* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CIRCLE OF LIGHT
  • Availability : Available
  • Translators : USHA MAHAJAN
  • ISBN : 9788184981001
  • Edition : 2
  • Publishing Year : APRIL 2010
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 432
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
KIRANJIT AHLUWALIA`S STORY IS HARROWING AND SHOCKING, BUT ULTIMATELY TRIUMPHANT. IT IS A STORY OF SURVIVAL AND HOPE IN THE FACE OF ALMOST INSURMOUNTABLE ODDS. BORN INTO A WELL-OFF FAMILY IN INDIA, KIRANJIT AHLUWALIA CAME TO ENGLAND IN 1979 TO BE MARRIED TO A MAN SHE HARDLY KNEW. SHE WAS A CHEERFUL, OPTIMISTIC YOUNG WOMAN, FULL OF HOPE FOR A HAPPY MARRIED LIFE, BUT LITERALLY FROM THE DAY OF THE WEDDING IT WAS CLEAR THAT ALL WAS NOT WELL. THE NEXT TEN YEARS WERE TO BE A NIGHTMARE OF CONSTANT PHYSICAL AND MENTAL ABUSE AT THE HANDS OF HER VIOLENT HUSBAND. THERE WAS NO ONE SHE COULD TURN TO FOR HELP AND SUPPORT, AS DOMESTIC VIOLENCE IS VIRTUALLY A TABOO SUBJECT FOR MANY ASIANS IN BRITAIN, AND FAMILY HONOUR- IZZAT - IS THE SUPREME CONSIDERATION. IN 1989, EXHAUSTED, CONFUSED AND DRIVEN BEYOND ENDURANCE BY THE SUFFERING SHE HAD UNDERGONE, KIRANJIT KILLED THE MAN WHO HAD MADE HER LIFE A MISERY. AT HER TRIAL, THE PROCEEDINGS OF WHICH SHE BARELY UNDERSTOOD, KIRANJIT WAS FOUND GUILTY OF MURDER, AND SENTENCED TO LIFE IMPRISONMENT. AS THE DETAILS OF HER CASE EMERGED FOLLOWING A CAMPAIGN CO-ORDINATED BY SOUTHALL BLACK SISTERS, A WOMEN`S CENTRE OPERATING ON A SHOESTRING BUDGET, NATIONWIDE ATTENTION FOCUSED ON HER PLIGHT, AND SHE WAS SET FREE IN 1992. AFTER HER RELEASE, KIRANJIT MET THE PRINCESS OF WALES, WHO URGED HER TO WRITE A BOOK ABOUT HER EXPERIENCES. CIRCLE OF LIGHT IS THAT BOOK. IT IS A REMARKABLE FIRST-HAND ACCOUNT OF ONE OF THE MOST CONTROVERSIAL AND TROUBLING ISSUES OF RECENT YEARS. KIRANJIT AHLUWALIA`S CASE IS UNIQUE, BUT IT REVEALS THE DISTURBING HIDDEN TRUTH ABOUT MANY WOMEN`S LIVES IN BRITAIN TODAY.
किरणजीत अहलुवालियाची कहाणी ही फार भयानक आणि धक्कादायक असली, तरी कहाणीचा शेवट मात्र विजयोत्सवाचा आहे. अतिशय कठीण आणि संकटाच्या परिस्थितीतही जगण्याची दुर्दम्य इच्छा आणि आशावादाचं ज्वलंत उदाहरण म्हणजेच ही जीवनगाथा! भारतातल्या एका सधन कुटुंबात जन्मलेली किरणजीत अहलुवालिया विशेष परिचित नसलेल्या माणसाशी विवाह करण्यास म्हणून १९७९ मध्ये इंग्लंडला आली. ती एक हसरी, खेळकर आणि आशावादी स्वभावाची, सुखी वैवाहिक जीवनाची स्वप्नं रंगवणारी तरुणी होती; परंतु लग्न झाल्याच्या दिवशीच तिच्या लक्षात आलं होतं की कुठेतरी, काहीतरी बिनसलेलं होतं. पुढचा दहा वर्षांचा