* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788184989861
  • Edition : 3
  • Publishing Year : MAY 2014
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 532
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
INTERACTIONS BETWEEN HUMANS ARE ALWAYS OF PRIME IMPORTANCE. THEY HELP TO BUILD PERSONALITIES. THE SAME APPLIES TO ANIMALS. PERSPECTIVE MAY VARY. THERE IS ALWAYS SOME KIND OF DIALOGUE BETWEEN TWO LIVING THINGS. TWO MINDS COME TOGETHER WITH PROFOUND INTEREST BASED ON HUES OF EMOTIONS AND FEELINGS. LOVE, AFFECTION, HOPES, ANTICIPATION, JEALOUSY, COMPETITION, RIVALRY…THE LIST IS ENDLESS, ALL PART OF A GAME, A VERY UNPREDICTABLE ONE. THE MILIEU INITIATES AND MAKES US PLAY. VERY FEW ARE ABLE TO TOTALLY IGNORE THE RULES AND CONSEQUENCES. THEY EMERGE AS THE CONQUERORS. OTHERS WHO FAIL TO OVERCOME THE MILIEU REMAIN CONFINED TO THE GAME, PLAYING, WORKING, WEARING THEMSELVES OUT. THEY KEEP ON WALKING AND TRUDGING. THEY CANNOT STOP EVEN IF THEY SLIP OR FALL OR BREAK; EVEN IF THEIR MINDS FLARE WITH PIERCING AND TORMENTING FIRE.
’’माणसामाणसांमध्ये घडणाऱ्या आंतरक्रियांना कमालीचं महत्त्व असतं. माणसाची जडण-घडण यांच्या माध्यमातून होत असते. जनावराचंही असंच असतं. भलेत्याचे माप दंडवेगळे असतील; पण दोन घटकांत संवाद हा घडतच असतो. दोन माणसं कधी एकत्र येताना दिसतील, तर कधी एकमेकांच्या बोकांडी बसलेलीही आढळतील. प्रेम, वात्सल्य, आशा-आकांक्षा, ईर्षा, स्पर्धा, संघर्ष अशा अनेक निर्यांचा हा हुतूतू. तो कधी कोणतं वळण घेईल, याचं अनुमान बांधणंही कठीण. मात्र, या सर्व बाहुल्यांना खेळवण्याचं काम करतेती भोवतालची परिस्थिती! तिला पायदळी तुडवून एखादं पुढे गेलं तर ते महानायक/महानायिका ठरतं. इतरांसाठी मात्र असतं ते तेच रिंगण. घाण्याला जुंपलेल्या बैलासारखं; झापडबंद...! कधी झापड सरकलं, घसरलं, तुटलं, खाली पडलं तरी चालत राहायचं, ऊरफाटंस्तोवर!...तोच हा मराठी मनाचा दाह!’’

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #DAAHA #DAAHA #दाह #FICTION #MARATHI #SURESHPATIL "
Customer Reviews
  • Rating Starडॉ नरेंद्र कदम

    दिनांक: ०७/११/२०२३ परिचयकर्ता: डॉ नरेंद्र भिकाजी कदम. पुस्तकाचे नाव: दाह लेखक: श्री सुरेश पाटील प्रकाशन: मेहता पब्लिशिंग हाऊस पृष्ठ संख्या: ५२४ मूल्य: रु ४९५/- प्रथमावृत्ती : मे २०१४ एकदा का मुंबईत शिरले की मुंबईच्या चाळीत शिरणे अपरिहार्य हे. मुंबईच्या चाळीची ओळख झाल्याशिवाय मुंबईची ओळख अपूर्ण आहे. मुंबईचा इतिहास फारच रंजक आहे, हे आपण कालच्या