* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CRISIS
  • Availability : Available
  • Translators : PRAMOD JOGLEKAR
  • ISBN : 9788184980998
  • Edition : 1
  • Publishing Year : FEBRUARY 2010
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 392
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :PRAMOD JOGLEKAR COMBO SET - 29 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
WHEN DR. CRAIG BOWMAN IS SERVED WITH A SUMMONS FOR MEDICAL MALPRACTICE, HE`S SHOCKED, ENRAGED, AND MORE THAN A LITTLE HUMILIATED. A DEVOTED PHYSICIAN WHO WORKS CONTINUOUSLY IN THE SERVICE OF OTHERS, HE ENDURED GRUELING YEARS OF TRAINING AND IS NOW A PARTNER IN AN EXCLUSIVE CONCIERGE MEDICAL PRACTICE. NO LONGER FORCED TO SEE MORE AND MORE PATIENTS WHILE SPENDING LESS AND LESS TIME WITH EACH ONE JUST TO KEEP HIS OFFICE DOOR OPEN, HE NOW PROVIDES THE KIND OF MEDICAL CARE HE IS TRAINED TO DO, LAVISHING TWENTY-FOUR-HOUR AVAILABILITY AND PERSONALIZED ATTENTION ON HIS HANDPICKED PATIENTS. AND AT LAST, HE IS EARNING A SIGNIFICANT INCOME, NO LONGER BURDENED BY FALLING REIMBURSEMENTS FROM INSURANCE COMPANIES. BUT THIS IDYLLIC PRACTICE COMES TO A GRINDING HALT ONE SUNNY AFTERNOON-AND GETS MUCH, MUCH WORSE. ENTER DR. JACK STAPLETON, A MEDICAL EXAMINER IN NEW YORK CITY AND BOWMAN`S BROTHER-IN-LAW: JACK`S SISTER ALEXIS-NOW CRAIG`S ESTRANGED WIFE-TEARFULLY BEGS FOR HIS HELP AS HER HUSBAND`S TRIAL DRAGS ON. JACK AGREES TO TRAVEL TO BOSTON TO OFFER HIS FORENSIC SERVICES AND EXPERT WITNESS EXPERIENCE TO CRAIG`S BELEAGUERED DEFENSE ATTORNEY. BUT WHEN JACK`S IRREVERENT SUGGESTION TO EXHUME THE CORPSE TO DISPROVE THE ALLEGED MALPRACTICE IS TAKEN SERIOUSLY, HE OPENS A PANDORA`S BOX OF TROUBLE. AS CRAIG BOWMAN`S LIFE AND CAREER ARE PUT ON THE LINE, JACK IS ON THE VERGE OF MAKING A MOST UNWELCOME DISCOVERY OF TREMENDOUS LEGAL AND MEDICAL SIGNIFICANCE-AND THERE ARE PEOPLE WHO WILL DO ANYTHING TO KEEP HIM FROM LEARNING THE TRUTH.
क्रेग बोमन या निष्णात हृदयरोगतज्ज्ञावर, हलगर्जीपणा केल्यानं, रुग्णाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल खटला सुरू होतो. स्वत:चं लग्न अवघ्या दोन दिवसांवर आलं असताना, केवळ बहिणीचा संसार वाचावा म्हणून,वैद्यकीय तपासनीस असणारा जॅक स्टेपलटन क्रेगच्या मदतीस सरसावतो. सत्य उघडकीस आणण्यासाठी तो अनेक महिन्यांपूर्वी दफन केलेल्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्याचा धाडसी निर्णय घेतो. धमक्यांचा सामना करत, जिवावर उदार होऊन जॅक हे काम पार पाडतो. पण त्यामधून बाहेर आलेलं सत्य फारच भयंकर निघतं...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #प्रमोदजोगळेकर #रोबिनकुक #COMA #TOXIN #SONS OF FORTUNE #FALSE IMPRESSION #CONTAGION #SEIZURE #CRISIS #CRITICAL #NOT A PENNY MORE, NOT A PENNY LESS #MARKER #कोमा #टॉक्सिन #कन्टेजन #सीजर #क्रायसिस #क्रिटिकल #मार्कर "