काळ म्हणजे क्रूर पतीकडून सतत होणारी शारीरिक मारहाण आणि मानसिक छळ असा एखाद्या भयानक स्वप्नाप्रमाणे होता. ती कोणालाही मदतीसाठी विनवू शकत नव्हती. कारण ब्रिटनमधल्या आशियाई वंशाच्या बहुतेक स्त्रिया, कौटुंबिक आणि वैवाहिक अत्याचार हा विषय चर्चिला जाणं, हे निषिद्ध मानतात. घराची इज्जत, अब्रू, घराण्याचं नाव यालाच प्रमुख महत्त्व दिलं जातं. अनन्वीत छळामुळे आणि अत्याचारांनी ग्रस्त झालेल्या, सहनशक्तीची सीमा संपलेल्या किरणजीतनं तिला जगणं नकोसं करून सोडणाऱ्या नवऱ्याला १९८९ मध्ये शेवटी मारून टाकलं. खटल्याच्या कामकाजातलं तिला विशेष असं काही समजायचं नाही. अखेरीस खुनाच्या आरोपावरून दोषी ठरवून तिला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. नंतर ‘साऊथहॉल ब्लॅक सिस्टर्स’ या बेताच्या आर्थिक मदतीवर चालणाऱ्या संघटनेने चळवळ सुरू करून तिच्या खटल्याच्या कामातील त्रुटी आणि उणिवा जनतेसमोर आणल्या. तिच्या खटल्याने देशभराचं लक्ष वेधून घेतलं आणि शेवटी १९९२ मध्ये तिची सुटका झाली. सुटका झाल्यानंतर किरणजीत एकदा प्रिन्सेस ऑफ वेल्स (राजकुमारी डायना) ला भेटली. तेव्हा तिने किरणला तिच्या जीवनातल्या अनुभवांवर पुस्तक लिहिण्यास प्रवृत्त केलं. ‘सर्कल ऑफ लाईट’ हेच ते पुस्तक! सद्य परिस्थितीमधलं एका वादग्रस्त आणि ज्वलंत विषयाच्या स्वानुभवाचे बोल म्हणजे हे पुस्तक होय. किरणजीत अहलुवालियाचा हा खटला खरंच खूप वैशिष्ट्यपूर्ण असून, ब्रिटनमध्ये सध्या वास्तव्य करणाऱ्या अनेक स्त्रियांच्या आयुष्यातील लपलेलं भयानक सत्य त्यामुळे उघड झालं आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #CIRCLEOFLIGHT #CIRCLEOFLIGHT #सर्कलऑफलाइट #BIOGRAPHY #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #USHAMAHAJAN #उषामहाजन #RAHILAGUPTA #KIRANJITAHLUWALIA "
Customer Reviews
  • Rating Starसई (पुस्तकप्रेमी समूह)

    ही कथा ज्या स्त्रीभोवती गुंफली आहे, तिला आयुष्याच्या एका टप्प्यावर गुन्हेगार ठरवलं जातं आणि काही वर्षे तुरूंगात काढावी लागतात. तुरूंग ही जागा तिला “माणूस” म्हणून समृद्ध बनवते . एक महिला संघटना तिच्यासाठी समाजात जागरूकता निर्माण करून निकाला चा पुनरविचार कोर्टाला करायला भाग पाडते व तिची या जीवघेण्या जगातून मुक्तता करते ,, ज्यामुळे स्वातंत्र्याचा खरा अर्थ तिला गवसतो. हा झाला सर्वसाधारण गोषवारा. पण हे पार पडताना तिला युगं लोटल्यासारखी वाटली असतील. राहिल गुप्ता ने तिची मुलाखत घेतली आहे , तिला सांभाळून घेत, तिला अधिक त्रास न देता. सुरूवातीला मुलाखत देताना ही काही तपशील तिला कमीजास्त आठवत होते. काही दुःखदायक होते, काही खाजगी , न सांगण्यासारखे होते. पण हळूहळू सगळ्याला सरावत जात , मोकळं होत ती खुलेपणाने बोलू लागते. एक सर्वसाधारण भारतीय संस्कारी घरात जन्माला आलेली मुलगी किशोरावस्थेत तिच्या आईवडिलांना अंतरते. आपल्या भावांच्या प्रेमाच्या छायेत वाढलेली, सुखाच्या राशीत लोळलेली “किरणजीत“ लग्नायोग्य झाल्यावर भावांच्या चिंतेचे कारण बनते. तिला लग्नापेक्षा शिक्षणात रूची असते. तिचं कोणी ऐकत नाही. ती तिच्या भावाकडे जाते तिथे दिपक तिला पहायला येतो. आपल्या व्यक्तिमत्वाने व मधाळ बोलण्याने तो सर्वांची मने जिंकतो . अखेर ‘हो नाही ‘करत त्यांचे लग्न पार पडते. दिपक , त्याची प्रतिमा, त्याचे घर , त्याची माणसे या सगळ्या चित्राला लवकरच मोठे खिंडार पडते ,, तिच्या सगळ्या स्वप्नांची माती होते. अपेक्षा धुळीला मिळतात. दिपक खूपच unpredictable असतो. त्याचा मूड कधी बदलेल, नूर कधी पालटेल, रागाचा पारा कधी चढेलउतरेल,, स्वतःच्याच माणसांना तो कधी चांगलं म्हणेल, त्यांना कधी वाईट बोलेल. त्याच्या घरची माणसेही किरण ला कधी चांगलं म्हणतील, वाईट बोलतील,, सगळंच अवघड आणि विचित्र होऊन बसलेलं होतं. किरण आशेवर दिवस ढकलत होती. लग्न जुनं होऊ लागलं तसं परिस्थिती गंभीर होत होती. जबरदस्तीने तिच्यावर दोन बाळंतपणं लादली गेली. दिपक चा राग अत्याचारांत बदलू लागला होता. तिला ढकलणे, मारणे, केस पकडणे , गालांवर मारणे हे सामान्य होतं . पैशांच्या तंगीमुळे, वाढत्या गरजा भागवण्यासाठी किरण बाहेर पडू लागली, थोडेफार पैसे मिळवू लागली ,,, तसं घरी पैसे कमी देणे, बाहेरख्यालीपणा करणं दिपकचं सुरू झालं . ती खूप सोसते, सहन करते , त्याचं मन वळवण्याचा प्रयत्न करते. दोन दिवस नीट वागून परत “ये रे माझ्या मागल्या” . ती भारताच्या एका ट्रीपमधे इंग्लंडला सासरी न जाण्याचं ठरवते ,,, पण तिच्या माहेरकडची मंडळी तिला समजावून , दिपकला धमकावून परत पाठवतात. एका भांडणात तो तिला इस्त्रीचा चटका देतो चेहरयावर आणि ती प्रक्षुब्ध होऊन उठते. शेवटी ते पाऊल ती उचलते . आणि सगळं संपतं तिला नवऱ्याच्या खुनाच्या आरोपाखाली अटक होते. बाहेरच्या जगात लेक नावे ठेवत असले तरी तुरूंगात तिला सगळे आधार देतात. तू याआधीच असं करायला पाहिजे होतं असं म्हणतात. तिला रीतसर एक वकील मिळते जी तिला मदत करण्याचा प्रयत्न करते पण किरण कोर्टात लाजेमुळं साक्ष देत नाही. जन्मठेपेची शिक्षा होते. किरणचा जीव मुलांसाठी तुटत असतो. तिचे बहीणभाऊ ही प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतात. प्रग्ना पटेल , साउथ हॅाल सिस्टर्सतर्फे ( एशियन स्त्रियांच्या हक्कासाठी लढणारे) तिच्या आयुष्यात आशेचा किरण बनून येते. खूप धडपड, खटपट करून ती तिची केस तयार करते. इकडे तुरूंगात तिची खास मैत्रीण झालेली सारा तिला प्रथितयश वकील मिळवून देते. प्रग्ना तिच्यासाठी जनजागृती करून तिच्या कहाणीला लोकचळवळीचं स्वरूप देते. तिला सर्व स्तरांतून पाठिंबा मिळतो. आधीच्या ज्युरींना तिची केस नीट कळवली च गेली नाही. असा प्रसार होतो. तेव्हा कायद्यात ;मानसिक छळ होऊन,, विचारस्थिती कमकुवत होऊन केला गेलेला एखादा गुन्हा यासंदर्भात तरतूदच नव्हती. पण शेवटच्या सुनावणीत तिची सुटका होते आणि ते जिंकतात. एका हरलेल्या दुःखाच्या क्षणी तिनं सगळं कसं घडवून आणलं हे सांगितलं गेलंय,,,, शेवटी मुलांसोबत ती