पुस्तक परिचयातून पाहिले. मुंबईच्या इतिहासा इतकाच रंजक इतिहास मुंबईच्या चाळींचाही आहे. मुंबईतल्या चाळी ही काय गंमत आहे हे त्या चाळीत राहिल्याशिवाय समजून घेणे थोडे अवघडच आहे. मुंबईच्या चाळीत माणसाची सोय होण्यापेक्षा गैरसोयच जास्त होत होती. मुंबईची भरभराट होण्यासाठी कारणीभूत असलेल्या मुंबईच्या गिराण्यांच्यामुळे प्रसिद्ध झालेला मुंबईचा गिरणगाव अन या गिराण्यांमध्ये काम करणाऱ्यांच्या केवळ रहाण्याची सोय व्हावी या कारणासाठी गिरणगावात निर्माण झालेल्या या मुंबईच्या चाळी. या गिरण्यात काम करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून माणसे मुंबईत आली होती. यात प्रामुख्याने भरणा होता तो कोकणातून आणि पश्चिम महाराष्ट्रातून आलेल्या जनतेचा. पश्चिम महाराष्ट्रातून आलेली ही जनता मुंबईच्या चाळीत प्रामुख्याने बैठकीच्या गाळयात रहात होती. दहा बाय दहा किंवा दहा बाय बाराच्या एका गाळयात एकावेळी एका गावातली (सांगूनही विश्वास बसणार नाही एवढी) सत्तर ते शंभर माणसे रहात होती. रात्रीचे अंथरूण आणि अंगावरचे कपड्यांचे दोन जोड ठेवण्यापूरते या बैठकीच्या गाळयांचा त्यांना उपयोग होता. चाळीचे पटांगण, वऱ्हांडा, मालाचे गोडाऊन, फुटपाथ, रस्त्यावर उभी हातगाडी, मैदान अशा कोणत्याही ठिकाणी पथारी टाकून ते आपल्या रात्री घालवून चाळीच्या सार्वजनिक नळावर स्नानादीक इतर सगळ्या गोष्टी आटोपत होते. बैठकीच्या गाळयात रहाणाऱ्या या लोकांच्या जेवणाची सोय व्हावी म्हणून प्रत्येक चाळीत रहाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील अनेक बायकांनी कुटुंबाच्या अर्थकारणात आपला आर्थिक हातभार लागावा या उद्देशाने खाणावळीची सोय केली होती. पंचक्रोशीतून मुंबईत कामासाठी येणारी मंडळी सहसा या खानावळींच्या आसऱ्याने आपले दिवस कंठीत होती. दाह या सुरेश पाटीलांच्या कादंबरीचे कथानक मुंबईतल्या राजाजी मँन्शन नावाच्या चाळीत आणि या चाळीतल्या अनेक खाणावळी यांच्याभोवती गुंफले आहे. लेखक सुरेश पाटील हे पानिपतकार विश्वास पाटील यांचे बंधू असून ते पत्रकारीतेत कार्यरत आहेत. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करून ते काही काळ शासनाच्या सेवेत राजपत्रित अधिकारी म्हणून कार्यरत होते. दाह ही त्यांची पहिलीच कादंबरी असून, त्यांना या कादंबरीसाठी दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा ‘शंकर खंडू पाटील साहित्य पुरस्कार’ मिळाला आहे. शिवाय या कादंबरीला इतरही अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. दैनिक महाराष्ट्र टाइम्स, दैनिक सामना, आकाशवाणी इत्यादींनी माध्यमांनी या साहित्यकृतीची अमाप स्तुती केली आहे. प्रत्येक कादंबरी सहसा एका विशिष्ट चाकोरीत, एखादे विशिष्ट कथानक घेऊन पुढे जात