Customer Reviews
  • Rating StarVIKAS MAHAMUNI, PUNE

    या पुस्तकात `कन्सियर्ज मेडिसिन` वा `रिटेनर मेडिसिन` येत नावाने ओळखल्या जाणार्या वैद्यकीय पध्दतीमध्ये काय घडू शकेल यावरती भाष्य केलेले आहे. या पध्दतीला आपणास वैयक्तिक वैद्यकीय सेवा तेही चोवीस तास कधीही ऊपलब्ध राहतात पण त्यासाठी भलेमोठे शुल्क आकारण्यातयेते. यासंदर्भात विस्ताराने लेखकाच्या मनोगतामध्ये विवरण केलेले आहे. कथेची सुरवातच डॉ. क्रेग बोमन आपल्या स्फोटक, मादक सेक्रेटरी कम नर्स मैत्रिणीबरोबर एका कार्यक्रमाला जाण्याची तयारी करत असतो. तेवढ्यात डॉ. क्रेग यांना त्यांच्या एका स्त्री पेशंटची प्रकृती गंभीर असल्याचा फोन येतो. ही स्त्री पेशंट नेहमीच आपल्याला काहीतरी आजार झालाय अश्या मानसिकतेत वावरत असते, वैद्यकीय भाषेत याला हायपोकाॅन्ड्रियिक पेशंट म्हणून ओळखतात. डॉ. क्रेग सकाळीच जाऊन नित्यक्रम तपासणी करून आलेले असतात. फोनवरती डॉ. क्रेग स्त्री पेशंटच्या नवर्याला खुप सारे प्रश्न विचारतात. आता काय,लक्षणे आहेत सकाळपासून कसे वाटत होते, त्रास कधीपासून जाणवत आहे, आत्ता नक्की काय होत आहे पोटात दुखत आहे का, वेदना हातातही आहेत का? श्वास घेता येतोय का ? सांगीतलेल्या चाचण्या करून घेतल्या होत्या का ? व सर्व विचाराअंती ह्रदयविकाराचा झटका असू शकतो हा आडाखा बांधतात व त्याबरहुकूम उपचारार्थ साहित्य घेऊन लगेच रवाना होतात. तेथे गेल्यावर आधी नाडी तपासतात, ती खुपच कमी लागते. रक्तदाब तपासतात, स्टेथोस्कोपने ह्रदयाचे ठोके तपासताक्षणी ईसीजी यंत्र चालू करतात, ईसीजी आवेख पाहून, पेशंट सायटाॅनिक झाली म्हणतात म्हणजेच ऑक्सिजनची कमतरता. लगेच रक्ताचे नमुने घेऊन पटकन बायोमार्कर ऑसे चाचणी घेतात, त्यांचा अंदाज खरा ठरतो. कृत्रिम श्वसन व सलाईन सुरू करतात त्यात ईपिनेफ्राईन व ॲट्रोपीनची इंजेक्शन सोडतात. पेशंट अत्यावस्थ अवस्थेत असतो, तातडीने प्रथमोपचार सुरू करून ते रूग्णावाहीकेला पाचारण करतात. पेशंटला लवकरात लवकर रूग्णालयात दाखल करण्यात येते, पेसर मशीन लावण्यात येते पण पेशंटचे ह्रदय प्रतिसाद देत नाही. छातीवर दाब देऊन ह्रदय चालू होत आहे का हेही पाहिले जाते. पण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतानाच तिचा मृत्यू होती. हे सर्व स्त्री पेशंटच्या नवर्याला कळविण्यात येते व मृत्युनंतर नोंद ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यु अशी केली जाते. पुढे पुस्तकात डॉ .जॅक स्टेपलटन यांच्याबाबत विस्तृत माहिती आहे. ते न्यूयॉर्क शहरातील नावाजलेले वैद्यकीय तपासनीस आहे. या ओळखीत डॉ .जॅक स्टेपलटन यांची तर्कसुसंगत विचारसणीचा प्रत्यय येतो, चुणूक दिसून येतो. डॉ .