राहू लागते. खूप अंगांनी विचार करायला लावणारे पुस्तक आहे. तिच्या विचारांची आंदोलनं, कायद्याचे तपशील, घटनांचा क्रम, पात्रांची मांडणी इतकी खोलात जाऊन केलीय की त्याला तोड नाही. “प्रोव्होक्ड” हा ऐश्वर्या राय अभिनित चित्रपट यावर बनवलाय पुस्तक हिमनग आहे आणि हा परिचय तसेच चित्रपटसुद्धा हिमनगाचे टोक आहे. “तुला शिकविन चांगलाच धडा तुझ्या पापांचा भरलाय घडा”” असं म्हणून किरणने जे त्याचे दहन केले , तेव्हा तिला वाटलं पण नसेल कि ती जगप्रसिद्ध होईल आणि ब्रिटिश कायद्यातल्या तरतुदी बदलण्याचं काम करेल. कितीतरी जणींना त्यानंतर तिने प्रेरणा दिलीय. तिची मुलं सुस्थितीत आहेत. तिचं सर्कल ॲाफ लाईट पूर्ण झालंय. सर्वांचे आभार!! ...Read more

  • Rating StarVaibhav Salunke

    कहाणी महिषासुरमर्दिनीची... काही वर्षांपूर्वी(२००७) ‘प्रोव्हेक्ड’ Provoked नावाचा एक सिनेमा येऊन गेला. ऐश्वर्या रॉयने यात प्रमुख भूमिका केली होती. कान्स चित्रपट महोत्सवातही या चित्रपटाची दखल घेतली गेली. असं काय होतं या चित्रपटात? मला टिव्हीवर हा सिनमा बघायला मिळाला. एक भारतीय सुशिक्षित मुलगी जिच्या डोळ्यात लग्नाची, संसाराची अनेक स्वप्ने असतात; ती परदेशात नातेवाईकांकडे जाते काय, तिथलंच एक स्थळ तिच्यासाठी येऊन लग्न पार पडतं काय आणि तिचा संसार सुरू होतो काय? सगळंच कल्पनेतलं वाटावं पण वास्तव. या वास्तवाशी तिचा सामाना होतो तोच नवऱ्याच्या तऱ्हेवाईक स्वभावाचा अनुभव घेत. सासू-सासरे, दीर-नणंद, नवरा अशा एकत्र पद्धतीच्या कुटुंबात ती दाखल होते. नववधूला त्या अनुभवातून, परीक्षेतून जावे लागते. त्याहीपेक्षा कितीतरी अधिक प्रसंग किरणच्या आयुष्यात येतात. नवऱ्याचा सततचा आक्रमक पवित्रा, आरडाओरड, आक्रस्ताळेपणा करण्याचा स्वभाव, हतबल सासू-सासरे, पदरी दोन मुलं असं सगळं किरण सहन करत होती. तिच्यावरचे अन्याय करणारे प्रसंग वाचून डोळ्यात पाणी येते. तब्बल दहा वर्षं किरण आज ना उद्या चांगले बदल होतील या आशेवर छळाचे विष पचवत राहिली. जेव्हा नवऱ्याचे शंभर अपराध भरले शिशुपालांसारखे किरणने त्याला यमसदनी पाठवले. त्याचीच गोष्ट ‘प्रोव्हेक्ड’ मध्ये होती. किरणजीत अहलूवालिया या पंजाबी स्त्रीने सोसलेले चटके या ‘सर्कल ऑफ लाईट’ मधून तुम्हाला वाचायला मिळतील. काही स्त्रियांना पुरुषांकडून अनन्वित छळ सहन करावा लागतो. त्यांच्या सहनशक्तीनुसार त्या सहन करतात. मात्र, कधीतरी तिलासुद्धा रणचंडिकेचा अवतार धारन करावा लागतो. किरणजीतच्या दुर्दैवाचे दशावतार वाचताना तिची बाजू पटते आणि तिने नवऱ्याला निजधामाला पाठवले यात तिचं काहीही चुकलेलं नाही, हे पुन्हा सिद्ध होते. किरणजीतवर खटला चालतो, तिला तुरुंगवासात रहावे लागते; परंतु तिच्या वकिलांनी, मैत्रिणींनी तिच्यावरचा अन्याय जगासमोर आणला. जनमत किरणजीतच्या बाजूने झुकते.