्या बोलीतील म्हण तिच्या जगण्याचं सार सांगते. देवाच्या नावावर समाजातील राक्षसी वृत्तींनी निर्माण केलेल्या प्रथेच्या बळी ठरलेल्या देवदासी स्त्रियांची होरपळ `चौंडकं` ही कादंबरी वाचकांसमोर ठेवते. स्त्रीदु:खाचा नेमका वेध, बोलीची सर्व सामर्थ्य पचवून राजन गवस यांनी `चौंडकं`मध्ये घेतला आहे. `सुली`च्या व्यक्तिरेखेतून एक ठसठशीत वेदना आपल्यासमोर येते. देवदासीच्या जगण्यातील सर्व दु:ख आणि तिच्या समस्यांचा वेध घेणारी कादंबरी म्हणून `चौंडकं`ची नोंद विशेषत्वानं करावी लागेल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#RAJANGAVAS #DEVDASI# JOGTIN# DEV #YALLUBAI #SULI #SUBANA #BAYAJA #PARADI #LIMB #JAT #BABANYA #SHEWANTAKKA #LAGNA #MELA #NAVAS #HITNI #DONGAR #BHANDARBHOG #RIVANAVAYALIMUNGI #CHOUNDAKA #AAPANMANSATJAMANAHI
Customer Reviews
  • Rating StarVijay Nimbalkar

    दोन दोन आठवडे आंघोळ न करणाऱ्या सुलीच्या डोक्यात एक जट दिसते म्हणून आई व आजी तिला गावातल्या जोगतीणीकडे घेऊन जातात. `यल्लूमाई तुमच्या घरी आली!` जोगतीण `डोंगरावरच्या देवीला घरात आणायला` आणि `घरातल्या निष्पाप पोरीला देवीला वाहायला` सांगते. सुलीच बाप विरोध करतो म्हणून म्हातारी व सुलीची आई महिनाभर त्याच्याशी भांडतात आणि शेवटी सुलीला डोंगरावरच्या देवीला वाहतात. `देवीची जोगतीण` म्हणजे `गावातल्या सगळ्या पुरूषांची भोगवस्तू!` त्यात वयात आलेली देखणी सुली पाहून सगळ्यांच्या नजरा चळतात. `साऱ्या गावाखाली झोपण्यापेक्षा एक बाप्या बरा` म्हणून सुली बबन्याला पकडते. पहिल्यांदा त्या दोघांत प्रेम फुलतं मग सुलीचं पोट फुगतं आणि शेवटी सुली गर्भ वाढवायचा धाडसी निर्णय घेते. सुलीच्या आयुष्याचं वाटोळं करून म्हातारी अगोदरच उलथलेली असते. कालपर्यंत सुलीला `देवी` समजणारी तिचीच आई आता तिला `वेश्या` म्हणू लागते. सुली मात्र गर्भ ठेवायच्या निर्णयावर ठाम असते. आई सुलीच्या मामांना बोलावून घेते व `हिने घराची आब्रू घालवली. हिला एखाद्या डोंगरात नेऊन पुरा` म्हणून भावांचं पाय धरते. घरात परंपरेने पुजला जाणारा देव्हारा आणि देव असतानाही घरात अशी नवी `देवी` आणून बसवणारे, `केसांच्या गुंत्या`ल्या देवीची जट समजून जपणारे, हातात परडी घेऊन गावात पाच घरं मागणारे; घराजवळ कुणीतरी लिंबू-मिरची टाकून करणी केली म्हणून देवरूषाकडे जाणारे... श्रद्धा व अंधश्रद्धा यातला फरक न समजणाऱ्या अशिक्षित समाजाची केविलवाणी कहानी. राजन गवस यांची कादंबरी - चौंडकं. - विजय निंबाळकर ...Read more