जॅक स्टेपलटन फोनवरति केसची माहीती घेत असतानाचे जे ठोकताळे मांडतात ते ऐकून आपल्याला शेरलॉक होम्सचीच आठवण येते. पण आता आपणास प्रश्न पडतो की डॉ .जॅक स्टेपलटन आणी डॉ. क्रेग बोमनचा काय संबंध आहे? कथा जसेजसे पुढे सरकते याचा उलगडा होत जातो. तब्बल आठ महिन्यानंतर डॉ. क्रेग बोमनवर मृत स्त्रीच्या नवर्याकडून अयोग्य पद्धतीने उपचार केल्याबद्दल दावा ठोकला जातो. त्याची केस कोर्टात सोमवारी उभी राहणार असते आणि शुक्रवारी संपणार असते. क्रेगची बायको अलेक्सी आपल्या भावाला मदतीला बोलावते. हा भाऊ म्हणजेच डॉ .जॅक स्टेपलटन न्यूयॉर्क शहरातील नावाजलेले प्रथितयश वैद्यकीय तपासनीस. आणि भरीस भर म्हणजेच नेमके त्याच शुक्रवारी डॉ .जॅक स्टेपलटन यांचे लग्न असते. तरीही तो आपल्या बहिणीला मदत करण्यासाठी बोस्टनला पोचतो आणि आठ महिन्यांपूर्वी दफन केलेल्या त्या स्त्रीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करायचा निर्णय घेतो. सर्वच प्रसंग इत्थंभूत व तपशीलवार नमूद केले आहेत असे वाटते की आपणासमोर हे घडत आहेत आपण त्या प्रसंगाचा अविभाज्य भाग आहोत. जॅक परिस्थितीजन्य व नोंदल्या गेलेल्या साक्षी याचा सखोल अभ्यास करतो आणी त्याला ऊमजते की पेशंटचे पोस्टमार्टम झालेलेच नाही, त्याचबरोबर तो क्रेगला काहि प्रश्न विचारून भंडावून सोडतो. आणी त्यातूनच केसमध्ये नवीन पैलूंवर प्रकाश पडतो. पेशंट वरती विषप्रयोग तर झाला नसेल अथवा पेशंटने टेस्ट का नाही केल्या तेही विचार करतो. तो क्रेगला पेशंटचे पोस्टमार्टम करायचे की नाही यावरती विचार करायला लावतो. शवविच्छेदन करण्यासाठीची सर्व माहीती जॅक गोळा करतो व कामाला लागतो. शवविच्छेदन करू नये यासाठी त्याला धमक्या येतात. त्याच्यावर प्राणघातक हल्ला होतो. शवविच्छेदन करायला विरोध करत असलेले कोण आहेत? तरीही जॅक हे कार्य पार पाडतो आणि हाती आलेले रिपोर्टपाहून चक्रावून जातो. काय आहे त्या रिपोर्ट मध्ये...? डॉ क्रेग खरोखरच निर्दोष आहेत का ...? यामागे कोणते षडयंत्र आहे ....? सर्वात महत्वाचे म्हणजे डॉ. जॅक स्वतः च्या लग्नाला वेळेवर उपस्थित राहू शकतील का ....? अखेरच्या पानापर्यंत उत्कंठा शिगेस पोहोचवणारे हे पुस्तक आहे. ...Read more

  • Rating StarKiran Borkar‎

    डॉ. क्रेग बोमन आपल्या मादक मैत्रिणीबरोबर एका कार्यक्रमाला जाण्याची तयारी करत होता इतक्यात त्याच्या एका स्त्री पेशंटची प्रकृती गंभीर असल्याचा फोन आला.तो ताबडतोब आपल्या मैत्रिणीला घेऊन त्या पेशंटच्या घरी गेला तिथून त्याने तिची तपासणी करून हॉस्पिटलमध्येऍडमिट करण्याची सूचना केली .पण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करताच तिचा मृत्यू झाला .आठ महिन्यानंतर डॉ. क्रेग बोमनवर मृत स्त्रीच्या नवर्याने अयोग्य पद्धतीने उपचार केल्याबद्दल दावा ठोकला.त्याची केस कोर्टात सोमवारी उभी राहिली आणि शुक्रवारी संपणार आहे . क्रेगची बायको अलेक्सीने आपल्या भावाला मदतीला बोलावले . डॉ .