किरणजीत अहलुवालियाची कहाणी ही फार भयानक आणि धक्कादायक असली, तरी कहाणीचा शेवट मात्र विजयोत्सवाचा आहे. अतिशय कठीण आणि संकटाच्या परिस्थितीतही जगण्याची दुर्दम्य इच्छा आणि आशावादाचं ज्वलंत उदाहरण म्हणजेच ही जीवनगाथा! भारतातल्या एका सधन कुटुंबात जन्मलेली किरणजीत अहलुवालिया विशेष परिचित नसलेल्या माणसाशी विवाह करण्यास म्हणून १९७९ मध्ये इंग्लंडला आली. ती एक हसरी, खेळकर आणि आशावादी स्वभावाची, सुखी वैवाहिक जीवनाची स्वप्नं रंगवणारी तरुणी होती; परंतु लग्न झाल्याच्या दिवशीच तिच्या लक्षात आलं होतं की कुठेतरी, काहीतरी बिनसलेलं होतं. पुढचा दहा वर्षांचा काळ म्हणजे क्रूर पतीकडून सतत होणारी शारीरिक मारहाण आणि मानसिक छळ असा एखाद्या भयानक स्वप्नाप्रमाणे होता. ती कोणालाही मदतीसाठी विनवू शकत नव्हती. कारण ब्रिटनमधल्या आशियाई वंशाच्या बहुतेक स्त्रिया, कौटुंबिक आणि वैवाहिक अत्याचार हा विषय चर्चिला जाणं, हे निषिद्ध मानतात. घराची इज्जत, अब्रू, घराण्याचं नाव यालाच प्रमुख महत्त्व दिलं जातं. अनन्वीत छळामुळे आणि अत्याचारांनी ग्रस्त झालेल्या, सहनशक्तीची सीमा संपलेल्या किरणजीतनं तिला जगणं नकोसं करून सोडणाऱ्या नवऱ्याला १९८९ मध्ये शेवटी मारून टाकलं. खटल्याच्या कामकाजातलं तिला विशेष असं काही समजायचं नाही. अखेरीस खुनाच्या आरोपावरून दोषी ठरवून तिला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. नंतर ‘साऊथहॉल ब्लॅक सिस्टर्स’ या बेताच्या आर्थिक मदतीवर चालणाऱ्या संघटनेने चळवळ सुरू करून तिच्या खटल्याच्या कामातील त्रुटी आणि उणिवा जनतेसमोर आणल्या. तिच्या खटल्याने देशभराचं लक्ष वेधून घेतलं आणि शेवटी १९९२ मध्ये तिची सुटका झाली. सुटका झाल्यानंतर किरणजीत एकदा प्रिन्सेस ऑफ वेल्स (राजकुमारी डायना) ला भेटली. तेव्हा तिने किरणला तिच्या जीवनातल्या अनुभवांवर पुस्तक लिहिण्यास प्रवृत्त केलं. ‘सर्कल ऑफ लाईट’ हेच ते पुस्तक! सद्य परिस्थितीमधलं एका वादग्रस्त आणि ज्वलंत विषयाच्या स्वानुभवाचे बोल म्हणजे हे पुस्तक होय. किरणजीत अहलुवालियाचा हा खटला खरंच खूप वैशिष्ट्यपूर्ण असून, ब्रिटनमध्ये सध्या वास्तव्य करणाऱ्या अनेक स्त्रियांच्या आयुष्यातील लपलेलं भयानक सत्य त्यामुळे उघड झालं आहे. ...Read more

  • Rating StarSandeep Chavan

    मी वाचले हे पुस्तक कौटुंबिक हिंसाचार कोणत्या थराला जाऊ शकतो याचे हे एक उदाहरण आहे काही लोक देश सोडून परदेशात गेले तरी त्यांची रूढी परंपरावादी भारतीय मानसिकता सहजासहजी बदलत नाही हे या घटनेतून दिसते

  • Rating StarEknath Marathe

    सधन कुटुंबात वाढलेली, शिकलेली किरण लंडन मध्ये जातीतल्या तरुणाशी साग्रसंगीत विवाह करते. लग्न झाल्यावर तिचा नवरा , दीपक आपला मूळ रंग दाखवतो. सतत 10 वर्षे तिचा तो सर्व प्रकारे अनन्वित छळ करतो. "खानदान की इज्जत" व दोन लहान मुले सांभाळण्यासाठी ती हे सर्व हन करते. पण एक दिवस या सगळ्याचा कडेलोट होतो व ती नवऱ्याला अद्दल घडवायचा निश्चय करते. त्याचे पाय जाळून त्याला वेदना म्हणजे काय ते दाखवून देण्याच्या तिच्या प्रयत्नात नवरा जळून मरतो व तिच्यावर कट करून नवऱ्याला ठार केल्याचा आरोप सिद्ध होतो