  • Rating StarVijay Saravate

    हि कथा आहे एका देवदासी प्रथेवर. देवदासी म्हणजे देवाला अर्पित. पण खरा अर्थ आहे `गावाला अर्पित`..... म्हणजे त्या व्यक्ती वर कुणाचा ठाम अधिकार नाही तर ती व्यक्ती सर्व गावाची, कुणी यावं आणि भोगावं .... म्हणजे वेश्या ... किंबहुना त्याहून वाईट ... साधारणपण, मुलांना (मुलगा वा मुलगी) काहीही कळत नसतं त्यावेळी कधीतरी त्यांना देवाला वाहील जातं आणि एकदा का हा विधी झाला कि मग त्यातून सुटका नाही, अगदी मरेपर्यंत. ही प्रथा अडाणी आणि गरीब लोकांमध्येच पाळली जाते. तरी सुदैवाने, आता या प्रथेवर कायद्याने प्रतिबंध लावले आहेत. परंतु, आजही हजारो जोगते - जोगतिणी आहेत आणि अत्यंत वाईट परिस्थितीत जगत आहे आणि आजूबाजूचा सधन समाज त्यांचे लचके तोडतोच आहे. मुळात, देवदासी संस्कृतीची परंपरा ७ व्या शतकात, कदाचित चोल, चेला आणि पांड्या यांच्या काळात दक्षिण भारतात सुरु झाली असावी. त्यावेळी समाज त्यांच्याशी चांगली वागणूक व आदरभाव ठेवून होता आणि त्यांनी समाजात उच्च सामाजिक प्रतिष्ठा होती. त्यांना धार्मिक विधीस उपस्थित राहण्यास वा करण्यास कसलाच मज्जाव नव्हता. देवदासी, देवरडीयार, जोगतिणी, जोगते वगैरे म्हणजे `देवाचे सेवक`. हे लोक देवसमर्पित असत आणि त्यांचा देवासोबत विवाह केला जात असे, म्हणजेच ते कोणत्याही ‘नश्वर व्यक्ती’ बरोबर लग्न करू शकत नाहीत. तथापि, विवाहित आणि अविवाहित पुरुषांपैकी कुणालाही भागीदार निवडण्यास ते स्वतंत्र होते. ही नाती दीर्घ व स्थिर असू शकतात किंवा फक्त थोड्या काळासाठी असू शकतात. परंतु कोणत्याही प्रकारे या महिला त्यांच्या भागीदारांवर आर्थिकदृष्ट्या अवलंबून नव्हत्या. त्यांना संगीत आणि नृत्य, आणि सुमारे ६४ प्रकारच्या कला शिकल्या जात. ते मंदिरात किंवा राजसभेत नृत्य-गायन करीत व बक्षीस म्हणून सोने व जमीन मिळवत असत. काहींनी स्वत:ला फक्त देवाला समर्पित करणे निवडले आणि संपूर्ण आयुष्यभर भागीदाराशिवाय राहिले. पण, कालौखात, हे सर्व मागे पडत गेले आणी त्याला आजचे हे अगदी ओंगळ स्वरूप प्राप्त झाले. म्हणजे आजही यांना गोंधळ वगैरे साठी बोलावून बरंच काही नको ते केलं जातं. चौंडकं कथा: एक गरीब परिवार, सुबान, त्याची पत्नी बायजा, मुलगी सुली आणि म्हातारी आई असे कसेबसे करून खात असतात. त्यांना खूप समस्या असतात आर्थिक आणि शारीरिक, पण त्यातून त्यांना बाहेर काही पडता येत नाही. त्यातच, सुलीच्या केसात एक जट आढळते आणि गावातील जोगतीण सुलीला यल्लम्मा या देवाला तिला सोडायचा सल्ला देतात. हि जोगतीण सुली पुढं मोठी होते, बबन्याच्या प्रेमजालात अडकते, त्यातून तिला दिवस जातात आणि सरळ साध्या कुठूम्बाची पूर्ण वाताहात होते. विजय सरवते ...Read more