असते. एखादे कुटुंब, त्यांच्याशी निगडीत घटना, दोन जीव, अनेक प्रसंग, निरनिराळी पात्रे अशा अनेक गोष्टी एकत्र गुंफून कादंबरीची रचना केलेली असते. या सगळ्या चाकोरीबद्ध मान्यतांना दाह या कादंबरीत फाटा दिलेला आढळतो. कोणतेही एक कथानक न घेता केवळ माणसामाणसांत घडणाऱ्या आंतरक्रियांचा मांडलेला लेखाजोखा असे या कादंबरीचे वर्णन करता येईल. अनेक व्यक्तिरेखा, अनेक प्रसंग, अनेक नातेसंबंध व या नातेसंबंधांतील अनेक गुंते या कादंबरीत एकत्र आलेले आहेत. यातील एका गुंत्याची उकल करायला जावे तर पुढचे अनेक गुंते पुढे येतात. प्रेम, वात्सल्य, मैत्री, इच्छा, आशा-आकांक्षा, ईर्षा, स्पर्धा अन त्यातून निर्माण होणारा संघर्ष. मानवी जीवनाचे असे एकापेक्षा अनेक कंगोरे या कादंबरीच्या प्रत्येक पानापानात भेटीला येतात. मानवी जीवनाच्या निरनिराळ्या कंगोऱ्यांचे, एका संस्कृतीचे, समूहाचे उत्कृष्ट चित्रीकरण या कादंबरीत आहे. हे सगळे प्रसंग घडवून आणायला कारणीभूत असणारी परिस्थिती ही खऱ्या अर्थाने कादंबरीची नायिका आहे असे म्हणायला हरकत नाही. अर्थात या सगळ्या कादंबरीत मुख्यत्वे पात्रांच्या स्वभावविशेषा प्रमाणे त्यांना वागायला लावणारी ही परिस्थिती, ती कादंबरीतील सर्व पात्रांना खेळवते आहे. कादंबरीत घडणाऱ्या सगळ्या गोष्टी घडवून आणते आहे. या परिस्थितीमुळे पात्रांच्या आपापसातील नातेसंबंधांत घडणारे सगळेच प्रसंग फारच नाट्यमय आणि उत्कंठावर्धक होतात. काही ठिकाणी हे प्रसंग समाजातील उच्चभ्रू किंवा पांढरपेशा लोकांच्या सामाजिक मान्यतांना छेद देणारे झाले आहेत. कादंबरीच्या ओघात अनेक ठिकाणी येणारे शारीरिक संबंध नीती-अनीतीच्या कल्पनांना सुरंग लावून जातात. या कादंबरीतील पात्रांच्या सामाजिक स्तरामुळे कादंबरीत अनेक ठिकाणी शिवराळ संवादांची जोरदार चकमक घडते. या शिवराळ उच्चारणांना चाळीतल्या खाणावळी बायका अत्यंत सहजगत्या उच्चारुन जातात. परंतु ही एक सापेक्ष गोष्ट आणि कादंबरीची गरज म्हणून वाचक त्या गोष्टीला मनाविरुद्ध का होईना पण स्वीकारतो. या लोकांचे आपापसातले हेवेदावे, प्रसंगी आपले काम करून घेण्यासाठी केली जाणारी लाडीगोडी प्रसंगी त्यासाठी दिला जाणारा आर्थिक, शारीरिक मोबदला या साऱ्या प्रसंगातून आपल्या कल्पना विश्वाच्या बाहेरची कादंबरी समोर उलगडली जाते. घडणाऱ्या प्रत्येक प्रसंगात इतके नाट्य आहे की या कादंबरीच्या प्रत्येक प्रकरणातून पुढे येणारे अनेक प्रसंग हे नवीन कादंबरीचा विषय ठरू शकतील. या कादंबरीचे सर्व कथानक चण्याचा माळा असे नाव पडलेल्या राजाजी मँन्शन या चाळीत घडते. या कादंबरीतील बहुतांश पात्र महाराष्ट्राच्या ज्या भागातून आलेली आहेत त्या भागाशी त्यांची नाळ अजूनही घट्ट आहे. कादंबरीत वर्णन केलेल्या अनेक प्रसंगातून