व जन्मठेप, 25 वर्षे कारावासाची शिक्षा, ठोठावली जाते. नवऱ्याच्या छळाला बळी पडलेल्या स्त्रियांसाठी लढणाऱ्या संघटना , तिची कहाणी ऐकल्यावर तिला न्याय मिळावा म्हणून लढा उभारतात. त्यासाठी खूप मोठी मोहीम उघडतात. सरकारला या संपूर्ण प्रकरणाचा फेरविचार करण्यास भाग पाडतात. किरणने केलेला नवऱ्याचा खून हा कट नसून त्याने तिच्या वर सतत केलेल्या अत्याचाराचा परिपाक आहे हे अनेक अंगांनी सिद्ध करतात. शेवटी किरणची मुक्तता होते. हा सर्व अनुभव किरणने लिहून काढलेला आहे. नव-याकडून होणारा स्त्रीचा छळ, "खानदान ची इज्जत" सांभाळण्याची तिच्यावर समाजाने टाकलेली सांस्कृतिक जबाबदारी, छळ करणाऱ्याची व तो सहन करणारा मानसिकता, यासंबंधी असलेले सामाजिक कायदे कानून, सरकार व न्यायालयांची या संबंधातली भूमिका, कायद्याचे कंगोरे या सर्व अंगावर पुस्तकात सविस्तर प्रकाश टाकलेला आहे. जरूर वाचावे असे पुस्तक. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

NAGZIRA
NAGZIRA by VYANKATESH MADGULKAR Rating Star
कृष्णा DIWATE

आजच्या पुस्तकाचा विषय माझ्या आवडीचा - जंगलाचा... *जंगल - काय असतं ?* म्हटलं तर फक्त झाडे, नदी-नाले, प्राणी पक्षी यांनी भरलेला जमिनीचा एक तुकडा .... की वन-देवता? की पशु-पक्ष्यांचं घर? की जीवनचक्रातील अति-महत्वाचा घटक? की आपल्यातल्या दांभिकपणाला - दिखव्याला - व्यवहाराला गाळून टाकणारं आणि आपल्यालाही त्याच्यासारखाच सर्वसमावेशक, निर्मळ बनवणारं आणि आपल्यातल्या originality ला बाहेर आणणारं, असं एक अजब रसायन? *जंगल भटक्यांना विचारा एकदा... बोलतानाच त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात जी चमक दिसेल ना, त्यातून फार वेळ वाट न बघता सरळ जंगल गाठण्याची इच्छा न होईल तरच नवल!* आमचा एक मित्र- ज्याने असंच जंगलांचं वेड लावलं आणि अजून एक भटकी मैत्रीण - जिने त्या वेडात भरच घातली..... आणि असे अजून अनेक भटके निसर्गप्रेमी ... आणि मुळातूनच निसर्गाची ओढ , या सर्व गोष्टी माझ्या जंगल -प्रेमासाठी कारणीभूत ठरल्या. *आणि मग अरण्यऋषी श्री. मारुती चितमपल्ली, शंकर पाटील (कथा), डॉ. सलीम अली, जिम कॉर्बेट, व्यंकटेश माडगूळकर इत्यादींनी या निसर्गदेवतेकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी दिली. त्या सर्वांनाच आजचा हा पुस्तक-परिचय सादर अर्पण!!* कथांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लेखकाने हे नागझिरा पुस्तक का बरे लिहिले असावे? मनोगतात ते स्वतः म्हणतात - *"महाराष्ट्रातील एखाद्या आडबाजूच्या जंगलात जाऊन महिना दोन महिने राहावे, प्राणी जीवन, पक्षी जीवन, झाडेझुडे पाहत मनमुराद भटकावे आणि या अनुभवाला शब्दरूप द्यावे हा विचार गेली काही वर्षे माझ्या मनात घोळत होता. काही परदेशी प्राणी शास्त्रज्ञांनी असा उद्योग करून लिहिलेली उत्तम पुस्तके माझ्या वाचण्यात आल्यापासून ही इच्छा फारच बळवली. मी इथे तिथे प्रयत्न करून पाहिले आणि निराश झालो. हे काम आपल्या आवाक्यातले नाही