जॅक स्टेपलटन न्यूयॉर्क शहरात वैद्यकीय तपासनीस आहे आणि नेमके शुक्रवारी त्याचे लग्न आहे .तरीही तो आपल्या बहिणीला मदत करण्यासाठी बोस्टनला पोचतो आणि आठ महिन्यांपूर्वी दफन केलेल्या त्या स्त्रीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करायचा निर्णय घेतो . शवविच्छेदन करू नये यासाठी त्याला धमक्या येतात. त्याच्यावर प्राणघातक हल्ला होतो. तरीही तो हे कार्य पार पाडतो आणि हाती आलेले रिपोर्टपाहून चक्रावून जातो. काय आहे त्या रिपोर्ट मध्ये...???? डॉ क्रेग खरोखरच निर्दोष आहे का ...?? यामागे कोणते षडयंत्र आहे ....?? सर्वात महत्वाचे म्हणजे डॉ. जॅक स्वतः च्या लग्नाला वेळेवर उपस्थित राहू शकतील का ....?? अखेरच्या पानापर्यंत उत्कंठा वाढविणारे पुस्तक . ...Read more

  • Rating StarSANJWARTA 11-4-2010

    रॉबिन कुक यांनी वैद्यकीय सत्य आणि कल्पनाशक्ती याच्या संयोगाने वैद्यकीय क्षेत्रातील रोमांचक आणि नैतिक प्रश्नाची जाणीव करून देणाऱ्या कथा-कादंबऱयांची मालिका लिहिली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील गैरप्रकार, औषध संशोधन, अवयवरोपन, जैवअभियांत्रिकी जननक्षमतेवर उपय अशा विषयांचा वेध घेतला आहे. त्यांच्या कादंबऱयांमुळे देशात वादळे उठली आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील नीती-अनीतीच्या संकल्पना आणि त्याचे बाजारू बाजारू स्वरूप याचे थेट चित्रण रॉबिन कुक यांच्या लिखाणातून येत राहते. स्टेम सेलसारख्या अपरिचित विषयांवर त्यांनी केलेले लिखाण वाचकांचे रंजन करण्याबरोबर त्या विषयाची माहितीही देत राहते. आपल्या पुस्तकांच्या लोकप्रियतेचे आणि तुफान खपाचे रहस्य सांगताना ते म्हणतात, ‘आपण सगळेच असुरक्षित आहोत आणि कधी ना कधी आपण पेशंट असणार आहोत.’ वैद्यकीय क्षेत्रातील घटनांचा थेट मुळाशी जाऊन घेतलेला धांडोळा त्यांच्या ‘क्रायसिस’ या कादंबरीतून दिसून येतो. यापूर्वी ‘कंटेजन’, ‘टॉक्सिन’, ‘सिझर’, ‘क्रोमोझोम-६’ आणि ‘कोमा’ या कुक यांच्या कादंबऱ्या मराठीत आल्या आहेत. यापूर्वी इंग्रजीमध्ये त्यांच्या २५ कादंबऱ्या प्रकाशित झाल्या असून इंग्रजी वाचकांमध्ये त्या कमालीच्या लोकप्रिय आहेत. ‘क्रायसिस’मध्ये क्रेग बोमन हा निष्णात हृदयरोगतज्ज्ञ आहे. त्याच्यावर हलगर्जीपणा केल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाला असा आरोप येतो. नंतर खटला सुरू होतो. यानंतर कादंबरीला वेगळे वळण लागते. बोमनचा मदतनीस जॅक स्टेपलटन त्याच्या मदतीसाठी येतो. त्याचे स्वतःचे लग्न केवळ दोन दिवसांवर आलेले असते. परंतु बहिणीचा संसार वाचावा म्हणजेच बोमन आरोपातून निरपराध असल्याचे सिद्ध व्हावे यासाठी तो कसोशीने प्रयत्न करू लागतो. ज्या रुग्णाचा मृत्यू बोमनमुळे झाला त्या रुग्णाचे अनेक महिन्यांपूर्वी दफन केलेले शव पुन्हा तो बाहेर काढतो. त्याचे विच्छेदन करण्याचा धाडसी निर्णयही तो घेतो. सरतेशेवटी धाडसाच्या आणि कमालीच्या उत्कंठेच्या मालिकेतून जीवावर