त्यांची त्यांच्या मातृभूमीची ओढ लक्षात येते. कादंबरीत निरनिराळ्या प्रसंगी साजऱ्या केल्या जाणाऱ्या वर्षांच्या अनेक सणांच्या वर्णनातून त्यांची ही नाळ स्पष्टपणे अधोरेखित होते. ज्या उत्साहाने गावाकडे प्रत्येक सण साजरा केला जातो त्या उत्साहाने सदानकदा जागेची अडचण असलेल्या मुंबईत हे सण साजरे करणे अशक्यच आहे. तरीही नागपंचमीला नाग पुजणे, बेंदराला मातीचे बैल पुजणे, इतर सणांच्या दिवशी खाणावळीत पोळ्या किंवा करंज्या करणे या प्रथा त्यांची गावाची ओढ, गावाच्या मातीशी त्यांचे इमान दाखवून जातात. मुंबई सारख्या कॉस्मोपॉलिटन शहराचे रीतिरिवाज अंगिकारणे, अनुसरणे, अन दुसरीकडे ते ज्या संस्कृतीतून आले त्या संस्कारांचे ओझे वहाणे, यातून निर्माण होणारी त्यांची कुतरओढ वारंवार या कादंबरीतून समोर येते. त्यांनी मुंबईच्या या बहुरंगी बहुढंगी जीवनाला कितीही आपलेसे केले तरी शेवटी त्यांची मातृभूमीची ओढ अधिक आहे हे जाणवून येते. चाळीतील एकापेक्षा जास्त खाणावळींच्या भोवती फिरणारे हे कथानक, मुंबईच्या चाळीची एक प्रातिनिधिक माहिती देऊन जातात. सदासर्वदा चाळीत ओसांडून वहाणारी गटारे, चाळीतले घाणीचे साम्राज्य, चाळीत एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी जायला असलेले अडचणींनी भरून राहिलेले वटान (गॅलेरी), चाळीतल्या सार्वजनिक शौचालयांची दुरावस्था या सगळ्या गोष्टीं कादंबरीच्या अनुषंगाने अंगावर काटा उभा करतात. त्यांच्या दैनंदिन जीवनात निर्माण होणाऱ्या या सगळ्या गैरसोयींवर खंबीरपणे मात करून चाळीतील खाणावळ कशा जीवन जगत होत्या ते दाखवून जातात. या खाणावळी चालवताना स्त्रियांना उपसावे लागणारे अपार कष्ट, चूल, स्टोव्ह आणि नंतर गॅस समोर बसून पन्नास, शंभर लोकांच्या थापल्या जाणाऱ्या भाकऱ्या, केल्या जाणाऱ्या चपात्या या साठी त्या बाया किती कष्ट उपसत असतील याची कल्पना देऊन जातात. दिवसभर चुलीसमोर बसल्याने चुलीच्या उष्णतेने होणारे त्यांचे शारीरिक हाल. स्वयंपाकासाठी लागणारे पाणी चाळीच्या सार्वजनिक नळांवरून भरताना करावी लागणारी कसरत, स्टोव्हसाठी पैदा करावे लागणारे रॉकेल हे सगळे जमवण्याचे उत्तरदायित्व केवळ आणि केवळ खाणावळी बायकांवर. खानावळींच्या नवऱ्यांना मात्र चाळीत जिन्याखाली किंवा कोणाच्या तरी रूमध्ये सहजा-सहजी मिळणारी दारू आणि त्यांनी इतर बायकांशी केलेली लफडी याशिवाय इतर काही काम नव्हते. चाळीच्या अशा या वातावरणात मुलांवर होणारे चांगले वाईट संस्कार. या सगळ्या चांगल्या वाईट संस्कारांवर कुरघोडी करून वयाने वाढणारी मुले, तारुण्य सुलभ वयात त्यांची चाळीत घडणारी प्रेम प्रकरणे, त्यातून घडणारे गर्भपात, एखाद्या सुंदर दिसणाऱ्या मुलीच्या शरीराचा स्पर्श मिळावा म्हणून केले जाणारे अतर्क्य कारनामे, या सगळ्या