असे वाटले. मग शेल्लरने कुठेतरी लिहिल्याचे वाचले की भारतातील लोक प्राणी जीवनाच्या अभ्यासात उदासीन आहेत, आफ्रिकेच्याही फार मागे आहेत. त्यांना वाटते अशा संशोधनासाठी प्रचंड खर्च करावा लागतो, पाण्यासारखा पैसा लागतो. पण तसे नाही. गळ्यात दुर्बीण, मनात अमाप उत्साह आणि आस्था असली की अभ्यास होतो. मी शक्य तेव्हा एकट्यानेच उठून थोडेफार काम करत राहायचे ठरवले. कधी काझीरंगा, मानस या अभयारण्यावर, कधी नवेगाव-बांधावर तर कधी कोरेगावच्या मोरावर लिहित राहिलो.* *मला चांगली जाणीव आहे की हा प्रयत्न नवशिक्याचा आहे. तो अपुरा आहे, भरघोस नाही. त्यात बऱ्याच त्रुटी आहेत, पण नव्या रानात शिरण्यासाठी पहिल्यांदा कोणीतरी वाट पाडावी लागते. पुढे त्या वाटेने ये-जा सुरू होते. मी लहानशी वाट पाडली आहे एवढेच!"* लेखक आत्ता असते तर त्यांना नक्की सांगितले असते की तुम्ही पाडलेली पायवाट आता जवळ-पास राजमार्ग बनत चालली आहे. आज अनेक वन्य-जीव अभ्यासक, जंगल भटके सुजाण व सतर्क झाले आहेत, जंगले आणि प्राणी वाचले पाहिजेत यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ह्या प्रयत्नांमागे लेखकासारख्या अनेक वनांचा अभ्यास करून ते आपल्यासमोर आणणाऱ्यांचा मोठा हात आहे. आज पक्षी-निरीक्षक किरण पुरंदरेंसारखे व्यक्ती शहरातील सगळा गाशा गुंडाळून जंगलात राहायला गेलेत ... काय नक्की thought -process झाली असेल त्यांची? फक्त जंगल-भटकंती करताना पाळावयाचे नियम अत्यंत महत्वाचे आहे. मुख्यत्वे-करून कुठल्याही वृक्षांचे, प्राणी-पक्ष्यांचे आपल्या असण्याने कुठलाही त्रास किंवा धोका - हानी संभवू नये, याची काळजी आपल्यासारख्या सुज्ञ भटक्यांनी नक्की घ्यावी. तरच हे भटकणे आनंद-दायी होईल. *भंडारा जिल्यातील नागझिरा हे एक अभयारण्य! फार सुंदर आहे.* हे पुस्तक फक्त लेखकाच्या दृष्टीने त्यांना भावलेलं जंगल आहे का? फक्त जंगलाचं वर्णन आहे का? तर नाही. एक पट्टीचा कथालेखक आणि मानव-स्वभाव चितारणारा लेखक केवळ वर्णन करू शकत नाही. माझ्या मते ही एक प्रक्रिया आहे, त्यांच्या अंतर्बाह्य बदलाची, जी त्यांना जाणवली, अगदी प्रकर्षाने. आणि तोच स्वतःचा शोध त्यांनी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. बाकी प्रत्येकाचं जंगल वेगळं, खरं जंगल नाही तर स्वतःच्या आतलं एक जंगल. ते ज्याचं त्याने शोधायचं, त्यात डुंबायच, विहार करायचा आणि काही गवसत का ते बघायचं .... लेखकानेही तेच केलं... एक स्वगत मांडलं आहे.... आणि त्यातून संवादही साधला आहे. हे पुस्तक ललित म्हणावे की कादंबरी, वर्णन म्हणावे की आत्मकथन, अशा हिंदोळ्यावर हे वाचताना मी सतत राहते. अतिशय आशयपूर्ण गहिऱ्या अर्थाचे लिखाण आहे यात. लेखकाने नागझिरा आणि त्याचे वर्णन कसे केले आहे ते आपण रसिक वाचकांनी हे पुस्तक वाचूनच त्याचा आनंद घ्यावा. ते इथे मी सांगत बसणार नाही, उगाच तुमचं आनंद का हिरावून घेऊ? मी इथे मला भावलेले लेखकच मांडण्याचा अल्पसा प्रयत्न करत आहे, ते ही या पुस्तकाच्या