उदार होऊन जॅक हे काम पार पाडतो, परंतु त्यातून बाहेर आलेले सत्य डोक्याला मुंग्या आणणारे असते. काय असते ते सत्य हे सत्य पुस्तकात वाचणेच अधिक श्रेयस्कर होईल. रॉबिन कुकचे सर्वच लिखाण थरारक असते. त्याची शैली चित्रमय असते. पटकथा लिहिल्यासारखे प्रसंग कादंबरीत येतात. कोमामध्ये जी उत्सुकता शेवटपर्यंत आपणास लागून राहते. तशीच उत्सुकता ‘क्रायसिस’मधून आपल्याला जाणवते. धक्कातंत्राचा वापर आपल्याला स्तिमित करतो. कुक यांचे लिखाण डॉ. प्रमोद जोगळेकर यांनी तेवढ्याच प्रभावीपणे अनुवादित केले आहे. भाषांतर करण्याऐवजी त्यांनी अनुवाद केल्यामुळे अनेक घटना अधिक सुस्पष्ट होत जातात. बिटिविन द लाईन्स असा अनुवाद केल्यामुळे रॉबिन कुक आपल्याला अधिक भावतात आणि कादंबरीची पकड आपल्या मनावर अधिक दृढ होत जाते. ...Read more

  • Rating StarSHRAMIK EKJOOT 11-4-2010

    रॉबिन कुक यांनी वैद्यकीय सत्य आणि कल्पनाशक्ती याच्या संयोगाने वैद्यकीय क्षेत्रातील रोमांचक आणि नैतिक प्रश्नाची जाणीव करून देणाऱ्या कथा-कादंबऱयांची मालिका लिहिली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील गैरप्रकार, औषध संशोधन, अवयवरोपन, जैवअभियांत्रिकी जननक्षमतेवर उपय अशा विषयांचा वेध घेतला आहे. त्यांच्या कादंबऱयांमुळे देशात वादळे उठली आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील नीती-अनीतीच्या संकल्पना आणि त्याचे बाजारू बाजारू स्वरूप याचे थेट चित्रण रॉबिन कुक यांच्या लिखाणातून येत राहते. स्टेम सेलसारख्या अपरिचित विषयांवर त्यांनी केलेले लिखाण वाचकांचे रंजन करण्याबरोबर त्या विषयाची माहितीही देत राहते. आपल्या पुस्तकांच्या लोकप्रियतेचे आणि तुफान खपाचे रहस्य सांगताना ते म्हणतात, ‘आपण सगळेच असुरक्षित आहोत आणि कधी ना कधी आपण पेशंट असणार आहोत.’ वैद्यकीय क्षेत्रातील घटनांचा थेट मुळाशी जाऊन घेतलेला धांडोळा त्यांच्या ‘क्रायसिस’ या कादंबरीतून दिसून येतो. यापूर्वी ‘कंटेजन’, ‘टॉक्सिन’, ‘सिझर’, ‘क्रोमोझोम-६’ आणि ‘कोमा’ या कुक यांच्या कादंबऱ्या मराठीत आल्या आहेत. यापूर्वी इंग्रजीमध्ये त्यांच्या २५ कादंबऱ्या प्रकाशित झाल्या असून इंग्रजी वाचकांमध्ये त्या कमालीच्या लोकप्रिय आहेत. ‘क्रायसिस’मध्ये क्रेग बोमन हा निष्णात हृदयरोगतज्ज्ञ आहे. त्याच्यावर हलगर्जीपणा केल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाला असा आरोप येतो. नंतर खटला सुरू होतो. यानंतर कादंबरीला वेगळे वळण लागते. बोमनचा मदतनीस जॅक स्टेपलटन त्याच्या मदतीसाठी येतो. त्याचे स्वतःचे लग्न केवळ दोन दिवसांवर आलेले असते. परंतु बहिणीचा संसार वाचावा म्हणजेच बोमन आरोपातून निरपराध असल्याचे सिद्ध व्हावे यासाठी तो कसोशीने प्रयत्न करू लागतो. ज्या रुग्णाचा मृत्यू बोमनमुळे झाला त्या रुग्णाचे अनेक महिन्यांपूर्वी दफन केलेले शव पुन्हा तो बाहेर काढतो. त्याचे विच्छेदन करण्याचा धाडसी निर्णयही तो घेतो. सरतेशेवटी धाडसाच्या आणि कमालीच्या