गोष्टी अत्यंत खुल्लेपणाने या कादंबरीत येतात. या मुलांनी केलेले याहूनही भयंकर अपराध, अशा अनेक डोक्याला झिणझिण्या आणणाऱ्या प्रसंगातून कादंबरी नदीसारखी पुढे वहात रहाते. ज्यांनी चाळीचे जीवन अनुभवले आहे त्यांना त्यांच्या चाळीतील दिवसांची आठवण करून देणारे अनेक प्रसंग या कादंबरीतून अक्षरश: अंगावर येतात. चाळीत सदोदित चहूबाजूला असलेले घाणीचे साम्राज्य, या घाणीचा चाळीत भरून राहिलेला वास, चाळीतल्या शौचालयांची दुरावस्था इत्यादी सर्व अभावांवर मात करूनही ही मंडळी आपली संस्कृती जपण्याचा करत असलेला प्रयत्न अंगावर शहारे आणतो. अनेक चाळीत चांगल्या पेक्षा वाईटच जास्त घडत असते. चण्याच्या माळ्यात घडत असलेल्या या साऱ्या वाईट प्रसंगातून या खाणावळींचे जीवन किती त्रासदायक होते हे दिसून येते. अशा या नकारात्मक वातावरणात राहूनही एखादा कोणी जेव्हा स्पर्धा परीक्षा पास करतो तेव्हा इथे केवळ नकारात्मकताच भरून वहाते असे म्हणणे चुकीचे होते. नकारात्मक वातावरणात राहूनही आपण त्या प्रवाहात कितपत वाहून जायचे हे आपल्या हातात आहे हा एक लाखमोलाचा संदेश त्यातून प्राप्त होतो. जीवनात ध्येय गाठायचे असेल तर अभावाला मागे सारून पुढे जात राहिले पाहिजे. ही कादंबरी मुळात एका सर्वकष संस्कृतीचे व्यापक चित्रीकरण आहे. लेखकाला ही संस्कृती जशी दिसली जशी भावली त्याने त्याच पद्धतीने याचे चित्रीकरण केले आहे. हे चित्रीकरण करताना लेखकाला आलेल्या अनुभूतीला शब्दबद्ध केल्यामुळे हे चित्रीकरण वास्तवाला धरून आहे असे जाणवते. भाषेची आक्रमकता हा कादंबरीचा स्थायीभाव आहे, त्यामुळे काही प्रसंगात, त्या प्रसंगांचा बटबटीतपणा चांगलाच जाणवून येतो. काही पात्रांच्या तोंडी काही परिस्थितीनुरूप आलेले काही संवाद अगदीच पांचट वाटतात. पण त्या कथानकाची गरज आणि त्या संस्कृतीचा तो अविभाज्य भाग आहे असे समजून वाचक त्याचा स्वीकार करून पुढे जातो. या कादंबरीत असलेल्या पात्रांच्या भाऊगर्दीमुळे अनेकदा अनेक संदर्भ तुटून गेल्या सारखे वाटतात. पुन्हा त्याचा पुढचा धागा जिथे गवसतो तिथे तो संदर्भ जुळवण्यासाठी आठवणींना विनाकारण ताण द्यावा लागतो. कादंबरीचा बाज हा पठडीबद्ध नसल्यामुळे त्यात सुसंस्कृतपणा, कलात्मकता, अलंकृत भाषा, व्याकरणीय सौंदर्य या गोष्टींचा अंतर्भाव अभावाने दिसून येतो. कादंबरीतील पात्रांच्या तोंडी त्यांच्या बोलीभाषेचा प्रभाव घडणाऱ्या नाट्याला प्रभावीपणे मांडतो. कादंबरीची भाषा एकदम रांगडी आहे त्यामुळे प्रत्येक पात्राच्या तोंडी अपरिहार्यतेने अनेक शब्द असे येतात जे वाचताना नकळत आपण आजूबाजूला कोणी आपल्याला वाचताना पहात तर नाही ना? हे पाहून घेतो. कदाचित आपल्यावर असलेल्या आपल्या संस्कृतीच्या प्रभावामुळे या गोष्टी मान्य करण्यासाठी आपले