* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MOONG OVER MICROCHIPS:ADVENTURES OF A TECHIE-TURNED-FARMER
  • Availability : Available
  • Translators : DEEPAK KULKARNI
  • ISBN : 9789353173043
  • Edition : 1
  • Publishing Year : AUGUST 2019
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 212
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
  • Sub Category : BUSINESS, INDUSTRY, SPORTS
  • Available in Combos :KISAN DIWAS OFFER
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
VENKAT IYER WAS LIVING A FAST-PACED LIFE IN THE IT WORLD IN MUMBAI WHEN HE DECIDED TO STOP AND TAKE A LONG, HARD LOOK AT WHERE HE WAS HEADED. DISHEARTENED BY HIS STRESSFUL EXISTENCE IN THE CITY, HE DECIDED TO GIVE IT ALL UP AND TAKE UP ORGANIC FARMING IN A SMALL VILLAGE NEAR MUMBAI. BUT IT WASN`T EASY. WITH NO EXPERIENCE IN AGRICULTURE, HIS JOURNEY WAS FRAUGHT WITH UNCERTAINTY. HE SOON WENT FROM NEGOTIATING TOUGH CLIENTS, STRICT DEADLINES AND TRAFFIC TO LOOKING FORWARD TO HIS FIRST BUMPER CROP OF MOONG. AS HE BATTLED ERRATIC WEATHER CONDITIONS AND STUBBORN FARM ANIMALS, HE DISCOVERED A WORLD WITH FRESH AIR AND ORGANIC FOOD, ONE WHERE HE COULD LEAD A MORE WHOLESOME EXISTENCE. AT TIMES HILARIOUS, AND OTHER TIMES PROFOUND, THIS BOOK FOLLOWS HIS EXTRAORDINARY STORY.
मुंबईतलं धकाधकीचं आयुष्य..अन् आयटीतील सहा आकडी पगाराची नोकरी..एकीकडे प्रलोभन तर दुसरीकडं तणावाचा कहर..या सगळ्यालाच रामराम ठोकण्याचा वेंकट अय्यर यांनी धाडसी निर्णय घेतला. शेतीतलं गमभन..ही माहिती नसताना त्यांनी काळ्या मातीतली अद्याक्षरं गिरवायला सुरुवात केली. आणि त्यातून साकारली समकालीन जगण्याला अत्यावश्यक असणारी एक प्रेरणादायी कहाणी...

No Records Found
No Records Found
Keywords
#CORPORATELA RAMRAM SHETILA SALAM #MOONG OVER MICROCHIPS #VENKAT IYER #DEEPAK KULKARNI #CORPORATE LIFE #INOVATIVE FARMING #ORGANIC FARMING #FARMING AT PALGHAR
Customer Reviews
  • Rating StarMakarand Ketkar

    I read the book with great Interest. Content is ultimate. Lot of things to learn. I got a feeling as if i am reading the original story not a translation. Very Pure Marathi. Many people will like it. I have discussed the book during my Book Club meting & all have liked the same. Kindly convey my message to Deepak Kulkarni about the quality of Translation. ...Read more

  • Rating Starलोकमत १७-११-१९

    अभिनव प्रयोगाचा प्रवास... स्वत:च्या आयुष्याची वाट निवडायची संधी खूप कमी लोकांना मिळते. त्यानंतर स्वीकारलेल्या संधीला न्याय देण्याची जबाबदारी मात्र पूर्णत: तुमची होऊन जाते. मुंबईच्या आयटी क्षेत्रात धावपळीचे, ताणतणावयुक्त आयुष्य जगत असताना आर्थिकदृष्टा सक्षम झालेल्या पण कुठेतरी शांतता, आनंद, शरीरस्वास्थ्यापासून दुरावत चाललेल्या एका माणसाची जीवनाला कलाटणी आणि प्रफुल्लित करणारी गोष्ट म्हणजे कॉर्पोरेट क्षेत्राला रामराम,शेतीला सलाम हे पुस्तक आहे. वेंकट अय्यरलिखित या पुस्तकात आयटीक्षेत्रातील नोकरी ते मुंबईजवळील एका खेडयात जात तिथे सेंद्रिय शेती प्रवास शब्दबद्ध करण्यात आला आहे. लहरी हवामान आणि अनेक अडथळ्यांचा सामना करीत अय्यर यांनी निर्मिती केलेल्या एका विश्वाशी आपण पुस्तकाच्या रूपाने जोडले जातो. - दीपक कुलकर्णी ...Read more

  • Rating Starलोकसत्ता | October 27, 2019

    कॉर्पोरेटमधील अधिकारी ते शेतकरी ! ग्रामीण सांस्कृतिक जीवन, खेडय़ातील स्वयंपूर्ण अर्थव्यवस्था याबद्दलचं अनुभवपर भाष्य या पुस्तकात केलेलं आहे... मोठय़ा कॉर्पोरेट कंपनीतली तगडय़ा पगाराची नोकरी सोडून शेतीकडे वळलेल्या आणि पुढे ग्रामीण जीवनपद्धतीतच रममाण झाेल्या वेंकट अय्यर यांची ही कहाणी दीपक कुळकर्णी यांनी अनुवादित केली आहे. आयबीएमसारख्या कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी असलेले अय्यर शहरातली वाढती गर्दी, कॉर्पोरेटमधली स्पर्धा, धकाधकीचं जीवन यामुळे चिंतित झाले होते. अशा वातावरणापासून दूर जाण्यासाठी त्यांनी नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या, मात्र आपल्या निर्णयावर ठाम असलेले अय्यर नव्या आव्हानांसाठी सज्ज होते. नोकरी सोडल्यानंतर त्यांनी शेतजमीन विकत घेतली. त्या जमिनीची मशागत, संपूर्णपणे रसायनविरहित शेती करताना येणाऱ्या अडचणी, बदलत्या हवामानाचा पिकावर होणारा परिणाम अशा कित्येक गोष्टी या पुस्तकात सविस्तरपणे सांगितल्या आहेत. तसेच ग्रामीण सांस्कृतिक जीवन, खेडय़ातील स्वयंपूर्ण अर्थव्यवस्था याबद्दलचं अनुभवपर भाष्य या पुस्तकात केलेलं आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more