उत्कंठेच्या मालिकेतून जीवावर उदार होऊन जॅक हे काम पार पाडतो, परंतु त्यातून बाहेर आलेले सत्य डोक्याला मुंग्या आणणारे असते. काय असते ते सत्य हे सत्य पुस्तकात वाचणेच अधिक श्रेयस्कर होईल. रॉबिन कुकचे सर्वच लिखाण थरारक असते. त्याची शैली चित्रमय असते. पटकथा लिहिल्यासारखे प्रसंग कादंबरीत येतात. कोमामध्ये जी उत्सुकता शेवटपर्यंत आपणास लागून राहते. तशीच उत्सुकता ‘क्रायसिस’मधून आपल्याला जाणवते. धक्कातंत्राचा वापर आपल्याला स्तिमित करतो. कुक यांचे लिखाण डॉ. प्रमोद जोगळेकर यांनी तेवढ्याच प्रभावीपणे अनुवादित केले आहे. भाषांतर करण्याऐवजी त्यांनी अनुवाद केल्यामुळे अनेक घटना अधिक सुस्पष्ट होत जातात. बिटिविन द लाईन्स असा अनुवाद केल्यामुळे रॉबिन कुक आपल्याला अधिक भावतात आणि कादंबरीची पकड आपल्या मनावर अधिक दृढ होत जाते. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

NAGZIRA
NAGZIRA by VYANKATESH MADGULKAR Rating Star
कृष्णा DIWATE

आजच्या पुस्तकाचा विषय माझ्या आवडीचा - जंगलाचा... *जंगल - काय असतं ?* म्हटलं तर फक्त झाडे, नदी-नाले, प्राणी पक्षी यांनी भरलेला जमिनीचा एक तुकडा .... की वन-देवता? की पशु-पक्ष्यांचं घर? की जीवनचक्रातील अति-महत्वाचा घटक? की आपल्यातल्या दांभिकपणाला - दिखव्याला - व्यवहाराला गाळून टाकणारं आणि आपल्यालाही त्याच्यासारखाच सर्वसमावेशक, निर्मळ बनवणारं आणि आपल्यातल्या originality ला बाहेर आणणारं, असं एक अजब रसायन? *जंगल भटक्यांना विचारा एकदा... बोलतानाच त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात जी चमक दिसेल ना, त्यातून फार वेळ वाट न बघता सरळ जंगल गाठण्याची इच्छा न होईल तरच नवल!* आमचा एक मित्र- ज्याने असंच जंगलांचं वेड लावलं आणि अजून एक भटकी मैत्रीण - जिने त्या वेडात भरच घातली..... आणि असे अजून अनेक भटके निसर्गप्रेमी ... आणि मुळातूनच निसर्गाची ओढ , या सर्व गोष्टी माझ्या जंगल -प्रेमासाठी कारणीभूत ठरल्या. *आणि मग अरण्यऋषी श्री. मारुती चितमपल्ली, शंकर पाटील (कथा), डॉ. सलीम अली, जिम कॉर्बेट, व्यंकटेश माडगूळकर इत्यादींनी या निसर्गदेवतेकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी दिली. त्या सर्वांनाच आजचा हा पुस्तक-परिचय सादर अर्पण!!* कथांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लेखकाने हे नागझिरा पुस्तक का बरे लिहिले असावे? मनोगतात ते स्वतः म्हणतात - *"महाराष्ट्रातील एखाद्या आडबाजूच्या जंगलात जाऊन महिना दोन महिने राहावे, प्राणी जीवन, पक्षी जीवन, झाडेझुडे पाहत मनमुराद भटकावे आणि या अनुभवाला शब्दरूप द्यावे हा विचार गेली काही वर्षे माझ्या मनात घोळत होता. काही परदेशी प्राणी शास्त्रज्ञांनी असा उद्योग करून लिहिलेली उत्तम पुस्तके माझ्या वाचण्यात आल्यापासून ही इच्छा फारच बळवली. मी इथे तिथे प्रयत्न करून पाहिले आणि निराश झालो. हे काम आपल्या आवाक्यातले नाही असे वाटले. मग शेल्लरने कुठेतरी लिहिल्याचे