माध्यमातून... पहिल्याच पानावर ते काय लिहितात बघा - *"गरजा शक्य तेवढ्या कमी करायच्या, दोनच वेळा साधे जेवण घ्यायचे, त्यात पदार्थ सुद्धा दोन किंवा तीनच. स्वतःचे कामे स्वतःच करायची. पाणी आणणे, कपडे धुणे अंथरून टाकणे आणि काढणे या साध्या सुध्या गोष्टींसाठी माणसांनी दुसऱ्यावर का अवलंबून राहावे? एकांत, स्वावलंबन आणि प्रत्येक बाबतीत मितव्यय ही त्रिसूत्री पाळून जंगलात पायी भटकायचे, जंगलाच्या कुशीत राहून निरागस असा आनंद लुटायचा या माफक अपेक्षेने गेलो आणि माझा काळ फार आनंदत गेला . रेडिओ, वृत्तपत्रे, वाङ्मय चर्चा, वाचन, कुटुंब, मित्र, दुसऱ्याच्या घरी जाणे येणे, जेवण देणे आणि घेणे यापैकी काहीही नसताना कधी कंटाळा आला नाही. करमत नाही असे झाले नाही. रोज गाढ झोप आली. स्वप्न पडले असतील तर ती सकाळी आठवली नाही. शिवाय मित आहार आणि पायी हिंडणे यामुळे चरबी झडली. एकूणच मांद्य कमी झाले."* हे वाचून आपल्याला नक्की काय हवे असते, आणि रोजच्या रहाटगाडग्यात आपण काय करतो, याची मनातल्या मनात तुलना व्हावी. खरंच काय हवं असतं आपल्याला? आपण सतत प्रेम, शांती, समाधान आणि मनःशांती याच्याच तर शोधात असतो ना? आणि नेमक्या ह्याच सर्व गोष्टी बाजूला पडून आपण नुसते धावतच असतो... कशासाठी?? जीवनाचं तत्वज्ञान हे फार गंभीर नाहीये, अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून आपण ते समजून घेऊन शकतो. फक्त ती जाण असली पाहिजे. थोडासा थांबून विचार झाला पाहिजे. मनःचक्षु उघडे पाहिजे आणि मुख्य म्हणजे मी कुणीतरी मोठा , हा भाव पहिल्यांदा गाळून पडला पाहिजे. *अगदी तसंच जसं पानगळीच्या मोसमात जुनं पान अगदी सहज गळून पडतं ... नव्यासाठी जागा करून देतं ... जंगल आपल्याला हेच शिकवतं ... न बोलता ... त्याच्या कृतीतून ... आपली ते समजून घेण्याची कुवत आहे का?* शेवटच्या प्रकरणात लेखक परतीसाठी रेल्वे फलाटावर येतो. तेव्हाचचं त्यांचं स्वगत फार विचार करायला भाग पाडतं - *"ह्या दोन तासात करण्याजोगे असे काहीच महत्त्वाचे कार्य नसल्यामुळे मी आरशासमोर बसून दाढी केली, मिशा काढून टाकल्या. सतत अंगावर होते ते हिरवे कपडे काढून टाकले आणि इतके दिवस माझ्या कातडी पिशवीच्या तळाशी परिटघडी राहिलेले झुळझुळीत कपडे चढवून पोशाखी बनलो.`* किती साधी वाक्य आहेत, पण `पोशाखी बनलो` यातून किती काय काय सांगायचे आहे लेखकाला... गहिरेपण जाणवते! मला विचार करायला भाग पाडते. ट्रेक करून गड -किल्ल्यांहून परतताना माझीही अवस्था काहीशी अशीच व्हायची... जाड पावलांनी घरी परतणे आणि पुन्हा निसर्गात भटकायला मिळण्याची वाट पाहणे, याशिवाय गत्यंतर नसायचे. *जंगलांवर , निसर्गावर निस्सीम प्रेम करणाऱ्या आणि त्यांच्या संवर्धनासाठी झटणाऱ्या अनेक वेड्यांमुळे आज आपली वसुंधरा टिकली आहे. पुढील पिढ्यांसाठी तिला असच बहरत ठेवायचं असेल, किमान टिकवायचं जरी असेल तरी आपणही थोडेसे निसर्ग-वेडे व्हायला काय हरकत आहे??* *वृक्षवल्ली आम्हा सोयरे... वनचरे ...* धन्यवाद! जय हिंद!!! ...Read more