  • Rating Starश्रीजीवन तोंदले

    नमस्कार मित्रहो आज रविवार परत एक नवीन पुस्तक घेऊन तुमच्या भेटीला आलो आहे. एक अशा लेखकाचे पुस्तक ज्याच्या प्रत्येक पुस्तकास विविध पुरस्कार मिळालेले आहेत,कोल्हापुर शिवाजी विद्यापीठातुन एम.ए.,एम एड पर्यंत शिक्षण पूर्ण केले.भोवतालच्या परिस्थितीचे निरीक्ण करून ते प्रभावीरीत्या लोकांसमोर मांडणे हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य मानले जाते.त्याच प्रभावी आणि समाज्याच्या अशा एका घटकावर त्यांनी या कादंबरी मधुन प्रभावीपणे प्रकाश टाकला आहे. या कादंबरीला १९८५चा उत्कृष्ट वाड्मय निर्मितीचा राज्य पुरस्कार,१९८५चा श्याम पानघंटी पुरस्कार-पुणे,Dr.अरुण लिमये ट्रस्ट,पुरस्कार-पुणे अश्या प्रकारचे पुरस्कार या कादंबरीला मिळाले आहेत.अशी ही कादंबरी म्हणजे राजन गवस लिखित चौंडकं. चौंडकं हे एक के वाद्य आहे जे देवदासी लोक वापरतात म्हणजे कोल्हापुर,कर्नाटक पासुन अगदी पश्चिम महाराष्ट्रामध्ये जेथे जेथे जोगती-जोगतीणी लोक आहेत ते देवीचा जागर करताना हे वाजवतात. चौंडकं हे एक दुर्मीळ आणि पौराणिक वाद्य आहे, फार पूर्वी भगवान परशुरामाने बैट्यासूर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि त्या राक्षसाच्या शरीराच्या काही भागां पासुन भगवान परशुरामाने चौंडकं हे वाद्य बनवले.आणि स्वतः भगवान परशुरामाने पहिल्यांदा ते वाजवले. मग पुढे कालांतराने ते वाद्य लाकडाचे बनवण्यात आले आणि आज ही ते बनवलं जात आणि वाजवलं ही जात. हे वाध्य वाजविण्यास अत्यंत अवघड. एका हाताच्या आणि बोटांच्या साहाय्याने हे वाजविले जाते. चौंडकं या वाद्यांची माहिती मला भुयेवाडी चे श्री तानाजी बडेकर यांनी दिली ती हि फक्त एका message वर.मना मध्ये कोणताही किंतु-परंतु न ठेवता. त्या बद्दल त्यांचे खूप खूप आभार. आता थोडं या कादंबरी विषयी बोलुया,कादंबरी १६२ पानांची आहे, कादंबरीच्या मुखपृष्ठावर एका देवदासीचं चित्र आहे. ती देवदासी डोक्यावर देवीचा जग (जग म्हणजे एका मोठ्या टोपलीच्या मध्ये देवीची मोठी मूर्ती असती त्याच्या मागे मोरपिसांचे वर्तुळाकार मखर असते. देवीच्या मूर्तीला शालु नेसवलेला असतो टोपलीच्या काटावर छोट्या छोट्या विविध देवींच्या छोट्या छोट्या मूर्त्या असतात.) डोक्यावर घेऊन उभी आहे त्या देवदासीने कपाळाला भंडारा लावला आहे,गळ्यामध्ये कवड्याची माळ आहे. अंगामध्ये हिरवा शालु नेसलेला आहे. अशी ही देवदासी बघताच डोळ्यात भरते आणि मुखपृष्ठावरूनच कादंबरीचा विषय समजतो. कादंबरी मधील कथा साधारण १९८०-८५ च्या काळामधील आहे.(म्हणजे ही कादंबरी तेव्हाचीच आहे.) त्या वेळची समाजामधील अंधश्रद्धा म्हणजे एक असाध्य रोगच त्या रोगावर किती ही उपचार केला तरी तो न बरा होण्यासारखाच आणि अजून सुद्धा तो रोग आपल्या समाजात आहे. त्या काळी अगदी साधा आजार झाला तरी देवीचा भंडारा खा,देवी ची ओटी भरा हे आणि किती तरी उपाय वेड्या अंधश्रध्ये पोटी लोकांना करण्यास भाग पाडलं जायचं. अश्याच अंधश्रद्धेला बळी पडलेल्या छोट्या सुली ची कथा या कादंबरी मध्ये लेखकाने मांडली आहे. तिच्या हिंडण्या-खेळण्याच्या दिवसातच तिच्या कोवळ्या मनाचा विचार न करता तिला देवाला सोडल जात आणि तिथुन तिच्या आयुष्याची फरफट सुरु होते. ज्या कोवळ्या वया मध्ये तिने भातुकलीने खेळावे,मैत्रीणीन सोबत हिंडावं फिरावं त्याच कोवळ्या वयात तिला दारो-दारी जाऊन भिक्षा मागायला भाग पडलं जातं. देवदासी म्हणजे जोगतीण देवाची आणि मालकी गावाची हे वाक्य देवदासीं बद्दल म्हंटले जाते. सुलीच्या (देवदासी स्रियांच्या) आयुष्याची झालेली फरफट लेखक राजन गवस यांनी अगदी प्रभावीपणे या कादंबरी मध्ये मांडली आहे. कादंबरी वाचते वेळी असं वाटतं की आपण लेखकाचे बोट पकडून देवदासींचे खडतर जीवन जवळून पाहतो असा भास होतो. कादंबरीची भाषा आमच्या पश्चिम महाराष्ट्राकडची आहे आणि कादंबरी मध्ये उपमा अलंकार पद्धती मध्ये भरपुर वाक्य आहेत(काळीज केळी च्या पानागत फाटत गेल, उन्हा अंबिली गत पिवळी पडली होती) ते वाचते वेळी समजते कि लेखकाचे सभोवतालच्या परिसराविषयी किंवा सभोवतालच्या घटना,वस्तू,परिस्तिथी विषयीचे वर्णन करण्याची एक वेगळीच दृष्टी लेखकाकडे आहे . लेखक राजन गावास आपल्या प्रत्येक कादंबरीतुन समाजातील प्रत्येक घटकांवर एक वेगळाच प्रकाश टाकतात. त्यातुन वाचणाऱ्याच्या मनात त्या घटकांविषयी सहानुभुती आणि आदर या दोन्ही भावना निर्माण होतात आणि त्यांचे विचार बदलुन टाकतात. सहानुभुतीची दृष्टी असणाऱ्या आणि समाजातील वंचित घटकांविषयी वेगळ्या पद्धतीने जाणुन घेणाऱ्या आणि प्रत्येक वाचकाने जरूर वाचावी अशी कादंबरी लेखक राजन गवस लिखित चौंडकं. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more