वाचले की भारतातील लोक प्राणी जीवनाच्या अभ्यासात उदासीन आहेत, आफ्रिकेच्याही फार मागे आहेत. त्यांना वाटते अशा संशोधनासाठी प्रचंड खर्च करावा लागतो, पाण्यासारखा पैसा लागतो. पण तसे नाही. गळ्यात दुर्बीण, मनात अमाप उत्साह आणि आस्था असली की अभ्यास होतो. मी शक्य तेव्हा एकट्यानेच उठून थोडेफार काम करत राहायचे ठरवले. कधी काझीरंगा, मानस या अभयारण्यावर, कधी नवेगाव-बांधावर तर कधी कोरेगावच्या मोरावर लिहित राहिलो.* *मला चांगली जाणीव आहे की हा प्रयत्न नवशिक्याचा आहे. तो अपुरा आहे, भरघोस नाही. त्यात बऱ्याच त्रुटी आहेत, पण नव्या रानात शिरण्यासाठी पहिल्यांदा कोणीतरी वाट पाडावी लागते. पुढे त्या वाटेने ये-जा सुरू होते. मी लहानशी वाट पाडली आहे एवढेच!"* लेखक आत्ता असते तर त्यांना नक्की सांगितले असते की तुम्ही पाडलेली पायवाट आता जवळ-पास राजमार्ग बनत चालली आहे. आज अनेक वन्य-जीव अभ्यासक, जंगल भटके सुजाण व सतर्क झाले आहेत, जंगले आणि प्राणी वाचले पाहिजेत यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ह्या प्रयत्नांमागे लेखकासारख्या अनेक वनांचा अभ्यास करून ते आपल्यासमोर आणणाऱ्यांचा मोठा हात आहे. आज पक्षी-निरीक्षक किरण पुरंदरेंसारखे व्यक्ती शहरातील सगळा गाशा गुंडाळून जंगलात राहायला गेलेत ... काय नक्की thought -process झाली असेल त्यांची? फक्त जंगल-भटकंती करताना पाळावयाचे नियम अत्यंत महत्वाचे आहे. मुख्यत्वे-करून कुठल्याही वृक्षांचे, प्राणी-पक्ष्यांचे आपल्या असण्याने कुठलाही त्रास किंवा धोका - हानी संभवू नये, याची काळजी आपल्यासारख्या सुज्ञ भटक्यांनी नक्की घ्यावी. तरच हे भटकणे आनंद-दायी होईल. *भंडारा जिल्यातील नागझिरा हे एक अभयारण्य! फार सुंदर आहे.* हे पुस्तक फक्त लेखकाच्या दृष्टीने त्यांना भावलेलं जंगल आहे का? फक्त जंगलाचं वर्णन आहे का? तर नाही. एक पट्टीचा कथालेखक आणि मानव-स्वभाव चितारणारा लेखक केवळ वर्णन करू शकत नाही. माझ्या मते ही एक प्रक्रिया आहे, त्यांच्या अंतर्बाह्य बदलाची, जी त्यांना जाणवली, अगदी प्रकर्षाने. आणि तोच स्वतःचा शोध त्यांनी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. बाकी प्रत्येकाचं जंगल वेगळं, खरं जंगल नाही तर स्वतःच्या आतलं एक जंगल. ते ज्याचं त्याने शोधायचं, त्यात डुंबायच, विहार करायचा आणि काही गवसत का ते बघायचं .... लेखकानेही तेच केलं... एक स्वगत मांडलं आहे.... आणि त्यातून संवादही साधला आहे. हे पुस्तक ललित म्हणावे की कादंबरी, वर्णन म्हणावे की आत्मकथन, अशा हिंदोळ्यावर हे वाचताना मी सतत राहते. अतिशय आशयपूर्ण गहिऱ्या अर्थाचे लिखाण आहे यात. लेखकाने नागझिरा आणि त्याचे वर्णन कसे केले आहे ते आपण रसिक वाचकांनी हे पुस्तक वाचूनच त्याचा आनंद घ्यावा. ते इथे मी सांगत बसणार नाही, उगाच तुमचं आनंद का हिरावून घेऊ? मी इथे मला भावलेले लेखकच मांडण्याचा अल्पसा प्रयत्न करत आहे, ते ही या पुस्तकाच्या माध्यमातून... पहिल्याच पानावर ते