मन सहजासहजी तयार होत नाही. मीही मुंबईतल्या अशाच एका चाळ संस्कृतीत वाढलो आहे. मुंबईच्या चाळ संस्कृतीला फार जवळून अनुभवले आहे म्हणूनच या कादंबरीतील काही प्रसंग अतर्क्य वाटतात. ही एक अंगावर येणारी अत्यंत आक्रमक कादंबरी आहे. वाचताना सोवळे ओवळे न पाळणाऱ्यांना एका वेगळ्या जगाची ओळख करून देणारी कादंबरी म्हणून वाचायला हरकत नाही. डॉ नरेंद्र कदम drnbkadam@gmail.com #दाह #सुरेश पाटील #मुंबई #मुंबईची चाळ#खाणावळ #वटाणा #वाचनवेडा #वाचनवेल#पुस्तकप्रेमी #डॉ नरेंद्र कदम # ...Read more

  • Rating StarEknath Marathe

    मुखपृष्ठ बघितले की लगेच त्याचा विषय मुंबईच्या चाळ संस्कृतीचा असणार हे लक्षात येते. ही महाकादंबरी नावाप्रमाणेच दाहक आहे. ज्यांनी "बटाट्याची चाळ वाचली" आहे त्यांना चाळीतले धगधगीत वास्तव, दाहकता पचनी पडायला जड जाईल. या कधीही कोसळेल अशा चाळीत अनेक मराठ कुटुंबे आयुष्याची लढाई निकराने लढत आहेत. चांगले, वाईट, खरे ,खोटे, सत्य , असत्य यात कशातही अडकून न पडता चाळकरी आयुष्याची लढाई लढत आहेत. मालकाची चाळ पाडायची कारस्थाने, चाळीत खानावळ चालवणाऱ्या खानावळी, त्यांचे नवरे, त्यांची मुले, त्यांच्या कडे जेवायला येणारे खानावळे, त्यांचे परस्पर कडू, वाईट, गोड संबंध, 10 x 10 मध्ये फुलणारे प्रेम प्रेम कधी रांगडे कधी वासनेने बरबटलेले, दारुडे , फुटलेली गटारे, तुंबलेले संडास, पाण्यासाठीची हातघाई, लफडी, कारस्थाने, कुत्री, मांजरी, उंदीर, घुशी, सणावाराच्या दिवशी असणारा थाट, भोंदू स्वामी व त्याच्या नादाला लागून उद्ध्वस्त होणारी कुटुंबे , पोलीस, गल्लीतले नेते.. असे अनेक चांगले वाईट, भले बुरे प्रसंग, लेखक आपल्या साक्षी भावनेने दाखवून आणतो. कादंबरीत नायक किंवा नायिका अशी कोणीच नाही. पण तरीही कमळ जायकर ही खानावळी शेवटी चाळ पाडत असलेल्या जे सी बी खाली येवून मरते हा शेवट अस्वस्थ करून सोडतो. मुंबईत आता चाळी फारशा उरल्या सुद्धा नसतील. कादंबरीत आलेला काळ साधारण 1990 च्या दशकातला असावा. चाळ संस्कृतीच्या अनेक वैशिष्ट्यांचे कंगोरे घ्यायचा पुरेपूर प्रयत्न लेखकाने या महा कादंबरीत केलेला आहे. एकदा वाचायला घेतली की खाली झपाटून पुरी करावी अशी आहे. लॉक डाऊन काळात जरूर वाचा. ...Read more

  • Rating Starमुबई, प्रहार २४ एप्रिल २०१६

    लेखक सुरेश पाटील यांची ‘दाह’ कादंबरी वाचायला हाती घेतल्यावर पूर्ण झाल्याशिवाय खाली ठेवावीशी वाटत नाही. याचं कारण कादंबरीची वास्तवाशी जुळलेली नाळ. आपण सुरुवातीची जी सण, उत्सव, मयत, साखरपुडा, बारशी लग्न सारख्याच उत्साहानं पार पाडणारी मराठी माणसं पाहिली ती या कादंबरीत आपल्याला भेटतात. सुरेश पाटील यांनी रेखाटलेली प्रतीक व्यक्तिरेखा कुठेतरी, कधीतरी आपल्याला भेटलेली