काय लिहितात बघा - *"गरजा शक्य तेवढ्या कमी करायच्या, दोनच वेळा साधे जेवण घ्यायचे, त्यात पदार्थ सुद्धा दोन किंवा तीनच. स्वतःचे कामे स्वतःच करायची. पाणी आणणे, कपडे धुणे अंथरून टाकणे आणि काढणे या साध्या सुध्या गोष्टींसाठी माणसांनी दुसऱ्यावर का अवलंबून राहावे? एकांत, स्वावलंबन आणि प्रत्येक बाबतीत मितव्यय ही त्रिसूत्री पाळून जंगलात पायी भटकायचे, जंगलाच्या कुशीत राहून निरागस असा आनंद लुटायचा या माफक अपेक्षेने गेलो आणि माझा काळ फार आनंदत गेला . रेडिओ, वृत्तपत्रे, वाङ्मय चर्चा, वाचन, कुटुंब, मित्र, दुसऱ्याच्या घरी जाणे येणे, जेवण देणे आणि घेणे यापैकी काहीही नसताना कधी कंटाळा आला नाही. करमत नाही असे झाले नाही. रोज गाढ झोप आली. स्वप्न पडले असतील तर ती सकाळी आठवली नाही. शिवाय मित आहार आणि पायी हिंडणे यामुळे चरबी झडली. एकूणच मांद्य कमी झाले."* हे वाचून आपल्याला नक्की काय हवे असते, आणि रोजच्या रहाटगाडग्यात आपण काय करतो, याची मनातल्या मनात तुलना व्हावी. खरंच काय हवं असतं आपल्याला? आपण सतत प्रेम, शांती, समाधान आणि मनःशांती याच्याच तर शोधात असतो ना? आणि नेमक्या ह्याच सर्व गोष्टी बाजूला पडून आपण नुसते धावतच असतो... कशासाठी?? जीवनाचं तत्वज्ञान हे फार गंभीर नाहीये, अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून आपण ते समजून घेऊन शकतो. फक्त ती जाण असली पाहिजे. थोडासा थांबून विचार झाला पाहिजे. मनःचक्षु उघडे पाहिजे आणि मुख्य म्हणजे मी कुणीतरी मोठा , हा भाव पहिल्यांदा गाळून पडला पाहिजे. *अगदी तसंच जसं पानगळीच्या मोसमात जुनं पान अगदी सहज गळून पडतं ... नव्यासाठी जागा करून देतं ... जंगल आपल्याला हेच शिकवतं ... न बोलता ... त्याच्या कृतीतून ... आपली ते समजून घेण्याची कुवत आहे का?* शेवटच्या प्रकरणात लेखक परतीसाठी रेल्वे फलाटावर येतो. तेव्हाचचं त्यांचं स्वगत फार विचार करायला भाग पाडतं - *"ह्या दोन तासात करण्याजोगे असे काहीच महत्त्वाचे कार्य नसल्यामुळे मी आरशासमोर बसून दाढी केली, मिशा काढून टाकल्या. सतत अंगावर होते ते हिरवे कपडे काढून टाकले आणि इतके दिवस माझ्या कातडी पिशवीच्या तळाशी परिटघडी राहिलेले झुळझुळीत कपडे चढवून पोशाखी बनलो.`* किती साधी वाक्य आहेत, पण `पोशाखी बनलो` यातून किती काय काय सांगायचे आहे लेखकाला... गहिरेपण जाणवते! मला विचार करायला भाग पाडते. ट्रेक करून गड -किल्ल्यांहून परतताना माझीही अवस्था काहीशी अशीच व्हायची... जाड पावलांनी घरी परतणे आणि पुन्हा निसर्गात भटकायला मिळण्याची वाट पाहणे, याशिवाय गत्यंतर नसायचे. *जंगलांवर , निसर्गावर निस्सीम प्रेम करणाऱ्या आणि त्यांच्या संवर्धनासाठी झटणाऱ्या अनेक वेड्यांमुळे आज आपली वसुंधरा टिकली आहे. पुढील पिढ्यांसाठी तिला असच बहरत ठेवायचं असेल, किमान टिकवायचं जरी असेल तरी आपणही थोडेसे निसर्ग-वेडे व्हायला काय हरकत आहे??* *वृक्षवल्ली आम्हा सोयरे... वनचरे ...* धन्यवाद! जय हिंद!!! ...Read more