आहे. त्यामुळे वाचक कादंबरीशी चट्कन जोडला जातो. दक्षिण मुंबईतील ‘चण्याचा माळा’ नावाची चाळ. त्या चाळीत राहणारे चाळकरी त्यांचे एकमेकांशी असलेले संबंध, त्यातील गुंतागुंत सुरेश पाटील यांनी उत्कटपणे लिहिली आहे. मुंबईतील प्रत्येक चाळ, गल्ली, बोळ यांच्या नावासोबत त्यांचा गतकाळ जोडला गेला आहे. मूळ नाव आणि लोकांनी ठेवलेलं नाव यात जमीन अस्मानचा फरक आहे. लोकांनी ठेवलेली नावचं जास्त रूढ आहेत. असंच ‘चण्याचा माळा’ चाळीचं आहे. सात मजली इमारतीतील प्रत्येक बिNहाडाचं अंतरंग ‘दाह’ कादंबरी उलगडतना लेखक सुरेश पाटील यांनी त्यांच्या वैविध्यातूनही त्यांचा माणूस असण्याचा धागा पकडून ठेवला आहे. मुळात तोच ‘दाह’चा गाभा आहे. माणसाचं इतरांशी आणि स्वतःशी असलेलं नातं. त्यांचं अनेकदा सुसंगत तर अनेकदा अतार्विâक वागणं याने वाचकही कुटुंबाशी जोडला जातो. कादंबरीची भाषा ही आपल्या नित्य वापराची आणि मराठी माणसांच्या सवयीची आहे. ओघात येणाNया शिव्या, स्त्रियांनी एकमेकांना सहजच ‘ए राडेऽऽ’ म्हणत अशी अनेक तपशिलामुळे कादंबरीतली माणसं आपल्याला आपली वाटतात. एकेकाळची मराठी माणसांची त्यांच्या हेव्यादाव्यांनी, सण उत्सवांनी गजबजलेली मुंबई त्यांच्याच चुकांमुळे कशी धनदांडग्याच्या हातात गेली याचं इत्थंभूत वर्णन ‘दाह’ कादंबरीमध्ये आहे. साधारण १९६० सालापासून ते टीव्ही, मोबाईलचे आगमन, माणसातील बदलत जाणारे नातेसंबंध, व्यवहार न कळल्यामुळे खानदान आणि गावातच जीव अडवूâन राहून स्वतःचीच प्रगती न होऊ दिलेली मराठी माणसं यात भेटतात. जागतिकीकरणाचा रेटा, जागेला आलेल्या विंâमती यामुळे मुंबईतून हद्दपार झालेल्या उपनगरात विखुलेला मराठी माणूस ‘दाह’ कादंबरीत पावलोपावली भेटतो. ऐतिहासिक गिरणी संप त्यामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणीगाव आणि पर्यायाने संपलेला मराठी माणूस याचं सामाजिक दस्ताऐवजीकरण या कादंबरीतून हाती लागतं. मुंबईतल्या स्थित्यंतराचा अत्यंत डोळसपणे कुठलाही आव न आणता घेतलेला धांडोळा असं एका वाक्यात दाह कादंबरीचं वर्णन करता येईल. नवोदित क्रिकेटपटूने पहिल्या बॉलमध्ये षट्कार ठोकावा आणि साNयांनी अवाव्â व्हावं अशी सुरेश पाटील यांच्या लेखक म्हणून पहिल्या कादंबरीने वाचकांची अवस्था केली आहे. मेहता पाqब्लशिंग सारख्या प्रकाशकांनी अतिशय बांधेसूद आणि देखण्या स्वरूपात कादंबरी सादर केली आहे. चंद्रमोहन कुलकर्णी यांनी मुखपृष्ठ चितारताना डोळ्यांवर येणारा लालरंग कादंबरीच्या ‘दाह’ नावातील तीव्रता व्यक्त करणारा आहे. मनाचा ठाव घेणारी आणि काळजाशी जवळीक सांगणारी प्रत्येक मराठी माणसाने वाचलीच पाहिजे अशी ‘दाह’ कादंबरी आहे. दै. प्रहार, मुंबई २४/४/२०१६ ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more